ऑनलाईन शेती.. अर्थात FarmVille

हे पान आधुनिक शेतकर्‍यांच्या कंपूसाठी.. स्मित
Farmville वरील घडामोडी मुख्य म्हणजे काही हवं असल्यास (जसं की प्राणी, झाडं, खिळे, हार्नेस इ. इ. इ.) ती मागणी नोंदवण्यासाठी..

आत्तापर्यंत जमलेला कंपू : adm, पन्ना, आऊटडोअर्स, मिनी, अमृता, सायलीमी, मृदुला, Swa_P_Nil, नंदिनी, चिनुक्स, नीलू, स्वाती, भास्कर, अश्विनी_के

फळी आणि खीळे पाठवण्यासाठी लिंक्स :

Link to send nail:
http://apps.facebook.com/onthefarm/gifts_send.php?gift=nail

Link to send Board:
http://apps.facebook.com/onthefarm/gifts_send.php?gift=woodenboard

फार्मव्हील बद्दल अधिक माहिती..
www.farmvillefreak.com
www.thefacegamer.com

बुशेल्स बद्दल माहिती:
शेतात फार्मर्स मार्केटचा तंबू लावावा (मार्केट मधुन विकत घेऊन) त्यानंतर त्यात ३ ऑप्शन्स आहेत ..

१. My Bushels मध्ये आपण जमा केलेली बुशेल्स दिसतील. ती नंतर वापरता येतात.

२. My Stall मध्ये आपल्या शेतातली बुशेल्स शेअर करण्यासाठी असतील .. बाकीचे शेतकरी ते घेउ शकतात .. त्यांनी घेतलीत की आपल्याला फार्मर्स मार्केटवर एक बाण दिसेल (जॉब पुर्ण झाल्यावर दिसतो तसा)
.. त्यातुन ३ गिफ्ट ऑप्शन मिळतील .. कॉईन्स, १५ युनिट्स फ्युएल (कॅन्स नाही) किंवा १० एक्स पी पॉइंट्स ..

३. त्यात Get Bushels वरुन वेगवेगळी बुशेल्स मिळतील .ती जमा करायची .. हे होम पेज वरच्या फीड्स मधुन पण करता येतं.. ही आपल्या शेतात वापरायची ..
->कुठलंपण पीक कापण्यापुर्वी My Bushels मधुन त्याच पीकाचं Use Bushel करायचं .. ते २ तास काम करते .. त्यामुळे जर त्या पीकाची मास्टरी झाली असेल तर कापतांना १ जास्तीचा एक्स पी मिळतो .. नसेल तर १ जास्तीचा मास्टरी पॉईंट मिळतो .. तसच लॉक्ड असलेली पीकं पण पेरता येतात आणि त्यांची मास्टरी पण मिळवता येते.

Submit to kanokani.com

मी पण राणी माशी विकत घेतली होती, FV १ ला मिळायची. पण हल्ली मला उठसुट सापडते आहे, शेतात काम करताना किंवा शेजार्‍याना मदत करताना. ती आपण शेअर करू शकतो, पण मी हल्ली काहीच publish करत नाही, कारण दूसरेही कोणी काही शेअर करत नाहीत. तसेही माझे active शेजारी खूप कमी आहेत.

@ उर्मी, अगं मी घेते ना गुड्स विकत, पण ते माझ्या भल्या मोठ्या शेतीसाठी नाही गं पुरत. ते काय १५-३० प्लॉट्स साठी असतं फक्त. पैसे मात्र खुप जातात. ठीक आहे, मी श्रीमंत शेतकरी आहे, म्हणुन चालुन जातं. स्मित

@ आउटडोअर्स, अगं मी करते जाऊन खतांची फवारणी, पण त्यात दोन problem आहेत. एक म्हणजे वेळ. नवरा शंख करत असताना, पट्पट शेतीकाम संपवायचं असतं. तू किती lucky कि तुझा नवराच शेतकरी आहे. दूसरा problem म्हण़जे हल्ली जरा कुठे दोन शेतात काम केलं की लगेच एक फुल्ल शेत खत फवारणी करेल असं एक बक्षिस मिळतं, मग काय, शेतकरी स्वतःची पिकं लावून झाली की स्वतःच पिक फवारून घेत्तात. एक सेकंदामधे स्वतःचे सगळे शेत खत फवारून होतं. मग शेजार्‍यांना चान्सच मिळत नाही, त्यामुळे फ्युएल पण नाही.
माझं नाव मृदुल नाही. ते माझ्या मैत्रीणीने माझं account create करताना ( चुकिच्या spelling ने) आणि खोट्या नावाने बनवले होते. तेव्हा आम्हाला माबो माहित नव्हते, तिथली लोक माहित नव्हती, म्हणुन dummy identity. माझं account जुनं आहे, पण मी वापरायला लागून एक आठवडाच झाला आहे फक्त. कधी log in केलंच नाही.

