माहितीचा स्त्रोत

Submitted by चंपक on 19 November, 2009 - 18:42

विनंती : ग्रुप मधील सर्व सभासदांनी त्यांच्या माहितीचा स्त्रोत इतरांच्या लक्षात आणुन दिला तर उत्तम.

प्रतिमंत्रिमंडळ उपक्रमामध्ये सामील होण्यासाठी माझा माहितीचा स्त्रोतः
१) सरकारी / शासकीय संस्थांची संकेतस्थळे. उदा. http://maharashtra.gov.in/ http://ahmednagar.nic.in/ http://mahanews.gov.in/
२) नेहमीच्याच वाचनामध्ये (वृत्तपत्रे / नियतकालिके) थोडासे लक्ष सरकारी निर्णय अन त्यावर समाजात उमटणार्‍या प्रतिक्रिया यावर.. (विषयतज्ञ वा अभ्यासगटांकडुन प्रसिद्ध झालेले लेख)
३) सरकारी अधिकारी असलेले मित्र. (त्यांची नावे उघड न करता माहितीचा उपयोग करावा)
४) राजकारणी मित्र (कधी कधी नावे उघड केलेली चालतात. जर त्यांची जाहीर भुमिका आपण लिहित असलेल्या भुमिकेशी सुसंगत असेल तर)
५) समाजसेवी संस्थांमध्ये काम करत असलेले मित्र.
६) संबंधित विषयात अनुभव/ ज्ञान असलेले मित्र.

Group content visibility: 
Public - accessible to all site users