मी काय करू??

Submitted by चैताली पाटिल on 3 November, 2009 - 07:17

आज रोजच्या प्रमाणे तो माझ्याशी भांडला कारण एकाच संशय. थकली आहे मी त्याच्या ह्या रोजच्या संश्याला. जिव द्याच ठरवल पण जमल नाही. आई-वडिलांचा विचार करून.
का कुणास ठाउक. मला झोप येत नह्वती आज. हा अस का वागतोय. माझ कुठे चुकते का? ह्याला काय झाल असेल? कधी थांबणार हे सगळ?
का सहन कराव मी?
त्याला जराही पर्वा नाही आहे माझी ?
माझ्या स्वप्नाची ?
किती वेगळी होती मी?
आणि आज फ़क्त सांगाडा उरला आहे माझा?
केवढी स्वप्न सजावली होती मी? आता काय करू? कस समजवू ह्याला? असंख्य प्रश्नानी मला वेड केल. तशी मी भुत काळात हरवत गेले.......................................................

फार काही मोठ्या महत्वाकान्शा नाही केल्या? जरा नाराजितच कॉमर्स ला प्रवेश घेतला होता. ४ वर्गंच कॉलेज काही कॉलेज असता का? नस्ता व्यॉप होता माझ्यासाठी तर. जायच मानूं जायचे आठाव्द्यातुं दोनदाच. उशिरा प्रवेश म्हणुन परीक्षा अगदी जवळ होती मला. माझा हिंदीचा पेपर होता.
मी रिक्षात बसून गाइड वाचत होते. मी मध्ये बसले होते. बाजूला एक मुलगा अणि मुलगी बसलेल. माझ निरी क्षण इतकच. माहित ही नह्वत की पेहली नजर का प्यार भी होता हैं अस. अगदी भक्कड़ होत माझ्या साठी. पण जेव्हा त्याला होकार दिला तेव्हा कळल. की मी त्याच माझ्यावर पेहली नज़र का प्यार होते अस. मला तर तेव्हा कळल की रिक्षात माझ्या बाजूला बसणारा तो मुलगा माझा भावी नवरा होता. माझा प्रेमी. मला वेडा करणारा. मग आमी रोज़ भेटायचो. रोज़ जाऊँन बिच वर बसण. बाहेर लंच घेण. क्लास बंक करण. किती वेगळ जीवन होत आमच. सगळ्या गोष्टीच्या मर्यादा ठरल्या होत्या. मी इंजिनियर होण आणि त्याने नगरपालिकेत कामाला लागुन साइड बिसनेस करण. अगदी सगळ काही सूरलित चालल होत.
आम्ही दिवस ढकलत नव्हतो जगत होतो. एकामेकांच होण्यासाठी. नियतीने एक चुकी केलि. जे सगळ करतात मी ही तेच केल. काही नविन नह्व्त. पण ती अशी चुक ठरली अशी की त्यानंतर सगळ्या चूका शुल्क वाटायला लागल्या. फ़क्त ती एक चुक. नंतर त्याने जणू नेहमी माझ्यावर दबाव धरून ठेवला. मी ही त्या दबावा खाली गडत गेले सम्पूर्ण पणे की मला स्वाशश्वास घेणे पण जमले नाही त्यानंतर. जणू काही तो माझ्यावर स्वताच अधिकारच गाजवत होता. आधी "मी जास्त कोणाशी बोलू नये. मग फ्रेंड्स बनवू नये? जींस घालू नये. जीजू सही बोलू नये. त्याला मेसेज करू नये. मग ऑफिस मध्ये जास्त बोलू नये? कोणाची मस्ती करू नये? सहकारयान सोबत बसू नये. मग सीनियर तुलाच का कॉल करतो? अरे तो तुलाच का मेसेज करतो. तू इतकी का हसतेस? ओड़नी नीट का ठेवत नाहीस. तुझ्या क्लासचा मित्राने तुला का कॉल केला. तुझी कोणी मुलगी मैत्रिण नाही आहे का. जेवताना माझ्याशी का बोलत नाहीस? चाहा पिताना माझा फोन का नाही उचलत. आज झोपताना मला मेसेज का केला नाहीस? इतक बंधन आणि ते पण मला. आज मी इतकी एकटी झाली आहे की मला का आणि किती तरस होतोय ते पण मला कोणाला संगताही येत नाही.
कोणाला सांगाव. कस सांगाव मला हेच कळत नाही. हे सगळ कोणाला सांगुन माझी इज्जत तर जाणार नाही ना कोणी गैर समज तर करून घेणार नाही ना?
मी वेडी झाली आहे म्हणुन आज लिहितेय?
तुमाला काय वाटत काय करव??????????????????????????????????????
मी असच सगळ सहन कराव की यावर ही काही उपाय आहे?
मला समजतच नाही????????????????

