सोलापूर सेक्स स्कँडल - क्रमशः - भाग ६

Submitted by बेफ़िकीर on 5 April, 2010 - 10:53

ढेबे सभागृह माणसांनी भरल्याचा फ़ोन साहेबांना गेला तेव्हा साहेब गाडीत बसतच होते. सहाय्यक पुढे बसला होता. साहेब सोलापुरच्या रस्त्यांचे निरिक्षण करत मग्रूर तोंडाने बसलेले होते. पुढे एक आवाज करणारी गाडी आणि मागे एक व्हॆन इतकाच ताफ़ा यावेळेस आणला होता.

भाऊंनी आज स्वत:च गाडी ड्राईव्ह करायचे ठरवले होते. साहेबांसमोर ड्रायव्हर वगैरेचा थाट नको करायला या विचाराने.

आणि मीना मात्र सर्वांच्या आधीच रिक्षेने सभागृहामागे असलेल्या आणखीन एका लहान खोलीत सरळ जाऊन बसली होती. एवढे अचाट चढ उतार पाहिल्यानंतर आता या सभेत आणखीन एक मोठा गोंधळ व्हायला नको म्हणून ती मुद्दाम रडवेला चेहरा करून एकटीच बसली होती. त्या खोलीपाशी रेंगाळणारे लोक चौकशी करत होते तेव्हा ’साहेबांनी मला इथे यायला सांगीतले आहे’ असे म्हणाल्यामुळे तिला प्रथम ’बाहेर बसा’ असे सांगीतले व नंतर दोन चार वेळा विनंती केल्यावर ’ठीक आहे, आत बसा, पण साहेब आल्यावर लगेच उठायला लागेल’ असे सांगीतले. साहेब आल्यावर तिला उठावे लागणारच नाही हे त्या बिचार्‍यांना माहीत नव्हतेच.

मीनापुढे वेगळीच अडचण होती. साहेब जर एकदम भाऊंना घेऊनच खोलीत आले तर त्यांच्याकडे पाच मिनिटे खासगी बोलायला कशी मागायची हे तिला समजत नव्हते.

भाऊ बाहेर येऊन सभागृहातील कार्यकर्त्यांकडून आगावू अभिनंदने स्वीकारत असल्याचे खोलीबाहेरील माणसांच्या गप्पांमधून तिला समजले. त्या बरोबर ती पळतच बाथरूममधे गेली. आता आमदार आले की त्यांना घेऊनच भाऊ आत येणार हे तिच्या लक्षात आले. कानोसा घेत असतानाच ’नमस्कार, नमस्कार’ चे जोरजोरात आवाज येत खोलीत गडबड उडाली. खोलीत पार्टीमधील लेडिज कुणीच नसल्यामुळे मीनाला बाथरूममधे कुणीच पाहणार नव्हते. आमदारसाहेब येऊन बसले होते. भाऊंचा आवाजही येत होता. बाहेरच्या माणसानी साहेबांना ’कुणीतरी बाई इथे थांबली होती’ वगैरे सांगीतले की नाही हे मीनाला कळत नव्हते. आवाज अस्पष्ट येत होते. बहुधा सभेआधीचे चहापान चाललेले असावे. मीनाने प्रचंड धाडसाने दार किलकिले केले.

ज्यांचे तोंड तिच्याकडे होते ते दोन चार जण आमदारांच्या तोंडाकडे पाहण्यात इतके दंगले होते की त्या दाराकडे कुणाचेच लक्ष नव्हते. आणि ज्यांची तिच्याकडे पाठ होती त्यांचा प्रश्नच नव्हता.

भाऊ व आमदार काहीतरी बोलत होते. ’आपण अजिबात सोलापुरात येत नाही साहेब, आपल्या नावाने आम्ही सोलापुरात विविध क्रीडा स्पर्धा आयोजीत केल्या होत्या, हे कांबळे, आपल्याला नवे जॊईन झाले आहेत’ वगैरे फ़ुटकळ माहिती भाऊ देत होते. साहेबांची नजर वळवळत होती. बहुधा मीनाची वाट पाहात असावेत. चहा आला. आणखीन दहा मिनिटे गेली. सभेला उशीर होत होता. भाऊंशी आमदार तुटकच बोलत होते. शेवटी भाऊ ’चलायचं का साहेब’ म्हणाल्यावर सगळे उठले. अर्थातच पुढारी पुढे जायला हवा होता. त्यामुळे आमदार साहेबांच्या मागून जाण्यासाठी बाकीचे थांबले होते. भाऊ त्यांच्या बरोबर जाण्यासाठी खोळंबले होते.

आमदार - तुम्ही जा व्यासपीठावर.. आम्ही आलोच.

आमदारांनी हुकूम सोडल्यावर सगळे निघाले. सहाय्यकाला समजेना आता काय राहिले आहे. आमदारांनी त्याला बोलवून काहीतरी हळू आवाजात सांगीतले. तो मान डोलावून बाहेर पडला. कुणी आलेच तर ’साहेब काय नुसते बसले आहेत’ असे वाटू नये म्हणून आमदार काहीतरी कागदपत्र न्याहाळत बसले.

दैवच मीनाच्या बाजूने होते म्हणायचे. अत्यंत रडवेला चेहरा करून मीना एकदम आमदारांच्या समोर गेली. त्यांचे खरे तर लक्षच नव्हते. कारण सहाय्यकाला मीनालाच शोधायचे काम त्यांनी सांगीतले होते. अचानक मीना उपटेल अशी त्यांना कल्पना असण्याचे कारणच नव्हते.

एका क्षणात साहेबांचा चेहरा खुलला.

आमदार - तू? एकदम कुठून आलीस?
मीना - चुकलं सर माझं... खरंच चुकलं! (असे म्हणून स्फ़ुंदायला लागली.)
आमदार - ऒं? अगं काय झालं? नंदन काही बोलला का? तो गेलाच नाही का लातूरला? की तू काही सांगितलंस त्याला?

हा काय प्रकार उपटला ते साहेबांना समजेना. ते प्रश्नांची सरबत्ती करू लागले.

हा लातूर काय प्रकार आहे मीनाला समजेना. आजच्या सभेत तिच्या नावाची घोषणा होईल तेव्हा तिला नंदन तिथे असायला नको होता. त्याला आमदारांनी ’आता कसं वाटतंय बायको जिल्हा उपप्रमुख झाल्यावर’ असं विचारलं असतं तर वेगळाच घोळ झाला असता. पण काय झाले आहे ते कळेपर्यंत रडण्याचे नाटक करणे आवश्यक होते.

बंडा - ए... ए.. रडू नको.. काय झालं काय?
मीना - माझी मोठी चूक झाली सर...
बंडा - अगं रडणं थांबव आधी... (प्रथमच आमदारांचा आवाज रागात आला.)
मीना - खोटं बोलले सर तुमच्याशी मी...
बंडा - काय? .... काय खोटं बोललीस?

आमदारांच्या मते अजून कसलीच वेळ गेली नव्हती. या मुलीला जिल्हा उपप्रमुख म्हणून जाहीर करणं शक्य नसेल तर आजचा निर्णय ते लांबवणार होते. पण हिने घोळ काय घातलाय हे त्यांना समजत नव्हतं!

बंडा - पटापट बोल... लोक येतील आत...
मीना - लग्न मोडलं होतं सर... झालं नव्हतं..
बंडा - कुणाचं?
मीना - माझं... नंदनशी...

ती काय बोलली त्याचा अर्थ डोक्यात घुसायला आमदारांना चार, पाच सेकंद लागले.

बंडा - म्हणजे काय? मग तू कोण आहेस?
मीना - मी आपल्याशी खोटं नाही बोलू शकत साहेब...मी नंदनची बायको नाहीये...
बंडा - आहेस कोण मग तू?
मीना - मीना कातगडेच आहे सर मी... पण मी नंदनशी लग्न मोडलं..
बंडा - का?
मीना - नाही सांगू शकत सर मी... नाही सांगू शकत...
बंडा - काय प्रॊब्लेम काय आहे?
मीना - तुमच्यासमोर सांगायलाच कसंतरी वाटतंय सर...
बंडा - आता पटकन बोल... सभा चालू होतीय...

तेवढ्यात सहाय्यक आत आला. त्याला मीनाला तिथे बघून धक्काच बसला. तिलाच शोधायला त्याने दोन माणसं पिटाळली होती. आमदाराने त्याला बाहेर जायला व दाराशीच उभे राहायला सांगीतले. तो चुपचाप निघून गेला.

बंडा - बोल...
मीना - सर.. ते मला ... भाऊंकडे...
बंडा - कोण ते?
मीना - नंदन...
बंडा - हां!
मीना - भाऊंकडे जा म्हणत होते...
बंडा - कशाला?
मीना - नाही सांगू शकत सर मी... तुम्ही समजून घ्या... भाऊंना ... खुष कर म्हणत होते... रात्री जाऊन

मीना हमसून हमसून रडू लागली.

आमदाराला दोन, तीन क्षणांनी मुद्दा लक्षात आला. तो अवाक झाला होता.

बंडा - ए.. गप्प.. गप्प... हां! रडायचं नाही इथे... मला एक सांग तू मला कशाला भेटली होतीस?
मीना - सर... अगदी खरं सांगते... माझ्या मनात खरंच तुमच्याबद्दल काही नाही... पण
बंडा - काय पण?
मीना - मी त्या दिवशी हे सांगायला आले होते की पार्टीतील लोक असे वागतायत, गरिबांनी काय करावे? पण...
बंडा - पण काय?
मीना - पण तुम्ही ऐकूनच घेतलं नाहीत सर.. तुम्ही मला...
बंडा - गप्प.. गप्प बस...
मीना - सॊरी सर.. पण तुमच्याबद्दल काही नाहीये मनात...
बंडा - बकवास बंद... भाऊंकडे जायचं नाहीये... अन माझ्याकडे चालतं? आं?
मीना - तुम्ही ऐकून घेतलंत तर पटेल सर तुम्हाला...
बंडा - तोंड बंद... परिणाम माहिती आहेत का? उठशील आयुष्यातून..
मीना - तुम्हाला खंर काय आहे ते ऐकायचंच नाहीये का सर?
बंडा - तुला एक संधी देतो.. काय बोलायचं ते बोल... अन निघून जा इथून..
मीना - नीट आठवा सर... मी तुमचे स्टेजवर स्वागत केले तेव्हा मी इतकेच म्हणाले की तुम्ही मला ओळखलं नाहीत का?
बंडा - मी कसा ओळखणार? मी नंदनलाच ओळखत नाही तर?
मीना - पण मागच्या वेळेस तुम्हाला मी भेटले होते सर..
बंडा - कुठे?
मीना - त्या रांगोळी स्पर्धेचं बक्षीस तुमच्या हस्ते मिळालं होतं...

