स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना यांचा संग्रह

Submitted by अश्विनी के on 19 January, 2010 - 03:10

नमस्कार,

लहानपणी शुभंकरोती म्हणताना आपण काही काही स्तोत्रे, श्लोक म्हणत असू. आपल्या ऋषी-मुनींनी तपसाधना करुन अनेक स्तोत्रे, स्तवने सिद्ध केली आहेत. त्यातील काही आपल्या नित्य पठणात असतात तर काही तात्कालीक कारणासाठी उपासना म्हणून म्हटली जातात. ह्या स्तोत्रांमधे बीजमंत्र सामावलेले असतात व त्यांचे जमेल तसे पठण निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणते, आपल्या विचारात, प्रारब्धात. विचार सात्विक व्ह्यायला लागले की हातून चूका कमी कमी घडू लागतात, मन (जे आपले प्रारब्ध घडवते) आपल्या ताब्यात येऊ लागते. सगळ्यात ओढाळ मनासारखे काहीच नाही. आजच्या पिढीला व पुढच्या मोठे होऊ घातलेल्या पिढीला मनावर ताबा मिळवण्याची खूप गरज आहे. पुढची पिढी दहशतवादी विचारांची बनायला नको आहे.

प्रकाशाचे उपासक हे शुद्ध दैवतांचीच उपासना करतात ज्यामधे स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे, प्रदेशाचे भले व्हावे, रक्षण व्हावे हा हेतू असतो तर अंधाराचे उपासक हे क्षुद्र दैवतांची उग्र प्रकारे उपासना करतात ज्यामधे दुसर्‍याचे वाईट व्हावे हाच मुख्य हेतू असतो, तंत्रविद्येचा, जारण मारणाचा वापर असतो.

इथे शुद्ध दैवतांच्या उपासनांमधे समावेश होऊ शकणार्‍या स्तोत्रं, श्लोक, प्रार्थना शक्य असल्यास कारण व फलितासह लिहिणे अपेक्षित आहे (मायबोलीवर दुसर्‍या प्रकारचे सदस्य असूच शकत नाहीत म्हणा Happy ) जेणेकरुन मायबोलीवर एकेच ठिकाणी सगळे मिळू शकेल, गूगलवर शोधत बसायची आवश्यकता नाही. स्तोत्र, अध्याय, श्लोक मोठे असतील तर लिंकही देण्यास हरकत नाही (अ‍ॅडमिनची हरकत असल्यास तसे कृपया कळवावे व त्यांच्या आदेशानुसार लिंका देऊ नयेत.)

सर्वांना धन्यवाद Happy आतापर्यंत खालील स्तोत्रे इ. जमा झाली आहेत. जसजशी भर पडेल तसतशी यादी अपडेट करायचा प्रयास करेन.

http://sanskritdocuments.org/sanskrit/by-category/stotra.php इथे भरपूर स्तोत्रं पीडीएफ मध्ये आहेत.

****************************************************************************************************
(खालील स्तोत्रांच्या लिंक अनुक्रमणिका रुपाने देण्याचे काम शाम भागवत ह्यांनी केले आहे. त्यांना मनःपूर्वक धन्यवाद)

