एन जे चं हिवाळी ए वि ए ठि झालं होतं तेंव्हा काही जणांनी तक्रार केली की रंगी बेरंगी मधली माझ्या कडच्या पुस्तकांची यादी दिसत नाही म्हणून. शिवाय ती यादी अपूर्ण पण होतीच. बर्याच चिकाटीने सर्व मराठी गद्य पुस्तकांची यादी पूर्ण केली. ती ही.
कवितांची, गाण्यांची पुस्तकं थोडीशीच आहेत. पण आता एक ब्रेक घेऊन यातली न वाचलेली पुस्तकं आधी वाचीन म्हणते; मग पद्य पुस्तकं , हिंदी पुस्तकं वगैरे...
संयुक्त राज्यात, कॅनडात राहणार्या कोणाला वाचायला हवी असतील तर अवश्य कळवा.
सरस्वती बाई अकलूजकर : आठवणी काळाच्या माणसांच्या
आचार्य अत्रे : कर्हेचे पाणी भाग दोन
केल्याने देशाटन
घराबाहेर
झालाच पाहिजे
निवडक अत्रे
मराठी माणसे, मराठी मने
मी कसा झालो
मुद्दे आणि गुद्दे
यू आर अनंतमूर्ती अवस्था ( अनुवाद उमा कुलकर्णी )
संस्कार
एस ए अय्यर आझाद हिंद फौजेची कथा
अनिल अवचट अमेरिका
आप्त
कार्यरत
छंदांविषयी
धागे आडवे उभे
प्रश्न
माणसं
मोर
स्वत:विषयी
सृष्टीत गोष्टीत
सुभाष अवचट स्टुदिओ
ह ना आपटे गड आला पण सिंह गेला
बाबा आमटे ज्वाला आणि फुले
महेश एलकुंचवार वाडा चिरेबंदी
शिरीष कणेकर इरसालकी
खटलं आणि खटला
गाये चला जा
गोतावळा
चापलूसकी
चापटपोळी
फटकेबाजी
लगावबत्ती
सूरपारंब्या
यादोंकी बारात
मधु मंगेश कर्णिक कॅलिफोर्नियात कोकण
दत्त रघुनाथ कवठेकर आभाळाची सावाली
अनंत काणेकर निशिकांताची नवरी
वसंत कानेटकर वादळ माणसाळतंय
विषवृक्षाची छाया
गिरीश कार्नाड हयवदन
शिवराम कारंथ मिटल्यानंतर ( अळियदमेळे ?)
अनंत कालेलकर माझं होम, माझी मुलं
काकासाहेब कालेलकर पूण्यभूमी गोमांतक
के नारायण काळे रंगभूमी प्रतिम, रंग आणि रूप
व पु काळे आपण सारे अर्जुन
काही खरं काही खोटं
वपुर्वाई
अण्णासाहेब किर्लोस्कर सौभद्र
शांता किर्लोस्कर भातुकली
गिरीश कुबेर हा तेल नावाचा इतिहास आहे
ल भा कुरकुरे राजा राम मोहन रोय
जी ए कुलकर्णी अमृतफळे
आकाशफुले
ओंजळधारा
निळासावळा
पारवा
पिंगळावेळ
रक्तचंदन
रमलखुणा
हिरवे रावे
सांज शकुन
स्नेहसुधा कुलकर्णी प्रज्ञावंतांची दैनंदिनी
दादा कोंडके एकटा जीव सदाशिव
माधव कोंडविलकर आता उजाडेल
अशोक कोठावळे ( संपादक) लेखकाचे घर
चिं त्र्य. खानोलकर अजगर
आपुले मरण
गणुराया आणि चानी
निवडक खानोलकर
राखी पाखरू
वि स खांडेकर अभिषेक
अमृतवेल
अविनाश
क्रौंचवध
गोकर्णीची फुले
ढगाआडचे चांदणे
दवबिंदू
नवी स्त्री
दोन धृव
प्रसाद
मुखवटे
ययाति
रानफुले
विकसन
