थांब तु आता जरा...

हरवले आभाळ माझे
निशिगंधात न्हाणे टाळ तु...
आठवु दे मज... स्वर माझ्या नभाचे
सुर केसातले सांभाळ तु...

फुलतो उरातुन सुर हा
झुलतो मनातुन मोगरा
हरवेन मी... हरपेन मी...
थांब तु आता जरा...

हरवला तो रंग तरंग
गंधात पाखरु गुंगले
वेलावर रंग सोडुनी
जाळ्यात पंख गुंतले

कर मोकळे....गर्द सावळे....
सोड त्या फुलपाखरा
रंगेन मी... तरंगेन मी...
थांब तु आता जरा...

हरवला पाऊस माझा
वणव्यात अडकुन पेटला
भिजवुन तु प्राजक्त माझा
अंगणात भडका रेटला

दाहातली नशा पिलेला
हा गारवा नाही खरा
अडकेन मी... भडकेन मी
थांब तु आता जरा...

धुंद रवी.

Submit to kanokani.com

सॉरी. कळली नाही.

मस्त रवी..धुन्द...

हरवला पाऊस माझा
वणव्यात अडकुन पेटला
भिजवुन तु प्राजक्त माझा
अंगणात भडका रेटला ........... हे मस्तच !!!!