पान १
१) गायत्री मंत्र
२) दत्तबावनी
३) श्लोक
४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र
५) तुळजा भवानी - लिंक
६) श्री भवानी अष्टक
७) श्री साईसच्चरित - लिंक
८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र
९) करुणा त्रिपदी
१०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा
११) श्री दत्तस्तव स्तोत्र
आणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.
पान २
१२) येई वो विठ्ठले
१३) श्री समर्थ रामदास - लिंक
१४) नव-नाग स्तोत्र
१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक
१६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)
१७) दत्तमाला मंत्र
पान ३
१८) श्री स्वामी समर्थाष्टक
१९ ) श्रीगणपती स्तोत्र
20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)
२१) नवग्रह स्तोत्र
२२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी
२३) हनुमंताचा धावा
२४) श्लोक
२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक
२६) संपूर्ण नवनाग स्तोत्र
२७) शुभंकरोति कल्याणम
२८) कालभैरवाष्टक
२९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र
३०) शनी मंत्र
३१) रुद्र
पान ४
३२) संपु���्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)
३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)
३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र)
३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३६) प्रार्थना
३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट)
४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक
४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट)
४२) पुरुषसूक्त
४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट)
44) दत्तलीला मंत्र
४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट)
४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक
पान ५
४७) स्वामी समर्थ माला मंत्र
४८) सूर्याष्टक
४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट)
४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी
५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट)
५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)
५२) शांती मंत्र
५३) शिवताण्डव स्तोत्र
५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल)
५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट
५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी)
 ५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट)
५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट)
५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.
५८) सुंदरकाण्ड ध्वनीरुपात
पान ६
५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी
५९) सूर्यनमस्कार
६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र
पान ७
६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)
६२) श्री दुर्गासप्तशती सार
६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम्
६४) दत्तदशक स्तोत्र
६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र
६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...
पान ८
६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक
६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती
६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम्
७०) रामरक्षा
७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.
पान ९
७२) श्रीरामांची कर्पुरआरती
७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक)
७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट)
७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट)
७६) गणपती स्तोत्र (मराठी)
७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट
पान १०
७८) दयाळू तू देवा खचित आहेसि - संत एकनाथांची रचना
७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम्
८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम्
८१) सनातनदेवीसूक्त
८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र
८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र
८४) देवीची आराधना
८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद
८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक
८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित "आरती नर्मदेची"
८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद
पान ११
८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन
९०) अन्नपूर्णास्तोत्रम्
९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित "उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय''
९१) सद्गुरु स्तोत्र
९२) विविध आरत्या महालक्ष्मीची आरती
श्री मंगेशाची आरती
श्री शांतादुर्गेची आरती
अंबेची आरती
विडा
९३) श्री रंग बावनी
९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना
पान १२
९५ ) दत्तबावनी (मराठी)
९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन
९७) अमोघशिवकवचम
९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर
९९) अंबे जगदोद्धारिणि गे |
१००) नृसिंहसरस्वती अष्टक
१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी..
१०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक
१०३) सूर्यस्तुती
पान १३
१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट)
१०५) बजरंग बाण
१०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक
१०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम्
*अर्थासहित) न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो
१०८) शांतीपाठाचा अर्थ
१०९) शिव आरती
११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला
१११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट)
११२) करुणाष्टकं (रामदास स्वामी)
पान १४
११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक
११४) श्री लिंगाष्टकः
११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट)
११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र
११७) सार्थ दत्तबावनी
पान १५
११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य
११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा
१२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....)
१२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट
१२१) GOD grant me the SERENITY...
१२१) GOD grant me the SERENITY... (मराठीत)
१२२)सर्वसिध्दी मंत्र
१२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा
१२४) श्री शिव मानस पूजा
१२५) शनी स्तोत्र
श्रीगुरुचरित्र (पाळावयाचे सामान्य संकेत)
!!भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.!!
पान १६
१२६) श्री दत्तात्रेय स्तुती
१२७) नवरात्र अष्टमी होम
१२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी.
१२८) श्रीदेवी उपासना - उपचार पद्धती, श्री गणेशस्तोत्रम , अथ श्री महालक्ष्म्यष्टकम्, अथ तंत्रोक्त देवीसूक्तम्, श्री सरस्वति स्तोत्र, अथ श्री सूक्तम् , श्री गणपतीच्या आरत्या, श्रीदेवीच्या आरत्या, माहुरगडावरी माहुरगडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास, श्री महालक्ष्मी आरती - वससी व्यापकरुपे, आरती श्री लक्ष्मी - अंबिके तुझे गे, श्रीयोगेश्वरी (अंबेजोगा‌ई) देवीची आरती, श्रीकरवीरनिवासिनीची (कोल्हापूरची अंबाबा‌ई) आरती, श्री शाकंभरी देवीची आरती, गोंधळाची संबळगीत, श्री देवीचे जोगवा संबळगीत, श्री देवीचे जोगवा, गोंधळ - उदो उदो गर्जुनी , श्रीदेवीची भजने, श्रीदेवीची खेळगाणी, कुंकू,  दंडवत, निरोप आरती, आरती श्री लक्ष्मी - सौम्य शब्दे उदोकारे
१२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.
पान १७
१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ
१३१) श्री देवी कवच
१३२) सिद्धमंगल स्तोत्र
१३३) रघुपति राघव राजा राम - भजन
१३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र
१३५) श्रीपञ्चम���ख हनुमत्कवचमंत्र
पान १८
१३६) श्री महालक्ष्मी माहात्म्य
१३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट)
१३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग
१३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट)
१४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)
पान १९
१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन
१४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट
१४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट
१४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र
१४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक)
१४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट
१४०) श्री हनुमान स्तुती
१४७) प्रारंभी विनती करु गणपती...
१४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा
१४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे !
१५०) श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम्
१५१) गजानन बावनी
१५१) गजानन बावनी
पान २०
१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट)
१५३) श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित गणपतिस्तोत्र
१५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र
१५५) श्रीसदाशिवेन्द्रस्तवः
१५६) श्रीदिनेशस्तवः
१५७) ललितापञ्चरत्नम्
१५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र
१५९) विंध्यवासिनीचे स्तोत्र
१६०) श्री विंध्यवासिनी माता आरती
१६१) महिषासुरमर्दिनी स्तोत्रम
१६२) पाण्डुरङ्गाष्टकम
पान २१
१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना
१६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज
१६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती
१६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा
१६७) एकश्लोकी रामायण
१६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र
१६९) एकश्लोकी भागवत
१७०) श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं
१७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना
१७१) श्रीगजानन विजय ग्रंथ- ऑन लाईन डाउन लोड
१७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक
१७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते
१७४) जिव्हा प्रार्थना
पान २२
१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक
१७६) श्री दत्त अथर्वशीर्ष
१७६) गणेशाने केलेले राधास्तोत्र आणि बरेच काही
१७७) एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक
१७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक
१७९) दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम्
१८०) ज्वरनाशकस्तोत्रः
१८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र
१८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना
१८३) संपूर्ण अच्यु���ाष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट)
१८४) महामृत्युंजय जप
पान २३
१८५) शनि वज्रपंज्जर कवचम
१८५) सहस्त्र-नाम तत्युल्यं मंत्र
१८५) जय जय त्रिंबकराज गिरीजानाथा गंगाधरा हो
१८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट
१८७) गजेंद्रमोक्ष स्तोत्र
१८८) कौसल्या सुप्रजा रामा
पान २४
१८९) कुंजिका स्तोत्र
१९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक.
१९०) नर्मदाष्टकम् --श्री शंकराचार्य
१९१) श्री रेणुका स्तोत्र
१९२) मानसपूजा (आत्मपूजा)
१९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट)
१९४) श्री दत्त कवच
१९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र)
१९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति
१९७) गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम्
पान २५
१९८) नारायण सूक्त
१९९) नारायण कवच
२००) व्यंकटेश स्तोत्र
२०१) श्रीगुरुपादुकाष्टम्
२०१) श्रीमद् शन्कराचार्यविरचितं शिवपञ्चाक्षरस्तोत्रं
२०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती
पान २६
२०३) श्री गुरुगीता
२०४) श्रीहरि स्तोत्र
२०५) श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्रम्
२०५) सोळा सोमवारचे व्रत कथा
२०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट
२०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक
२०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र
२०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र
२१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती
पान २७
२११) गणेश स्तुती
२१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती
२१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं
२१४) लक्ष्मी सूक्त
२१५) श्री सूक्त
२१६) श्री प्रज्ञावर्धिनी स्तोत्र
२१७) मंत्रमातृकापुष्पमालास्तवः
२१८) अन्नपूर्णास्तुतिः
२१९) श्री बालमुकुन्दाष्टक.
२२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्
पान २८
२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट)
२२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र
२२३) अर्गला स्तोत्र
२२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र
२२५) निर्भय निर्गुण (संत कबीर)
२२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ)
२२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी
२२८) लक्ष्मीनृसिंह करावलंबस्तोत्र
२२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति
२३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम
२३०) श्रीबृहस्पति कवचम्
पान २९
२३१) गोविंद नामावली
२३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन
२३३) "आरती संग्रह (मराठी)" अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपची लिंक
२३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अ‍ॅप्लिकेशन लिंक)
२३५) अन्नपूर्णा स्तोत्र
२३६) श्रीहनुमदष्टकम्‌, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक)
२३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक)
२३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक)
२३८) नारायण स्तोत्र
२३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप
२४०) श्री साईनाथांची अकरा वचने
२४१) शतश्लोकी रामायण
२४२) श्रीरामहृदयम्
२४३) ब्रह्मचिंतन
२४४) सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र
पान ३०
२४५) मृत्युंजय कवचम्
२४६) अनसूयेचे स्तोत्र
२४७) अष्टक १ ले (नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.)
२४८) गुरु शरणम्
२४९) लक्ष्मी कवच
२५०)अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम्
२५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र
२५२) श्रीपरशुराम स्तुती
पान ३१
२५३ ) परशुरामसहस्रनामस्तोत्र
२५४) श्रीपरशुरामाष्टकम्
२५५) परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम्
२५६) परशुरामस्तोत्रम्
२५७) संस्कृत स्तोत्रं वगैरे असलेली साईट
२५८) कर्‍हाडच्या कृष्णामाईचं स्तवन
पान ३२
२५९) इंदूकोटी स्तोत्र
२६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक)
२६१) दारिद्रयदुःखदहन शिवस्तोत्र
२६२) गौरीची प्रार्थना
पान ३३
२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग
२६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला
२६५) दत्तात्रेय कवचम