आमदाराला घोळ समजेना.

बंडा - कसली रांगोळी?
मीना - आरोग्यमंत्रीसाहेब आले होते तेव्हा...

आमदाराने ’असेल केव्हातरी’ असे वाटून प्रकरण सोडून दिले. मीनाची थाप सध्या तरी पचली होती.

बंडा - मग?
मीना - मला वाटले तुमच्या मी लक्षात राहीन..
बंडा - पण नंदनची बायको म्हणून कशी माहिती असशील मला?
मीना - नंदन सांगायचे की ते उस्मानाबादला आले की तुमच्या घरी पार्टी होते.

हा आमदाराला आणखीन एक सौम्य धक्का होता. त्याने ’असं काय’ अशा अर्थी मान हलवली. त्याच्या डोक्यात वेगळंच चक्र सुरू झालं होतं.

नंदन जर मीनाचा कुणीच नसेल तर त्याला लातूरला पाठवून स्थानिक लोक, सोलापुरातील लोक अन बाबा इतक्या जणांचा विरोध कशाला सहन करायचाय?

बंडा - मग?
मीना - म्हणून मला वाटले की तुम्ही मला ओळखाल
बंडा - मग?
मीना - तर तुम्हीच मला बोलवलंत

हे मात्र आमदाराला लगेच पटलं!

बंडा - हां मग?
मीना - मी तिकडे आले ते नंदनना सांगणे शक्यच नव्हते
बंडा - का?
मीना - आधीच लग्न मोडलं होतं आमचं
बंडा - मग?
मीना - मी गरिबांवर येणारी संकटे सांगायला आपल्याला भेटावे म्हणून आले
बंडा - मग बोलली का नाहीस?
मीना - माझ्या तोंडाने कसे सांगू सर..?
बंडा - काय?.. काय कसं सांगू?
मीना - तुम्ही मला...
बंडा - मी जबरदस्ती केलेली नाही.. तू तयार होतीस...
मीना - तेच तर म्हणतीय सर मी...

मीना लाजरी नजर करून जमीनीकडे बघत म्हणाली. तिच्या बोलण्याचा अर्थ समजायला यावेळेला तर आमदाराला जास्तच वेळ लागला.

बंडा - म्हणजे?
मीना - .....
बंडा - तुझी तक्रार काय आहे मग?
मीना - .... (खाली बघून मंद हासत तिने नकारार्थी मान डोलावली.)

आमदाराला त्या हसण्याचा अर्थ अस्पष्टसा जाणवला.

बंडा - म्हणजे तुला म्हणायचंय की रूमवर आल्यावर.....

मीना अजूनही मंद हासत होती.

बंडा - म्हणजे ते सगळे तुलाच करावेसे वाटत होते?

मीनाने नजर फ़िरवली. आमदाराच्या अंगावर मूठभर मांस चढले.

मीना - कुठलीतरी मुलगी अशी थांबेल का सर खोलीत? आणि आधी येईल तरी का अशा वेळी खोलीत कधी?

या सगळ्या संवादातून साध्य इतकेच झाले की आमदाराला समजले की ही नंदनची बायको नाही. ही त्याची बायको नाही हेच सांगायला ती आली आहे. म्हणजे ती आत्ता खरं बोलत आहे. जर ती नंदनची बायको असती तर त्या दिवशी कशाला रूमवर आली असती. आपल्याला हे आधीच कसं लक्षात आलं नाही? कार्यकर्ता घरी असताना त्याची बायको नेत्याकडे कशाला येईल? साली चालूच आहे. पण मग आली होती कशाला? धंदेवाली तर वाटत नाही. धंदेवाल्या अशा दिसतच नाहीत. ही खानदानी पोरगी आहे. साली उपप्रमुख व्हायला आली होती की काय? आपणही भाळलो. हिला तर कधीही वापरता येईल. ही कुणीच नाही आहे.

बंडा - हे बघ, जे झालं ते झालं! आता ही सभा होऊदेत.. भाऊंच्या नावाची घोषणा करायचं ठरवलंय आरोग्यमंत्र्यांनी. तू आता रात्री भेट आम्हाला.

या एका वाक्यातच मीनाचा पार पचका झालेला होता.

भाऊंनी नियुक्तीचे पत्र फ़ाडले तेव्हा मनात आलेली भावनाच आत्ताही आली. एवढं सगळं करून आपण काय कमावलं? हाच क्षण! हा एकच क्षण आहे आमदाराला भुलवण्याचा! आज जिंकलो नाहीत तर कधीही जिंकणार नाही आपण!

आमदार खुर्चीत बसला होता. मीना त्याच्या समोर उभी होती. ती त्याच्या तोंडावर झुकली. त्याच्या कानाला ओठांनी स्पर्श करत ती म्हणाली:

मीना - आज नाही येता येणार सर.. अन यापुढेही येणं जरा अवघडच आहे.. माझं लग्न दुसरीकडे ठरतंय...

इतकेच बोलून मीनाने आमदाराच्या छातीवरून आपला उजवा तळहात फ़िरवत पार खाली नेला. डाव्या हाताची बोटं त्याच्या गालावरून फ़िरवली.

आमदाराचे नियंत्रण सुटले. त्याने तिला खोलीतच करकचून आवळली. तिच्या ओठांत ओठ गुंफ़वून तो हात फ़िरवायला लागला. तिने दोन, तीन सेकंद त्याची साथ दिली व पटकन बाजूला होत म्हणाली:
मीना - सभा सुरू होईल सर.. माझी आठवण ठेवा... येते मी... आयुष्यात परत कधीतरी भेट होईलच आपली...

मीना असे म्हणून फ़िरताच आमदाराला जाणवले.

पाखरू निसटतंय. एखाद्या वेगळ्याच गावात जाऊन राहिली तर परत भेटायचीही नाही. पोरगी तर मस्त आहे. फ़ुकट कशाला सोडायची? तिला तर राजकारणातही इंटरेस्ट नाही आहे. खडा टाकून पाहू.
आमदाराने पटकन तिचा हात मागून धरला व तिला जोरात आपल्याकडे खेचले. मीना धडपडून त्याच्या अंगावर पडली. तिला आपल्या मांडीवर बसवत आमदार तिच्याकडे पाहात म्हणाला...

बंडा - नेहमी भेटता येईलच की?
मीना - सर.. सोडा... कुणीतरी येईल
बंडा - तो उभा आहे रूमच्या बाहेर. कोणी येणार नाही.
मीना - नेहमी कसं भेटणार?
बंडा - आता उपप्रमुखांनी प्रमुखांना भेटायलाच पाहिजे की?
मीना - उपप्रमुख?
बंडा - हं...
मीना - कोण मी?
बंडा - हं...
मीना - अन भाऊ?
बंडा - म्हातारा नगरसेवक आहेच की..
मीना - तुम्हीच म्हणालात ना... की...
बंडा - गंमत केली तुझी...
मीना - पण मला कसं जमेल सर पार्टीचं काम?
बंडा - रात्री नाही का जमलं?
मीना - थट्टा करताय ना सर?
बंडा - तेच काम महत्वाचं आहे...
मीना - सर मी खोटं सांगीतलं होत की मला पार्टीचं काम करायचंय. तुमच्यावर मन जडलं होतं माझं! म्हणून म्हणाले तसं! पण खरच काम करायची वेळ आली तर मला काही माहीतही नाही आहे. आणि तेच सांगायला मी आज आले होते की मला ते पद नका देऊ...

मीनाच अख्खा देह ताब्यात आल्यामुळे आमदार आधीच पाघळलेला होता. त्यातच त्याला जाणवलं की पोरगी पद देऊ नका सांगायला आली होती. त्याला आणखीनच खात्री पटली.

बंडा - बोलणं बंद.. आजपासून तू जिल्हा उपप्रमुख...आम्ही सगळं काम शिकवू तुला... लग्न इतक्यात करायचं नाही.

पाच मिनिटे त्याच्याकडून कुस्करली जात असताना मीनाच्या मनात फ़क्त एकच विचार येत होता...

आपलं शरीर किती वेळा कुणासमोर सोपवायला लागणार आहे कुणास ठाऊक!

सूत्रसंचालक बडबडत होता. साहेब आलेले आहेत. एका उद्योजकांबरोबर अर्जंट मीटिंग चाललेली आहे. दोन, चार मिनिटात साहेबांचं व्यासपीठावर आगमन होईलच वगैरे वगैरे! कार्यकर्तेही साहेब काय निर्णय घेणार याबाबत उत्सूक होते.