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

यावेळी तुम्ही त्यांची आई होउन त्यांना मदत करावी. >> बाहेरचा समुपदेशका पेक्षा बायकोच ते काम नीट करू शकते. तो त्याच्या शेल मध्ये गेला ना तर त्याला बाहेर काढणे अवघड जाईल.>>>

व्वा..... आश्विनि मामी तुम्ही ग्रेट आहात...तुमचे मिस्टर खरंच भाग्यवंत आहेत्...
तुम्हाला सा. नमस्कार....असा ग्रेट सल्ला तुमच्या कडुनच अपेक्षीत होता.

पून्हा एकदा सा. न.

अश्विनी मी पण तेच म्हणालो होतो.
मी ज्या नाट्यकलाकाराचे उदाहरण दिले, तो आज हयात नाही, पण ती कलाकार मात्र पुढेही कार्यरत राहिली. कदाचित तिला, आपण प्रेमात कुठे कमी पडलो, असा विचार कधीही शिवणार नाही.
ज्या क्षणी दारू श्रेष्ठ की नातं, असं द्वंद्व मनात सुरु होतं. ज्या वेळी हे समजून चुकतं की, यापैकी काहीतरी एकच आपल्यापाशी राहील, तो मला वाटतं निर्णायक क्षण ठरतो.

आई बापाचे मुलावर चांगले संस्कार असतील तर नक्कीच कसलेही व्यसन जुडणार नाही. >>> आपण आजवर एक तरी शिवी दिली आहे का? मनातल्या मनात तरी? प्रामाणिकपणे दिलं तर उत्तर 'हो' च असेल. जर तसं असेल तर ती शिवी कशी द्यावी हे तुम्हाला कुणाच्या संस्कारांनी शिकविले? काही गोष्टी अनुकरणातून, आ़कर्षणातून, अज्ञानातून, तारुण्यातल्या बेसावध बेफाम काळात नकळतपणे जडून जातात. व्यसन हे शिवी इतक्याच सहज आपल्या आयुष्यात येते.

व्यसन जुडण्याविषयी नव्हे तर सोडण्याविषयी बो्लत आहोत. ज्याना लागलेच नसेल ते नशीबवानच आहेत.

ह.बा. तुम्हीपण महान आहात...पण जरा जिद्दी आहात.....वाचा तुमचीच पोस्ट वाचा त्यात तुम्ही लिहलंय "जबरदस्तीने आपला निर्णय लादणे" या विषयावर म्हणुन मि वरची पोस्ट दिली.

>>दारु पिणे ज्याचात्याचा निर्णय आहे ... जो तो आपापल्या विवेकाने ठरवेल ...दुसर्‍या कोणी तरी जबरदस्तीने आपला निर्णय त्यावर का लादावा ? >>>

बायको नवर्‍यावर लादणारच... आई-बाप मुलावर.... मित्र मित्रावर... डॉक्टर पेशंटवर लादणारच ते त्यांचं कर्तव्य आहे. कुणाच्या लेखी त्या नात्यांना आणि एका चांगल्या विचाराला सिगारेटीच्या एका थोटकाएवढीही किंमत नसेल तर मग कुणीच काही करू शकत नाही. पण माझं ऐक मुक्त आयुष्य नशेच्या त्या काही क्षणांपेक्षा खूप सुंदर असतं. अधिकार नाही तरी सांगतो जमल्यास नक्की सोड.<<<

ह.बा. आता आंब्याचे रोप लावले आणि त्याला योग्य खतपाणी देउन योग्य निगाराखली तर त्याला आंबेच लागणार ना....दारू बनवणारी द्राक्षांचे घड तर नाही ना.
तर कोणाला भेट्तात तसे संस्कार.... कोणाला जास्त कुणाला कमी असं असु शकते. पण संस्कार लादू नाही शकत आपण कुणावरही लहान मुलावरही.