***********************************************************************************

पान १

१) गायत्री मंत्र २) दत्तबावनी ३) श्लोक ४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र
५) तुळजा भवानी - लिंक ६) श्री भवानी अष्टक ७) श्री साईसच्चरित - लिंक
८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र ९) करुणा त्रिपदी १०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा
११) श्री दत्तस्तव स्तोत्र
आणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.

पान २

१२) येई वो विठ्ठले १३) श्री समर्थ रामदास - लिंक १४) नव-नाग स्तोत्र
१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक १६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)
१७) दत्तमाला मंत्र

पान ३

१८) श्री स्वामी समर्थाष्टक १९ ) श्रीगणपती स्तोत्र 20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)
२१) नवग्रह स्तोत्र २२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी २३) हनुमंताचा धावा २४) श्लोक
२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक २६) संपूर्ण नवनाग स्तो���्र २७) शुभंकरोति कल्याणम
२८) कालभैरवाष्टक २९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र ३०) शनी मंत्र ३१) रुद्र

पान ४

३२) संपुर्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)
३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)
३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र) ३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३६) प्रार्थना ३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट) ३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट) ४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक ४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४२) पुरुषसूक्त ४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट) 44) दत्तलीला मंत्र ४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट) ४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक

पान ५

४७) स्वामी समर्थ माला मंत्र ४८) सूर्याष्टक ४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी ५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट) ५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)
५२) शांती मंत्र ५३) शिवताण्डव स्तोत्र ५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल) ५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट ५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी) ५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट) ५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट) ५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.

पान ६

५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ५९) सूर्यनमस्कार ६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र ६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)

पान ७

६२) श्री दुर्गासप्तशती सार ६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम् ६४) दत्तदशक स्तोत्र ६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र ६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...

पान ८

६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक ६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती ६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम् ७०) रामरक्षा ७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.

पान ९

७२) श्रीरामांची कर्पुरआरती ७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक) ७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट) ७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट) ७६) गणपती स्तोत्र (मराठी) ७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट

पान १०

७८) दयाळू तू देवा खचित आहे���ि - संत एकनाथांची रचना ७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम् ८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम् ८१) सनातनदेवीसूक्त ८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र ८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र ८४) देवीची आराधना ८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद ८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक ८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित "आरती नर्मदेची" ८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद

पान ११
८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन ९०) अन्नपूर्णास्तोत्रम् ९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित "उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय'' ९१) सद्गुरु स्तोत्र ९२) विविध आरत्या ९३) श्री रंग बावनी ९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना

पान १२
९५ ) दत्तबावनी (मराठी) ९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन ९७) अमोघशिवकवचम ९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर ९९) अंबे जगदोद्धारिणि गे | १००) नृसिंहसरस्वती अष्टक
१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी.. १०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक १०३) सूर्यस्तुती

पान १३

१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट) १०५) बजरंग बाण १०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक १०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम् १०८) शांतीपाठाचा अर्थ १०९) शिव आरती ११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला १११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट) ११२) करुणाष्टकं

पान १४

११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक ११४) श्री लिंगाष्टकः ११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट) ११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र ११७) सार्थ दत्तबावनी

पान १५

११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य ११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा १२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....) १२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट १२१) GOD grant me the SERENITY... १२२)सर्वसिध्दी मंत्र १२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा १२४) श्री शिव मानस पूजा १२५) शनी स्तोत्र

पान १६

१२६) श्री दत्तात्रेय स्तुती १२७) नवरात्र अष्टमी होम १२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी. १२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.

पान १७

१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ १३१) श्री देवी कवच १३२) सिद्धमंगल स्तोत्र १३३) रघुपति राघव राजा राम - भजन १३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र १३५) श्रीपञ्चमुख हनुमत्कवचमंत्र

पान १८
१३६) श���री महालक्ष्मी माहात्म्य १३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट) १३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग १३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट) १४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)

पान १९
१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन १४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र १४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक) १४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट १४७) प्रारंभी विनती करु गणपती... १४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा १४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे ! १५०) श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम् १५१) गजानन बावनी

पान २०
१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट) १५३) श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित गणपतिस्तोत्र १५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र १५५) श्रीसदाशिवेन्द्रस्तवः १५६) श्रीदिनेशस्तवः १५७) ललितापञ्चरत्नम् १५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र १५९) विंध्यवासिनीचे स्तोत्र १६०) श्री विंध्यवासिनी माता आरती १६१) मह���षासुरमर्दिनी स्तोत्रम १६२) पाण्डुरङ्गाष्टकम

पान २१
१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना १६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज १६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती १६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा १६७) एकश्लोकी रामायण १६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र १६९) एकश्लोकी भागवत १७०) श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं १७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना १७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक १७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते १७४) जिव्हा प्रार्थना

पान २२

१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक १७६) श्री दत्त अथर्वशीर्ष १७७) एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक १७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक १७९) दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम् १८०) ज्वरनाशकस्तोत्रः १८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र १८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना १८३) संपूर्ण अच्युताष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट) १८४) महामृत्युंजय जप

