माझी जाउ पण माहेरची जोशीच. त्यामुळे मी आमच्या लग्नात
"जोश्यांनी घातली भाव्यांवर मोहिनी
किरणची मी आज झाले अर्धांगिनी" हा माझ्या वडिलांनी सांगितलेला उखाणा घेतला.
माझ्या बाबांनी माझ्या दिराच्या लग्नात घेतला होता आणि बाँब टाकला होता.
विमानातुन पडला बाँब, जहाजाचा झाला चुरा
xxxx माझ्या ह्रुद्याचा हिरा (लिहीता येत नाहीए)
सशल, तू स्पष्ट केलंस तेव्हा मला कळलं की प्रीतिच्या उखाण्यातला शब्द 'हृदय' आहे. नाहीतर मी तो शब्द 'हुद्दा' असा वाचला होता. आणि मग मला वाटलं की प्रीतिला आठवूनच इतकं हसायला येतंय की त्यामुळे लिहिता येत नाहीये. मी आपलं दहा सेकंद डोकं खाजवलं, कुठला हुद्दा ? कळलं नाही तेव्हा खालची पोस्ट वाचायला घेतली आणि उलगडा झाला
माझ्या मैत्रीणि मिळुन माझे डोहाळ्जेवण्-कम बेबी शॉवर करत आहेत.त्यासाठी नाव अथवा उखाणा सुचवा.प्लिज लवकर सुचवा, मी नेटवर बाकिच्या साईट शोधल्या पण सगळे मोस्ट्ली लग्नाचे उखाणे आहेत. धन्यवाद!
माझ्या नवर्याने घेतलेला एक उखाणा....
विजेच्या खांबाला हजार वोल्ट्चा धोका..
---- माझी मनी, मी तिचा बोका...
माणसा, तयारीचा एक भाग का हा ?
माझ्या दिराने माझ्या नवर्याला हा उखाणा तयार करुन दिला होता. आणि त्याने तो घेतल्यावर आमच्या नातेवाईकांकडूनही उस्फूर्त दाद, टाळ्या, हशा वगैरे मिळाला.
बँगलोर असो नाहीतर मिनियापॉलिस

अजितच्या मागे आता अश्विनी पोलिस ....
माणसा, तयारीचा एक भाग का हा ? >>> तसं स्पष्टं कबुल केलं तर आम्ही अगदी वेचक उखाणे शोधुन देऊ
हा एक-
****** माझं नाव घ्याया न्हाई नगं म्हणूस
तू तर माझी बाईल आणि मी तुझा 'माणूस'
ब्रेडबरोबर खाल्ले अमूल बटर…

***चे नाव घ्यायला अडलय माझ खेटर
कोल्हापुर स्पेशल
अंबाबाईच्या देवळाला सोन्याचा कळस
*** चं नाव घ्यायचा मला नाही आळस
माणसा लालुने सांगितलेला उखाणा पाठ करुन ठेव.. लग्नात नाही घेतलास तरी आप्ल्या गटगला घ्यावा लागेलच
माझी जाउ पण माहेरची जोशीच. त्यामुळे मी आमच्या लग्नात
"जोश्यांनी घातली भाव्यांवर मोहिनी
किरणची मी आज झाले अर्धांगिनी" हा माझ्या वडिलांनी सांगितलेला उखाणा घेतला.
माणसासाठी लिहायचेत की बाईसाठी
माझ्या नवर्याला एकच उखाणा येत होता आणि तोच त्याने दोन-तीन वेळेला घेतला ..
भाजीत भाजी मेथीची
xxx माझ्या प्रितीची
शेवटी सगळ्यांना '"मेथीची भाजी" नको आता परत' म्हणावं लागलं ..
आणि हा अजून एक साधासुधा ..
xxx माझे नाव, xxx माझे गाव
आज मिळाली भार्या, xxx तिचे नाव
माझ्या बाबांनी माझ्या दिराच्या लग्नात घेतला होता आणि बाँब टाकला होता.
(लिहीता येत नाहीए)
विमानातुन पडला बाँब, जहाजाचा झाला चुरा
xxxx माझ्या ह्रुद्याचा हिरा
हृदय = hRuday
आईने कधीतरी लग्नाच्या पंगतीत घेतलेला उखाणा
xxxच्या लग्नाची खरेदी केली पळत पळत.
xxxरावांना वाढते जिलब्यांची चळत.
[आणि बाबांच्या ताटात सगळ्या जिलब्या सरकवल्या]
सशल, तू स्पष्ट केलंस तेव्हा मला कळलं की प्रीतिच्या उखाण्यातला शब्द 'हृदय' आहे. नाहीतर मी तो शब्द 'हुद्दा' असा वाचला होता. आणि मग मला वाटलं की प्रीतिला आठवूनच इतकं हसायला येतंय की त्यामुळे लिहिता येत नाहीये. मी आपलं दहा सेकंद डोकं खाजवलं, कुठला हुद्दा ? कळलं नाही तेव्हा खालची पोस्ट वाचायला घेतली आणि उलगडा झाला
चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे
घास भरविते मरतुकड्या, थोबाड कर ईकडे.
माझ्या मैत्रीणि मिळुन माझे डोहाळ्जेवण्-कम बेबी शॉवर करत आहेत.त्यासाठी नाव अथवा उखाणा सुचवा.प्लिज लवकर सुचवा, मी नेटवर बाकिच्या साईट शोधल्या पण सगळे मोस्ट्ली लग्नाचे उखाणे आहेत. धन्यवाद!