हिरवा चाफ़ा
क्षितिजस्पर्श
भा द खेर सारथी सर्वांचा
माधव गडकरी राम गणेश गडकरी
रा ग गडकरी एकच प्याला
प्रेमसन्यास
भाव बंधन
राजसन्यास
प्रतिभा गणोरकर बा भ बोरकर
वीणा गवाणकर आयडा स्कडर
नाही चिरा डॉ खानखोजे
गंगाधर गाडगीळ एका मुंगीचे महाभारत भाग दोन
सुधीर गाडगीळ लाइफ़स्टाईल
लक्ष्मण गायकवाड वडार वेदना
मिलींद गुणाजी माझी मुलुखगिरी
चंद्रकांत गोखले चंद्र किरण
शरच्चंद्र गोखले माझ्या सार्वजनिक जीवनाची बखर
मंगला गोडबोले अशी घरं अशी माणसं
आणि मी
झुळूक
पोटाचा प्रश्न
सहवास हा सुखाचा
नीलम गोर्हे नारीपर्व
ना ग गोरे कारागृहाच्या भिन्ती
ग्रेस मितवा
आनंद घोरपडे नामवंतांचे विनोद
वि द घाटे काही म्हातारे व एक म्हातारी
पांढरे केस, हिरवी मने
मारुती चितमपल्लि चकवा चांदण
पक्षी जाय दिगंतरा
रातवा
शोभा चित्रे गौरी गौरी कुठे आलीस
अनुराधा चिन्मुळगुंद प्रथम पुरुषी स्त्री वचनी
जयकांतन जयकांतनच्या कथा
अशोक जैन सोंग आणि ढोंग
चिं वि जोशी आरसा
एरंडाचे गुर्हाळ
ओसाडवाडीचे देव
ना मारो पिचकारी
पाल्हाळ
मेषपात्रे
रहाटगाडगे
लंकावैभव
विनोद चिंतामणी
संचार
संशयाचे जाळे
रत्नप्रभा जोशी जीवनसाथींच्या नजरेतून साहित्यिकांचे अंतरंग
वि श्री जोशी झांशी राणी लक्ष्मीबाई
मुकुंद टांकसाळे सक्काळी सक्काळी
मनिषा टिकेकर कुंपणा पलीकडला देश
लक्ष्मीबाई टिळक स्मृती चित्रे
ग ल ठोकळ ठोकळ गोष्टी
शरदिनी डहाणुकर फुलवा
मृणालिनी ढवळे दृष्टी आडची सृष्टी
अरुणा ढेरे काळोख आणि पाणी
कृष्ण किनारा
नाग मंडल
भगव्या वाटा
लावण्या यात्रा
लोकसंस्कृतीची रूपे
गोपीनाथ तळवलकर सहस्त्र धारा
गोविंद तळवलकर अभिजात
बहर
लाल सलाम
वाचता वाचता २
पूर्णचंद्र तेजस्वी चिदम्बर रहस्य
प्रिया तेंडुलकर ज्याचा त्याचा प्रश्न
पंचतारांकित
विजय तेंडुलकर आणि मी
कादम्बरी एक
चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी
तें
तेंडुलकरांच्या निवडक कथा
रातराणी
हे सर्व कोठून येते
मधुकर तोरडमल आयुष्य पेलताना
पुष्पा त्रिलोकेकर वेध
जयवंत दळवी निवडक ठणठणपाळ
परममित्र
माजघर
सारे प्रवासी घडीचे
अरुण दाते शतदा प्रेम करावे
गो नी दांडेकर हे तो श्रींची इच्छा
फादर फ्रांसिस दिब्रिटो ओऍसिस च्या शोधात
सीमा देव सुवासिनी
गोविंद बल्लळ देवल शारदा
गौरी देशपांडे आहे हे असं आहे
पु ल देशपांडे अघळ पघळ
अपूर्वाई
असा मी असामी
आपुलकी
आम्ही लटिके ना बोलू
एक झुंज वार्याशी
एका कोळीयाने
उरलं सुरलं
