हाउसिंग सोसायटी

Submitted by शुभंकरोती on 3 March, 2010 - 02:05

घर पहावे बांधून ---

खरंच अनुभवल्या शिवाय कळायचे नाही. घर बांधायचे Melody खाओ खुद जान जाओ, अश्यातली गत आहे. घर घ्यायचे कि बांधायचे, ऐन शहरात कि शहरा बाहेर, स्वतंत्र कि फ्लैट, हाउसिङ्ग बोर्ड कि प्रायवेट बिल्डर,मुलांच्या शाळे जवळ कि लांब, लोन किती आणि कोण्त्या बैंके कडून, हप्ता किती बसेल, किती वर्षे भरावा लागेल ह्या यक्ष प्रश्नांना सामोरे जावून एकदाचे तुम्ही घर मालक होता (हुश्श्श...). मग घर-भरणी / गृह्-प्रवेश किंवा हाउस वार्मिंग (नाम में क्या रखा है ...) च्या नावाखाली आधीच ढीला झालेला खिसा अगदी फाटायच्या बेतात असतो. तशातच सोसायटी नावाचा ब्रम्हास्त्र तुम्हाला संपूर्ण शरणागती पत्करायला भाग पाडतं. असो ...

तर अशी ही तुमच्या घराच्या पाचवीला पुजलेली सोसायटी आणि त्याचे मेंबर रोज नवे नियम/कार्यक्रम निमित्त करून तुमच्या खिश्यावर टांगती तलवारच जणू. तर अश्या ह्या सोसायटी आणि त्यांचे तुम्हाला आलेले अनुभव (त्या वरून तुम्ही शहाणे आहात हे सिद्ध ... इति) शेयर करा आणि भावी घर मालकांना शहाणा करून सोडा. काय ??

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे माबो वर हौसिंग सोसायटीच्या कामकाजाबद्दल माहिती असणारे कोणी आहे काय? काही महत्वाच्या अडचणी संदर्भात नियम माहिती करुन हवे आहेत. किंवा अशा नियमांची माहिती मला कोठे मिळू शकेल हे कोणी सांगू शकेल काय? थोड्या अडचणीत आहोत. थोडी घाई आहे. कृपया मार्गदर्शन करावे.

आरती,

मला अजून तरी हाउसिंग सो.बद्दल फारशी माहिती नाही, म्हणून मी हा बीबी उघडला.
जाणकारांनी " कृपया मार्गदर्शन करावे." अनुमोदन

एकेका मुद्यावर लिहीता येईल. मुद्दा काय आहे ? जनरल माहितीसाठीरविवारच्या लोकसत्ता मधले सर्व लेख संग्रही कुणी ठेवला असल्यास उपयोगी होईल. ही माहिती फारच जास्त म्हणजे वी.पु. त लिहिता येईल अशी नाही.

सोसायट्यांच्या प्रचालनबद्दल बरीच मराठी पुस्तकेही आता उपलब्ध आहेत. कायमस्वरूपी संग्रही ठेवायला २००-३०० रुपये गेले तरी हरकत नाही. इथे अर्धीकच्ची माहिती घेण्यापेक्षा. अर्थात अनुभव मांडले तर हरकत नाही....

अर्थात अनुभव मांडले तर हरकत नाही.... >>>
===============================
तेच म्हणालो मी ...

=========================================================================
तर अश्या ह्या सोसायटी आणि त्यांचे तुम्हाला आलेले अनुभव (त्या वरून तुम्ही शहाणे आहात हे सिद्ध ... इति) शेयर करा
=========================================================================