व्यासपीठावर मध्यभागी साहेबांची खुर्ची होती. शेजारी आणखीन दोन, दोन खुर्च्या प्रत्येक बाजूला होत्या. उजवीकडच्या पहिल्या खुर्चीवर भाऊ बसलेले होते. त्यांच्या पलीकडे पक्षाचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते काका म्हस्के बसलेले होते. डावीकडच्या पहिल्या खुर्चीवर पार्टीच्या वकीलीण बाई सौ. मेधा बर्गे होत्या. त्यांच्या पलीकडे सुंदरमल होते, ज्यांनी वेळोवेळी पार्टीला काही ना काही डोनेशन दिलेले होते. आजच्या सभेला जिल्हाध्यक्ष व समाजसेवक काका नाफ़डे हे दोघेही नव्हते. जिल्हाध्यक्ष मुंबईला गेले होते व काका नाफ़डे ग्रामीण विभागात गेले होते. जिल्हाध्यक्ष हे पद आरोग्यमंत्र्यांनी निर्माण केलेले होते. जिल्हाप्रमुख व जिल्हाध्यक्ष या दोन पदांच्या कार्यव्याप्तीमधे फ़रक होता. आमदार स्वत:च जिल्हाप्रमुख होते.

जिल्हाप्रमुखाला जिल्ह्यात पार्टीचे अस्तित्व हरप्रसंगी जनमानसासमोर दाखवून देणे व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलनात्मक कारवाया करणे असे होते. त्यामुळे सणासुदीला, स्वातंत्र्यदिन, शिवजयंती, आंबेडकर जयंती अशा प्रसंगी आमदारांकडे असलेले कार्यकर्ते सोहळे आयोजीत करायचे. यामुळे जनसामान्यांमधे पार्टीचे अस्तित्व ठळकपणे दिसायचे. जनसामान्यांचे प्रश्नही सोडवण्याचे काम हेच कार्यकर्ते करायचे. नगरसेवक भाऊ बनसोडे या चॆनेलमधीलच एक स्थानिक पुढारी होते. भाऊ बनसोडेंचे डायरेक्ट रिपोर्टींग आमदारांना होते. सध्या उपप्रमुख हे पद रिक्त होते. या पदाची आवश्यकता अशी होती की नगरसेवक हे पद कार्यकारी होते व त्यामुळे जनमानसाला एक निष्पक्ष व्यक्तीमत्व हवेसे वाटत असल्याने उपप्रमुख नियुक्त करायचे होते. स्वत: आमदार साहेब सतत दौयावर असल्याने जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची सोलापूरला उपलब्धता फ़ार कमी होती. जिल्हाध्यक्ष हे जिल्हाप्रमुख आमदारांच्या जवळपास तितक्याच दर्जाचे पद होते. मात्र त्यांचे काम फ़क्त निवडणूक संदर्भातील होते. तसेच, त्यांना स्वत:ला कार्यकारी पद कधीच मिळणार नव्हते. त्यामुळे, जिल्हाध्यक्ष व्हायला कुणी फ़ारसे इच्छूकही नसायचे व झालेच तर पटकन पोर्टफ़ोलिओ बदलून घ्यायच्या कामी लागायचे. पार्टीला जास्तीतजास्त तिकिटे मिळावीत यासाठी पॆरेंट पार्टीशी निगोशिअशन्स करणे व उमेदवार निवडून यावा यासाठी शक्य तितक्या यंत्रणा राबवणे हे जिल्हाध्यक्षांचे कार्य होते. जिल्हाध्यक्ष प्युअरली पार्टीचे काम करत असल्याने व ते पद कधीच वरच्या दर्जाच्या कार्यकारी पदांसाठी विचारात घेतले जात नसल्याने पार्टीत कार्यकर्ते नेहमी जिल्हाप्रमुखालाच आपला साहेब मानायचे. मात्र, निवडणूकीत जिल्हाध्यक्षांची खरी पॊवर कळायची. कारण स्वत: आरोग्यमंत्रीच त्यावेळेस जिल्हाध्यक्षांना स्वत:च्या पॊवर्स डेलिगेट करायचे. तसेच, मुंबईत होणाया आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकींमधे जिल्हाप्रमुखांपेक्षा जिल्हाध्यक्षांचे महत्व जास्त गणले जायचे.

किमान वीस कार्यकर्त्यांनी तरी भाऊंना भेटून आज हार्दिक शुभेच्छा दिलेल्या होत्या. भाऊ आधीच फ़ुलून गेले होते. चुळबूळ चालू होती. कधी एकदा साहेब येतात अन नावाची घोषणा होते. बर्गेबाई शांत होत्या. त्यांचा अन सुंदरमल यांचा फ़क्त सत्कारच होता. काका म्हस्केंना शंका येत होती की भाऊ टाकून आले असावेत. सकाळीच पार्टी झाली की काय या चिंतेत ते होते. कारण दिवसात एकदाच प्यायची असा त्यांचा स्वत:चा कडक नियम होता अन आज रात्री प्यायची ठरलेली असल्याने व पार्टीची पार्टी जर सकाळीच झालेली असली तर आज आपल्याला स्वत:च्याच पैशाने प्यावी लागेल याची काळजी त्यांना होती.

अचानक एका बाजूला गडबड उडाली. आकाशी सफ़ारी घातलेले रुबाबदार आमदार श्री. बंडाभाऊ यांच्या आगमनाची वर्दी सूत्रसंचालकाने दिली. सर्व कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. भाऊ पुढे आल्यानंतर तब्बल पंधरा मिनिटांनी आमदार साहेब व्यासपीठावर येत होते. व्यासपीठावरचे सगळे उठून उभे राहिले. भाऊंनी पुढे होऊन हात जोडून सस्मित वदनाने स्वागत करत साहेबांना मधल्या खुर्चीवर बसवले. साहेब भाऊंकडे फ़ारसे बघत नव्हते. बर्गेबाईं शेजारीच होत्या. त्यांच्याकडे मात्र साहेबांनी जरा जवळून नीट बघून घेतले. काका म्हस्केंकडे पाहून हात जोडले व सुंदरमल यांनाही अभिवादन केले. बर्गेबाईंना कसे काय वगैरे विचारून मिस्टर आले आहेत की नाही असे विचारले. त्यावर त्यांनी ’होय, समोरच बसलेत’ असे सांगीतले.
सर्वप्रथम म्हस्केंच्या हस्ते साहेबांचा सत्कार व स्वागत झाले. त्यानंतर साहेबांच्या हस्ते बर्गेबाई व सुंदरमल यांचा सत्कार झाला. श्रीफ़ळ, मानपत्र, शाल व पार्टीच्या वरच्या वर्तुळातील लोकांना कार्यक्रमापुरता असायचा तो व्हॊलंटीयरचा बॆच!

काका म्हस्के बोलायला उभे राहिले.

म्हस्के - व्यासपीठावरील मान्यवर, आमदारसाहेब, बनसोडे भाऊ, बर्गेताई अन सुंदरमल शेठ.... तसेच आपण सगळे निष्ठावंत कार्यकर्ते...बंधू आणि भगिनींनो...आज या ठिकाणी.. आमदार साहेबांचे आगमन झाले ही आपल्या दृष्टीने .. पक्षबांधणीसाठी फ़ार महत्वाची बाब आहे. त्यांच्याकडून व माननीय आरोग्यमंत्री व आपल्या पक्षाचे संस्थापक श्री. दादासाहेब यांच्या आशीर्वादाने... आज पार्टीने सोलापुरात जे कार्य केले आहे... त्याचा अहवाल थोडक्यात...

म्हस्केंनी अहवाल सांगीतला.

त्यानंतर बर्गेबाईंनी सत्कार केल्याबद्दल आभार मानले व यापुढेही पार्टीचे काम विना मानधन करत राहणार असल्याचे सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. सुंदरमल शेठ यांनी मोडक्या तोडक्या मराठीत पार्टीला हवा तो आधार देण्याचे आश्वासन दिले. त्यांनाही जोरदार टाळ्या मिळाल्या.

आता भाऊ बोलायला उठले.

भाऊ - माननीय आमदार साहेब श्री बंडाभाऊजी, आदरणीय काका, माननीय बर्गेताई व सुंदरमल शेठ व मित्रांनो... आज आपण या सभागृहात जमलो आहोत... ते दोन अत्यंत महत्वाच्या व्यक्तीमत्वांचे सत्कार करायला. आत्ताच बर्गेताई व सुंदरमलजी यांचा सत्कार साहेबांच्या हस्ते झाला. बर्गेताईंनी आपल्या पार्टीची कायदेशीर बाबींमधे हरप्रकारे मदत केलेली आहे. तसेच, सुंदरमलजी यांनी अनेकवेळा अर्थिक भार स्वत: सोसून पार्टी उभी करण्यामधे मोलाचा हातभार उचलला आहे. या दोघांच्याही सहयोगामुळे आज निर्विघ्नपणे आपण सगळे पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते कार्यरत झालो आहोत. साहेबांना आज या ठिकाणि मला असे सांगावेसे वाटते की आपल्या पार्टीचे जितके काम सोलापुरात झाले असेल तितके कदाचितच इतर शहरांमधे झाले असेल. (टाळ्या). अगदी उस्मानाबादमधेही इतके काम झाले आहे की नाही अशी शंका यावी अशी प्रगती तुम्ही सर्वांनी करून दाखवली आहेत व साहेब निश्चीतच त्यासाठी तुम्हाला मनापासून शाबासकी देतील. (बनसोड्यांचे हे वाक्य खरे तर चुकले होते. आरोग्यमंत्री खरे तर स्वत:च उस्मानाबादचे होते. त्यांच्या स्वत:च्या कार्यभूमीत त्यांच्याच पक्षाचे काम सोलापूरहूनही कमी झाले अशा स्वरुपाचे धाडसी विधान ऐकून आमदारांच्या कपाळावर एक आठी आली.)

