कवितेस

सोडायचा नव्हताच हात,
आधी नाईलाज म्हणून आले होते आस-याला,
मग सवय झाली,
मग व्यसन,
पण आताशा तूही दुरावत चाललीयेस
मला तर विसरच पडत चाललाय,
कारणाचा शोध घेतीये,
पटेल असं सापडलं नाहीये अजूनही,
सध्या जे सुचेल ते कारण पटवून घेणं चाललंय
असो,
भेटुच परत कधी तरी..


मग व्यसन,
........
भेटुच परत कधी तरी..

मस्त जमल्ये. व्वा.



कालच सांगितल तुला, जमलीये म्हणून स्मित सुरेखच स्मित
अजून येउदेत



तुमचे प्रतिसाद वाचून .
लिहून जरा बरं वाटतय खरंच , धन्यवाद सुधीर, शैलजा स्मित



जास्त मागे लागू नकोस तिच्या.. जितकी मागे लागशील तितकी दूर पळून जाईल..

थोडे दिवस ढुंकूनही पाहू नकोस मग बघ कशी तुझ्या मागे मागे करेल ती स्मित

visit http://milindchhatre.blogspot.com



खरय तेच बघु या कधी उगवतोय तो दिवस



पण हे लिहितानाच भेटली ना ती? स्मित



तु आणि तुझी कविता...दोघी सख्या ना...रुसवे फुगवे चालायचेच! आज तर ती आलिच ना. पुन्हा आली की कळव आम्हाला स्मित)



पल्ले, कळव म्हणजे काय ,त्याशिवाय पर्याय नाहीच

अमोल, आत्ता भेटली हे मात्र खरं स्मित
तुम्हा दोघांचेही मन:पूर्वक आभार



अच्छा .......तो ये बात है.....!!
तुमची दोघींची भेट लवकरात लवकर होवो स्मित
आमचाही तोच आहे रोना अरेरे