ज्या क्षणी दारू श्रेष्ठ की नातं, असं द्वंद्व मनात सुरु होतं. ज्या वेळी हे समजून चुकतं की, यापैकी काहीतरी एकच आपल्यापाशी राहील, तो मला वाटतं निर्णायक क्षण ठरतो.

>>> येकझॅकट्ली ! आणि त्या क्षणी दारु पिवुनही योग्य निरणय घेता येत असेल तर प्यायला काहीच हरकत नाही ...नसावी ...इतकेच मला म्हणायचेय !
( आता योग्य काय अयोग्य काय ही वेगळी चरचा होईल ..))

ज्या क्षणी दारू श्रेष्ठ की नातं, असं द्वंद्व मनात सुरु होतं. ज्या वेळी हे समजून चुकतं की, यापैकी काहीतरी एकच आपल्यापाशी राहील, तो मला वाटतं निर्णायक क्षण ठरतो.>>> दारूचे माहिती नाही पण एकुण व्यसनी माणसाच्या समोर हा क्षण वारंवार येतो... काही काळाकरीता व्यसन तर कधी नातं श्रेष्ठ ठरतं. निर्णायक क्षणासाठी व्यसनी माणसाला स्वतःशी खूप झगडावं लागतं. मनाशी, दिनक्रमातील अनेक गोष्टींशी ही व्यसनं जोडली जातात. जीवनाचा अविभाज्य भाग बनून जातात तेव्हा दूर जाणे खुप अवघड होते. थोडे शारिरीक त्रासही होतातच. त्यालाही तोंड द्यावे लागते. ही एक लढाईच असते म्हटले तरी चालेल.

प्रसादपंता.......तुमच्या सारखे तुम्हीच. व्वा.....काय चांगाला पाय रूतवला आहे ईकडे..ओ..हो....

एकाच दिवसात ४ पान झाली.

ज्याने दारू निवड्ली तो ईमानदार आहे... हो नक्कीच तो ईमानदार आहे.
पण ज्याने नातं निवड्ल तो कपटी आहे धोकेबाज आहे. तो तुम्हाला कधीतरी नाउम्मेद करेल विश्वासघात करेल १००% तो महिन्या दोन महिन्या नंतर गल्ली मधल्या आंटीचा शोध घेउनचं दम घेईल मग कधि-कधि थोडी थोडी असं चालुऊऊऊऊऊऊऊऊऊउ

कालांतराने नातेवाईकांना कळेल पण मग तेही म्हणतील..थोडी..थोडी...लिया करो....
जाउदे त्रास तर नाही देत ना आता झूलेलाल होउन तर नाही येत ना घरी...बस्स्स....

ज्या क्षणी दारू श्रेष्ठ की नातं, असं द्वंद्व मनात सुरु होतं. ज्या वेळी हे समजून चुकतं की, यापैकी काहीतरी एकच आपल्यापाशी राहील, तो मला वाटतं निर्णायक क्षण ठरतो.>> वेल सेड दिनेश. नाते टिकवायचे असेल तर आपल्या पार्टनरला चुकायची संधी द्यायला हवी. तुम्ही तुमच्या आई व इतर लोकांना या समीकरणातून बाजूला ठेवावे. पुरूषांना असे सारखे सूक्षमदर्शकाखाली ठेवलेले सहन होत नाही.

भाविका, तुम्ही अनिल अवचटां चं " मुक्तांगण ची गोष्ट " पुस्तक वाचा. दारु पिणार्‍यांच्या बायकांचा एक ' सहचरी ' नावाचा गट ते चालवतात. सहचरी च्या निमित्ताने तु म्हाला सम दु:खी बायकांशी बोलता येईल. यथायोग्य मार्गदर्शन तिथे मिळेल.

