अन्यायाच्या विरुद्ध कोणी ....

अन्यायाच्या विरुद्ध कोणी तोंड उघडुनी बोलत गेले..
मुस्कटदाबी झाली तैसे धुमसत गेले, पेटत गेले!

डोक्यावरती पाय ठेवुनी चढले कोणी, मोठे झाले,
तेच लोक त्या डोक्यांना मग लाथेखाली चिरडत गेले!

रणभूमी पाहिली नसावी, अशी जयांची असे अवस्था,
शूरपणाच्या पोकळ बाता मोठ्या तोंडी मारत गेले!

तप्त निखारे फुलले, काही जळले, त्यांची राख जाहली,
चतुराईने कोण तयांना फुलवत गेले, विझवत गेले?

रक्ताचे केलेले पाणी, निढळाचा जो घाम गाळला,
पोटी नाही कांदा-भाकर, काय न्याय ते मिळवत गेले?

डार्विनचा सिद्धांत चालतो, शक्ती टिकते, दुबळे मरते,
'शरद' जयांच्या हाती सत्ता, दीन जनांना ठोकत गेले!!

शरद

Submit to kanokani.com

सुरेख... नेहमीप्रमाणेच प्रवाही गझल...

तप्त निखारे फुलले, काही जळले, त्यांची राख जाहली,
चतुराईने कोण तयांना फुलवत गेले, विझवत गेले? >>> मस्तच

पुर्ण गझल आशयासहीत आवडली...!!

सही! रणभूमी, निखारे, सिद्धांत खासच!

सगळे शेर आवडले .

छान गझल!!
रक्ताचे केलेले पाणी, निढळाचा जो घाम गाळला,
पोटी नाही कांदा-भाकर, काय न्याय ते मिळवत गेले?

>>>मस्त!

मस्त लय आहे स्मित
मला पण फुललेल्या निखार्‍यांचा शेर खूप आवडला !

सगळ्याच कल्पना, गझल सुंदर - पहिले दोन आणि ' निखारे ' .... खास !

सुंदर

मस्त आहे गझल..

'डोक्यावरती पाय ठेवुनी चढले कोणी, मोठे झाले,
तेच लोक त्या डोक्यांना मग लाथेखाली चिरडत गेले!

रणभूमी पाहिली नसावी, अशी जयांची असे अवस्था,
शूरपणाच्या पोकळ बाता मोठ्या तोंडी मारत गेले!

तप्त निखारे फुलले, काही जळले, त्यांची राख जाहली,
चतुराईने कोण तयांना फुलवत गेले, विझवत गेले?'

अशा गोष्टी चारचौघात मोठ्याने बोलायच्या नसतात. घरावर दगड पडतील.

तप्त निखारे फुलले, काही जळले, त्यांची राख जाहली,
चतुराईने कोण तयांना फुलवत गेले, विझवत गेले?

वा...

तप्त निखारे फुलले, काही जळले, त्यांची राख जाहली,
चतुराईने कोण तयांना फुलवत गेले, विझवत गेले?

बहोत खूब!!!

मिल्या, गंगाधर, क्रांति, छाया, सुमेधा, जयवी, सतिश, चंपक, मयुरेश, भरत, नचिकेत, झाड सर्वांना अभिप्रायाबद्दल धन्यवाद! स्मित

छान.

पुर्ण गझल आशयासहीत आवडली...!!