नोकरांना ताड कुठला, माड कुठला शेटजी

प्रसादच्या सुंदर गझलेचं थोडसं स्वैर विडंबन

नोकरांना ताड कुठला, माड कुठला शेटजी
वाटते तुम्हा नको ती, त्यांस पाजा शेटजी

एक वाटी साखरेची सांडली रस्त्यावरी
अन बिचार्‍या पद्मनाभास हसता शेटजी

का सुक्या माश्याप्रमाणे तूपरोटी वाढतो
एवढा का वाढप्याला वास सुटला शेटजी

काढता का मायबापा अन तुम्ही का भैन ही
पोट आहे पेटलेले, हात अडला शेटजी

संपल्या त्या चार ज्यांचा संग होता लाभला
आणतोच पुन्हा नविन, मोजून घटिका शेटजी

पाडण्या बघ रोज भांगा, तो फणीही आणतो
लावतो साधून वेळ, मग वीग टकला शेटजी

काय झाले? कानशीला चार चपला वाजल्या
तप्त झाले कान त्याचे, मंद झाला शेटजी

स्वस्त झाले जा जगी सर्वत्र दारू अन दुवा
चालण्या आधीच का हो तोल सुटला शेटजी?

चार बोटे, आठ बोटे, वाढवा खोली जरा
खोदता खड्डा दुजाला, जीव खपला शेटजी