अंताक्षरीचे नियम
१. गाण्याची सुरूवात ही सुरूवातीपासून केली जावी. फक्त सुरूवातीचे आलाप किंवा गुणगुणणे वगळावे. गाण्याचे धृपद पूर्ण लिहीले जावे. धृपद पूर्ण लिहीले नसेल किंवा गाण्याची सुरूवात सुरूवातीपासून केली नसेल तर गाणे बाद धरले जाईल.
२. गाणं त्या पानावरुन वाहून गेल्याशिवाय त्याची पुनरुक्ती करु नये.
३. दोन किंवा अधिक गाणी एकाच वेळी किंवा काही अंतराने पण एकाच अक्षरापासून लिहीली गेली तर सर्वात आधी आलेलं गाणं ग्राह्य धरुन पुढील गाणे लिहावे.
४. अ, आ, ओ सारखे स्वर स्वतंत्रपणे वापरले जावेत अपवाद इ / ई आणि उ / ऊ चा).
५. नवीन गाण्याची सुरूवात आधीच्या गाण्याच्या शेवटच्या अक्षराने किंवा शेवटच्या एक अथवा अधिक शब्दांनीही करता ये_ईल. शेवटचा शब्द घ्यायचा असेल तर तो आहे तसाच घेतला जावा. त्याची रूपे किंवा समानार्थी शब्द घे_ऊ नयेत.
६. फक्त मराठी अंताक्षरीमध्ये शेवटचे अक्षर ल\' असल्यास, पुढचे गाणे एकतर, \'ल\' पासूनच लिहावे, किंवा उपांत्य अक्षरापासून लिहावे. हा नियम हिंदी अंताक्षरीसाठी लागू नाही
७. मराठी अंताक्षरीमध्ये शेवटचे अक्षर ठ' असेल तर ते गाणे लिहीणार्याने पर्याय द्यावा अन्यथा पुढील गाणे लिहीणार्याने उपांत्य अक्षरापासून पुढचे गाणे लिहावे.
८. मराठी अंताक्षरीमध्ये सहज टाळता येण्यासारख्या काही चुका
८.१. 'पाहुनी रघुनंदन सावळा' ही गाण्याची सुरूवात आहे, 'लाजली सीता स्वयंवराला' नव्हे.
८.२. 'निंबोणीच्या झाडामागे' ही सुरूवात बरोबर आहे लिंबोणीच्या झाडामागे' नव्हे.



मी हरणुली होईन, मी हरणुली होईन
चौखुर धावेन, मुरडत मिरवीन
तू परि येता वनि, लपुनी तुज न गवसेन
डौल मोराच्या मानंचा रं मानंचा
वेग रामाच्या बाणाचा रं वेग बाणाचा
तान्या सर्जाची हुनाम जोडी
कुणा हवीत घोडी, माझ्या राजा रं ....
( शब्द कदाचित पुढे मागे झाले असतील)
कोकिळा गा
गा गारे..
भुलोकीच्या गंधर्वा तू
अमृतलाघव गा...
मी कशी ओळखु प्रीती हे ह्रदय म्हणु की लेणे
प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे लेणे
निळा सावळा नाथ
जशी हि निळी सावळी रात
मी जलवंती मी फुलवंती
तुझी नजर लागलं मला
काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात
जाईजुईच्या फुला रं
कुठे गेले सगळे

मी एकटाच खेळतोय अंताक्षरी
ओलेत्या पानात सोनिया उन्हात भरून मेघ आले
डहाळी जणु नवी नवरी हळद रंग ओले
साद ओली पाखराची ओढ जागे पावसाची
मी एकटाच खेळतोय अंताक्षरी<<
मला हाक मारायची ना मग...
रामा रघूनंदना आश्रमात या कधी रे येशील
मी न अहिल्या शापीत नारी
मी न जानकी राजकूमारी
दीन रानटी वेडी शबरी
तूझ्या पदांचे अखंड चिंतन ही माझी साधना...
वर आभाळ खाली धर्ती, दिस आलाय माथ्या वरती
अल्याड डोंगर पल्याड डोंगर मधेच खोलखोल दरी
जरा जपून चाल ग पोरी..गेली सांगून ज्ञानेश्वरी न
माणसापरीस मेंढरं बरी....
मी आले निघाले सजले फुलले फुलपाखरू झाले
वेग पंखांना आला असा आल्या ह्या लहरी घेतली भरारी
तूफानापरी बेभान मी झाले....
मला वाटते की हे गाणं इथे चालू शकेल....(?)
त्या फुलांच्या गंधकोशी, सांग तू आहेस का?
त्या प्रकाशी तारकांच्या ओतिसी तू तेज का?
त्या नभाच्या नीलरंगी होऊनिया गीत का?
गात वायूच्या स्वरांनी, सांग तू आहेस का?
जीवनी संजीवनी तू, माउलीचे दूध का?
कष्टणाऱ्या बांधवांच्या रंगसी नेत्रात का?
मूर्त तू मानव्य का रे, बालकांचे हास्य का?
या इथे अन त्या तिथे, सांग तू आहेस का?
हे हिंदुशक्ती संभूत दिप्तीतम तेजा
हे हिंदु तपस्यापुत इश्वरी ओजा
हे हिंदुश्री सौभाग्यभुतीच्या साजा
हे हिंदु नॄसिंहा प्रभो शिवाजी राजा......
चंबू, शेवटच्या गाण्यासाठी धन्स
तो एक राजपुत्र नि मी एक रानफुल
घालीन मी मी त्याला सहजीच रानभूल
माझी रेणूका माऊली कल्पवॄक्षाची साऊली
जैसी वत्सालागी गाय तैसी अनाथाची माय....
एक लाजरा न साजरा मूखडा चंद्रावानी फुलला गं
राजा मदन हासतोय कसा की जीव माझा भुलला गं
अरे कुठे आहात सगळे.. आणि ते भरत तर गायबच झालेत....
सुप्रभात चंबू !!!!
उगवला चंद्र पुनवेचा
मम ह्रदयी दर्या उसळला प्रीतीचा
हा उनाड अवखळ वारा
या टपोर श्रावणधारा
फुलवून पिसारा सारा
तू नाच आज रे मोरा
लॉजिक काय आहे??
एकमेकांशी केलेली तुलना किंवा एखादी उपमा असलेली गाणी
नमस्ते जिप्सी....
झाला महार पंढरीनाथ; झाला महार पंढरीनाथ
काय देवाची सांगू मात; झाला महार पंढरीनाथ
नेसला मलीन चिंधोटी; घेतली हातामधे काठी
घोंगडी टाकली पाठी; करी जोहार दरबारात....झाला महार पंढरीनाथ
ऐरणीच्या देवा तूला ठिणगी ठिणगी वाहू दे
आभाळागत माया तूझी आम्हावरी राहू दे..
लेऊ लेणं गरीबीचं चणं खाऊ लोखंडाचं
जीनं होऊ आभारुचं धनी मातूर माझा देवा
वाघावाणीअसू दे....
आला महाराजा सोबत बँडबाजा
कूणी म्हणे आला यमराज
करू दुनीये वरती राज, करू दुनीये वरती राज__राम राम गंगाराम
स्वयें श्रीरामप्रभू ऐकती
कुश-लव रामायण गाती
कुमार दोघे एक वयाचे
सजीव पुतळे रघुरायाचे
पुत्र सांगती चरित पित्याचे
ज्योतीने तेजाची आरती...
ललिता नमस्ते.. आज खूप दिवसांनी...