|| श्री ||

खूप दिवस..
चांगल्या दिवसाची वाट पाहीली.
बेसिकली काहीतरी चांगलं लेखन सुचायची वाट पाहीली !

पण काहीच सुचेना.
आणि राहवेना सुद्धा.
त्यामुळे असेच बिना मुहुर्तावर , बिना लेखनाने माझ्या रंगीबेरंगी पानाची सुरवात करते.

"मायबोली गणेशोत्सव २००९ " मध्ये असलेल्या संयोजन समितीमधील सहभागामुळे , मायबोलीकडून मिळालेली ही प्रेमाची भेट मी खूप आनंदाने स्विकारत आहे! स्मित
त्याचबरोबर इथे लिहीण्यासाठी खरंच उत्तमोत्तम काही सुचुदे ही त्या गणरायापाशी प्रार्थना!

!! गणपती बाप्पा मोरया !!

Submit to kanokani.com

ऑल द बेस्ट भाग्यश्री.तुझ्या नुकत्याच झालेल्या भारतवारीवर लिही काहीतरी.

बोला

बर्‍याच दिवसांनी दिसते आहेस. काही तरी झक्कास येऊ देत आता.

धन्यवाद पूर्पू, सिंडे..
लिहीन लवकरच.. स्मित

पूर्पू >> हाहा

बोला >> हाहा

बस्के लिहित रहा.. स्मित

लोल ! क्रोमचे प्रताप ! अरेरे राग

बोला >> हाहा

बेसिकली काहीतरी चांगलं लेखन सुचायची वाट पाहीली >> श्याम मनोहरांचे "कळ" वाच. लिहावं वाटणार्‍या पण काहीच न सुचणार्‍या माणसाच्या आत्मचिंतनाने काही पान भरली आहेत.

ओह हो का केदार? त्या पुस्तकाचे नाव इथे मायबोलीवर फारच वेळा ऐकले.
आणले पाहीजे पुढच्या वेळेस..

बस्के, भारतवारीच्या वृत्तांताने सुरुवात कर..

मग फचिन तुला झब्बु देइल डोळा मारा

ह्म्म.. भारतवारी..
प्रवासवर्णनं असतातच कायम हाताशी! दुसरं काही सापडलं नाही की ते लिहीले जातेच ! स्मित :|
सकाळी हे लिहीले, आणि आत्ता काहीतरी सुचु लागले.. स्मित टाकते रात्री पर्यंत.. स्मित

ऑल द बेस्ट भाग्यश्री.

लिही गं भाग्स. तुझी मागे Long Drive ची वर्णनं होती ती टाक. किंवा त्याकरितातरी long drive ला जा! स्मित

अभिनंदन आणि शुभेच्छा!
तू छान लिहितेसच येऊ दे मग छान छान लेख आणि फोटोजपण

शुभेच्छा ग. स्मित

लिवा की आता बिगीबिगी... स्मित