कान्होजी आंग्रे
काय वाट्टेल ते होईल
कोट्याधीश पु ल
खोगीर भरती
गणगोत
गुण गाईन आवाडी
गोळा बेरीज
चार शब्द
चित्रमय स्वगत
जावे त्यांच्या देशा
तीन पैशांचा तमाशा
ती फुलराणी
तुझे आहे तुजपाशी
दाद
नवे गोकुळ
नस्ती उठाठेव
पुरचुंडी
पुलकित षट्कार
पु ल पंचाहत्तर
पूर्वरंग
पोरवय
बटाट्याची चाळ
भाग्यवान
मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास
मित्रहो
मुक्काम शांतिनिकेतन
मैत्र
मोठे मासे छोटे मासे
रवींद्रनाथ तीन व्याख्याने
रसिकहो
रेडिओवरील भाषणे व ष्रुतिका १ व २
वटवट वटवट
वयम मोठम खोटम
वंगचित्रे
व्यक्ती आणी वल्ली
विठ्ठल तो आला आला
पु ल एक साठवण
स्वगत
सुंदर मी होणार
हसवणूक
सुनिता देशपांडे आहे मनोहर तरी
आहे मनोहर तरी वाचन आणि विवेचन
मण्यांची माळ
मनातलं अवकाश
सोयरे सकळ
वामन देशपांडे निवडक अभंग
सदानंद देशमुखबारोमास
लालजी देसाई जोहार मायबाप
नारायण धारप स्वप्न मोहिनी
शं ना नवरे अघळपघळ
सर्वोत्कृष्ट शन्ना
प्रमोद नवलकर पहारा
ज्ञानेश्वर नाडकर्णी चिद्घोष
जयंत नारळीकर यक्षांची देणगी
याला जीवन ऐसे नाव
वामन परत न आला
भालचंद्र नेमाडे कोसला
जरीला
झूल
बिढार
साहित्याची भाषा
सेतू माधवराव पगडी अहकामे आलमगिरी
नेसोनी शालू हिरवा
अप्पा पटवर्धन गावाचे गोकुळ
वसुंधरा पटवर्धन हाय
दया पवार पासंग
बलुतं
अलेक पदमसी अ डबल लाइफ़
दिलीप प्रभावळकर अवती भवती
श्रीयुत गंगाधर टिपरे अर्थात अनुदिनी
मीना प्रभु ग्रीकांजली
चिनी माती
दक्षिणरंग
विश्वास पाटील झाडाझडती
महा नायक
म गो पाठक लक्ष्मीबाई भ्रतार वासुदेव
यशोदा पाडगांवकर कुणास्तव कुणीतरी
कमल पाध्ये बंध अनुबंध
भाउ पाध्ये बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर
वासूनाका
श्री दा पानवलकर सांजारी
मेघना पेठे नातिचरामि
के ज पुरोहित व्रात्यस्तोम
श्री ना पेंडसे रथचक्र
हद्दपार
प्रभाकर पेंढारकर रारंगढांग
भालजी पेंढारकर साधा माणूस
शिरीष पै मी
माझे मला
टिप फुले टिप ग
वसंत पोतदार भीमसेन
ना सी फडके निवडक कथा
बावनकशी
सितारा मंझिल
सुधीर फडके गाजलेली गीते
य दि फडके नाही चिरा नाही पणती
शकुंतला फडणीस फोटोवर टिच्चून
न र फाटक लोकमान्य
पद्मजा फाटक बापलेकी
बाळ फोंडके जंतर मंतर
जावे विज्ञानाच्या गावा
रविंद्र बागडे गठुळं
वसंत बापट अहा देश कसा छान
ताणे बाणे
विसाजी पंताची वीस कलमी बखर
अरविंद बावडेकर कंसर माझा सांगाती
विद्या बाळ संवाद
वि आ बुवा नवर्यांवर पी एच डी