पान २३
१८५) शनि वज्रपंज्जर कवचम १८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट १८७) गजेंद्रमोक्ष स्तोत्र १८८) कौसल्या सुप्रजा रामा

पान २४
१८९) कुंजिका स्तोत्र १९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक. १९१) श्री रेणुका स्तोत्र १९२) मानसपूजा (आत्मपूजा) १९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट) १९४) श्री दत्त कवच १९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र) १९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति १९७) गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम्

पान २५
१९८) नारायण सूक्त १९९) नारायण कवच २००) व्यंकटेश स्तोत्र २०१) श्रीगुरुपादुकाष्टम् २०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती

पान २६
२०३) श्री गुरुगीता २०४) श्रीहरि स्तोत्र २०५) श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्रम् २०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट २०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक २०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र २०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र २१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती

पान २७
२११) गणेश स्तुती २१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती २१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं २१४) लक्ष्मी सूक्त २१५) श्री सूक्त २१६) श्री प्रज्ञावर्धि���ी स्तोत्र २१७) मंत्रमातृकापुष्पमालास्तवः २१८) अन्नपूर्णास्तुतिः २१९) श्री बालमुकुन्दाष्टक. २२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्

पान २८
२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट) २२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र २२३) अर्गला स्तोत्र २२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र २२५) निर्भय निर्गुण (संत कबीर) २२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ) २२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी २२८) लक्ष्मीनृसिंह करावलंबस्तोत्र २२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति २३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम

पान २९
२३१) गोविंद नामावली २३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन २३३) "आरती संग्रह (मराठी)" अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपची लिंक २३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अ‍ॅप्लिकेशन लिंक) २३५) अन्नपूर्णा स्तोत्र २३६) श्रीहनुमदष्टकम्‌, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक) २३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक) २३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक) २३८) नारायण स्तोत्र २३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप २४०) श्री साईनाथांची अकरा वचने २४१) शतश्लोकी रामायण २४२) श्रीरामहृदयम् २४३) ब्रह्मचिंतन २४४) सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र

पान ३०

२४५) मृत्युंजय कवचम् २४६) अनसूयेचे स्तोत्र २४७) अष्टक १ ले (नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.) २४८) गुरु शरणम् २४९) लक्ष्मी कवच २५०)अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम् २५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र २५२) श्रीपरशुराम स्तुती

पान ३१

२५३ ) परशुरामसहस्रनामस्तोत्र २५४) श्रीपरशुरामाष्टकम् २५५) परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम् २५६) परशुरामस्तोत्रम् २५७) http://sanskritdocuments.org/sanskrit/by-category/stotra.php २५८) कर्‍हाडच्या कृष्णामाईचं स्तवन

पान ३२
२५९) इंदुकोटी स्तोत्र २६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक) २६१) दारिद्रयदुःखदहन शिवस्तोत्र २६२) गौरीची प्रार्थना

पान ३३
२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग २६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला २६५) दत्तात्रेय कवचम

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

येई गो विठ्ठ्ले माझे माऊली गे,
निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहे |

आलिया गेलिया हाती धाडी निरोप,
पंढरपुरी आहे माझा मायबाप |

पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला,
गरुडावर बैसुनी माझा कैवारी आला |

पुढ्चे कोणाला माहित आहे का?

गुब्बी.
येई गो विठ्ठ्ले माझे माऊली गे,
निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहे |

आलिया गेलिया हाती धाडी निरोप,
पंढरपुरी आहे माझा मायबाप |

पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला,
गरुडावर बैसुनी माझा कैवारी आला |

त्यापुढे शेवटचे एक कडवे मला मुखोद्गत आहे.
व्याकरणाच्या चुका असु शकतात.
.
विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी,
विष्णुदास नामा जिवे भावे ओवाळी |
.

नव-नाग स्तोत्र,

अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलम् ।
शंखपालं धार्तराष्ट्रं तक्षकं कालियं तथा ।।
एतानि नवनामानि च महात्मनाम् ।

एक सांगू इच्छिते:

प्रकाशाचे उपासक हे शुद्ध दैवतांचीच उपासना करतात ज्यामधे स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे, प्रदेशाचे भले व्हावे, रक्षण व्हावे हा हेतू असतो तर अंधाराचे उपासक हे क्षुद्र दैवतांची उग्र प्रकारे उपासना करतात ज्यामधे दुसर्‍याचे वाईट व्हावे हाच मुख्य हेतू असतो, तंत्रविद्येचा, जारण मारणाचा वापर असतो.

>> गणपती हा महाराष्ट्रातल्या बर्‍याच जणांचा आवडता देव आहे. आपण जे अथर्वशीर्ष म्हणतो तेच मुळी तांत्रिक अथर्वशीर्ष आहे.

मंत्र तंत्र म्हणजे वाईटच हे खरं नाही. ते वापरणारा कशा प्रकारे वापरता त्यावर ठरते.
देवाकडे जायचा तो ही एक मार्ग आहे फक्त - भक्तीमार्गासारखाच.
'परमहंस' पदाला पोचण्याकरता तंत्रमार्गातले काही विधी करावेच लागतात. ते प्रत्यक्ष रामकृष्ण परमहंसांना देखील करावे लागलेले. पण ते वाईट होते, असं कोणी कधी तरी म्हणेल का!

आणखीन एक आठवलं - आनंदीबाईंनी उजव्या सोंडेच्या गणपतीची आराधना केलेली आणि तत्कालिन पेशव्यांना क्षय झालेला नंतर. पण म्हणून गणपती हा सरसकट वाईट देव होत नाही.
ही शक्ती आहे - तुम्ही तिला ज्या रुपात जागवाल त्या प्रमाणे तुम्हाला मिळणारं फल असेल.

(अर्थातच भक्तिमार्ग काय किंवा मंत्र-तंत्र काय -सगळीच ऐकीव माहिती :))

अगं कुठे गणपती बाप्पा आणि कुठे क्षुद्र दैवतं !

