माझ्यावरती रागावली की ती प्रेमाने मला डुक्कर म्हणते...
परवा दिवशी ती इतक्या लाडानी मला डुक्कर म्हणाली की
पलिकडच्या चिखालातल एक डुक्कर लाजलं
आणि एक बाई कड़े बघून लाजला म्हणुन
त्याच्या बाइकोशी त्याचं वाजलं
त्याची बायको त्याला म्हणाली
आरे लाज वाटते का तुला ... काल तर म्हणलस की माझ्या सोबत खुश आहेस
पण तू काहि सुधारणार नाहीस
डुक्कर कसला.... पुरुष आहेस...
तिनी त्याला पुरुष म्हणू दे किंवा हीनी मला डुक्कर
ही तर प्रेमाची हाक आहे...
पण माणुस व्हा नाहीतर डुक्कर
शेवटी बायको म्हणजे धाक आहे...
धुंद रवी


अराsराssराsss बेधुंद रवी कसल्या कसल्या जोड्या लावतोस रे .
नावावरुन "डुक्कर उडाला" च्या पुढचे व्हर्जन आहे की काय असे वाटले.
अजुन एक नवीन समानार्थी शब्द... नवरा जमातीला... डुक्कर...
राजु,
नवरा जमातीला का? पुरुष जमातीला आधीच आहे तो .."मेन आर पिग्ज" विसरलास का?
रवी, कविता खरोखरच 'धुंद' होऊन लिहिलीत वाटते. तुमच्या मिसेस येत नाहीत ना इथे कविता वाचायला?
रविभाऊ,
काय राव, आपल्या पुरुष जातीचा पुर्ण चेंदामेंदा केलात.
जाऊ दया आता.
अरेरे
डुक्कर, डू़क्कू डुक्कुराज्या, डुक्या, पिगुली मगुली, वराहुल्या शोनुल्या, सुवरू बावरू, क्कीत्त्ती छान लिहितोस् रे.
ते ही रात्री १२ वाजता पोस्ट केली कविता. इतक्या रात्री चहा बनवितात वहिनी? कम्माल आहे. वा.वा.
मामी!!
डुक्या, पिगुली मगुली, <<<
काय मामी, तुम्ही पण लाडात का ?
खूप हसलो!!!
मामी, असे लाड करु नका,
आजुन दोन तिन लेख/कविता वाचावे लागतिल बरं!
लाडाच्या संबोधनात 'माझा ड्युक गं तो' हा समावेश कसा वाटतो?
डुक्कर, डू़क्कू डुक्कुराज्या, डुक्या, पिगुली मगुली, वराहुल्या शोनुल्या, सुवरू बावरू, क्कीत्त्ती छान लिहितोस् रे.
>>>
मामी, कवितेइतकीच पोस्टपण वाचनीय झालीये.
मामी
डूकूच्या(खरे डूक्कर) भावना डूकावतील अशाने.
खी खी खी
मामी..... दंडवत तुम्हाला. खरा धाक तर तुमचा वाटेल आता.
स्वाईन फ्लू पासून सर्वांनी जपून राहा बरं. कवितांना पण लागण व्हायला लागली म्हणजे कठीण आहे !
मामी तुम्हाला डुक्करदंडवत
इतक्या रात्री चहा बनवितात वहिनी? >>> काय मामी अशी कविता चहा पिऊन नाही , "देशी"ने बेधुंद होऊन लिहिली पाहीजे .
>>>>इतक्या रात्री चहा बनवितात वहिनी? >>> काय मामी अशी कविता चहा पिऊन नाही , "देशी"ने बेधुंद होऊन लिहिली पाहीजे


चहा कधी प्यायचा असतो ते आपल्याला व्हेरी साने गुर्जीं नी सांगितलेलेच आहे
नवीन ब्रँड वाघ-डुक्कर च हा
शँकी , तो साने गुर्जींचा चहा लय कडक हाय , व्हटाला पोळलं .
dhundravi,
माझी एक मैत्रीण होती. तिला एखाद्याचा राग आला की "डुक्कर कुठला का " असं म्हणायची सवय होती.
मग आमचा राग आला कि ती फक्त "डु" म्हणायची. मी तिला विचारलं काय गं डु म्हणजे काय ?
ती म्हणाली, खर तर मला डुक्कर म्हणायचं असतं म्हण मित्राना तसं म्हणनं बर नाही वाटत म्हणुन शॉर्ट फॉर्म वापरते.