किती प्रकाशवर्षे उलटली..
कुठे असतील ती स्पंदन?
तुझ्या माझ्यातल्या अनुरागाची ..
या अनोळखी अवकाशात
मिळाला असेल का त्यांना
सोयीस्कर बधीर अंत?
जन्मांचे डाव उधळत
फुकाचा सारा प्रवास
असाच निरर्थक चालु राहील?
काही बोध घेऊ नकोस..
कूस बदलून निजून जा..
कधी कधी इंद्रियगम्य मन ही
विश्वजाणीवेच्या गोचरीतून जात..
- शशांक प्रतापवार



प्रकाशवर्ष हे अंतराचे परिमाण आहे ना? काळाचे नाही.
एक प्रकाशवर्ष =एका वर्षात प्रकाशाने निर्वात पोकळीत कापलेले अंतर.
मूलभूत तत्त्वांची पाळेमुळे
खणून खणून तत्त्वज्ञ मेले
त्यांच्या नावाचे इतिहासात
सोने झाले..भले झाले
आरती प्रभू
कुठे असतील ती स्पंदन?
हे अंतराच्या पर्स्पेक्टीवनेच लिहिली आहे...