सदस्य प्रवेश |
मराठी भाषाइथे गेली बरीच वर्षे बर्याच लोकांनी म्हंटले की मराठीत लिहा. तरी बरेचदा लोक इतर भाषातच लिहीतात. व्यवहारात सुद्धा मराठी वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. खरे तर दोन मराठी लोक आपआपासात बोलताना बरेचदा आपल्याला काय म्हणायचे आहे ते जास्त चांगल्या रीतीने म्हणायला इंग्रजी शब्दप्रयोग जास्त योग्य वाटतात. उदा.: आजच मराठी ऐकताना असे वाक्य ऐकले. "तो प्रसंग हा तुमच्या आयुष्यात 'defining moment' ठरला". तर आता प्रश्न असा की अश्या इंग्रजी किंवा हिंदी शब्दांना नि शब्दप्रयोगांना मराठीत अर्थपूर्ण पर्याय शोधता येतील का? ते प्रचलित करता येतील का? जसे हार्मोनियमला संवादिनी हा शब्द आजकाल लिहीलेला व बोललेला हि ऐकण्यात येतो. आनंदाची गोष्ट. हे केले तर इतर भाषांमुळे मराठी समृद्ध होते या वाक्याला अर्थ येईल. मागे सावरकरांनी असा प्रयोग केला, पण सर्वसाधारण मराठी लोकांना ते फार संस्कृतप्रचूर व क्लिष्ट वाटले म्हणून वापरात आले नाही. तसे काही केले तर मराठीत इतर भाषा घुसडण्याची गरज वाटणार नाही. यासाठी अर्थातच् मराठी भाषेचे पद्धतपूर्ण शिक्षण घेतलेल्या, खूप मराठी वाचन केलेल्या व्यक्तींची गरज आहे. त्यांच्या कार्याला गरज असल्यास पैशाची मदत केली पाहिजे. त्यातून वापरण्यायोग्य शब्दप्रयोग झाले पाहिजेत. इकडे जर मराठी नेत्यांनी लक्ष दिले, तर त्यांना सत्ता व पैसे मिळणार नाहीत, पण मराठी लोकांचे ते मनापासून नेते होतील. पण लक्षात कोण घेतो? त्यापेक्षा डोके कापल्या जाईस्तवर नुसते स्वस्थच बसायचे नाही तर उलट शत्रूला मदत करायची, नि मग बाजी प्रभू पणा करायला जायचे! सगळ्यांनाच बाजी प्रभू होणे जमत नाही. |
|
अहो मराठी नेत्यांनी हे करायला त्यांना तरी शुध्द मराठी बोलता येते का हे बघावे लागेल
झक्कि
आपण इथूनच सुरवात करु या की.
दिवे घ्या सारखा शब्दप्रयोग आपण यशस्वी करुन दाखवलाच की.
आपन कुथे रहात आहात यावर सगले अवलम्बून असते. माझ्या आजूबाजूला चोवीस तास सगले जन मराथीच बोलतात. आम्हाला सवय रहावि/ व्हावि म्हनून मुद्दामून ईन्ग्रजीत बोलावे लागते. मराथि सोदून ईतर भाशान्शि आमचा क्वचितच सम्बन्ध येतो.
DR ANIL MOKASHI
MD,DCH,FIAP,PhD
Chairman
Institute of Rural Pediatrics,
Bal Kalyan Kendra,
Postal address
6/269 Newase road,
Baramati
Dist Pune,
maharashtra,
India, 413102,
Landline o2112224288,
Fax 02112226426,
mob 9423584062,98
झाकी...तुमची कळ्कळ व्यक्त होते. आहो नेते राहुद्या हो मराठि जनतेलाच हे कधी उमगेल कुणास ठाउक...
तर माझा तुमच्या या उपक्रमाला पाठीबां आहे तर बोला कशी सुरवात करुया ?
झाकी...तुमच्या साठी खास...पारीभाषिक शब्द प्रयोग चा बा. फ.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103385/138661.html?1207889705
झक्की ,
माझे ह्या बाबतीतले मत जरा वेगळे आहे. मराठीचा उपयोग करावा पण प्रत्येक शब्दाला प्रतीशब्द शोधण्याने भाषा वाढेल असे मात्र नाही. प्रष्ण हा मुळ संकल्पनांचा आहे. जो समाज नवीन संकल्पना निर्माण करत असतो त्या समाजाने स्विकारलेल्या भाषेचा विकास होतो. मराठी समाजात जोपर्यंत नव्या वाटा धुंडाळणारे, नव्या संकल्पना शोधणारे व त्या मराठीतच मांडणारे उपजत नाहीत तो पर्यंत मराठी भाषेला दुसर्या भाषेवर अवलंबून रहाणे भाग आहे.
अर्थात हा प्रष्ण कोंबडी आधी की अंडे आधी अशा स्वरूपाचा आहे. मराठीवर प्रेम असणारे आणी नव्या वाटा धुंडाळणारे जितके मराठीत लिहितील तितकी ती भाषा वाढेल. पण हे मराठीवर प्रेम असुनही शक्य होतेच असे नाही. अर्थकारण आडवे येते. मराठी भाषा ज्ञान भाषा नाही, ती न वापरण्याने कुणाचेही अडणार नाही. केवळ साहित्यावर भाषा कशी टिकणार? भाषा विकून पैसा मिळवता यायला हवा. ते मराठी मोठ्या प्रमाणावर साधु शकत नाही ही मराठीच्या विकासातील खरी कोंडी आहे. मराठीमधे संत वाड्न्ग्मय सोडले तर नव्या संकल्पना शोधणारे काय निपजले हा प्रष्णच आहे.
असो
पेशवे, तुमचे पोष्ट आवडले. पण मला एक सांगा फक्त एक इंग्रजी भाषा सोडली तर आणखी किती भाषा पैसे कमवायला उपयोगी पडतात..