आई मला सांगशील का?
एकटा आहे मी,
मला बोलशील का...?
देवाने बाबांना का बोलावलं?
आठवणं येते त्यांची,
मला का रडवलं...?
आई मी आता कोणाकडे जाऊ?
सगळे गेले दुर,
तुझ्या जवळ येवू...?
जवळ मला बोलावशील का?
रडु नको सोन्या,
असं म्हनशील का...?
आई तुला माहित नाही का?
एकटा पडलो मी आता,
उमगत नाही का...?
लेकरु तुझं का आहे दु:खी?
परकं झालं जग,
राहील कसं सुखी...?
आई माझ्याकडे बघशील का?
दुर आहे उभा मी,
तुला दिसतोय का...?
आई तु मला जवळ बोलव...
प्रेमाने मला घास भरव....
आई तुच माझी आहेस गं.
तुझ्याशिवाय माझं कोणी नाही गं.
एकदाच फक्त माझ्याकडे बघ...
एकदाच फक्त माझ्याकडे बघ.....!


अमोल आज मनःस्थिती उदास होती आणि त्यात तुझी कविता वाचली.काळ्जात कालवाकालव झाली.खरंच!
खरचं खुपचं छान, मलाही आईला असच बोलावेसे वाटते,
अगदी मनाला भिडली ही कविता
अगदी मनाला भिडली
कवितेने डोळ्यातून पाणी काढले.
कविता छान आहे.