तुम्ही तिला ज्या रुपात जागवाल त्या प्रमाणे तुम्हाला मिळणारं फल असेल. >>> मी देखिल तेच म्हणतेय ग नानबा. दुसर्‍याचे वाईट व्हावे ह्या हेतून तंत्रविद्येचा, जारण मारणाचा वापर करणे असं म्हटलंय मी. लिंबाला सुया टोचणे हा तांत्रिक भाग दुसर्‍याच्या शरीराला तशाच वेदना करण्यासाठी असतो.

रामकृष्ण परमहंस हे स्वतःच सद्गुरु होते की ! त्यांना वाईट म्हणण्याचं स्वप्नात तरी येईल का कुणाच्या? मी तर कुठल्याही सद्गुरुंना किंचितही नावं ठेवू शकत नाही कारण मला माहित आहे की सद्गुरुतत्व हे आतून एकच असतं.

आनंदीबाईंनी उजव्या सोंडेच्या गणपतीची आराधना केलेली आणि तत्कालिन पेशव्यांना क्षय झालेला नंतर. पण म्हणून गणपती हा सरसकट वाईट देव होत नाही. >>>> सिद्धीविनाय्क असो वा रिद्धीविनायक असो ते शुद्ध दैवतच आहे. क्षयच काय, आपल्या प्रारब्धानुसार काहीही होऊ शकते. सिद्धीविनायकाची आराधना करणे आणि कुणाला क्षय होणे याचा काही संबंधच नाहिये.

बरं ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, योगमार्ग आणि भक्तीमार्ग असे ४ मार्ग आहेत पण कुठेही दुसर्‍याचे वाईट करण्याच्या कृती, तंत्र, कर्मकांडांचा अवलंब नाही.

आनंदीबाईंनी उजव्या सोंडेच्या गणपतीची आराधना केलेली आणि तत्कालिन पेशव्यांना क्षय झालेला नंतर. पण म्हणून गणपती हा सरसकट वाईट देव होत नाही. >>> अगदी अगदी नानबा..
माझा एक अनुभव उजव्या सोंडेचा गणपतीचा. आमच्या घरी (म्हंजे आईकडे) आहे उजव्या सोंडेचा गणपती. मी १ वर्षाची असताना खेळताना तो गणपती मला मिळाला. आईबाबांनी उजव्या सोंडेचा गणपती घरात ठेवावा की नाही याबद्दल एका गुरुजींना विचार्ले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे गणपतीची पुजा केली नि आम्हाला त्याचा अतिशय चांगला अनुभव आला. थोडक्यात सांगाय्चं तर उजव्या सोंडेचा गणपती आम्हाला लाभला. Happy

सिद्धीविनाय्क असो वा रिद्धीविनायक असो ते शुद्ध दैवतच आहे. क्षयच काय, आपल्या प्रारब्धानुसार काहीही होऊ शकते. सिद्धीविनायकाची आराधना करणे आणि कुणाला क्षय होणे याचा काही संबंधच नाहिये. >>>>> हे पटलं अश्विनी.

व्वा! आता कस माहेरी आल्यासारख वाट्तय , धन्यवाद!

नमस्कार अश्विनी,
एक प्रामाणिक प्रश्न...

सुरुवातीला आपण अस लिहलत..

>>>लहानपणी शुभंकरोती म्हणताना आपण काही काही स्तोत्रे, श्लोक म्हणत असू. आपल्या ऋषी-मुनींनी तपसाधना करुन अनेक स्तोत्रे, स्तवने सिद्ध केली आहेत. त्यातील काही आपल्या नित्य पठणात असतात तर काही तात्कालीक कारणासाठी उपासना म्हणून म्हटली जातात. ह्या स्तोत्रांमधे बीजमंत्र सामावलेले असतात व त्यांचे जमेल तसे पठण निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणते, आपल्या विचारात, प्रारब्धात. विचार सात्विक व्ह्यायला लागले की हातून चूका कमी कमी घडू लागतात, मन (जे आपले प्रारब्ध घडवते) आपल्या ताब्यात येऊ लागते. सगळ्यात ओढाळ मनासारखे काहीच नाही. आजच्या पिढीला व पुढच्या मोठे होऊ घातलेल्या पिढीला मनावर ताबा मिळवण्याची खूप गरज आहे. पुढची पिढी दहशतवादी विचारांची बनायला नको आहे.

आणि
आता अस लिहलत,

>>>सिद्धीविनाय्क असो वा रिद्धीविनायक असो ते शुद्ध दैवतच आहे. क्षयच काय, आपल्या प्रारब्धानुसार काहीही होऊ शकते. सिद्धीविनायकाची आराधना करणे आणि कुणाला क्षय होणे याचा काही संबंधच नाहिये

पठणामूळे 'मन (जे आपले प्रारब्ध घडवते) आपल्या ताब्यात येऊ लागते' हे बरोबर का, 'आपल्या प्रारब्धानुसार काहीही होऊ शकते. सिद्धीविनायकाची आराधना करणे आणि कुणाला क्षय होणे याचा काही संबंधच नाहिय.' हे बरोबर?

तर नक्की काय बरोबर आहे?
म्हणजे 'प्रारब्धानुसार' जन्म मिळतो हे जर बरोबर असेल, तर पठणाने ते 'प्रारब्ध' बदलत कस?
संत म्हणतात, " प्रारब्ध हे भोगूनच संपवाव, ते टाळू नये".
नक्की काय करायला पाहिजे?

परमहंस परिव्राजकाचार्य, श्रीमद भगवन दत्तात्रेय, श्रीसद्गुरु वासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराजांच्या 'श्रीचरणी' साष्टांग नमस्कार!

धन्यवाद!

जे आपल्या हातून घडून गेलंय ते संचित, क्रियमाण, प्रारब्ध रुपाने ऑलरेडी पुढे उभे ठाकलेले असते. ते संत म्हणतात त्याप्रमाणे भोगूनच संपवावे लागते. परंतू झालेल्या चुका उमगून पुढे मनावर कंट्रोल ठेवला व ते अधिकाधिक सात्विक करण्याचे प्रयास झाले तर प्रारब्ध भोगताना त्रास कमी होतो (भवसागर कोरड्या पावलाने पार करणे). उदाहरणार्थ, माझ्या पुर्वकर्मानुसार मला १०००० रु. गमवावे लागणार आहेत. मी जर आहार विहार आचार विचार यांची वाट अजूनही लावत असेन तर ते १०००० रु. माझ्याकडून अत्यंत क्लेशदायक रितीने जातील. जर मी हे सगळं सांभाळायचा अटोकाट प्रयास करत असेन तर जरी आपल्याला मानवी मर्यादा असल्या तरी ते १०००० रु. माझ्याकडून जातील पण एखाद्या समाजसेवी संस्थेला देणगी म्हणून.