आपल्या सर्वांचे स्फ़ुर्तीस्थान, ज्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण सारे पक्षाचे काम दिवसरात्र करत आहोत ते माननीय आरोग्यमंत्री आज या समारंभाला उपस्थित असते तर सोन्याहून पिवळे झाले असते. पण आपलेच दुसरे स्फ़ुर्तीस्थान, आपले मार्गदर्शक व आपले अगदी स्वत:चे असलेले माननीय आमदारसाहेब व जिल्हाप्रमुख आज आवर्जून आपल्यात उपस्थित राहिले आहेत. त्यांना मी असे सांगू इच्छितो की आम्ही सोलापुरातील कार्यकर्त्यांनी मागील निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत मतांची टक्केवारी १३ वरून १८ वर आणली आहे. (टाळ्या). तसेच, आम्ही येथे एक क्रीडास्पर्स्धा भरवू लागलो आहोत जी माननीय आमदारसाहेबांच्याच नावाने भरवली जाते. त्यातील विविध क्रीडाप्रकारातील पहिला चषक हा माननीय आमदारसाहेबांच्या नावाने दिला जातो. आम्ही सोलापुरमधे एकंदर ८ तक्रार निवारण केंद्रे स्थापन केली असून जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फ़ोडण्यासाठी सुरू केलेला हा उपक्रम अत्यंत मोठ्या स्तुतीला पात्र ठरलेला आहे. (टाळ्या). आम्ही गेल्या सहा महिन्यात एकंदर २२ अपंग व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून दिला असून आता त्यांची कुटुंबांचा चरितार्थ व्यवस्थित चालू आहे. (टाळ्या). महिलांसाठी आम्ही १२३ बचत गट स्थापन केले आहेत. तसेच, खास महिलांसाठी अशी दोन तक्रार निवारण केंद्रे आहेत. माननीय आरोग्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्या रुग्णालयात कमीतकमी पैशात रुग्णसेवा व्हावी या माननीय आरोग्यमंत्र्यांच्या आदेशाचे आम्ही जातीने पालन करत आहोत. एकंदर सहा रस्त्यांची डागडुजी व्हावी यासाठी आम्ही रास्ता-रोको आंदोलन केलेले असून त्याचे फ़ळ लवकरच मिळेल. (टाळ्या). पार्टीची सभासद नोंदणी केंद्रे आधी फ़क्त दोन होती. आता ती चार झालेली आहेत. सभासद नोंदणीचा वेग गेल्या तीन महिन्यात वाढलेला असून आम्ही फ़क्त गेल्या पंधराच दिवसात ६१ जणांना पार्टीचे सभासदत्व दिलेले आहे. (टाळ्या).

हायवेवर झालेल्या प्रत्येक अपघातातील प्रत्येक रुग्णाला अर्ध्या दरात सोलापुरातील रुग्णालये ट्रीटमेंट देत आहेत. तीन शाळांना आम्ही जिल्हाप्रमुख निधीमधून दूध व बनपाव पुरवत आहोत. (टाळ्या).
भाऊंचे भाषण लांबत चालले होते. आमदार त्यांच्या भाषणाकडे व्यवस्थित लक्ष देत होते. मात्र लक्ष आहे असे दाखवत मात्र नव्हते.

जवळपास बारा मिनिटे बोलून भाऊंनी आपले भाषण संपवले. एखाद्या नवशिक्याची अशी कल्पना झाली असती की उस्मानाबादपेक्षाही खरे तर पार्टीचे अस्तित्व सोलापुरमुळे तगलेले आहे. मात्र त्यातील खाचाखोचा काका म्हस्के, काही जुने कार्यकर्ते व सगळ्यात महत्वाचे म्हणजे आमदारसाहेबांना व्यवस्थित माहीत होत्या.

भाऊ बसले तेव्हा टाळ्यांचा कडकडाट चाललेला होता.

सूत्रसंचालकाची वाट न पाहता आमदारसाहेब बोलायला उठले. सूत्रसंचालक उगीचच ’आता... आपले माननीये नेते...’ वगैरे म्हणू लागला होता.

आमदारसाहेबांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.

व्यासपीठावरील मान्यवर, बंधू व भगिनींनो,

सोलापुरात आल्यावर मला माझ्याच घरी आल्यासारखे वाटते. (टाळ्य़ा).

याचे कारण आपल्या सर्वांचे प्रेम! इतके प्रेम मला फ़क्त उस्मानाबादलाच मिळालेले आहे. (टाळ्या).

माननीय आरोग्यमंत्री, आपल्या पक्षाचे संस्थापक व माझे तीर्थरूप, यांनी शुद्ध समाजसेवेच्या हेतूने स्थापन केलेल्या या पक्षाच्या वाढीसाठी आपण सर्व मिळून अत्यंत पराकोटीचे कष्ट घेत आहात हे पाहून मला अभिमान वाटतो. सोलापूरमधील कार्यकर्त्यांचे एक वैशिष्ट्य मी नेहमी सर्व शहरांमधील कार्यकर्त्यांना सांगतो. की झोकून देऊन काम कसे करावे हे येथे शिकावे. (टाळ्या).

आपल्या सर्वांच्या प्रेमाची किंमत करणे शक्य नाही.

आत्ताच पार्टीचे प्रमुख आधारस्तंभ सुंदरमलजी यांचा सत्कार झाला. सुंदरमल यांनी पार्टीच्या प्रगतीसाठी केलेले प्रयत्न माझ्या भाषणातून उल्लेखणे योग्य ठरणार नाही. काही काही ऋणांचा उल्लेख योग्य नसतो. (सुंदरमल यांची मान ताठ झाली.) मात्र, आमच्या परीने आम्ही हे ॠण फ़ेडण्याचा प्रयत्न करण्यासाठी काय काय करू शकलो इतकेच आम्ही कसेबसे सांगू शकतो. आम्ही सुंदरमल यांना फ़क्त एका पेट्रोल पंपची एजंन्सी तेवढी दिली. (सुंदरमल यांनी खाडकन आमदारांकडे बघितले. आमदार समोर बघत होते. लोक सुन्न झाले होते). सुंदरमल यांच्या त्या पंपामुळे आज सोलापुरातील विष्णूनगर भागातील सर्व नागरिकांची पेट्रोलची सोय झाली. (सुंदरमल यांनी आवंढा गिळला.) मध्यंतरी एका ठिकाणी एका ढाब्यावर धाड पडली. (संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले. सगळ्यांनाच माहीत होते की तो ढाबा सुंदरमल यांचा आहे. दिड महिन्यापुर्वी तेथे अनैतिक व्यवहार चालल्याची अगदी छोटी बातमी झळकली होती. तीही एकाच स्थानिक वर्तमानपत्रात. सुंदरमल यांनी मधले काही हप्ते दाबलेले असल्यामुळे डिपार्टमेंटने तो लहानसा सूड घेतलेला होता. पण नंतर ते प्रकरण दाबण्यासाठी पार वरपर्यंत जावे लागले होते व एक मोठ्ठा हप्ता द्यावा लागला होता). काही समाजकंटकांनी त्या प्रकरणात उगीचच सुंदरमल यांचे नाव गोवले होते. (आता भाऊही हादरले होते. बहुतेक आज साहेबांचा मूड सरकलेला वाटत होता.) मात्र आम्ही सुंदरमल यांचे नाव त्या घाणेरड्या प्रकरणातून काढून टाकले. इतक्या निष्पाप व निरागस व्यक्तीमत्वाची अशी थट्टा त्या समाजकंटकांना का करावीशी वाटली काही समजत नाही. (सुंदरमल यांची मान छातीला टेकेल इतकी खाली गेली होती. बर्गेताई सुन्न झाल्या होत्या. या प्रकरणात त्यांनी जीवाचे रान करून सुंदरमल यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांना एक बजाजची एम एटी मिळालेली होती.)

आम्ही असेही ऐकले की तक्रार निवारण केंद्राबाबतही तक्रार आली होती. (काका म्हस्केंना ठसका लागला). एका तक्रार केंद्रात म्हणे एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने पाण्याच्या कनेक्शनसाठी प्रयत्न करण्यासाठी ३००० रुपये घेतले होते. (हे प्रकरणही बहुतेकांना ठाऊक होते कारण त्याची वर्तमानपत्रात बोंबाबोंब झाली नसली तरी अंतर्गतरीत्या झालीच होती. आज साहेब कोणाकोणाचा बुरखा फ़ाडणार असे आता कार्यकर्त्यांना वाटू लागले होते). हे ज्येष्ठ कार्यकर्ते कोण हे काही आजवर आम्हाला समजलेले नाही. मात्र, असे कुणी असल्याचे समजल्यास कृपया इतरांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा. अशा कार्यकर्त्यांना आपल्या पार्टीत ठेवता येणार नाही. (काका अंतर्बाह्य हादरले होते. ते कार्यकर्ते आपण आहोत हे साहेबांना कधीच माहीत झालेले होते हे त्यांना माहीत होते. साहेबांनीच वयाचा मान ठेवून ’समजलेली पहिली चूक’ माफ़ केलेली होती). भ्रष्टाचार रोखण्यासाठी आपली पार्टी आहे. भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यासाठी नाही.

(इकडे भाऊंच्या काळजाचे पाणी पाणी झालेले होते).

आदरणीय बर्गेताईंबद्दल मी काय बोलणार? पक्षासाठी अहोरात्र झटतात त्या. त्यांचा सत्कार करणे हे पक्षाचे कर्तव्यच आहे. आपल्या समाजकार्यात अनेक केसेस मार्गी लावून त्यांनी मोठाच हातभार उचलला आहे. मात्र, पक्षाचा जिल्हाप्रमुख या नात्याने मलाही एक गोष्ट सांगावीशी वाटेल. (बर्गेताई सचिंत नजरेने साहेबांकडे पाहू लागल्या). जी कामे सामान्य नागरिकांना सहाय्य करणारी ठरतील, जी कामे अवैध नसतील तीच कामे आपल्याकडून केली जातात हे पाहणे आवश्यक आहे. (सभागृहात पुन्हा सन्नाटा पसरला. बर्गेबाईंना ’कुठून आले इथे’ असे झाले. त्यांनी सुंदरमलना वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे हे फ़ळ मिळाले होते).

आपल्या पार्टीची प्रगती भाऊ बनसोडे यांनी सांगीतली. (भाऊंना आता तलवार आपल्याकडे वळल्याची जाणीव झाली).