विश्राम बेडेकर रणांगण
मिलींद बोकील उदकाचिया आर्ती
जनाचे अनुभव पुसतां
झेन गार्डन
शाळा
रा रं बोराडे वाळवण
भाई भगत चेहरे मोहरे
दुर्गा भागवत आस्वाद आणि आक्षेप
दुपानी
पूर्वा
पैस
भावमुद्रा
रानझरा
व्यासपर्व
भा रा भागवत छगनचे चर्हाट चालूच
हाजीबाबाच्या गोष्टी
मनोज भाटवडेकर आपली मुलं आणि आपण
पु भा भावे अकुलिना
विनोबा भावे महाराष्ट्रीयांशी हितगूज
सुभाष भेंडे आमचा गोवा, आम्हाला हवा
ऐसी कळवळ्याची जाती
साहित्य संस्कृती
एस एल भैरप्पा पर्व ( अनुवाद उमा कुलकर्णी)
बा सी मर्ढेकर मर्ढेकरांच्या कादम्बर्या
रत्नाकर मतकरी माणसांच्या गोष्टी-२
रमेश मंत्री ओठ सलामत तो
सह्याद्रीची चोरी
ह मो मराठे निवडक कथा
निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी
कविता महाजन ब्र
श्री म माटे बारा शस्त्रज्ञ
ग दि माडगूळकर कृष्णाची करंगळी
गदिमा
चंदनी उदबत्ती
जोगिया
थोरली पाती
बांधावरल्या बाभळी
बोलका शंख
भाताचे फूल
मंतरलेले दिवस
सोने आणि माती
व्यंकटेश माडगूळकर उम्बरठा
कोवळे दिवस
चरित्र रंग
चित्रकथी
पांढर्यावर काळे
बाजार
व्यंकटेश माडगूळकर यांची कथा
द मा मिरासदार फर्मास गोष्टी
अम्बरीष मिश्र शुभ्र काही जीवघेणे
केशव मेश्राम ज्वाला कल्लोळ
दि बा मोकाशी मोकाशी यांची कथा
जरा जाऊन येतो
गंगाधर मोरजे मराठी लावणी वांग्मय
बाबू मोशाय चित्राची गोष्ट
शहेनशहा
सण्डे के सण्डे
आनंद यादव आत्म चरित्रा मीमांसा
नटरंग
भूमीकन्या
मं वि राजाध्यक्ष भाषाविवेक
प्रतिभा रानडे ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी
ऐरणीवरचे प्रश्न
यशोदाबाई आगरकरांच्या आठवणी
फिरोझ रानडे काबूलनामा
नार्ला वेंकटेश्वर राव वेमना
सत्यजित राय जय बाबा फेलूनाथ
मो ग रांगणेकर असा धरी छंद
जे के रोलिंग हॅरी पॉटर आणि तत्वचिंतकाचा पाषाण
सुमेध वडावाला ( रिसबूड) ब्रह्मकमळ
सांजवा
फणीश्वर नाथ रेणू काळी माती हिरवी माती
लक्ष्मण लोंढे २२ जुलै १९९५
विनय वाइकर आइना ए गजल
अनुताइ वाघ कोसबाडच्या टेकडीवरून
बापू वाटवे दादासाहेब फाळके
हंसा वाडकर सांगत्ये ऐका
सरोजिनी वैद्य कहाणी लंडनच्या आजीबाइची
संक्रमण
केदार शिंदे सही रे सही
वि वा शिरवाडकर ऑथेल्लो
अंतराळ
कैकयी
बारा कथा
मुख्य मन.त्री
ययाती आणि देवयानी
विदूषक
विभावरी शिरूरकर् विरलेले स्वप्न
उषा शेठ माझी नीता
अरूण शेवते अलीकडे पलीकडे
स्नेहांकित
राम शेवाळकर् निवडक मराठी अत्मकथा
सांता शेळके कविता स्मरणातल्या
