निळ्या, निरभ्र, निवांत आकाशाशी
बघतों मी नेहमीच नातं जोडायला
आणि जुळताताही सूर आमचे बरेचसे
उणीव काय असावी, दूरी पूरी मिटायला
ढगाळून ओथंबलेलं पांघरून आकाश
उभा ठाकतो मग जीवघेणा एक दिवस
धाड धाड ओढतही सुटतो आसूड
सूडाने पेटल्यागत अविरत तो पाऊस
अन कितीही आक्रोशून नाकारलं मी
तरी, वीजा विचकून दांत, टाकतात उजळून
नकोसं मला असलेलं खोलवरचं नातं माझं
रौद्ररुपी वरच्या त्या अस्मानी थैमानाशी
दिसणं तुझं म्हणूनच म्हणतो नाही पुरेसं
निळ्या, निरभ्र, निवांत त्या आकाशाला
चांदण्यासारखं बरसणंही हंवय तुझं मंद
नातं चांगल्याचं माझ्या, तुजसंगे बहरायला.


सुंदर कल्पना. छान कविता
सुंदर कविता.
मस्त !
गंगाधरजी व अलकाजी, तुम्हाला आवडली ,बरं वाटलं. धन्यवाद.
कर्णिकजी,
आपण शब्दांची फेरमांडणी करून ई-मेलद्वारे पाठवलेली हीच कविता
निश्चितच अधिक ओघवती झाली आहे. कवितेच्या या पैलूकडे मी अधिक लक्ष
देईन. आपण इतकं लक्ष घातलंत यानेच मी सुखावलो. धन्यवाद.
अतिषय सुरेख कल्पना भाऊ... खुप आवडली कविता !
शिर्षकात...हंवच ऐवजी "हवंच" असं हवय का?
खूप छान कविता!
भाऊ ,कविता आवडली .
सह्ही कल्पना..खुप आवडली कविता..मस्त!!
विशालजी,
खंरय...सॉरी.. खरंय तुमचं. आयुष्यभर जपलेला माझा वेंधळेपणा असा डोकावणारच ना कुठेतरी !! धन्यवाद.
गणेशजी, छायाजी, सुमेधाजी - तुम्हालाही आवडली, हे मला खूप आवडलं. धन्यवाद.