तू एकदा ...

केसातल्या ओल्या धुक्याचे
............ रान तू ऊठवून जा...
भडकू दे श्वासात वणवा....
............ तू एकदा उमलून जा....

जवळ तू... तू दूर तरीही
बघ चिडवतो हा गार वारा
सुचवतो पाऊस काही
............... तू ज़रा उमजुन जा...

थांबायचे नसते तुला तर
भेटायला येतेस का ?
आता जवळ घे स्वप्नात मजला
किंवा
...................... झोप तू ऊडवुन जा....

चिंब डोळ्यांच्या किनारी
राहिलो मी कोरडा
आता बुडव तू मद्यात मजला
किंवा...
.....................पापण्या उघडून जा....

बेईमान सारे शब्द माझे
गुंतले तुझ्या कवितेमध्ये
ओढ़ मलाही कवितेत... किंवा
.................... पान हे ऊलटुन जा

चंद्रास माझ्या विरहपीडा
पौर्णिमेच्या धुंद राती
झटक तू ... केस आता तुझे अन...
..................चांदणे उधळुन जा ...

घाव झेलायास मागे
मी आता उरलो कुठे ?
काही तुला देण्यास नाही
............ जे राहिले ... उचलून जा....

धुंद रवी

Submit to kanokani.com

कविता आवडली.

झटक तू ... केस आता तुझे अन...
..................चांदणे उधळुन जा ...

-- क्या बात है!

सुंदर !
-हरीश

वा!! सुंदर कविता.. !!!

वा रवि

जवळ तू... तू दूर तरीही
बघ चिडवतो हा गार वारा
सुचवतो पाऊस काही
............... तू ज़रा उमजुन जा...

>>

रविभाऊ,

क्या बात है.
मस्त जमलं.

>> घाव झेलायास मागे
मी आता उरलो कुठे ?
काही तुला देण्यास नाही
............ जे राहिले ... उचलून जा....>>
क्या ब्बात है!

छान स्मित

छान..... सुंदर लिहिले आहे ...... !!! स्मित

वाह!

धुंद रवी.. जुन्या मा बो वर तुमच्या खूप कविता वाचल्यात. अताही तश्याच मस्त कविता वाचायला मिळणार ह्यात शंका नाही. स्मित

मनापासुन आभार...

सुंदर कविता

छान कविता.

मस्त, धुंद रवि, नावाला साजेसं स्मित

सुंदर!

जीव घेतोस रे...

खूप छान.

ग्रेट .

क्या बात है...
रवी : मी आतापावेतो वाचलेल्या तुझ्या कवितांपैकी ही सगळ्यात आवडली स्मित

कवित अतिशय सुंदर. कविता वाचन केल्यास प्रत्येक अंतर्‍यानंतर टाळ्या १००% मिळणार

धुंद कवी स्मित कविता आवडली स्मित