सदस्य प्रवेश |
....... झाडामागे चंद्र झोपला गं बाईVariegated Wash टेक्निक ने हे चित्र साधारण तीन ते चार मिनटात संपवलय. A3 च्या अर्ध्या साईझ चे हे चित्र वेगवेगळ्या वॉशेसच्या सरावाचा येक भाग म्हणुन केलय |
अजय, चित्र फारच सुरेख आहे!!!! रंगसंगती उत्तम जमली आहे..
खुपच छान चित्र आहे अजय. तुमची प्रकाशचित्रे ही सुंदर असतात.
हे चित्र ३-४ मिनिटात काढलय्???कस काय्???भारि आहे
३-४ मिनीटात? मान गये.
अजय चित्र छानच आहे पण मलासुद्धा केदार सारखा प्रश्न पडलाय ३-४ मिनीटात कसे काढायचे. त्या टेकनिक बद्दल
आमच्या सारख्या सामान्यांना जरा सांगणार का?
सर्वांचे आभार.
- पहिल्यांदा हवेआसलेले दोन्ही र्रंग पॅलेट मधे तयार ठेवले (खुप दाट कीवा पातळ रंग न बनवता थोडे सुप सारखे दाट्सर रंग बन्वायचे), १.१/२ईंच फ्लॅट ब्रशने वर निळा फ्लॅट वॉश (चंद्रकोर काळ्जीपुर्वक पांढरी सोडली)आणि मधे थोडी मोकळी जागा सोडुन दुसर्या र्रंगाचा वॉश दिला. हे वॉशेस ओले असताच पेपर्वरच हे वॉशेश ब्रशने त्या सोडलेल्या मो़कळ्या जागेत येक्मेकात मिसळुन घेतले (Variegated Wash). हे साधारण दोन मिनटात संपवावे लागते अन्यथा हे रंग हवे तसे येक्मेकात मिसळत नाहीत.
वॉशेस थोडे दाट्सर असल्याने पंख्यावर थोडे सुकल्यावर ७/८ नंबरं रांउंड ब्रशने येक डार्क शेडने (निळा + ब्राउन) झाड पुर्ण केले, झाड काड काढताना ब्रश अगदी वरच्या टोकाला पकडला ज्यामुळे स्टोक्स अगदी लुज येतात आणि खालुन वर असे स्ट्रोक्स मारले, हे काम १ ते २ मिनटात संपते.