त्यांचे जमेल तसे पठण निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणते, आपल्या विचारात, प्रारब्धात. विचार सात्विक व्ह्यायला लागले की हातून चूका कमी कमी घडू लागतात, मन (जे आपले प्रारब्ध घडवते) आपल्या ताब्यात येऊ लागते. >>> हे मी लिहिलंय ते 'जे घडून गेले ते गेले पण यापुढे काय?' या प्रश्नातून.

'आपल्या प्रारब्धानुसार काहीही होऊ शकते. हे आणि 'सिद्धीविनायकाची आराधना करणे आणि कुणाला क्षय होणे याचा काही संबंधच नाहिय.' हे वाक्य वेगळे वाचा. आनंदीबाईंनी आराधना केली व दुसर्‍या व्यक्तीस क्षय झाला या दोन्हीचा संबंध नाही असं म्हणतेय मी. त्या व्यक्तीस क्षय त्याच्या प्रारब्धाप्रमाणे झाला. आनंदीबाईंनी आराधना केली म्हणून नाही झाला.

असो, जास्त डिटेलवार गप्पा भक्ती बाफवर मारु. इथे आपल्याच नकळत विषयांतर होऊन जाईल Happy

असो, सावट, आल्यासरशी एखादं स्तोत्रं इथे लिहून जायचंत ना ! Happy

१)प्रणम्य शिरसा देवं.. हे एक माझे आवडते स्तोत्र आहे. ह्याने शांती मिळते एक वेगळीच.

२)स्वामी समर्थंचे , नि:शंक हो निर्भय हो मना रे|| प्रचंड स्वमीबळ पाठीशी रे||

(हे मी पुर्ण विसरले)

२) चा ह्यांचा अनुभव चांगला आहे. कसलीही आशा व मागणे न धरता फक्त रोज केले तरी मनासाठी चांगले आहे. एक मनाला ताठपणा देण्यासाठी,विश्वास वाढवायला..( आता ज्याचा विश्वास आहे त्यालाच हे तसे वाटणार.. विश्वास नसण्यार्‍यांनी ने केले तरी उत्तम. ):)

अश्विनी, काही प्रश्नः
१. क्षुद्र देवता कोणत्या ?
२. "सर्व देव नमस्कारं केशवं प्रति गच्छति" असे म्हणतात त्यात क्षुद्र देवता येतात का?

जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

नि:शंक हो निर्भय हो मना रे,
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे,
अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी,
जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय.
आज्ञेविन काळ ना नेई त्याला
परलोकीही ना भिती तयाला,
उगाची भितोसी भय हे पळु दे.
जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे,
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा,
नको घाबरु तु असे बाळ त्यांचा.
खरा होई जागा श्रद्धेसहीत,
कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त.
कितीदा दिला बोल त्यांनीच हात,
नको डगमगु स्वामी देतील साथ,
विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ
स्वामीच ह्या पंचप्राणामृतात,
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती,
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती.

श्री स्वामी चरणविंदार्पणमस्तु ||

ह्या पुढे एक आणखी एक स्तोत्र आहे.
अनन्याश्चिंतयंतो मां ये जना पर्युपासते|
तेंषां नित्याभियुक्तांनां योगक्षेमं वहाम्यहम||

व्वा!

>>>जे आपल्या हातून घडून गेलंय ते संचित, क्रियमाण, प्रारब्ध रुपाने ऑलरेडी पुढे उभे ठाकलेले असते. ते संत म्हणतात त्याप्रमाणे भोगूनच संपवावे लागते. परंतू झालेल्या चुका उमगून पुढे मनावर कंट्रोल ठेवला व ते अधिकाधिक सात्विक करण्याचे प्रयास झाले तर प्रारब्ध भोगताना त्रास कमी होतो

अस असेल तर, प्रत्येक स्तोत्राच्या शेवटी असणार्‍या फलश्रृतीचा अर्थ काय होतो? किंवा अशा 'सकाम उपासना' कशा करिता करायच्या?

"सर्व देव नमस्कारं केशवं प्रति गच्छति" असे म्हणतात त्यात क्षुद्र देवता येतात का? >>>>> नाही.

नरबळी, पशुबळी, लिंबू मारणे (की फिरवणे?) इत्यादी उपायांनी होणारी दैवते म्हणजे क्षुद्र दैवते. जिथे असल्या उपासना केल्या जातात त्यांची फळं उग्र रुपातच बूमरँग सारखी मिळतात.

गणपती, दत्त, दुर्गा इ. देवळात आपण इमॅजिन तरी करु शकतो का बळी वगैरे? अ‍ॅक्चुअली बळी हीं संज्ञा आपल्या षडरिपुंचा देवाचरणी बळी या अर्थाने आली. त्यासाठी आपण देवळात नारळ पण अर्पण करतो. पण अर्थाचे अनर्थ होऊन प्राण्यांचे वगैरे बळी, सूरा म्हणून चक्क दारु अर्पण केली जाते. माझ्या माहितीप्रमाणे ते शहाळ्याच्या पाण्यात विशिष्ट प्रमाणात मध मिसळून अर्पण करायचे असते. किंवा सरळ पंचामृत अर्पण करावे. कुणाचा जीव घेवून केलेली उपासना ही त्यास्थानी शुद्धपणा येऊच देणार नाही.

असो, यो, धन्यवाद गं. मी पण टायपायलाच घेतलं होतं पण म्हटलं एकदा रिफ्रेश करुया, नाहीतर डबल पडेल.

प्रत्येक स्तोत्र हे बीजमंत्रांचा विलास असतो. प्रत्येक बीजमंत्राचे आपापले एक फलित असते. सामान्य मानव म्हणून आपल्याला बर्‍याच अडचणी येत असतात व त्यातून बाहेर पडण्याची आपली धडपडही असते. प्रयासांची पराकाष्ठा तर श्रद्धावान श्रद्धाहीन दोघेही करतातच पण श्रद्धावान अध्यात्माचा आधारही घेतात.

