गुरूर ब्रह्मा, गुरूर विष्णू
गुरूर देवो सत्यसाईश्वरा
धावत आलो दिल्लीवरूनी
सरकारा तारा पट्टपुर्थीश्वरा ....
विजय जाहला, सत्ता आली
’खाती’ खाती हवी आम्हाला
घास मुखीचा निसटू पाहे
कृपा असावी पट्टपुर्थीश्वरा ...
महान राष्ट्री भाऊबंदकी
लोणी हवे सारे आम्हाला
सावलीनेच धरला दावा
द्या वरदहस्त पट्टपुर्थीश्वरा ...
पोहोच तुमची खालवर पुरती
हायकमांडही ढाळीते चवर्या
उद्दंड जाहला जाणता राजा
द्या समज त्यासी पट्टपुर्थीश्वरा ...
नतमस्तक हो तुमच्यापुढती
दास खुर्चीचे पामर आम्ही
बुडत्या नौकेस हात द्यावा
घ्या दंडवत माझा पट्टपुर्थीश्वरा ...
संदर्भ : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीवरुन धावत येवुन सत्यसाईबाबांची केलेली पाद्यपुजा.
विशाल.



जबरदस्त!!
कोणी तरी अशी हाणायलाच पाहीजे !!
-हरीश
अजून खरमरीत हवी होती.
वाढदिवशी लोटांगण, पुन्हा बंगल्यावर लोटांगण, त्यासाठी सगळ्यांना मज्जाव.... अंधश्रद्धावाले मात्र आता गप्प.
विठोबाचे दर्शन आता ८० फुटांवर गेलय. वारकर्यांची अवहेलना... मंत्र्यांना आयती पाद्यपुजा... उबग आणलाय या सत्तेच्या दलालांनी.
मस्त. सणसणीत. शपथविधीला पण बाबांना बोलावू असे म्हणणे म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे.
अजून खरमरीत हवी होती.>>
कौतुका, तुझ्या मेंदूला काही खाद्य नको का?
एकदम सणसणीत टोला
विशाल,
महाराष्ट्राच्या राजधानीत अमराठी लोकांसाठी ही प्रार्थना मराठीऐवजी हिंदी किंवा उर्दूमधे असायला हवी होती ऐसे आपको नही लगताहै क्या? मराठी शिकणेकेलिये टाईम लगता है, मालुम? इथून पुढचे हमारे समदे मंत्री मराठी थोडेच असनेवाले है? क्या बोलताय?
झकास !
लै बडी चुक हुई गयी मुकूंददा,
ईब का करे, हमका याद ही नाही रहत की ई बंबई ससुरी सबकी है, बस मरहट्टोंको छोडके !
तुम्हाप्रतीही एक लोटांगण
झकास !! विशाल,तुला पण लोटांगण रे.. मस्त खरमरीत लिहिल्या बद्दल.. !!
विशालजी मी शेजरीण असून मला नाही सुचल हे लिहायला.............मस्तच्....तुमच्या लिखनाला....अनि कविला सादर प्रणाम.........फक्कड्.............अजुन मसाला हावच पण्.......माफ करा पण वाटल...........
वेदनगंधा तुमचे मन:पूर्वक आभार.
माफी कशाला, अजुनही बरेच काही लिहीता येइल. पण इतरांनाही लिहू द्या. तुम्हीही लिहा. तो कौत्या पण काडी टाकुन गेलाय पण नंतर गायब.
झकास. साले पाय कधीच सोडणार नाहीत.
धन्यवाद !
विश्ल्या सिक्सर..