चौघीजणी
पत्रं पुष्पम
पावसा आधीचा पाऊस
ललित नभी मेघ चार
वेडे वारे
वसंत सरवटे सहप्रवासी
नी र सहस्रबुद्धे शिक्षणक्षेत्रातील सरस नीरस
इंदिरा संत मालन गाथा
प्रकाश नारायण संत झुम्बर
पंखा
वनवास
शारदा सांगीत
आनांद साधले आनंद ध्वजाच्या कथा
सानिया स्थलांतर
बाळ सामंत सप्रेम नमस्कार
कमलाकर सारंग अनुभव
शिवाजी सावांत युगंधर श्रीकृष्ण एक चिंतन
वि दा सावरकर १८५७ चे स्वातंत्र्य समर
काळे पाणी
माझी जन्म ठेप
सहा सोनेरी पाने
ज्योती सोमण् क्वेटा टेरेस
कमला सोहोनी आहार गाथा
शांता हुबळीकर् कशाला उद्याची बात
राजाराम हुमणे राजारामायण
इतर
ढवळे प्रकाशन तुकारामची गाथा
य गो जोशी ज्ञानेश्वरी
बाळकृश्ण अनंत भिडे ज्ञानेश्वरी
दासबोध
निवडक आवाज
ही सग.........ळी तुझ्याकडे 'असलेल्या' पुस्तकांची यादी आहे??? माय गॉड... हेवा वाटतोय तुझा!
जबरीच.. i wish माझ्याकडे आत्ता इतकी पुस्तकं असती..
बरीच माहीत नसलेली पुस्तके कळली.. thanks for sharing...
बरीच वाचलेली, काही न वाचलेली. अमेरिकेत राहून ईतकी पुस्तक जमविने खरच कोतुकास्पद गोष्ट आहे.
शोनु,
तुझ्याकडच्या पुस्तकांची यादी बघुन मला आपण एकदम गरीब आहोत की काय असे वाटायला लागले. माझ्याकडे स्वतःची
५०-६० सुद्धा पुस्तकं नसतील. इथे आणि भारतात मिळुन.
एकदा सुट्टीत तुझ्या घरी यायला पाहिजे म्हणजे सगळी पुस्तकं अधाश्या सारखी वाचुन काढता येतील. तुझी लायब्ररी बघीतली
तर मी बहुदा आनंदाने वेडी होईन असे वाटतय. यातली कितीतरी पुस्तकं "माझ्या Must read पुस्तकांची यादी" मध्ये आहेत.
आहे की तुझ्याकडे.
एवढी मोठी लिस्टच आहे.
आता तु बेंच मार्क पुस्तक गोळा करण्यातली.
बर श्री ना पेंडसे यांच गारंबीचा बापु नाहिये का??? का?????
आणखी एक आयुष्य हवय, नुसते वाचन करण्यासाठी.
मिळालेच तर सगळी वाचुन काढीन म्हणतोय.
तोपर्यंत या श्रीमंतीचा हेवा करण्याशिवाय काय करू ?
पण माझ्या अल्पमतिप्रमाणे, या यादीत हि पुस्तके हवीतच.
मंगला गोडबोले = साक्षात धप्प, पर्स हरवलेली बाई, जिथली वस्तु तिथे.
विश्वास पाटिल = चंद्रमुखी, पांगिरा, पानिपत,
डॉ डहाणुकर = स्वास्थ्यवृत्त
पुष्पा त्रिलोकेकर = देवाचा जन्म
मीना प्रभु = मेक्सिको पर्व, इजिप्तायन, तुर्कनामा
निळु दामले = माणुस आणि झाड, कैरो ते इस्तंबुल,
मल तुझा फार हेवा वाटला गं..... किती छान संग्रह आहे तुझा. मलाही वाचनाची खुप आवड आहे. प्रयत्न करते आहे पुस्तकं जमवायचा.
