फुले झडोणी गेली, काटे ते राहीले
पायघड्या गेल्या, दगड, वाटे ते राहीले
रचले किती मनोरे, ढासळून गेले
स्वप्नाचे ढिगारे, कोसळून गेले
तुकडे आठवांचे, वाटे ते राहीले
फुले झडोणी गेली, काटे ते राहीले
सावलीच्या झाडांची , पाने गळून गेली
झाडावरची पाखरे , सगळी पळून गेली
आसवांचे पाट, वाटे ते राहीले
फुले झडोणी गेली, काटे ते राहीले
बोटी किनारा लागता, बुडून गेल्या
सावल्या लांबताना, डोळ्यापुढून गेल्या
अंधाराचे सोबती, वाटे ते राहीले
फुले झडोणी गेली, काटे ते राहीले
हाका मारल्या कितीदा, कोणी ना साद देती
कधी हात दिला होता, कोणी ना याद देती
वंचनांचे वार माझ्या, वाटे ते राहीले
फुले झडोणी गेली, काटे ते राहीले
हरीश दांगट


मस्त रे !
हरिश, फारच सुन्दर
छान आहे. 'झडोणी' ऐवजी 'झडोनि' करावे एव्हढेच.
सुरेख !