गाण्यातला तात्या - ८ - मी गाताना गीत...

Submitted by तात्या अभ्यंकर on 19 April, 2010 - 04:08

या आधी,
गाण्यातला तात्या - १ - वृक्षवल्ली आम्हा..
गाण्यातला तात्या - २ - व्हायलीन ब्रदर्सची बंदिश सिंफनी..
गाण्यातला तात्या - ३ - माझे मन तुझे झाले..
गाण्यातला तात्या - ४ - घाल घाल पिंगा..
गाण्यातला तात्या - ५ - रुठो ना...
गाण्यातला तात्या - ६ - आप अगर आप ना होते..
गाण्यातला तात्या - ७ - तरून जो जाईल..

मी गाताना गीत.. (येथे ऐका)

मी गाताना गीत तुला लडिवाळा
हा कंठ दाटुनी आला..

एक होता विदूषक चित्रपटातलं एक अप्रतिम अंगाई गीत. आनंद मोडकांचं सुंदर संगीत, आणि रवींद्र साठ्यांची सुरेख गायकी!
रानकवी महानोरांचे सुंदर शब्द लाभले आहेत या गाण्याला...

मी दुःखाच्या बांधुन पदरी गाठी
जपले तुज ओटी-पोटी
कधी डोळ्यांना काजळ तुज भरताना
गलबला जीव होताना..

अंगाईला साजेशी छान संथ लय, तेवढीच शांत, सुरेख, हळवी चाल! जीव अगदी सुखावतो हे सुंदर गाणं ऐकून..

एका होता विदूषक हा पुलंचा परीसस्पर्श झालेला चित्रपट. लक्ष्मीकांत बेर्डे हा अत्यंत गुणी कलाकार परंतु केवळ पाचकळ, उथळ विनोदी भूमिकांपलीकडे कुठल्याच निर्माता-दिग्दर्शकाला त्याचा उपयोग करून घेता आला नाही हे भाईकाकांचं मत.. आणि म्हणूनच या चित्रपटातल्या विदूषकाच्या भूमिकेकरता स्वत: भाईकाकांनी लक्ष्याचं नांव सुचवलं होतं. आणि लक्ष्यानेही चांगलं काम करून भाईकाकांचा शब्द राखला.

या गाण्याच्या निमित्ताने, अकाली काळाच्या पडद्याआड गेलेल्या लक्ष्याला आणि त्याच्यातल्या गुणांची पारख असलेल्या भाईकाकांना विनम्र अभिवादन..

--तात्या अभ्यंकर.

गुलमोहर: 

तात्या,

अफाट गाणं आहे हे.. आशाताईंच्या आवाजातलं गाणं मला जास्त आवडतं.. 'श्रावणाचं ऊन मला सोसेना' किंवा 'कुठं तुमी गेला व्हता'सारख्या लावण्या गाणार्‍या आशाताई हे अंगाईगीत इतकं सुरेख गाऊन जातात.. आशाताईंचं गाणं ऐकताना अक्षरशः डोळ्यात पाणी येतं..

धन्यवाद. Happy

२००८च्या मायबोली गणेशोत्सवात 'सलाम आशा' नावाचा ध्वनिमुद्रणांचा संच आहे. त्यात श्री. आनंद मोडकांच्या मनोगताच्या शेवटी या गाण्याचा आशाताईंच्या आवाजातला भाग आहे. या गाण्यातली उरलेली दोन कडवी रवींद्र साठ्यांच्या आवाजात आहेत.

http://www.maayboli.com/node/3417 या दुव्यावर आपल्याला ऐकता येईल.

पूर्ण गाणं ऑनलाइन उपलब्ध नसावं.