सण

आली आली आली, वाजतगाजत एक शेळी
मुलं आली गोजिरवाणी करायला खेळीमेळी

खुल्या हवेत ठेवले तिला, रानावनात चारले तिला
वाटलं मला, सुटली ही एकमेव आजमितीला

पण नाही हो..

आले तेवढ्यात चारजण साजरा कराया सण
उभ्या उभ्या गणित मांडले तुला किती मला मण

घात झाला, घात झाला आज त्या शेळीचा
गोंजारूनी विश्वास दिला त्यांनी..
तिला खाण्याचा, तिला खाण्याचा..

Submit to kanokani.com

शेळीचा जीव जातो आणि खाणारे म्हनतात, भाजी पांचट झाली..

स्मित

अज्ञातजी, खूप दिवस जुन्या वहीची आठवण झाली अन त्यातून ही इद्च्या दिवशी बाहेर पडली.
३-४ वर्षांपूर्वी ही अगदी भोजनाच्या वेळीच लिहिलेली; बहुधा गणेशचतुर्थी व इद एकत्र आलेले होते.

गंगाधरजी,
धन्यवाद. खरच आहे. ही कविता पुन्हा एकदा वाचली तर त्यातला तिखटपणा/ कडवटपणा नक्कीच जाणवेल.
येथे लिहू का नको अशाच विचारात एवढे दिवस होते!
-सविनय.