पुणे: लालु जीटीजी- रविवार १७ जानेवारी २०१०

मंडळी,
मायबोलीवरील एक प्रसिध्द उसगावकर व्यक्तीमत्व लालु उर्फ शर्मिला लवकरच भारतात दोन आठवड्यांच्या धावत्या दौर्‍यावर येणार आहेत. स्मित भारतात असताना पुण्यात त्यांचा दोन दिवस मुक्काम असेल. या मुक्कामादरम्यान त्यांना पुणेकर मायबोलीकरांना भेटायची इच्छा आहे. म्हणुन हे जीटीजी आयोजित करण्यात आले आहे. तेव्हा पुणेकर मायबोलीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन लाल्वाकांच्या भेटीचा लाभ घ्यावा असे पुणेकर मायबोलीकरांना जाहीर आवाहन. स्मित

जीटीजी संदर्भातली सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे:

तारीखः- १७ जानेवारी २०१०
वारः-रविवार
वेळः- सकाळी साडेआठ
स्थळ:- हॉटेल गंधर्व (बालगंधर्व रंगमंदिरासमोर)

जे कोणी येणार असतील त्यांनी लगेच आपापला हात वर करा पाहु . स्मित म्हणजे त्यानुसार हॉटेलमध्ये रविवारसाठी आसनसंख्या आधीच सांगुन ठेवता येईल..

Submit to kanokani.com

मला यायची खूप इछा आहे पण १७ लाच माझ महत्वाच काम आहे ...अरेरे

रविवारी सकाळी साडेआठ वाजता अंथरूणातुन कष्टाने उठण्याचा प्रयत्न करणे ह्याखेरीज इतर काही महत्वाचीही कामे असतात काय???

सगळ्यांना सॉरी. पोस्ट मागे घेत आहे.

साधना..स्मित
अग जेव्हा नवरयाने सन्गितल आपल्याला रवीवारी सकाळी जायच आहे ,मलाही पहिले असाच राग आला होता .. .. पण क्या करे ?? नवीन घराची deal आहे.. so I have to be there...

जळवा कुजक्यांनो राग अरेरे
लालु तू जाता जाता इकडे उतर मग आपण इकडेपण जीटीजी करु या फिदीफिदी

मी येणारे. आधीच सांगतेय. स्मित श्यामले टुकटुक.. !

मजा करा स्मित

हॅलो!

कदाचित हे जीटीजी सुद्धा मला मिस करावे लागणार कारण त्याच दिवशी डॉग शो मध्ये आमच्या ग्रेस ची एन्ट्री आहे. शिवाय आमच्या रुग्णालयातसुद्धा मला हजर राहणे जरुरी आहे.

क्षमस्व!

शरद

Hand.jpg
मी येतोय.

मी येतो आहे..........

अरे माझ्या लक्षातच नाही आलं मी पुण्यात आहे या दिवशी. माझा हात वर!!!

अरे वा बरेच हात वर आहेत की.. मज्जा येणार तर.. कार्याध्यक्ष व्यवस्था चोख हवी. मागच्या हंगामी कार्याध्यक्षांनी लय घोळ केले होते.. (आता हा साज्या काय मला सोडत नाही मी पळतेच कशी ... डोळा मारा )

मी नाय येऊ शकत (:

हे तिकडे तोंड करुन हसताय कि दु:खी झालायत? फिदीफिदी

अमृता - हूडकाकांनी टोपी घातली आहे बहुतेक फिदीफिदी

मी पण येऊ शकत नाही अरेरे

मी ए आर रहमान चे गाणे ऐकायला जाणार आहे!

माझं नक्की नाही.. जमल्यास.

मी पुण्यात येणार आहे त्या दिवशी, पण सकाळी ११ पर्यंत जर गटग चालु राहिले तरच मला जमेल... अरेरे

साधना,तुझ्याजवळ पुण्यातल्या कोणाचा भ्रमणध्वनी क्रमांक असेल तर फोन करून पहा त्यावेळेस..

चला मंडळी... अजुन कोण येणार असेल जीटीजीला तर लवकर हात वर करा. स्मित

आम्ही.

हात वर..स्मित

मी पण.. मी पण.. स्मित

मलाबी जत्रंला येऊ द्या की रं.

मी पण जमवणार...

अरारा!! अरेरे
ही लालुला भेटण्याची दुसरी संधी हुकणार.
शनिवारीच सोलापुरला चाल्लोय.

साडेआठ म्हणजे नऊ का? स्मित
साधना, लवकर ये, मला जेवायला घरी जायचंय. नाहीतर गाणं म्हणावं लागेल, 'जाऊ द्या ना घरी..'
धन्यवाद.
याल तर हसाल न याल तर फसाल.
लवकर निजे लवकर उठे, धनसंपदा त्याला भेटे.

अय्या लालु.. तु धनसंपदा घेउन जाणारेस... फिदीफिदी (सिंडीला स्मरुन फाको)

अगं लालु गटगला धनु आणि संपदा येणार असतील. जे लवकर उठुन गटगला येतील त्यांना त्या दोघी भेटतील फिदीफिदी

सिंडे, आधीच नाही सांगायचं का? त्या दोघी मलाही भेटल्या असत्या... डोळा मारा

मयुरेश, तुझं कार्याध्यक्ष नाव खरंच सार्थ आहे.. स्मित

त्यातलं 'लवकर निजे' बहुतेकांना जमेल.. पण लवकर ऊठे राग