आता आपला दात दुखत असेल तर आपण म्हणणारच ना की माझा दात दुखतोय, त्रास होतोय. मग डेंटिस्टकडे जायलाच पाहिजे (सकाम उपासना). दात माझ्याच निष्काळजीपणामुळे (प्रज्ञापराधामुळे) दुखत असतो (प्रारब्ध) पण मला त्या दुखण्यातून सुटका तर हवीच असते (प्रारब्धावर वार, प्रारब्ध सोसण्याची ताकद).

सावट, मी माझ्या अल्पबुद्धीने लिहिण्याचा प्रयास करतेय Happy

>>>सावट, मी माझ्या अल्पबुद्धीने लिहिण्याचा प्रयास करतेय!

अश्विनी, काळजी नको! आमचीही बुध्दी ही 'कु-मती'च आहे! तीला 'सु-मती' करण्याचे काम चालू आहे! मती मधला 'सु' हा 'सद्गुरुंचा' आहे आपणास कळले आहे, म्हणूनच हा लेखन प्रपंच... असो. Happy

>>>प्रयासांची पराकाष्ठा तर श्रद्धावान श्रद्धाहीन दोघेही करतातच, पण श्रद्धावान अध्यात्माचा आधारही घेतात.

अतिशय योग्य बोललात!

पण श्रद्धावानाची प्रयासांची पराकाष्ठा,योग्य दिशेने होणे गरजेचे असते.

>>पण मला त्या दुखण्यातून सुटका तर हवीच असते,

असे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा त्यानंतर काय याचही उत्तर आपल्याकडे तयार पाहीजे. कारण दुखण्याला तसा खरा व्यवहारिक 'अंत' नसतोच! असो.. आता थांबतो! Happy धन्यवाद!

तसदिबद्द्ल क्षमस्व!

कारण दुखण्याला तसा खरा व्यवहारिक 'अंत' नसतोच! >>>> Happy त्यानंतर काय !!!! त्यासाठीच तर आहार विहार आचार विचार या मूलाधारचक्राच्या ४ पाकळ्या शुद्ध करण्याचा प्रयास करायचा असतो ना जिथे गंपती बापा स्थित करायचा असतो विघ्न हरण्यासाठी ! तरी आपण परत परत करंटेपणा करतोच Sad पण चिवटपणे पुढे गेले तर निदान ४ पावलं पुढे, ३ पावलं मागे करता करता net पुढे तर सरकू !

तसदी काय हो ! मला अंमळ परिक्षेला बसल्यासारखं वाट्लं पण उत्तरं द्यायला मजाही वाटली, उजळणी झाली.

श्री दत्तमाला मंत्र
========

दत्तयागाच्या वेळेस या मंत्राचा ठराविक वेळा उच्चार केलेला पाहिला आहे.
-----

ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय, स्मरणमात्रसंतुष्टाय,
महाभयनिवारणाय, महाज्ञानप्रदाय, चिदानंदत्मने,
बालोन्मत्तपिशच्ववेशाय, महायोगिने अवधूताय,
अनसूयाSSनंदवर्धनाय, अत्रिपुत्राय,
ॐ भवबंधविमोचनाय,
'आं' असाध्यसाधनाय, 'र्‍हीं' सर्वविभूतिदाय,
'क्रौं' असाध्याकर्षणाय, 'ऐं' वाक्प्रदाय,
'क्लिं' जगत्त्रयवशीकरणाय,
'सौ:' सर्वमनःक्षोभणाय, 'श्रीं' महासंपत्प्रदाय,
'ग्लौं' भूमण्डलाधिपत्यप्रदाय, 'द्रां' चिरंजीविने,
वषट वशीकुरु वशीकुरु, वौषडाकर्षयाकर्षय,
'हुं' विद्वेषय विद्वेषय, 'फट' उच्चाटय उच्चाटय,
ठः ठः स्तंभय स्तंभय, खें खें मारय मारय,
नमः संपन्नय संपन्नय, स्वाहा पोषय पोषय,
परमंत्रपरयंत्रपरतंत्राणि छिंधि, छिंधि,
ग्रहान निवारय निवारय,
व्याधीन विनाशय विनाशय,
दु:खं हर हर, दारिद्र्यं विद्रावय विद्रावय,
देहं पोषय पोषय, चित्तं तोषय तोषय,
सर्वमंत्रस्वरुपाय, सर्वयंत्रस्वरुपाय,
सर्वतंत्रस्वरुपाय, सर्वपल्लवस्वरुपाय,
ॐ नमो महासिद्धाय स्वाहा ||

अश्विनी - क्षयच काय, आपल्या प्रारब्धानुसार काहीही होऊ शकते. सिद्धीविनायकाची आराधना करणे आणि कुणाला क्षय होणे याचा काही संबंधच नाहिये
>> ह्यात आनंदीबाईंनी तू मुळ लेखात जे लिहिलयस ना "ज्यामधे दुसर्‍याचे वाईट व्हावे हाच मुख्य हेतू असतो, तंत्रविद्येचा, जारण मारणाचा वापर असतो. " - त्याप्रकारे गणपतीची साधना केलेली.

मला वाटतय, आपण सगळेच जण तेच बोलतोय. मुळात आपल्यातलं कुणीच स्वतःच्या फायद्यासाठी दुसर्‍याचं वाईट अशा प्रकारचे विचार करणारे नाहियोत (म्हणजे, असं मला वाटत). पण आपल्याला आवडत्या दैवताची आराधना काही लोक अशीही करुन घेतात.
म्हणजे कालीला नरबळी/पशुबळी देणारेही असतातच की - पण जर आपण तसं न करता आराधना करत असू तर ती आपल्याला तशा प्रकारेच प्रसन्न होईल.

मी सांगायचा प्रयत्न इतकाच करते आहे की आपल्या घरात येणारी नेहमीची वीज आहे - आपल्याला अत्यंत उपयुक्त. पण समजा एखाद्यानं काहितरी गोट्या केल्या आणि दुसर्‍या माणसाला शॉक देऊन मारण्याकरता ती वापरली. मग वीज वाईट का? नाही. पण वापरणार्‍याच्या बुद्धी आणि हेतू नुसार परिणाम बदलू शकतात. तसंच ह्या उदाहरणासारखं शक्तीत स्वतःच चांगलं वाईट काही नाहिये.