>>>> पुरूषांना असे सारखे सूक्षमदर्शकाखाली ठेवलेले सहन होत नाही.
वेल सेड मामी, पण पुरुषच काय, स्त्रीयान्ना देखिल असे आवडत नाही, त्या विरोधात व्यक्त व्हायची पद्धत हवे तर बदलती असेल, पण नाहीच आवडणार कुणालाच! Happy

धन्यवाद
सगळ्यांना.........

जेव्हा पासुन इथे लिहिले आहे ते आज पर्यन्त छान चालु आहे.,
व्यवस्थीत घरी येतोय

त्याला सांगीतले आहे आता "तुझ्या शरीरावर तुझा हक्क नाही तो आपल्या बाळा चा आहे
आपल्या बाळाला ठ्णठ्णीत बाबा पाहीजेत........."

खुप प्रगती आहे आणी आशिच राहो आसे वाटते..[touch wood]

मी ईथे काय लिहिले हे त्याला आजीबात दाखवले नाहि
फक्त त्याच्या बरोबर मोकळे पणा ने बोलले
मी ते AA मधे पण call केलेला पण तेवढा वेळ नाही काढु शकत

४ डीसेंबर पासुन ९ वा लगतोय... Happy म्हणुन

मी त्याला आजीबात टोमणे मारत नाही की फोन करुन विचारत नाहि कि तु कुठे आहेस?

तोच
घरी येण्या पुर्वी कुठे पर्यंत आला हे sms करतो

तुम्हि सगळ्यानी mentally help केल्याबद्दल खुप आभार

खास करुन प्रसादपंत [I m learning now hw to divert -ve thoughts from -ve people]
भावीका

धन्स भाविका !

Lesser you become strict ...more he'll become disciplined !

______________________________________________________

सोम सुरा पुरखे पीते थे, हम कहते उसको हाला,
द्रोणकलश जिसको कहते थे, आज वही मधुघट आला,
वेदिवहित यह रस्म न छोड़ो वेदों के ठेकेदारों,
युग युग से है पुजती आई नई नहीं है मधुशाला।।५५।|

भाविका, तुला इथल्यांची मदत झाली हे वाचुन बरे वाटले. काळजी घे आता आणि बाळ आल्यावर आम्हालाही कळव तुझी गोड बातमी. Happy

maza ek salla asa aahe ki. tu tuzya aai-baba n sobat na rahta.... tumhi doghe vegle raha.....

may ba yane pharak padel suddha...

Hi

mazi mulgi 21 months chi aahe, te khup shy aahe. te etar lahan mulmadhe mix hot nahi. mazya ghari sasu-sasre, amhi doghe, ani mazya chulat sasu-bai ahot. te phqat aamchya 5 lokana kade ch jate, baki etar kona kadech jat nahi. lambun -lambun etaranshi bolte pan javal jat nahi. aamchya buliding madhe khup lahan mul aahet mhnaje 1st & 4th standard madhli.. tya mulan madhe pan mix hot nahi. Amhi tila each saturday -sunday Garden madhe geun jato. te ekti changli khelte. pan etar lahan mula madhe khelat nahi. Ya sathi me kay praytan karu te mala kalat nahi. please mala suggest kara ani mala help kara.

Thanks.

पल्लवी,
तुमची मुलगी शिकतेय की घरीच असते?
आणि शाळेत्/कॉलेजमधे ती अशीच लाजाळू वागायची..वागते,की फकत घरी?

आणि इतर वेळेत ती घरी काय करते? कधी दुकानात्/स्टेशनरी आणायला/कपड्यांच्या दुकानात वगैरे गेली की निर्भयतेने वागते,की तुम्ही वर्णन केल्या प्रमाणेच लाजते किंवा बुजल्यासारखी वागते?

