वासनेच्या गूढगर्भी
तुझ्या नजरेतले कमळ
जेव्हा उलट्या रंगात अवतरले
तेव्हा मी कूस पालटली
चादरीवरच्या सुरकुत्यांचं जाळं झालं
तुझ्या जलसमाधीची
अशी तयारी झाली.
तरी चादरीवरच्या लाटांमधे
एक कमळ उमलले
आणि
आणि
तुझ्या राजकीय निष्ठेचं मला कौतुक वाटलं.
त्याने कमळ चिन्ह असलेल्या राजकीय पार्टीशी जवळीक दाखवली म्हणून तिने त्याला ' Not Tonight dear' म्हटलं. अन नंतर दोघेही बराच वेळ या कुशीवरुन त्या कुशीवर करत राहिले अन चादरीचा पार चोळामोळा झाला
हाय काय अन नाय काय?
Submitted by shraddhak on सोम., 03/31/2008 - 23:30.
कविता चांगली आहे. पण ही इथे का टाकलीस? आजकाल सगळ्याच कविता फक्त कविता विभागातच टाकतात.
आता अजून दुर्बोध आणि शब्दबंबाळ कसं करावं बरं?<<<<<<<<<<<
तरी चादरीवरच्या लाटांमधे
एक कमळ उमलले <<<<<<
ते तुडवत 'हत्ती' पळाला
तेव्हा 'कंदिला'च्या मिणमिणत्या प्रकाशात त्याचा
वेध घ्यायला मी 'हाता'त उचलले
'धनुष्य बाण'....
विनोदी चाललय.... खरच मेले हसून हसून.... चादरीवरच्या सुरकुत्या काय, कमळ काय, हत्ती काय...
पण चालूद्या!
तिथे जे काय चाललय त्यापेक्षा बर्यापैकी "काहीच्या काही" आहे
कविता म्हणजे नक्की काय कसं समजवायचं? ही 'समज' थोडी आतली आहे....
साखरेची गोडी आणि गुळाची गोडी यातला फरक एकवेळ आपण खायला देऊन सांगू शकू.... पण मुळात 'गोड' ह्या चवीचा थांगपत्ता लावण्याचे अवयव ही(मी अजून मनाशी पोचले नाहीये) नसलेल्यांनी.... आपल्या पानात मीठ वाढून 'घ्या... हो, श्रीखंड घ्या' म्हटलं तर काय करणार?
त्यांनी वाढलेलं खायचं नाही, चुकून खाल्लं तरी दाखवायचं नाही.... कारण तोंड वाकडं केलं तर हे म्हणणार मग, श्रीखंडाची तुमची रेसिपी द्या की ... आता बोला.
मी शक्यतो ह्या बाबतीत बोलत नाही कारण.... वेळही नसतो... जमेल तितकं चांगलं वाचायचं.... त्यावर मनपासून दाद द्यायची... अजून काही सक्रीय करण्याची 'जबाबदारी' घेण्याला वेळ हवा...
असो... तुमचं चालू द्या
----------!!!!!!!!
त्याने कमळ चिन्ह असलेल्या राजकीय पार्टीशी जवळीक दाखवली म्हणून तिने त्याला ' Not Tonight dear' म्हटलं. अन नंतर दोघेही बराच वेळ या कुशीवरुन त्या कुशीवर करत राहिले अन चादरीचा पार चोळामोळा झाला
हाय काय अन नाय काय?
अप्रतिम अर्थ सांगितला आहे! क्या बात है!! हाय काय अन नाय काय... फारच मजा आली हे सर्व वाचून
:)
शी बाई
तुम्हाला अर्थ समजला/ लागला!!
आता अजून दुर्बोध आणि शब्दबंबाळ कसं करावं बरं?
कविता चांगली आहे.
पण ही इथे का टाकलीस? आजकाल सगळ्याच कविता फक्त कविता विभागातच टाकतात.
आता अजून दुर्बोध आणि शब्दबंबाळ कसं करावं बरं?<<<<<<<<<<<
तरी चादरीवरच्या लाटांमधे
एक कमळ उमलले
<<<<<<
ते तुडवत 'हत्ती' पळाला
तेव्हा 'कंदिला'च्या मिणमिणत्या प्रकाशात त्याचा
वेध घ्यायला मी 'हाता'त उचलले
'धनुष्य बाण'....
वगैरे चालेल का गं?
ही ही

अगदीच चालेल.
आता आपण दुर्बोध काव्यमाला लिहूया. STY सारखं!
लिहा. लिहा, छानशी दुर्बोध काव्यमाला लिहा!!
खी, खी....
विनोदी चाललय.... खरच मेले हसून हसून.... चादरीवरच्या सुरकुत्या काय, कमळ काय, हत्ती काय...
पण चालूद्या!
तिथे जे काय चाललय त्यापेक्षा बर्यापैकी "काहीच्या काही" आहे
कविता म्हणजे नक्की काय कसं समजवायचं? ही 'समज' थोडी आतली आहे....
साखरेची गोडी आणि गुळाची गोडी यातला फरक एकवेळ आपण खायला देऊन सांगू शकू.... पण मुळात 'गोड' ह्या चवीचा थांगपत्ता लावण्याचे अवयव ही(मी अजून मनाशी पोचले नाहीये) नसलेल्यांनी.... आपल्या पानात मीठ वाढून 'घ्या... हो, श्रीखंड घ्या' म्हटलं तर काय करणार?
त्यांनी वाढलेलं खायचं नाही, चुकून खाल्लं तरी दाखवायचं नाही.... कारण तोंड वाकडं केलं तर हे म्हणणार मग, श्रीखंडाची तुमची रेसिपी द्या की ... आता बोला.
मी शक्यतो ह्या बाबतीत बोलत नाही कारण.... वेळही नसतो... जमेल तितकं चांगलं वाचायचं.... त्यावर मनपासून दाद द्यायची... अजून काही सक्रीय करण्याची 'जबाबदारी' घेण्याला वेळ हवा...
असो... तुमचं चालू द्या
हायला! जबरी आहे. आज्जाबात कळली न्हाय. येऊ द्यात अजून.
श्रद्धाच्या लिस्ट मधे अजून एक
त्याच वेळी 'घड्याळा' त बाराचे टोले पडले.
'घडाळ्यात बारा वाजले' नावाची एक अजरामर कविता मला वाटतं मायबोलीवरच वाचली होती. मॉड्सनी उडवली वाटतं
दाद अगदी. पण अगदीच घ्या तोंड गोड करा म्हणून मीठ तोंडात कोंबायला लागतात तेंव्हा मात्र...
वा छान कविता आहे... आणखी चार पाच कडवी लिहा....
आयला आता हीला काय झालं...
अस करु नको संदीप रागवेल ना तुला... हा हा हा....
काय जुळवलय ना मी...