अग, मी काही तांत्रिक साधना करणारे अथवा काही मांत्रिक पाहिलेत - ह्यातले काहीजण एक उत्तम दर्जाचा माणूस आहेत. ह्याच साधना करुन गोट्या करणारेही काही लोक असतात.
पण तंत्र मंत्र म्हणजे वाईटच असा समज नको व्हायला वाचणार्‍याचा म्हणून मी ह्या दोन पोस्टस टाकल्या.

तुझं म्हणणंही पटेश.

गुगल वर जोगळेकर फॅमिली म्हणून सर्च करा. जोगळेकर फॅमिली'ज सायबर होम अशी पहिली लिंक येते.
त्यावर अनेक स्तोत्र, आरत्या, रामदास स्वामींचं साहित्य- असं बरच काय काय आहे.
रामरक्षेचा आणि गीतेचे ऑडियो तर केवळ अप्रतिम!

धन्स गो नानबा Happy

आपल्या घरात येणारी नेहमीची वीज आहे - आपल्याला अत्यंत उपयुक्त. पण समजा एखाद्यानं काहितरी गोट्या केल्या आणि दुसर्‍या माणसाला शॉक देऊन मारण्याकरता ती वापरली. मग वीज वाईट का? नाही. पण वापरणार्‍याच्या बुद्धी आणि हेतू नुसार परिणाम बदलू शकतात. तसंच ह्या उदाहरणासारखं शक्तीत स्वतःच चांगलं वाईट काही नाहिये. >>>> अगं माझ्या मनात देखिल हे उदाहरण कितीवेळा येऊन जातं हे असं उलटं सुलटं करणारे लोक्स पाहिले की. आता तुला ते काळुबाई देवस्थान ऐकून माहित आहे ना मांढरदेवीचं? ते मुळचं काली (पार्वती)ने तात्कालिक कारणासाठी घेतलेल्या अंशात्मक अवताराचं स्थान आहे असं ऐकलंय. तिथे बकर्‍यांचे बळी देऊन रक्तामांसाचा चिखल पडलेला असे आणि दुसर्‍याचा घात करण्यासाठी भारलेली लिंबं मिळत म्हणे ७५० रु. ला एक प्रमाणे. ह्या असल्या उपासना करणार्‍यांचाच शेवटी बुमरँगसारखा घात होत असणार. काहीवर्षांपुर्वी तिथे दुर्घटना झाल्यावर ह्या सगळ्यावर तिथे बंदी आणलीय म्हणे सरकारने. देवीने देखिल हुश्श म्हटलं असेल.

अग, मी वाईची. मांढरदेवी(काळुबाई जिथे आहे ते) वाईच्या अगदी जवळ आहे.
त्यामुळे चांगलच माहितेय.

अग, नरेंद्र दाभोळकरांनी त्यांच्या एका पुस्तकात ('विचार तर कराल' बहुतेक) इथलाच एक अनुभव सांगितलाय.
काळुबाईच्या जत्रेच्या वेळी तिथे डोंगराच्या मागच्या बाजूला रक्तामासाचा चिखल असतो म्हणे. अनिंस चे लोक एके वर्षी तो प्रकार थांबवायला तिथे उपोषणाला बसलेले. पूर्ण पोलिस बंदोबस्त.
वातावरण तापत चाललेलं. सगळीकडे एकदम तणाव - की आता पुढे काय होतंय.
अशात एक भगत पुढे झाला - त्यानं एक जिवंत कोंबड हातात घेतलं आणि त्याची मान स्वतःच्या दातांनी कचकन तोडली. सगळीकडे रक्त उडलं - ते पिऊन त्यानं ते कोंबड कचाकचा खाल्लं. ज्यांना बळी द्यायचा होता त्यांच्या गटात सगळीकडे विजयोन्माद! त्या भगताला डोक्यावर घेऊन सगळेजण फिरत होते. मग जेवढी बकरी-कोंबडी कापली जायची तेवढी गेलीच.
हे आत्ता लिहितानाही माझ्या अंगावर काटा येतोय - हात थरथरतोय.

हेच जेव्हा चेंगराचेंगरीत माणसं मेली तेव्हा ह्याच माणसांना किती वाईट वाटलं असेल! देवीला कोंबड्याचं रक्त जसं आवडतं- तसंच माणसाचही आवडलं असेल ना!
मला तो एक प्रकारचा न्याय वाटला.. आपल्या आख्या माणूस जातीच्या थोबाडीत दिल्यासारखा.
(सगळ्या जगाचं हवं ते करण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिला!)

देवीला कोंबड्याचं रक्त जसं आवडतं- तसंच माणसाचही आवडलं असेल ना! >>>> वोईच तो बुमरँग बोली मै.

मला तो एक प्रकारचा न्याय वाटला.. आपल्या आख्या माणूस जातीच्या थोबाडीत दिल्यासारखा. >>>> १००० मोदक.

त्यानं एक जिवंत कोंबड हातात घेतलं आणि त्याची मान स्वतःच्या दातांनी कचकन तोडली. सगळीकडे रक्त उडलं - ते पिऊन त्यानं ते कोंबड कचाकचा खाल्लं. ज्यांना बळी द्यायचा होता त्यांच्या गटात सगळीकडे विजयोन्माद! त्या भगताला डोक्यावर घेऊन सगळेजण फिरत होते. >>>> 13[1].gif हेच ते राक्षस, अंधराचे उपासक Angry

अश्विनी के,
तुम्हालापण धन्यवाद, चांगला बाफ चालु केलाय पण १खादा श्लोक शोधायचा म्हले कि सगळी पाने फिरावे लागते (अजुन पाने वाढल्यावर अजुन फिरावे लागेल Happy ) त्यापेक्शा तुम्ही जो पानाच्या सुरुवातीला common मजकुर आहे तिकडे, प्रसिध्द झालेला श्लोकचे heading आणी जमलेतर पान क्र. दिले तर बरे होईल शोधायला :-)...

अहो हेच तर करत होते आत्ता. सगळं टायपून संपादित केलं तर तुमची पोस्ट दिसली. आपण दोघांनी एकच विचार केला बहुतेक आत्ता Happy

मी 'स्वामी समर्थ करुणाष्टक' पण टाईप करुन पोस्ट केलं होतं तारकमंत्रा नंतर. कुठे गायब झालं कुणास ठाऊक? Crying.jpg अ‍ॅडमिनला माहित असेल का असं का झालं ते ? Uhoh

Pages