माफ करा.... तिला नक्की कश्याचा फोबिया आहे हे शोधायला ही माहिती उपयोगात येईल म्हणून विचारलं.... Happy

@ डॉ. गायकवाड
पल्लवीवीची मुलगी फक्त २१ महिन्यांची आहे. Happy
@पल्लवी
अगं २१ महिन्यांची म्हणजे लहानच आहे. डेकेअर मधे न जाणारी बरीच मुले साधारण ९-१० महिन्यापासून असे वागायला लागतात. साधारण २-२ १/२ वर्षांपर्यंत चालते ही फेज. मुद्दामहून तिला इतरांच्यात मिसळण्यासाठी फोर्स करु नका. किंवा ती shy आहे असे बोलूही नका. त्यामुळे ती अजुनच बुजेल. माझा मुलगा पण फक्त ठरावीक लोकांजवळ जायचा. प्री स्कूलला देखील पहिले २-३ दिवस इतर मुलांच्यात फारसा खेळला नाही. त्याच्या टिचरनेही फोर्स केले नाही. पण मग पुढल्या आठवड्यात रमला. ४ वर्षापासून प्लेडेट वगैरे एवढे वाढले की मलाच 'नको' म्हणायची वेळ आली.

हा धागा म्हणजे लक्ष वेधून घ्यायचा केविलवाणा प्रकार वाटतोय. माफ करा स्पष्ट व्बोलतोय..

आपले खाजगी आयुष्यातील प्रश्न भर चौकात लाउडस्पीकर वर ओरडून सांगून गर्दी जमवणारा मनुष्य आजवर कुणी पाहीलाय का ? किंवा जाहीर सभेत आपले प्रश्न मांडून त्यावर मतं कुणी विचारली आहेत का आजवर ?

कृपया , अशी उदाहरणं पाहण्यात असतील तर कळवावे..

ओह.. माय मिस्टेक.. मी २१ वर्षांची आहे समजून उत्तर लिहीले होते.

@ किरण..... तू म्हटलेले निश्चित विचार करण्याजोगे आहे. Happy

आपले खाजगी आयुष्यातील प्रश्न भर चौकात लाउडस्पीकर वर ओरडून सांगून गर्दी जमवणारा मनुष्य आजवर कुणी पाहीलाय का ? किंवा जाहीर सभेत आपले प्रश्न मांडून त्यावर मतं कुणी विचारली आहेत का आजवर ?

तसे नाहीये. तुम्ही जेव्हा भर चौकात लाउडस्पिकरवर ओरडता किंवा जाहिर सभेत आपले प्रश्न मांडता तेव्हा लोक तुम्हाला पाहतात. तिथे कोणाचीतरी आई, बाबा, मुलगा, मुलगी, बायको, नवरा, बॉस ही आपली ओळख असते. आणि नेमकी ही ओळख आपल्याला बोलायला देत नाही. कारण मग आपले प्रश्न जगजाहिर होतात. मिळालेल्या सल्ल्यापेक्षा झालेले गॉसिप जास्त भरते.

इथे प्रश्न टाकत असलेल्या आयडीजना आपण ओळखत नाही. सगळ्या आयडीज नविन आहेत. कदाचित लोक जुने असतीलही पण नविन आयडी घेऊन प्रश्न विचारत असतील. आंतरजालाच्या बुरख्याखाली मुळ ओळख लपते आणि त्यामुळे मोकळेपणे प्रश्न विचारता येतो.

इथले प्रश्न आपल्याला क्षुल्लक वाटतील, पण त्या परिस्थितीतुन जाणा-यालाच माहित असते तो काय भोगतोय ते.

पल्लवी, उगाच टेंशन घेऊ नकोस. प्रत्येक मुलाची जगाशी ओळख करुन घ्यायची स्वतःची पद्धत असते. २१ महिने म्हणजे खुपच लहान आहे. बागेत घेऊन जायचे चालु ठेव. तिचा बॉल वगैरे जरा लांब गेला किंवा दुस-या मुलाकडे गेला तर तिला गोड बोलुन तो आणायला लाव वगैरे करुन तिला इतरांमध्ये मिसळायला मदत कर. आणि तरीही नाही मिसळली तरीही काळजी नको. घरच्यांमध्ये मिसळते म्हणजे काही प्रॉब्लेम नाहीय. हळुहळू जमेल तिला. आज जमले नाही तर उद्या जमेल, परवा जमेल. प्लिज तिच्यावर दबाव आणुन तिच्या मनाविरुद्ध वागायला भाग पाडु नकोस.