खरोखरच, इतकी वेगवान प्रगती पाहून मी अचंबीत झालो आहे. (आमदारांच्या स्वरातील उपरोध सभागृहाच्या कानाकोपयाला आदळून आला). माननीय आरोग्यमंत्र्यांनी लावलेल्या या रोपाचा इतका मोठा वृक्ष करण्यात सगळ्यांचाच मोलाचा सहभाग आहे. गेल्या केवळ पंधरा दिवसात ६१ नवे सभासद झाल्याचे भाऊंनी सांगीतले. अशा उत्साहवर्धक बातम्या आम्ही बाबांना सांगणारच आहोत. खरे आहे, कदाचित उस्मानाबादपेक्षाही जास्त वेगात पक्षाची प्रगती सोलापुरात होत असावी. त्याचबरोबर, गेल्या एक महिन्यात, आपल्या पार्टीत काम करणारे ४४ समाभद फ़ुटले व इतर पक्षांमधे गेले याची कारणमीमांसाही सादर व्हावी असा आम्ही आदेश देतो. (साहेबांनी आज मुंडकी उडवण्याचा प्लॆन केलेला दिसत होता. मगाशी वाजत असलेल्या टाळ्या आता अजिबातच वाजत नव्हत्या. साहेब स्तुतीपर बोलता बोलताच असे काही बोलत होते की सगळे चाचरून नुसते ऐकत होते). आपल्या पार्टीमधे या फ़ुटलेल्या लोकांना का राहायचे नव्हते? त्यांच्या काय अडचणी होत्या? त्यांना इतर पक्षांमधे नेमके काय मिळाले म्हणून ते तिकडे गेले? हे लोक कोण होते? यांच्या फ़ुटण्याच्या बातम्या इतक्या जोरदार पद्धतीने का आल्या? जनमानसात आपली प्रतिमा यामुळे किती बिघडली व ती सुधारण्यासाठी आपण काय काय केले याचा रिपोर्ट मला उद्या सकाळी उस्मानाबादला हवा आहे.

क्रीडास्पर्धांना लागणारी साधनसामुग्री! (पुन्हा सगळे हादरले). यातही काहीतरी घोटाळा झाल्याचे निदर्शनास आले आहे. आता माझ्याच नावाने चषक दिला जातो याचा आनंद मानावा की दु:ख हे मला समजत नाही. माननीय आरोग्यमंत्र्यांची प्रतिमा आपण मलीन करतो आहोत याची जाणीव संबंधितांना नाही हे किती दुर्दैवी आहे. पक्षाचे काम नि:स्वार्थीपणे करण्याच्या घोषणा करता... मग या गोष्टी होतातच कशा?
तसेच, हायवेवर झालेल्या अपघातग्रस्तांना कमी पैशात , सवलतीत उपचार मिळतात याचा मला आनंद आहे. पण मुळातच दारू पिऊन गाडी चालवू नये या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आपण काय काय केले आहे ते मला समजायला हवे. पण ते समजणार तरी कसे? पुढारीच स्वत: दारू पिऊन येत असतील तर हा शोध कोण घेणार?

(दुपारी लावलेले ड्राय रमचे तीन घोट आता पश्चात्तापाचे घोट बनून भाऊंच्या हृदयातून वर आले).

(कोण दारू पिऊन आले आहे याची इतर कुणालाच फ़ारशी कल्पना नव्हती. बर्गेबाई लांब होत्या. सुंदरमलही लांब होते. पण काका म्हस्केंना समजले होते की साहेब भाऊंबद्दल बोलत आहेत).

एकंदर इतक्या कसरती केल्यानंतरही पक्ष टिकून आहे तो तुमच्यासारख्या मूळ थरात कार्य करत असलेल्या कार्यकर्त्यांमुळे! तेव्हा हे असेच कार्य चालू ठेवा असा मी आदेश देतो. कोणत्याही भ्रष्टाचाराला फ़ोफ़ावू देऊ नका. अन्याय सहन करू नका. मात्र त्याचा विरोध अहिंसेने करा. दंडेलशाहीने करू नका. आंदोलनात्मक मार्गांनी करा. सामान्य माणसाचे सुख हे आपल्या पक्षाचे ध्येय आहे हे लक्षात ठेवा.
एकंदर परिस्थिती पाहून आम्ही सोलापूर जिल्ह्यासाठी एक कायमस्वरुपी जिल्हा-उपप्रमुख असावा या निष्कर्षावर पोहोचलो आहोत. आम्ही आरोग्यमंत्र्यांना, पार्टीच्या संस्थापकांना याची पुर्ण कल्पना दिलेली आहे.

(भाऊंना पुन्हा उत्साह आला. काही झाले तरी पार्टीत आत्ता तरी त्यांच्याइतके ज्येष्ठ कुणी नव्हते. आरोग्यमंत्र्यांनी पक्ष स्थापन केल्यापासून भाऊ पार्टीत होते. त्यावेळेस आमदार त्यांना ’काका आले, काका आले’ म्हणून बिलगायचे अन भाऊ एखादी कॆडबरी कौतुकाने आमदारांना द्यायचे. पण तो काळ आता गेलेला होता. आता घराणेशाहीच्या नैसर्गीक नियमाप्रमाणे आमदार आमदार झाले होते. भाऊ त्यांना खूपच ज्युनियर होते. मात्र भाऊ हा माणूस आपल्या वडिलांपर्यंत कधीही पोचू शकतो याची जाणीव असल्यामुळे आमदारांनी मुद्दाम वडिलांना कल्पना असल्याचे भासवले होते. आणि त्याच कारणामुळे भाऊंनाही आमदारांवर आपले दडपण असेल व आपल्याशिवाय इतर कुठल्याच नावाच विचार ते करणार नाहीत याची जवळपास खात्रीच होती.)

आमदार साहेबांचे भाषण पुढे सुरू झाले. सर्व जण आत्ताइतके एकाग्र या सभेत अजूनतरी झालेले नव्हते.
आम्ही ठरवले आहे की पक्षाला एक असे नेतृत्व द्यायचे जे स्वत: स्वच्छ प्रतिमेचे आहे. ज्या व्यक्तीवर आजवर कोणताही आरोप झालेला नाही. ज्या व्यक्तीमुळे जनसामान्यांना आपल्यातीलच कुणीतरी पक्षाचे काम बघतो याची जाणीव होईल. ज्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे सामान्य माणसांना, विशेषत: महिलांना सहज शक्य होईल.

पार्टीत बोकाळलेली अनीती, भ्रष्टाचाराची वृत्ती नष्ट करून पार्टीची प्रतिमा उजळली जाईल असे कार्य करणारी व्यक्ती आम्ही या जागेवर नियुक्त करत आहोत. आमचा सोलापूर दौरा वारंवार होऊ शकत नाही. यामुळे येथे सतत पक्षाच्या नि:स्वार्थी व समाजसेवेच्या तत्वांचा पाठपुरावा करून जनसामान्यांना सुटकेचा श्वास घेता येईल असे नेतृत्व आवश्यक आहे.

आम्हाला अशी व्यक्ती माहीत आहे. ती आपल्यातीलच एक आहे.

मी ... पक्षाचा आमदार व सोलापूर, उस्मानाबाद व जालना जिल्ह्यांचा जिल्हाप्रमुख बंडाभाऊ असे जाहीर करतो की पक्षाच्या सोलापूर जिल्हा उपप्रमुखपदी मी नियुक्त करत आहे, एक तडफ़दार, तरुण व खंबीर नेतृत्व.....

मीनाताई कातगडे....
.....................
.........................

एक प्रदीर्घ सन्नाटा! इतकेच त्या क्षणांचे वर्णन होऊ शकत होते. आजवर कधीही ऐकले नाही ते नाव अचानक उपप्रमुख म्हणून ऐकायला मिळत होते. कार्यकर्ते अक्षरश: सुन्न झाले होते. टाचणी पडली तर आवाज येईल अशी शांतता पसरली होती. कोण मीना कातगडे हा प्रश्न प्रत्येक चेहरा व्यापून उरला होता.
बर्गेबाई स्टेजच्या एका बाजूला, जेथे आमदारसाहेब बघत होते, तिकडे, बहुधा इकडून मीनाताई येणार या अपेक्षेने बघत होत्या. त्यांना धक्काच बसला होता. आजवर पार्टीचे काम करताना इतक्या वर्षांमधे हे नाव सोलापुरातच काय, इतरत्रही ऐकले नव्हते. सगळे सभागृहच तिकडे बघत होते.

सुंदरमल यांना व्यक्तीश: काहीच फ़रक पडणार नव्हता. अर्थकारण त्यांच्या हातात असल्याने त्यांचे महत्व कमी होणार नव्हते. पण आता ढाब्यावर झाले तसे प्रकार पुन्हा कुठेही होऊ द्यायचे नाहीत इतके त्यांना आतल्याआत समजले होते. तेही अती उत्सुकतेने तिकडेच बघत होते.

काका म्हस्के विदीर्ण चेहरा करून बसले होते. त्यांचे अन भाऊंचे गुळपीठ चांगले होते. किरकोळ पैसे खाऊन भाऊंना सांगून कातडी वाचवायची हा खाक्या चांगला जमू लागलेला असतानाच हे नवे विघ्न आले होते.

सूत्रसंचालक बधीर झाला होता. त्याला फ़रक पडण्याचा संबंधच नव्हता. कोणीही असले तरी नाव बदलले की तेच भाषण चालत होते. पण हे नावच नवीन होते म्हंटल्यावर बरीचशी इक्वेशन्स बदलण्याचा संभव होता.

आणि भाऊ! भाऊंना हार्ट ऎटेक आलेला नव्हता व ते गेलेले नव्हते इतकेच सत्य होते. बाकी त्यांच्या संपूर्ण शरीराला मुंग्या आलेल्या होत्या. किमान दिडशे कार्यकर्त्यांसमोर एक कधीही भरून न येणारा अपमान! एका पोराने, केवळ त्याच्या बापाचा पक्ष आहे म्हणून.. हे करावे?

