पुन्हा आली तुझी सय माझी उदासे नजर
माझे काळीज कापते सांज कातर कातर
पुन्हा आली तुझी सय उंचावला हा उंबरा
आसुसल्या या दाराला कधी होणार सामोरा?
पुन्हा आली तुझी सय भांडते मी भांड्यांशीही
लागे उचकीही अशी नाही उसंत तिलाही
पुन्हा आली तुझी सय माझ्या भिजलेल्या गाला
आठवता तुझी खोडी पहा नाजूक लाजला
पुन्हा आली तुझी सय रुसली का माझी नीज
परि स्वप्न पाही तुझे विरहिणी माझी शेज
पुन्हा आली तुझी सय माझे फुलले हृदय
माझ्या चालण्यात सख्या नाचे तुझीच की लय
पुन्हा आली तुझी सय सोबतीला तिच्या वारा
गंध कसला हा बाई कसा उठे हा शहारा
गेले विसरून सय ऐकू येते पायधून
आता नको ही यायला सय जगाची, वैरिण



छान कविता.
सुंदर.
कविता वाचल्यावर एक लक्षात येतं, तुझी या शब्दाच्या placement मुळे छान वेल तयार झालीय. (/// या थाटाची). माझ्या चालण्यात सख्या नाचे तुझीच की लय- येथील अंगतपंगत व
शेवटच्या कडव्यातही तुझी हा शब्द तसाच घातल्यास अजून मजा येईल.
मस्त.
पुन्हा आली तुझी सय रुसली का माझी नीज
परि स्वप्न पाही तुझे विरहिणी माझी शेज
वा, सुंदर भावना अविष्कार
सुंदर....
नक्षीदार कविता !!!
सुंदर!!
रुणझुणती,सुरेख लयीची मस्त कविता!
'पुन्हा आली तुझी सय भांडते मी भांड्यांशीही'
छान!
सयी !!!!
अ प्र ति म
सय तीची...
क्या बात है!
“पुन्हा आली तुझी सय माझ्या भिजलेल्या गाला
आठवता तुझी खोडी पहा नाजूक लाजला”
...... रोमॅंटिक
“माझ्या चालण्यात सख्या नाचे तुझीच की लय”
…… खूप आवडली ही कल्पना