खुप छान वाटलं. तुला भेटायला आवडेल.
शोनू, तुझं हे पान म्हणजे आता हक्काची लायब्ररी झालीये. काय वाचू? असा प्रश्न पडला की सरळ इथे यायचं आणि हवं ते पुस्तक निवडायचं. ह्यात मंगला गोडबोलेंचं 'गुंडाबळी' दिसलं नाही. तसेच सुधा मुर्ती आणि सुहास शिरवळकर पण गैरहजर दिसताहेत. हे दोन माझे आवडते लेखक आहेत.
बरं, प्रत्येक भारतवारीला घेशील ती नविन पुस्तकं इथे पण इथे टाकशील ना??
शोनू, यादी मेहनतीने केलीस.. छान..
शोभा चित्रेंच ते गौरी गौरी कुठे आलीस.. कशाबद्दल आहे? इतकी पुस्तकं जमवलीत कशी वा जमलीत कशी तेही लिहायच असतं.
पूर्ण यादी वाचनही धन्य वाटले.. तू तर सगळी पुस्तकेच वाचलेली आहेत.. तुला सुपर सर्वोत्तम

किंवा वाडकरांच्या भाषेत 'फन्टॅब्युलस'!!
शोनू, तुमचं वाचन आणि पुस्तकांचा संग्रह खरंच जबरदस्त आहे.
एवढा मोठा वैयक्तिक संग्रह फारच थोड्या जणांचा असेल.
खरच तुझा हेवा वाटावा एवढी पुस्तक वाचायला मिळाली आहेत.
आई ग.... ही सगळी पुस्तक तुझी आहेत???? जबरदस्त कलेक्शन आहे हं. तुला भेटायला खरच आवडेल. नवीन पुस्तक घेतलीत की यादी अपडेट करत राहा. आता एक इंग्लिश पुस्तकांची यादी पण बनव ना.
-प्रिन्सेस...
येवढं कौतुक करू नका मंडळी. अमेरिकेत रहातेय गेले पंधरा वीस वर्षं. वर्षा-दीड वर्षानी भारतवरी ठरलेलीच असते. शिवाय आई, मावशी, इतर नातेवाइक सगळ्यांनी वेळोवेळी आणलेली पुस्तकं आहेत. मला दर खेपेला जेमतेम एकदा जवाहर अन एकदा आयडियल मधे जायला जमतं. जवाहर मधे रस्त्यावर उधं राहून सगळी खरेदी चालते. एकदा दहाबारा पुस्तकंनिवडलीकी मग त्यांचा माणून पण उत्साहाने गट्ठे उलटे पालटे करून पुस्तकं शोधून देतो. मग ते सावकाशीने हिशेब करून फोनवर कळवतात अन नंतर त्यांचा माणूस पुस्तकांचा गठ्ठा घरी आणून देऊन पैसे घेऊन जातो. एकदा रसिक साहित्य मधे गेले तेंव्हा भावाच्या ड्रायव्हरकडे असलेले पण पैसे घेऊन त्यांचं बिल चुकतं केलं होतं इतकी वेड्यासारखी पुस्तकं घेतली होती.
कधी वाटतं भारतात असते तर केवढी तरी जास्त जमवली असती. पण कधी वाटतं की दूर रहाते अन मराठी पुस्तकं इथे तशी दुर्मिळच. म्हणून एवढी जमलीयेत.
ज्यांना कोणाला पुस्तकं वाचायसाठी रहायला यायचं त्यांना सर्वांना उभं आमंत्रण ( श्टँडिंग इंव्हिटेशन हो )
अजूनही काही मस्ट रीड असतील तर सांगा.
शोनू .. आपण भेटायलाच हवं... तुझ्याकडे ही सग्ग्ग्ग्गळी पुस्तकं आहेत ? !!!