भाऊ दोन्ही हात टेबलावर दाबून ठेवून टेबलाकडेच बघत बसले होते. त्यांच्या डोळ्यांमधून ’सर्व काही संपल्या्ची’ भावना ओसंडत होती. याक्षणी, अगदी याचक्षणी येथून चालते व्हावे असे वाटत होते त्यांना!
आमदारांनी जे नाव घेतले तेच आपण ऐकले हे त्यांना खरेच वाटत नव्हते. आपल्या मनात त्या पोरीचा विचार असल्याने आपल्याला तसे ऐकू आले की खरोखर तेच नाव घेतले?

मीनाताई कातगडे? ताई? आमदार हिला ताई म्हणतो? आहे कोण ही पोरगी?

ही मीना कातगडे नावाची मुलगी आहे कोण नक्की?

आमदाराची नातेवाईक तर नाही?

आपले सगळे संपले आहे आता. सी.डी. प्रकरण तर असे भोवणार आहे की देशात कुठेही पळून गेलो तरी सापडू अन फ़ासावर जाऊ.

मीना कातगडे! सामान्य झोपडपट्टीतील एक मुलगी! जिल्हा उपप्रमुख! आमदार वेडा झाला आहे. नंदन लातूरचा प्रमुख, ही इथली! नंदन हिच्याशी लग्न करणार बहुतेक! आणि शर्मिलानेच आमदाराला सुचवले असणार आहे हे. हा सगळा आपल्याला नेस्तनाबूत करण्याचा डाव आहे.

भाऊ बनसोडे मरणार! आपण मरणार! आपले हाल आता कुत्रा खाणार नाही. ही कालची मुलगी आता आपल्या बंगल्यात राहायला येणार. पक्षाच्या वरिष्ठ अधिकायासाठी आपल्याला जागा सोडावी लागणार. कार्यकर्ते या पोरीच्याच मागे लागणार. आपल्याला विचारणार नाहीत. सोलापुरातील सर्वात वरिष्ठ पद तिला मिळाले. आपण संपलो.

नाही. आपण कसे संपू? दादासाहेब आहेत की? आपण असे कसे संपू? हा आमदार बच्चा आहे. आपल्याच अंगाखांद्यावर खेळला आहे. अजून याला अक्कल नाही. काय करतो आहे ते याचे यालाच समजत नाही. पण मुळात प्रश्न अजूनही हाच आहे, की ही साली मीना कातगडे याची आहे कोण? यांचा संबंध काय आहे?
संपूर्ण सभागृह स्तब्ध झालेले होते. मीना कातगडे हे काय प्रकरण आहे बघण्यासाठी सगळेच डोळे, भाऊंचे सोडून, आतुरले होते.

आणि मीना स्टेजवर आली. गव्हाळ रंग, तोंडावर प्रसन्न स्मितहास्य, इतका मोठा समुदाय आपल्या सत्काराला जमला आहे याची सार्थ जाणीव, या पोझिशनसाठी आपल्याशिवाय कुणी पात्रच नसावे असा आत्मविश्वास तोंडावर, निळी साडी, हात कार्यकर्त्यांकडे बघून जोडलेले!

मीना कातगडे!

जिल्हा उपप्रमुख!

वय? बावीस? काहीतरी काय सांगता? होय... वय बावीस... फ़क्त!

अनुभव? ... अनुभव? छे! शुन्य!

पात्रता?....... काहीही नाही, फ़क्त दिसायला आकर्षक...

कधी बघितलयत? ..... आज पहिल्यांदा पाहिलं हिला....

सोलापुरचीच आहे का? .......माहीत नाही... असेल बहुधा

मीना कातगडे! व्वा! काय निवड आहे साहेबांची! एखाद्या कादंबरीच्या किंवा दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर शोभावा असा चेहरा! मीना कातगडे...

एकच क्षण! संपूर्ण सभागृह फ़क्त एकच क्षण स्तब्ध होते. मीनाचे आगमन झाल्यावर तिचे व्यक्तीमत्व कसे आहे याची उत्सुकता संपायला तो एक क्षण पुरला.

तो एक क्षण संपला आणि टाळ्यांची अक्षरश: बरसात झाली. अभूतपुर्व टाळ्या वाजल्या.

ही मीना कातगडे? अरे? पोरगी आहे एवढीशी! ही जिल्हाप्रमुख?

लोक उत्स्फ़ुर्त टाळ्या वाजवत होते. आमदारांसकट सगळे तिच्या त्या स्मितहास्याकडे खेचल्यासारखे जात बघत होते. काका म्हस्केंना प्रथमच कुणीतरी फ़्रेश नेतृत्व आले ते बरे झाले असे प्रामाणिकपणे वाटू लागले होते. बर्गेबाई तिच्या व्यक्तीमत्वाने फ़ारच प्रभावित झाल्या होत्या. सुंदरमल तिच्याकडे सुखद आश्चर्याने पाहात होते. त्यांना वाटत होते की काही म्हणा, पण असे नेतृत्वही पाहिजेच पार्टीला...
कार्यकर्ते टाळ्या थांबवतच नव्हते.

तब्बल वीस, पंचवीस सेकंदांनी टाळ्या थांबल्या अन कुणीतरी म्हणाले:

मीनाताई कातगडे -

सगळ्यांनी घोषणा दिल्या - विजय असो....

हे तेच ते कार्यकर्ते! जे आजवर भाऊंच्या एका शब्दासाठी वाटेल तसे खपत होते. पण आज भाऊंच्या तोंडाकडे कुणाचे लक्षच जात नव्हते.

आमदारांनी तिला माईकपाशी येऊन बोलण्याची खूण केली.

मीनाला माहीत होते की तिला फ़ारसे बोलता येत नाही. पण पहिल्याच भेटीत कार्यकर्त्यांवर प्रभाव पाडणे अत्यावश्यक होते.

मीना आत्मविश्वासाने माईकपाशी आली.

मीना : मी आपला फ़ार वेळ घेणार नाही. सगळ्यांनी एकत्र येऊन, कोणतीही वाईट भावना मनात न ठेवता, पार्टीचे काम मनापासून करायचे आहे. कुणालाही पार्टीच्या कामासंदर्भात कोणतीही तक्रार, अडचण असली तर अर्ध्या रात्री हाक द्या, ही मीना कातगडे मदतीला धावेल. सोलापुरच्या लहान मुलांना देखील आपल्या पार्टीचे नाव कायमचे लक्षात राघिले पाहिजे इतके काम करूयात. सर्वांना अन्न, पाणी, वस्त्र, निवारा व शिक्षण हे आपले प्राथमिक ध्येय आहे. उद्याच पार्टीच्या कार्यालयात मी सर्व जबाबदायांचे वाटप करणार आहे. उद्या सकाळी दहा वाजता कार्यालयात सर्वांनी यायचे आहे. आजपासून अंतर्गत राजकारणे, कलह हेवेदावे, सगळे बंद! पक्ष सोडून आता कुणीही जायचे नाही. उलट पक्ष मोठा करायचा. मी तुमच्या सर्वांची धाकटी बहीण आहे. मलाही समजावून घ्या व मीही तुमच्या अडीअडचणी समजावून घेईन! एकत्र काम करू..

जयहिंद!

जणू गेली वीस वर्षे स्फ़ुर्तीदायक भाषणे देण्यासाठी प्रसिद्ध असल्याप्रमाणे मीना बोलली होती.

सभागृह अवाक झाले होते. ही चिमुरडी? हेवेदावे थांबवा म्हणते? खरच, ही म्हंटल्यावर खरच थांबवावेसे वाटतात आपले हेवेदावे!

किती छान, प्रसन्न बोलली ही? आमदारसाहेबांची निवड एकदम भारीच!

पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.

मीना स्टेजवरून निघून जायला लागल्यावर आमदारांनी तिला ’येथे बस’ अशी खूण केली.
आता खुर्च्या पाचच होत्या. सहाव्वी खुर्ची ताबडतोब आणण्यात आली. पोझिशनप्रमाणे, ज्या दोघांचा सत्कार होता ते व कार्यकर्त्यांच्या भावनांची जाण ठेवायची असल्यामुळे काका म्हस्के हे आहेत तिथेच बसणे अपेक्षित होते. आमदारांनी भाऊंना सहाव्या, सर्वात शेवटी ठेवलेल्या खुर्चीवर बसायला सांगीतले आणि मुख्य म्हणजे इतका अपमान होऊनही केवळ राजकारणात मुरलेले असल्याने भाऊ स्वत:हून सस्मित चर्येने उठून त्या खुर्चीवर बसले.

सूत्रसंचालकाने सर्वप्रथम मीनाताईंचे हार्दिक अभिनंदन केले. त्यानंतर, बरोबर नाऊ वाजता रेव्हन्स या तारांकित हॊटेलात सर्वांना डिनर असल्याचे सांगीतले व त्यानंतर कार्यक्रम संपला असल्याची घोषणा केली. काका म्हस्क्यांना कॊकटेल डिनर आहे की नाही हे त्याला विचारायचे होते, पण तो आधीच खाली निघून गेला.

मीनाचे अभिनंदन करायला रीघ लागली. एकेक जण येऊन आपापली ओळख करून देत नमस्कार करून जात होता. भाऊंकडे कुणीच बघत नव्हते. पण तरीही ते तिथेच बसले होते. चेहरा हसराच ठेवला होता. एखाद्याशी एखादा शब्द बोलत होते. आमदार सर्वांचा आनंद पाहून आनंदीत झाले होते.
वीस मिनिटांनी भाऊंच्या गाडीत भाऊ व दोन, चार कार्यकर्ते तर सुंदरमल यांच्या गाडीतून बर्गेताई व काका म्हस्के रेव्हन्सला निघाले. बर्गेबाईंचे मिस्टर नव्या एम एटीवरून मागून निघाले. आणि आमदारांच्या गाडीत आज सहाय्यकही नव्हता. ड्रायव्हरचे लक्ष नाही असे बघून हळूच आमदार मीनाच्या हातात हात गुंफ़वत होते. ती लाजल्याचा अभिनय करून खरे तर अत्यंत विषारी नजरेने बाहेर बघत होती. सगळे झाल्यावर या आमदाराला धडा शिकवायचे तिने केव्हाच ठरवले होते. पण आत्ता त्याचा उपयोग एका शिडीसारखा होणार होता.

