दासी

मी दासी.......
जन्मा आल्यापासुन हे पद मला मिळालं.
मला निवडीची संधीच नव्हती.
मी माणुस आहे हेच मी विसरले.
माझ्या भावनांना महालाच्या तळाशी दडवले.
त्यांनी युद्ध केले, आब आमची गेली.
ते हरले-जिंकले, गावं आमची पेटली.
तिचा ऋतु होता, आमचा कधीच नव्हता!
तिथे तेज होतं, आम्हा दारी अंधार होता.
मी दमले होते, गळले होते....
पण,
दासीनं दमायचं नसतं.
राणीसोबत रहायचं असतं.
राजकन्येशी खेळायचं असतं.
सरदारांना काय 'हवं-नको' पाह्यचं असतं...
राजकन्येचं लग्न झालं, ती निघाली,
तिच्यासोबत मलाही जावं लागलं.
घरी तान्हुलं भुकेलं होतं,
म्हातारीनं त्याला जोजवलं होतं....
माझा राजा दाराशी दरबान म्हणुन उभा होता,
ताठ कणा, मानेला उभार होता,
जाताना मी वळुन पाह्यलं,
त्याच्या डोळा पाणी होतं.....
मी दासी,
राणीसोबत शोभलं पाहिजे
म्हणुन
दागिन्यांनी मला मढलं पाहिजे.
झळाळत्या वस्त्रात
माझ्या वेदनेला कोंडलं पाहिजे.
हे असलं कसलं माझं पूर्वसंचीत?
माझ्या कोंडमार्‍याचं विधीलिखित.
पुढच्या जन्मी मी राणी झाले ना
तर... माझी कामं मीच करेन,
दासीला बंधनातुन मुक्त करेन....
विचारेन तिलाही,
बयो, तुला काय हवंय सांग!
माझं म्हणणं खरं ठरलं,
सगळ्या दास्या राण्या झाल्या.
सगळी काम स्वतःच करु लागल्या.
राण्या मुळी उरल्याच नाहीत,
सगळ्याच राण्या दासी झाल्या.....

Submit to kanokani.com

माझं म्हणणं खरं ठरलं,
सगळ्या दास्या राण्या झाल्या.
सगळी काम स्वतःच करु लागल्या.
राण्या मुळी उरल्याच नाहीत,
सगळ्याच राण्या दासी झाल्या.......>>

छान,

छानच ग पल्ले.. स्मित

खूप लांबलीय ........

पल्ले लय आवडली. शेवट खासच

....... ? मी जरा साशंक आहे..... अरेरे

राणीसोबत शोभलं पाहिजे
म्हणुन
दागिन्यांनी मला मढलं पाहिजे.
झळाळत्या वस्त्रात
माझ्या वेदनेला कोंडलं पाहिजे.
हे असलं कसलं माझं पूर्वसंचीत?
माझ्या कोंडमार्‍याचं विधीलिखित.

मस्त...!

स्मित

ठमाबाई विचारांची राणी

आभारी सर्वांची स्मित

आवडली..पण नेहमीसारखी नाही वाटली

हम्म्म, पुढच्या वेळी सुधारेन

पल्ली, कविता आवडली. मस्तच.. स्मित

पल्लु छानच ग...

खुप उशीरा पाहिली स्मित

मी माणुस आहे हेच मी विसरले.
माझ्या भावनांना महालाच्या तळाशी दडवले.
त्यांनी युद्ध केले, आब आमची गेली.
ते हरले-जिंकले, गावं आमची पेटली.

अहाहा...क्या बात है..!!
या चार ओळी मध्ये फक्त दासीचेच दु:ख नाही दडलेले तर समस्त शोषित समाजाच्या वेदनांचेच प्रतिनिधित्व करतात या चार ओळी...!!

धन्स स्मित