मी सुद्धा एनजे मधेच राहतो... त्या दिवशी एवेएठिला येऊ शकलो नव्हतो
मी तर हि लिस्ट्च वाचत रहते दिवसतुन २ दा कमितकमी ... हेवा वाट्तोय आणी आदरपण!!
आयुष्यात आता एक सुट्टी अशी घालवायला मिळावी...हि सगळी पुस्तक्...एप्रिलचे सुस्त निवान्त सुटीचे दिवस....मस्त घरात झोपाळ्यावर लोळ्त फकस्त वाचत रहावे...मम्मीची हाक यी पर्यन्त...
ये अब मुम्किन कहा
वा वा वा ! तोंडाला (डोळ्यांना) पाणी सुटले
जीएंची भरपूर आहेत की तुझ्याकडे. आकाशफळे पण आहे म्हणजे कमाल आहे. सहसा कोणाकडे दिसत नाही. काय सही आहे ना ते पुस्तक?
आणि पुलंची पण मोठी यादी पाहून जिव गलबलला !
शोनू, मॅड म्हणजे एकदम मॅsssssssssडच! भन्नाट लिस्ट आहे.
शोनूताईंनी पाठविलेल्या पुस्तकात 'झुळुक' हे मंगला गोडबोले यांचे पुस्तक वाचले.
झुळुकबद्दल सांगायचे म्हणजे''चटपटीत खमंग भेळ'
मंगला गोडबोले यांचे आईने जमविलेले लेख-कात्रणं कधीमधी सुट्टीतच काय ती वाचली गेली होती. आज खूप दिवसांनी असे Light mood पुस्तक वाचून तोंडाला चव आली, असे म्हटले तरी चालेल! पुस्तकात काय आवडले ते नेमके सांगता येणार नाही. पहिल्या एक - दोन झुळकी जोरात येतात! (मी झोपेतदेखील रात्रभर हसत होते- इति नवरा). इतर लेख त्यामानाने जरा कमी जोरात आल्या तरी, प्रत्येक वाक्यावर माझी मान आपोआप होकारार्थी डोलावत होती. अगदी साधे सोपे दैनंदिन जीवनातले अचूक निरिक्षण आणि त्यावर मार्मिक भाष्य असे पुस्तकाचे स्वरूप आहे.
मुखपृष्ठ आणि आतील चारुहासांची comic strips अगदी विषयानुसार आणि झक्कास!
असे नर्मविनोदी पण मध्येच विचारात पाडणारे पुस्तक पाठविल्याबद्दल शोनू, तुमचे खूपच आभार!
व्यंकटेश माडगूळकर. काय लिहु?- सिर्फ नामही काफी है!
डीडीवर माडगूळकरांच्या कथांवर आधारीत मालिका पाहिली होती. एक दोन धडे देखील होते. पण तेव्हाचे वाचन फक्त परिक्षेच्या दॄष्टीकोनातून झाल होतं.
ह्या माणसाला नुसते लेखक म्हणणे फार चुकीचे. लेखक नव्हे निष्णात चित्रकारच तो!
'उंबरठा' ह्या पुस्तकातल्या त्यांच्या कथांची वर्णनशैली आप्रतिम! सलामीची 'उंबरठा', 'जंगल', 'घरापाठीमागची..' अश्या अनेक साध्या सरळ कथांतून जबरदस्त व्यक्तीचित्रण आहे. प्रत्येक व्यक्ती योजलेल्या पात्राला पुरेपूर न्याय देउन जाते. मला भावलेलं म्हणजे फक्त व्यक्तीच नाही तर कथांमध्ये आलेलं वातावरण, बोलीभाषा यातून सहजपणे चित्रित होत जाणारा कथेचा गाभा.. विशेषकरून 'उंबरठा' हा कथासंग्रह म्हणजे विविधतेने नटलेले वेगवेगळ्या चित्रांचा संग्रह! 'देता किती घेशील दो कराने' ह्या अवस्थेला कारण.