हॊटेल रेव्हन्स!

उस्मानाबादहून आलेली आमदारांची मैत्रिण आधीच या हॊटेलमधे होती. तिला दोन दिवसात काहीच ड्युटी करायला लागलेली नव्हती. त्यामुळे ती सहाय्यकाला तिच्या मासूम शंका विचारत होती. बहुतेक सगळे तेथे पोचले होते. काही क्षणातच भाऊंची गाडी, पाठोपाठ सुंदरमल अन त्यानंतर साहेबांची गाडी व त्यांच्या ताफ़्यातील दोन गाड्या आल्या.

सगळे उतरल्यावर ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातला. साहेब व मीनाताई अभिनंदनांचा स्वीकार करत होते. त्यातच कुणीतरी आमदारसाहेबांना म्हणाले की ’साहेब आज मात्र पार्टी पाहिजे, आपण दोन वर्षांनी आला आहात’.

काका म्हस्के अपेक्षेने पाहू लागले. त्यांना वयामुळे काही म्हणणे शोभून दिसणार नव्हते हे त्यांना समजत होते. भाऊ खोटे हसत उगीचच आमदारांबरोबर असल्याप्रमाणे दाखवत होते. पण मीना, नवी उपप्रमुख, पाहिल्यानंतर कुणाचे भाऊंकडे लक्षच जाणे शक्य नव्हते. त्यातच, मीना स्त्री असल्यामुळ एकंदर प्रसंगाला एक सभ्यतेची झालर आलेली होती.

आमदारांनी मीनाकडे पाहात ’ताई, कार्यकर्त्यांना पार्टी पाहिजे, आजच्या दिवस राग मानू नका’ असे सांगीतले. मीनानेही मान हलवून परवानगी दिल्यावर एकच जल्लोष झाला.

बाटल्यांची बुचे कचाकच फ़ुटली. चीअर्सच्या घोषणा दुमदुमल्या. बर्गेबाईंच्या मिस्टरांनीही आपला पेग भरला. बाई ’आत्ता सगळ्यांसमोर नको’ असेही म्हणाल्या. सुंदरमल प्युअर व्हेजिटेरिय़न होता व दारूला शिवायचाही नाही. शर्मिला पार्टीला आलेली नव्हती. आमदारांनी दुपारी केलेला अपमान अजून तिच्या मनात ठुसठुसत होता. काका म्हस्केंचा पहिला पेग दोन घोटांमधेच संपला होता. भाऊ एकटेच जरा बाजूला जात ड्रिंक घेत एकंदर परिस्थितीचा विचार करत होते. आमदारांची उस्मानाबदची मैत्रिण, आमदारांची उगीच शोभा व्हायला नको म्हणून त्यांच्यापासून लांब राहून सहाय्यकाबरोबर बोलत होती. काही लोकांचा ’ती त्याची बायको असल्याचा’ गैरसमज झाला होता. आमदार ’आत्ता फ़ार घेणे चांगले नाही’ या विचाराने अगदीच हळूहळू घेत होते. आणि मीना...

मीना ओठांनी काहीच करत नव्हती. मात्र डोळ्यांनी व कानांनी संपूर्ण परिस्थितीचे आकलन करत होती. कोण कसा बोलतो, कोण कामाचा आहे, कोण कसा वागतो, कोण कोण पितो वगैरे वगैरे! तसेच, तिला सर्वात सीनियर स्थानिक असल्यामुळे आमदारांच्या शेजारीच बसावे लागत होते. आमदार एकेक भेटायला येणारा आला की त्याच्याशी जुजबी बोलत किरकोळ चौकशी करत ’अरे वा, असे का,’ वगैरे बडबडत होते. त्यांचे लक्ष होते त्यांच्या मैत्रिणीशी त्यांचा सहाय्यक कसा वागतो याकडे अन मीना काय करते याकडे. मधून मधून ते मीनाशी बोलत होते. तिला काही ओळखी करून देत होते व पक्षाच्या कामासंबम्धी उगीचच काही महत्वाचे मुद्दे सांगीतल्यासारखे दाखवत होते.

अर्ध्या तासांनी आमदार उठले व जायला निघाले. सगळे त्यांच्याजवळ गोळा झाले. सगळ्यांनी हात जोडून नमस्कार वगैरे केल्यानंतर आमदार त्यांच्या गाडीत जाताना मीनाला ’ताई तुम्हाला घरी सोडतो’ म्हणाले. त्यावर मीना ’हो’ म्हणाली व त्यांच्या गाडीत बसली. मात्र आमदार गाडीत बसायच्या एकच क्षण आधी भाऊंनी त्यांना ’थोडं बोलायचं होतं’ असं सागून गाडीतून बाहेर बोलवलं! आमदार व मीना, दोघांनाही कल्पना होती की त्यांना काय बोलायचे असेल!

भाऊ - साहेब... आपण जाणताच... आम्ही जुनी माणसं... दादासाहेबांच्या वेळची...
बंडा - खरंय भाऊकाका
भाऊ - आपण अतिशय चांगला निर्णय घेतलात. युवा नेतृत्व हवेच होते पार्टीला..
बंडा - आपल्या वडिलधायांकडून असेच मार्गदर्शन अपेक्षित आहे.
भाऊ - आम्हाला वाटले होते.. एकदा आमच्याशी चर्चा कराल आम्हाला विश्वासात घेऊन..
बंडा - वरून आलेला निरोप होता भाऊकाका, मला वाटले आपल्याला ठाऊक असणारच, आमच्याहून बाबा आपल्यालाच मानतात.
भाऊ - असो.. एकंदर निर्णय चांगला झालाच आहे.. आता हळूहळू आम्हालाही निवृत्त व्हावेच लागणार होते
बंडा - काय बोलता भाऊकाका? तुम्ही कधीच निवृत्त व्हायचे नाहीत.. मग आमच्याकडे कोण बघणार?
भाऊ - ते तर आहेच. आपल्यासाठी आम्ही आहोतच. पण या रोजच्या धकाधकीचे आता वय राहिले नाही.
बंडा - हवे तर काही दिवस सुट्टी घ्या भाऊकाका! तब्येतीला जपा.
भाऊ - असो. बाई अजून लहान आहेत वयाने. अनुभव नाहीये... सुरुवातीचे काही दिवस आमच्याकडून मार्गदर्शन घ्यायला सांगा
बंडा - अर्थातच! आपण असल्यावर आम्हाला काय काळजी आहे?
भाऊ - सोलापुरचा रिपोर्ट मी पाठवत जाईन सुरुवातीला... मग त्यांना एकदा जमायला लागले की त्या पाठवतीलच...
बंडा - अगदी अगदी! खरे तर मीच आपल्याला तशी विनंती करणार होतो.
भाऊ - विनंतीची काय गरज आहे? आपला हक्कच आहे आमच्यावर!
बंडा - असे म्हणू नका भाऊ काका.. बरं.. काका.. या मीनाताईंना आता.... राहायला
भाऊ - बोला...
बंडा - त्या ... त्यांना पार्टीकडून घर मिळायला हवे खरे तर...
भाऊ - करतो व्यवस्था... एखादा चांगला फ़्लॆट...
बंडा - काका, बाबा उगीच नाराज होतील.. पक्षाची शिस्त मोडली म्हणून...
भाऊ - म्हणजे?
बंडा - वरिष्ठ अधिकारी म्हंटल्यावर ... ताईंना बंगल्यात... ठेवायला.. हवे.. म्हणजे... असे ...
भाऊ - वरून आदेश आलाय ... हो ना?
बंडा - होय काका...
भाऊ - ठीक आहे... एक पंधरा दिवसात जागा सोडतो... माझं काय?
बंडा - तुमचं काय म्हणजे? आम्ही काय तुमची गैरसोय होऊ देऊ? तुम्ही आपल्या लोकांना चांगली जागा बघायला सांगा लगेच
भाऊ - ओके... ठीक आहे... आपलं आगमन पुन्हा कधी?
बंडा - बघतो... आता तुम्ही आहातच, मीनाताईही आहेत
भाऊ - आम्ही काय? आम्ही आपले असतोच नेहमी...
बंडा - नाराज दिसताय...
भाऊ - नाराज? नाही हो... नाराज कुणावर व्हायचं? सगळे आपलेच?
बंडा - असं का बोलताय?
भाऊ - आता काय सांगायचं तुम्हाला..
बंडा - मनात ठेवू नका काका
भाऊ - मनात राहणारच! दिवस रात्र कष्ट करून पक्ष उभा केला सोलापुरात... शेवटी अपमान पदरी आला
बंडा - आम्ही तर आपला सन्मानच करतो नेहमी...
भाऊ - मलाही तसंच वाटायचं... आधी...
बंडा - वाटायचं म्हणजे?
भाऊ - आज आमचं पूर्ण नाक कापलं गेलं
बंडा - का?
भाऊ - सोलापुरात या पक्षाची ओळख म्हणजे दादासाहेब, तुम्ही स्वत: आणि मी! त्यातला मी आज वजा झालो
बंडा - असे कसे?
भाऊ - आता नवं नेतृत्व आलं... इतकं केलं... शेवटी आम्ही परकेच राहिलो
बंडा - तसे काही नाहीये काका..
भाऊ - तुम्हाला वाटत असेल ड्रिंक घेतलं म्हणून असं बोलतोय...
बंडा - छे छे! मगाशी सभेतही ड्रिंक घेऊन चांगलं बोललात की?

भाऊ चपापले.