@ रुपाली, पूर्वी अनविदरचा option यायचा शेजार्‍यांच्या शेतात गेल्यावर. आता बंद झाला तो. आता फक्त ५ शेतीचे तुकडे करू शकतो आपण. पुर्वीसारखं पुर्ण शेत नाही होत. वाईट ना ! अरेरे

@ काशी, अश्विनी, छान वाट्लं वाचून कि माझ्यासारखे अजुन पण कष्टाळु शेतकरी आहेत.

मनिमाऊ,, जाम हसले हसून हसून गडबडा लोळण किती प्रामाणिक व्यथा आहे फिदीफिदी
आता एक फा र्मविल मुक्तीकेंद्र उघडलच पाहिजे डोळा मारा
रुपले माझ्याकडे दोन एक्स्ट्रा राणी माश्या आहेत. त्या देता येतात का बघते थांब

वा वा .. परत वाहाता झालाय हा बाफ डोळा मारा हाहा

रुपाली, उद्या देऊ शकेन मी राणी माशी तुला.

मला रोज मिळतेय एक तरी शेतात स्मित

माझ्या गिफ्टबॉक्सातपण बर्‍याच राण़्ईमाशा आहेत पण मला त्यांचा उपयोग नाहीये. करायच्या काम मी त्या?

मनिमाऊ,
सगळ्यांकडून वस्तू [दारू/केक इ.इ] विकत घे.. त्याच्याबदली खूप पेट्रोल मिळते..

चिअर्स स्मित

रुपाली, राणीमाशी शेअर केली आहे स्मित

हे plzz सर्व farmville khelnyaranno माझे पण शेजारी व्हा.......

अरे मला पण एक राणी माशी पाठवा रे.. दिवाळी अंकाचे काम झाल्यावर परत एकदा शेताकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे.. तेव्हा मला पण आपलं म्हणा...

आमची माती... आमची माणसं... स्मित

सध्या शेतकर्‍यांचा नेता स्वप्निल देशात आलेला आहे आणि बहुतेक पुढच्याच आठवड्यात मुंबईत येण्याची शक्यता आहे .

तेव्हा एक विराट शेतकरी मेळावा फिदीफिदी व्हायला हरकत नसावी नै

माझ्याकडे ते सोनं देनारं कॉटेज तयार झालंय. पण त्याचं पुढे काय करायचं ? मिळालेल्या सोन्याचे काय ? ते साठवायची घागर माझ्याकडे नाही !

माझ्याकडेही

>>विराट शेतकरी मेळावा>> हाहा

स्मित

झाले स्वप्निलबाबा कालच्या मुहुर्तावर लग्न्बंधनात अडकल्यामुळे मेळावा कॅन्सल झालाय फिदीफिदी

अरे वा स्वप्निल अभिनंदन
मितान तू पण शेतकरी का?

आयला.. हा बाफ कसा काय वर आला एकदम.. स्मित
लोकं खेळतात का अजून ? मी मधे एकदा शेतात जावून जुने दिवस आठवून आलो.. फिदीफिदी

स्वप्निल, द शेतकरी आणि त्याच्या शेतकरणीचं अभिनंदन.. आणि शुभेच्छा. स्मित

अरे लोक्स, मी बंद केली होती शेती सहा महिने. सहज चक्कर मारायला गेले नि अडकले =))

माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या की....
झाडाने दिलेल्या सोन्याचे काय करायचे ? साठवायला हंडा नसेल तर ?
हे बावळट लोक्स ( फार्मविले बनवणारे ) त्याचे दागिने पण करू देत नाहीत !!!!

मितान फिदीफिदी
मी फेरफटका मारते शेतावर अधून मधून फिदीफिदी

शेतकर्‍यांच्या नेत्याचं मनापासून अभिनंदन. आता शेतकरणीच्या मदतीने हा शेतकरी त्याचं शेती अजून जोमाने करेल यात शंकाच नाही.

स्वप्निल...मनापासून अभिनंदन.

मला शेतात friends ची आवश्यक्ता आहे...वर जी नाव दिली आहेत ती facebook वर कशी ओळखची.