स्टेम सेल्स आणि कॉर्ड ब्लड बँकींग

ह्या बिबी वर स्टेम सेल्स आणि कॉर्ड ब्लड बँकींग बद्दल चर्चा करूया.
किती खरे किती खोटे ? काय फायदे तोटे ? प्रिझर्व करावे की करू नये ?
भारतातील आणि भारताबाहेरील कॉर्ड ब्लड बँक्स बद्दल माहीती आणि संशोधनाबद्दल चर्चा अपेक्षीत आहे. जाणकारांनी कृपया आपली मते मांडावीत.

Submit to kanokani.com

Benefits असतात असं ऐकून आहे. पण फार खर्चिक प्रकार वाटला. ज्यांच्या कुटूंबियांना cells store न करता लगेच वापरले जातील, त्यांना फायदेशीर असावे.

Stem cell therepy ने कुनाला kidney साथी फायदा झाला आहे का? कोनि हयावर जास्त माहिती सागु शकेल का?

भारतात रिलायन्स अन बायोकॉन यावर काम करतात.

युक्रेनमध्ये एका मराठी मित्राने स्टेम सेल थेरपी चा फायदा घेतला होता. त्यांच्या मुलीला पायांची हालचाल करायला अडचण होती. त्यांना थेरपीचा फायदा झाला होता. मी त्यांना विचारुन सांगतो.

Cancer Research मधे येण्यापूर्वी मी Stem Cell Research Area मधे काम करत होते. Liver आणि metabolizing enzymes हे माझ्या कामाचे क्षेत्र असल्याने Stem cells पासून functional adult liver तयार करणे हे आमचे लक्ष्य होते (अजूनही काम पूर्ण झालेले नाही.. !)
Abortion cases मधे उपलब्ध होणा-या Fetal liver cells पासून किवा delivery नंतर टाकून देण्यात येणा-या Amnion पासून Stem cells मिळवून, त्यातून adult liver तयार करणे हा आमचा research area होता.
अश्या तयार झालेल्या hepatocyte-like cells (hepatocytes म्हणजे liver cells) आमच्या एका पेशंटला therapy म्हणून वापरल्या गेल्या आहेत. He was a patient of Crigler-Najjar Syndrome. हा एक अतिशय दुर्मिळ असा genetic आजार असून यात रुग्णाच्या शरीरातली bilirubin ची पातळी खूप जास्त असते.
आम्ही तयार केलेल्या liver सारखं काम करणार-या cells मुळे ह्या रुग्णाच्या liver मधला bilirubin metabolism हा normal liver सारखा काम करायला लागल्याने त्याची bilirubin level नियंत्रणाखाली येण्यास मदत होत असे.
ह्या रुग्णाच्या शरीराने ह्या therapy ला चागला प्रतिसाद दिला. मागच्या वर्षीपर्यन्त तो जिवंत होता. सध्या माहित नाही.

एक संशोधक या नात्याने ही खूपच आशादायी गोष्ट असली (एकूणच research मधे success पेक्षा failure इतकं जास्त पाहायला आणि पचवायला लागत की हा आशेचा किरण खूप महत्त्वाचा ठरतो- हिम्मत न सोडता काम करत करण्यासाठी .. !)तरीही reliable therapy म्हणून वापरण्याच्या दृष्टीने ह्या क्षेत्रातला research अजून 'बाल्यावस्थेत' आहे. पण जगभरातले संशोधक प्रयत्न करत आहेत.
या पिढीला नाही तरी कदाचित पुढच्या पीढीला या संशोधनाचे फ़ायदे नक्की मिळतील अशी आशा आहे. स्मित

या विषयावर कोणाला अधिक माहिती हवी असेल तर मला मेल करा. मला शक्य आहे तितकी माहिती सांगायचा मी नक्की प्रयत्न करीन.

(Research करणं सोपं, पण मराठीत सांगणं अवघड.. अशी अवस्था झालीये माझी...त्यामुळे कृपया चु.भु.द्या.घ्या. ) स्मित

champak, rar धन्यवाद लगेच रीप्लाय दिल्या बद्दल. पन stem cell therepy चा kidney साथि उपयोग होतो का? कुनाला काही माहित आहे का?

ह्या डिस्कशन बोर्डावर थोडी माहिती आहे.

असा गूगल शोध केला तर बर्‍याच साइट्स सापडतील.

या पिढीला नाही तरी कदाचित पुढच्या पीढीला या संशोधनाचे फ़ायदे नक्की मिळतील अशी आशा आहे.
>>>> रार, रिसर्च इन ऑस्ट्रेलिया मासिकातील मार्च २०१० च्या इस्यु मध्ये 'पोस्ट डॉक डायरी' हे शेवटुन दुसरे पान वाच!
जमल्यास मी इथे स्कॅन करुन टाकेल!

युरोपात राहणार्‍या मराठी व्यक्तीबद्द्ल मी वर लिहिले होते. पण दुर्दैवाने अजुन त्यांचेशी संपर्क करु न शकल्याने अधिक माहिति देउ शकत नाही. क्षमस्व.

त्यांनी भारतात प्रयत्न केले पण तेंव्हा(२००४-५) भारतात हे काम खर्चिक अन लिगली अवघड होते. म्हणुन युक्रेन ला गेले होते. ५००० युरो खर्च आला होता असे सांगितले होते.

Mrinmayee,
माहिती बद्दल धन्यवाद.

सई

Stem cell therepy ने cerebral palsy वर काही positive effect होऊ शकतो का?
Stem cell therepy करणारे मुंबईतील हॉस्पीटल्स, स्पेशालिस्ट,संस्था बद्द्ल कोणी माहीती देऊ शकेल काय?