भाऊ - प्रकृती ठीक नसते हल्ली.. मग थोडसं...
बंडा - त्यात काय विशेष आहे भाऊ काका? आम्ही तुमचं भाषण लक्ष देऊन ऐकलं आज
भाऊ - कसलं काय अन कसलं काय
बंडा - तुम्ही जरी आमचं कालचं भाषण ऐकल नसलत तरी...
भाऊ - मी? कालचं? ऐकलं की? का?
बंडा - असूदेत.. निघू?

आमदारांनी वाकून नमस्कार केला. ते आपल्या गाडीत बसून निघून गेले.

भाऊ व आमदार दोघेही बोलण्यात सुरुवातीला साखरपेरणी करत होते. मात्र ती साखर फ़ासलेली होती लवंगी मिरचीसारख्या भावनांना! ते इतरांना कळण्य़ासारखे नव्हते इतकेच!

नेहमीप्रमाणेच कुणालातरी जास्त झाली होती. शिवराळ भाषा तोंडात येऊ लागली होती. आमदारांची मैत्रिण आपल्या रूमवर निघून गेली होती. ती उद्या सकाळी उस्मानाबादला निघणार होती. तिच्यासाठी वेगळीच गाडी होती. सहाय्यक तिची व्यवस्था पाहात होता. कुणीतरी त्याच बाईचा उल्लेख केला. सहाय्यकाने सर्वांदेखत त्याला झापले. तोही काहीतरी बरळून निघून गेला. सगळाच बेरंग झाला होता.

भाऊ आपल्या गाडीतून निघून गेले.

रात्री एक वाजता पार्टी संपली.

मात्र, त्याआधी, आज मीनाने शक्कल लढवली होती. इतका उशीर पहिल्यांदाच झालेला असून अजून आईला काहीच कल्पना नाही आहे असे सांगीतले. गाडीत ड्रायव्हर असल्याने आमदारांनाही काही बोलता येईना. तिच्या घरापासून अर्ध्या किलोमीटरवर तिला सोडून आमदार पुन्गा गेस्ट हाऊसवर गेले. त्यांना अर्ध्या तासात निघावे लागणार होते. मात्र गाडीतल्या गाडीत तिच्या नव्या बंगल्याची बातमी तिला देत त्यांनी जमेल तितके ओंगळवाणे स्पर्श मीनाला केले होते. मीना भयानक खवळलेली होती. पंण तोंडावर लाजरे हसू खेळवत ती त्यांना रिस्पॊन्स देत होती. मीना घरी पोचली तेव्हा पावणे अकराच झाले होते. त्यामुळे आई कालच्या इतकी खवळलेली नव्हती. पण तरी शोभा व आई दारात होत्याच. आज शोभाने ’काय चाललेले आहे’ हे सांगण्याच हट्टच केला. पण मीनाच्या आईनेच तिला कसे तरी समजावले. आत गेल्याव्र आईने पुन्हा खोदून खोदून विचारले तेव्हा मीनाने ’एक मीटिंग होती, त्यात मला बोलावले होते’ इतकेच सांगून कसेबसे बाकीचे टाळले. शंकीत मनाने आई व जेत्या मनाने मीना... दोघी झोपून गेल्या. आता या भाड्याच्या घरातले शेवटचे काही दिवस होते त्यांचे....

इकडे...

भाऊंनी घरी पोचल्यावर एकापाठोपाठ एक अशी ड्रिंक्स घेतली. काहीही समजेनासे झालेले होते. उद्याच्या उद्या आरोग्यमंत्र्यांशी डायरेक्ट बोलायचे त्यांनी ठरवले होते. हा निर्णय वरून आला असण्याची त्यांना अजिबात शक्यता वाटत नव्हती. काहीतरी सॊलिड मोठा घोळ होता. ही पोरगी अशी कशी पार्टीत पोचली हे कळत नव्हते.

त्यांनी ताबडतोब डीनला फ़ोन लावला. डीनची यावेळेस, म्हणजे दिड वाजायच्या सुमारास, अर्धी झोप झालेली असायची. ते दचकून उठले.

भाऊ - भाऊ बोलतोय.... नगरसेवक बनसोडे
डीन - येस्स.. येस्स सर.. येस्स सर... (त्यांच्यामते कुणीतरी वारले असावे.)
भाऊ - मीना कशी भेटली साहेबाला? (भाऊंना जास्त झालेली होती. डीनला काहीच माहीत नसणार हे त्यांच्या लक्षातच नव्हते.)
डीन - सर.. सर?
भाऊ - सर, सर काय? मीना कशी भेटली साहेबाला?
डीन - हू इज मीना सर?
भाऊ - आईच्या भाषेत बरळता येत नाही का?
डीन - सॊरी सर.. सॊरी.. मला मीना कोण ते माहीत नाही... सर
भाऊ - माहीत नाही? उपप्रमुख आहे ती.. उपप्रमुख...
डीन - कुठे आहेत त्या उपप्रमुख?
भाऊ - अरबस्तानात... झोपा काढता काय सभेला?
डीन - सर... मी .. म्हणजे कालची सभा का?
भाऊ - आत्ता.. आत्ता झालेली सभा...
डीन - माफ़ करा सर.. पण मी सभेला नव्हतो...

भाऊ शुद्धीवर आले. हा डीन बिचारा निर्दोष असणार हे त्यांच्या लक्षात आले.

भाऊ - ती मीना म्हणून जी मुलगी आहे...
डीन - कोण मीना सर...
भाऊ - ती काल साहेबांना हार घालणारी..
डीन - हार घातला? असा कसा हार घातला?
भाऊ - ओ .. ऐका जरा... कसा काय हार घातला काय? स्वागत ठेवलवतंत ना तुम्ही...?
डीन - हां हां! मग? हार घातला तर काय?
भाऊ - ती मुलगी हॊस्पीटलशी संबंधीत आहे का?
डीन - अर्थातच असणार! बाहेरचे कुणीतरी येऊन थोडेच हार घालणार आहे?
भाऊ - पंधरा मिनिटात मला तुमचा फ़ोन यायला हवा... ती तुमच्या हॊस्पीटलशी कशी संबंधीत आहे याचा..
डीन - येस्स सर.. शुअर सर...

डीन एक तर प्रौढ होते. त्यात त्यांची झोपमोड झालेली होती. ही काय पणवती आहे त्यांना समजेना. त्यांनी उगाचच चक्र फ़िरवली. त्यांना असे सांगण्यात आले की मीना नावाच्या एक डॊक्टर आहेत पण त्या पन्नाशीच्या आहेत व नर्स म्हणून एकही मीना नावाची मुलगी हॊस्पीटलमधे नाही.

ही बातमी भाऊंना सांगीतल्यावर ते पुन्हा झोपून गेले. आपण का उठलो, काय माहिती काढली, ती का काढली, ती भाऊंना का सांगीतली यावर विचार करण्याची त्यांची आत्ता क्षमताच नव्हती. ’उद्या पाहू’ हे दोन शब्द त्यांना घोरण्य़ासाठी फ़ार उपयुक्त वाटले.

आणि भाऊंना जास्त झालेली असल्यामुळे त्यांना ही बातमी धक्कादाय आहे हेच लक्षात आले नाही. त्यांनी सवयीप्रमाणे शर्मिलाला फ़ोन केला.

यावेळेस शर्मिलाचे पॆकिंग झालेले होते. चंदीगडच्या बजाजच्या शोरूमचा दूरध्वनी क्रमांकही तिच्याकडे होता. आणि सोलापुर-पुणे ट्रेन, पुणे-दिल्ली फ़्लाईट ही तिकिटेही तिच्याकडे होती. आता ती सकाळी लवकर उठायचे म्हणून केव्हाच झोपलेली होती. फ़ोन वाजल्यावर ती दचकून उठली.

भाऊ - हॆलो
शर्मिला - बोला.....
भाऊ - गाडी काढ अन इकडे ये...
शर्मिला - का?
भाऊ - उपप्रमुख झाली ती....
शर्मिला - कोण?
भाऊ - नंदनची बायको..
शर्मिला - शिळ्या बातम्या फ़ेकू नका... दुपारीच नंदन प्रमुख झालाय..
भाऊ - तुझी उतरली की ऐक... नंदन नाही... त्याची बायको
शर्मिला - तुम्हाला हल्ली झटके येतात भाऊ... नंदनचे लग्न झालेले नाही...
भाऊ - डीन तर म्हणाला की?
शर्मिला - कोण डीन? ... डीन कोण?
भाऊ - तू इकडे ये गं...

शर्मिलाने फ़ोन सरळ ठेवून दिला व नंतर काढूनच ठेवला. म्हातारा भ्रमिष्ट झालेला आहे हे तिचे मत ठाम झाले.

भाऊंची मात्र आता चांगलीच उतरली होती. जालीम उपाय म्हणून त्यांनी एक फ़ोन नंबर फ़िरवला.

भाऊ - साब... बनसोडे बोल रहा हूं
तिकडून - क्या है
भाऊ - परसो भेजी थी वो मिली क्या..
तिकडून - हं! ... तो?
भाऊ - वो भेजना मत आगे...
तिकडून - क्युं?
भाऊ - इधरही उसका लफ़डा करनेका है...
तिकडून - बेवकूफ़ हो क्या? ऐसा माल दुबारा मिलेगा कहीं तुम्हे?
भाऊ - वो लीडर है यहॊंकी... फ़सोगे! मेरे पास कॊपी है! आप मत भेजना.. मै इधरही देखता हूं सबकुछ! मुनाफ़ा तो यहॊंभी मिलनेहीवाला है!
तिकडून - लीडर गयी ****! वो कॊपी डिस्ट्रॉय करदो! और दुबारा ऐसे वक्तमे फ़ोन मत करना...समझे????

भाऊ निराश होऊन रात्रभर तळमळत कधीतरी पहाटे साडेपाच-सहाला झोपले.

सोलापूर सेक्स स्कॆंडलच्या देशातील सर्वात मोठ्या अधिकारी व्यक्तीने ’पंगा’ घेतला होता.... मीनाशी!

गुलमोहर: