पायांची काळजी (निगा)

बदलत्या ऋतु नुसार पायांची काळजी (निगा) कशी घ्यावी यासंबंधी माहिती इथे द्यावी. पावले स्वच्छ, सुंदर, नितळ दिसण्यासाठी करता येण्यासारखे उपाय, नखांची काळजी तसेच घरच्या घरी पेडीक्युअर करण्याची पद्धत यावर इथे मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे.

Submit to kanokani.com

मी अजिबात काळजी घेत नाही पायांची.. २ महिन्यातून एकदा पार्लर मध्ये जाऊन पेडिक्यूअर करते.. ते ही आठवला तर... अरेरे
आयडीयली... आठवड्यातून एकदा गरम पाण्यात थोडा शँपू घालून त्यात १० मिनिटं पाय घालून मग नखं आणि टाचा साफ कराव्यात. (निदान इतकं तरी)
पण इथे वेळ कुणाला आहे? एकदा घरी असताना हा उदयोग सुचला.. पाय घातले रे घातले त्या साबणाच्या पाण्यात आणि केबलवाल्याने बेल वाजवली.. आणि खूप वेळ घेतला.. तोवर सगळं पाणि थंड अरेरे

घरच्या घरी पेडिक्युअर करण्यासाठी गरम पाण्यात शँपु, थोडंसं ग्लिसरिन ( नाहीतर खूप कोरडी होतात पावलं), हायड्रोजन पॅरॉक्साइड (बहुदा मळ सुटुन येतो लवकर म्हणून घालतात) हे घालावं. १०-१५ मिनिटं ह्या पाण्यात पाय घालून पाय, टाचा, नखं वैगरे साफ करावं.
नंतर पाय पुसून एखाद्या ऑल परपज क्रिम / फुट क्रिमनी पायाला मसाज करावा. वेळ अन हौस असेल तर पाण्यात पाय घालायच्या आधी स्वच्छ धूवून क्लिनसिंग मिल्क लावून पुसावेत अन एखादे ब्लिच क्रिम लावावे.
शेवटी मसाज केल्यावर एखादा पॅकपण लावता येतो.

ग्लिसरिन, लिंबु आणि गुलाबजल यांचे मिश्रण नियमित लावल्याने पण पाय मऊ अन छान होतात. कधीकधी लिंबाची फोड , साल वैगरे पावलांवर घासली तर राप निघून जातो. मोहरीचे तेल व मिठ यानी हलकी मसाज केली तर मऊपणा येतो.

अर्थात हे सगळं करायला जमत नाहीच. कॉलेजात असताना, हॉस्टेलवर मैत्रिणींनी सांगितलेले अन त्यावेळी केलेले उद्योग आहेत हे सगळे. आता फक्त दोनेक महिन्यात पार्लरमध्ये जावून पेडीक्युअर केरुन घेते. तेपण भाभी आपके पैर तो बुढ्ढोंजैसे दिखते है असं धाकट्या दिराने ऐकवल्यापासून. अरेरे

रोज आंघोळ करताना एखाद्या स्क्रब किंवा प्युमिस स्टोनने टाचा, तळपाय चोळावेत. आंघोळ झाल्यावर त्वचा ओलसर असताना बेबी ऑइल किंवा युसेरिन / निव्हिआ सारखे हेवी क्रीम लावावे.

रात्री पाय स्वच्छ धुऊन, भरपूर पेट्रोलियम जेली चोपडून त्यावर सुती मोजे चढवून झोपायचे. टाचा कोरड्या पडत असतील तर हे नियमित केल्याने खूप फरक पडतो.

खूप चाल झाली असेल, हाइकिंग वगैरे केलं असेल तर थोड्या कोमट पाण्यात मीठ घालून त्यात पाय बुडवून ठेवले तर फार छान वाटतं.

मुख्य म्हण्जे पायाच्या नखांचे नेल पॉलिश नेहमी अपटु डेट ठेवावे. अर्धवट निघालेले चांगले दिसत नाही. व शक्यतो डार्क कलरचे लावावे म्हणजे भारतीय पोषाखांवर चांगले दिसते. पीपटो शूज असतील तर अजूनच.

अजून एक टीप. पायाचं वॅक्सींग करताना पावलांवरूनही (तळपाय नव्हे) थोड्या पट्ट्या ओढाव्यात. डेड स्कीन निघून येण्यास मदत होते. त्यामुळे काळवंडलेली पावले थोडी उजळायलाही मदत होते. हल्ली ते "पेडएग" म्हणून छोटं स्क्रबर मिळतं ते देखील खूप उपयोगी आहे.दोन पेडीक्युअरच्या मधे वापरायला छान.

पॉटरी करतांना सतत पाण्यात हात घातले जातात त्यामुळे संपूर्ण हाताची त्वचा कोरडी होते. क्लास मधल्या एका बाईने हा उपाय सांगीतला. मी फक्त हातानांच नाही तर कोपर, घोटा, पाऊल, गुडघा, नकल्स थोडक्यात जिथे जिथे त्वचा राठ झालेली असते त्या ठिकाणी हा उपाय करून बघीतला आणि साधारण ३ आठवड्यात मला फरक दिसू लागला.
कुठलीही गोष्ट माझाकडून सातत्याने होत नाही पण ही झाली आणि त्याचे चांगले परीणाम पण दिसू लागले.

उपाय खालील प्रमाणे :

मिनरल ऑइल (किंवा एरंडेल तेल), ग्लीसरीन, आपल्या आवडीचे बॉडी लोशन/मॉइश्चरायझर सम सम प्रमाणात एकत्र एका बाटलीत भरून ठेवायचे. आंघोळ झाली की लगेच थोडेसे हातावर घेऊन जिथे जिथे राठ त्वचा आहे तिथे लावायचे, त्वचेत चांगले जिरले पाहीजे. या उपायाचा मला आतापर्यंत सगळ्यात जास्त फायदा झाला. माझ्या कोपराची त्वचा फार म्हणजे फारच खरखरीत होती, अगदी हात लावावासा वाटत नसे, आता महिन्याभरात चांगली मऊ झाली आहे.
मिनरल ऑइल इथे कुठल्याही सुपरमार्केटमध्ये लॅक्सेटीव्ह सेक्शन मध्ये मिळते.
मिनरल ऑइल चे गुणधर्म वाचतांना लक्षात आले की एरंडेल तेलाचे आणि याचे गुणधर्म अगदी सारखे आहेत.
सुंदर मी होणार बीबी वर वाचुन केसांसाठी एरंडेल तेल आणले होतेच त्यामुळे मग मी एरंडेल तेल + सेटाफील + ग्लीसरीन असे मिश्रण करून ठेवले आहे बाथरुम मध्ये, आंघोळ झाली की लावायला सोपे जातं आणि विसरत नाही. मिश्रण थोडसच लावायचे असल्याने चिकट वगैरे काही होत नाही.

रूनी छान उपाय सांगितलास स्मित

मला एक उपाय हवाय, मांडी घालून बसल्यामुळे की अजून कशामुळे माहीत नाही पण पायाच्या घोट्याच्या भोवती त्वचा गोलसर भागात काळी आणि किंचित राठ झाली आहे. तिथे टोचलं वगैरे तर दुखत नाही. पण ती डेड स्किन निघून जावी यासाठी काही उपाय आहे का? अ ओ, आता काय करायचं

मी जेव्हा चेहरा ब्लिच करते तेव्हा उरलेलं ब्लिच पावलाला लावते, त्याने ही पावलं चांगली दिसतात. स्मित

रुनी, तुला ग्लीसरीन कुठे मिळाले? आणि "आंघोळ झाली की लगेच थोडेसे हातावर घेऊन जिथे जिथे राठ त्वचा आहे तिथे लावायचे" म्हणजे तु चोळुन चोळुन ते त्वचेत जिरवतेस का? माझेही कोपर खुप राठ झाले आहेत हा ऊपाय करुन पाहीन!

अमया,
हो चोळून त्वचेत चांगले जिरवायचे ते मिश्रण.
ग्लीसरीन मी भारतातुन आणले होते. वॉलमार्ट मध्ये First aid, Band aid सेक्शनच्या बाजुला Humco ब्रॅन्ड्चे ग्लीसरीन (6 Oz bottle) मिळते असे मी नेटवर वाचलय, तर काही ठिकाणी केक, कुकीज इ बेकींग सामानाच्या सेक्शन मध्ये फुड कलरच्या बाजुला मिळेल असे लिहीले होते. मी स्वतः अजून घेतले नाहीये. तिथे किंवा इंडीयन ग्रोसरीतही मिळेल कदाचित.

अस होय, मी वॉलमार्ट मध्ये बघते!!! धन्स ग रुनी !!!!

पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे घोट्याची त्वचा तर काळवंडली आहेच पण तिकडची स्किन पण अर्धवट निघत आहे आणि जास्त जोरात घासू पण नाही शकत... अशा वेळेस काय करू???

माझी पण घोट्याची त्वचा कआळवंडली आहे आणि निबर सुद्धा झाली आहे. त्यासाठी काय करता येईल

माझी पण घोट्याची त्वचा खुप कालि आहे त्यासाठी काय करता येईल

रोज सकाळी आंघोळीच्या वेळेस दुसर्या बादलीत कोमट पाण्यात पाय ठेउन बसा...घरच्या घरी पेडी क्युअर करा.... [कोमट पाणी + शांपु (पायाचाब्रशने शेवटी मसाज)]

पायाला रात्री हलके तेल चोळा [आवडत असेल तर जरा जास्त घ्या..]

घोट्याची त्वचा लवकर बदलत नाही ..पहीले मऊ - स्वच्छ होते मग रंग बदलतो.

मस्त धागा. पायांना रोजचा आराम देण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी रोज कोमट पाण्यात १५ मि. पाय बुडवून ठेवावेत. मग स्वच्छ कपड्याने पुसून, तेल लावून झोपावे.

तेल अथवा बॉडी लोशन, फूट क्रीम वगैरे ने रोज/एक दिवसा आड न चुकता मसाज करावा.

टाचांना भेगा पडल्या असतील, तर कोकमतेल वितळवून कोमट झाले की ते टाचांना चोळून ठेवावे. हा उपाय सलग ७ दिवस केल्यास भेगा भरून येतात व टाचा मऊ होतात. दुखत नाहीत.

अरे पायांची निगामधे कोणी 'फिश स्पा/पेडिक्युअर' बद्दल लिहिलंच नाहीए. मला वाटलं ही गोष्ट एकदम इन आहे सध्या. मी या विकेंडची अपॉइंटमेंट घेतली आहे. पहिल्यांदाच करणार आहे. कोणाला अनुभव आहे का? मला फार उत्सुकता आणि थोडीशी भीती वाटते आहे. एवढे काहीच्या काही पैसे देवुन किती इफेक्टिव आहे कोण जाणे.

कोणी केलं असेल तर मला पटकन माहिती सांगा ना, प्लीज.