साहित्यचोरी

एवढे दिवस फक्त आपल्या मायबोलीकर मनोगती किंवा अजून कोणी नेट्वर लिहीणा-यांचच साहित्य स्वतःच म्हणून खपवणारे लोक बघितले. आज चक्क मंगेश पाडगावकरांचीच कविता स्वतःची म्हणून गुलमोहरात पोस्ट केली एका महाशयांनी.

वैभवची " कुणीतरी आठवण काढतय " ही कविता तर लोक एकमेकांना स्वतःच्या वाटीतली खीरापत दिल्यासारखी देत असतात. बोलत कोणीच काही नाही कारण हाही चोर आणि तोही चोर असतो. मग घेणारा पण तीच कविता माझीच म्हणून आपल्या ब्लॉगवर पोस्ट करतो. मी जीथे असे प्रकार बघते तिथे पोस्ट टाकून येत असते.गेल्या आठवड्यात एका प्राध्यापक महाशयांनी वैभवचीच "डोह"ही कविता आपल्या नावानी प्रकाशीत केली. नंतर परत तिकडे जावून बघितलं तर कवितेसाहित सगळच गायब.

स्वतः लिहायची एवढी हौस असेल तर मनाचे श्लोक लिहून काढावेत सरळ. नाहीतर चित्रपटांची गाणी टायपा की.
चो-या काय करता अश्या?

कंटाळा आला या साहित्य चोरांचा.अरेरे


खरच ग... मला पण वैभवच्या कविता मेल मधुन येत असतात.
आणि आज तर खरच हद्द झाली... मंगेश पाडगांवकरांना पण नाही सोडले स्मित. लिहिण्याचा एवढा सोस कशासाठी अरेरे नसेल जमत तर राहु द्या की. आजकाल मायबोलीवर काय चाललय, काही कळत नाही अरेरे(((((((
-प्रिन्सेस...



पण एक मात्र बरं झालं थोड्या का होईना पाडगावकरांना मायबोलीकरांच्या डायरेक प्रतिक्रिया मिळाल्या. स्मित



खरेच आहे हे!! ह्या चोर्या फार फार वाढत चालल्या आहेत. वैभवच्याच काय पण मिल्याची ३-४ विडंबने, देवदत्ताची विडंबने, सगळी साधारण इकडे प्रकाशित केल्यापासुन महिन्याभरात मला मेलमधुन आली आहेत. आणि पाठवणार्‍यालाही ती फॉरवरर्ड होत आलेली असतात. \च्लिपर्त्{उहोह}



कोणी तरी हे बोलायलाच हवं होतं.मला चीड आहे अशा गोष्टींची.धन्यवाद!