अग पल्लवी, तुझी मुलगी खुपच लहान आहे. आतापासून काळजी करू नकोस. तु जे काही करतेयस ते बरोबरच आहे. कधी कधी मुलांमधे आत्मविश्वास कमी असेल तर ती बुजरी असतात तर काही काही मुलं बाय नेचर असे असतात. ती मोठी होईल तशी बदलेल बघ. तोवर तिच्या बरोबरीच्या काही मुलांना (एकावेळी एक) असे करून घरी खेळायला बोलावता येईल का? यामुळे तिला त्यांच्याशी तिच्या स्वत:च्या माहितीच्या वातावरणात खेळता येईल. एकदा ओळख झाली की ती जरा मोकळी होईल. हळूहळू प्रयत्न कर. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे सतत तिच्याशी बोलताना तिचे चांगले गुण तिच्यावर ठसवत जा. अगदी तिच्या दिसण्याबद्दलही चांगलं चांगलं बोल, तिच्या चित्रांचं कौतुक कर, तिच्यावर छोट्या छोट्या जबाबदार्‍या टाक. फक्त हे करताना खोटं बोलायचं नाही. बेसिकली तिचे जे पॉझिटिव्ह गुण आहेत तेच हायलाइट करत रहायचे.

बाकीच्या (ओव्हर)स्मार्ट मुलांमुळे अजिबात टेंशन घेऊ नकोस.

मी माझ्या मुलीला अडीच वर्षाची माँटेसरीत घातले. मी जेंव्हा तिला आणायला जायचे तेंव्हा बघायचे की तिच नव्हे तर सगळीच मुलं एकेकटी काहीतरी करत/खेळत असायची (अमेरीकेतली शाळा). एकदा टीचरला विचारलंच अस कां ? म्हणून. तर ती म्हणाली हे परफेक्टली नॉर्मल आहे. मुलं साधारण चार वर्षाच्या पुढे एकमेकांबरोबर खेळतात. माझ्या मुलीच्या बाबतीत असंच घडलं . तुमची मुलगी २१ महीन्याचीच आहे. तेंव्हा आत्तापसून कशाला काळजी करता ?

Hi,

saglyanche manapasun aabhar. Mazi mulgi normal ch aahe. asa confidence tumhi mala dilya baddal. aata me jast tension ghenar nahi tich.

Hi,

saglyanche manapasun aabhar. Mazi mulgi normal ch aahe. asa confidence tumhi mala dilya baddal. aata me jast tension ghenar nahi tich.

Hi,

Manapasun saglyan che aabhar mante me. Mazya muliche me aata jast tension ghenar nahi

hi.

mazi halli khup chid-chid hot aahe. mazi mulgi 2 years chi aahe. mazya ghari sasu-sasre ani chulat sasu bai astat. me ani maze Mr. amhi dogh job karto. divas bhar mulgi sasu-sasre yanchya barobar aste. Saglya aaj-ajoba sarkhe te pan tiche khup lad kartat... tya mule te khup hatti zali aahe.... ekadi ghost pahije mhanje pahije ch. tila...
sakali office la jaychya aadhi mala aamcha doghancha daaba karyach asto, parat muli la zopetun uthun. tich shi-shu, aanghol, Breakfast sagal aavrun 9.30 la ghar sodyach asta......
Ani parat mulila tonic dyacha asat.. ani he sagli kam me karavi ashi mazya sasu chi apeksha.... ani maza navra pan mala help karat nahi... mag mazi halli khup chid chid hota aahe.. ani sagla rag mazya muli var nighto.. he chuk aahe he mala kalalt aahe.. pan tya velela dusar kahi suchat nahi......
please mala help kara.. ani guide kara ki mazya ragavr control kasa karu..?

पल्लवी२६,
मुलगी तुमचीच आहे ना? आणि नोकरी सुद्धा स्वतःच्या गरजेसाठी( किंवा आणखी काही खाजगी कारणासाठी करता) करता ना?
मग हि कशाला अपेक्षा कि मुलीचे सासू सासर्‍यांनी केले पाहिजे? ते नसते तर?
एकत्र रहाता म्हणून तुमची अपेक्षा असली तरी तुमची मुख्य जबाबदारी आहे ना ही तेव्हा करावेच लागते. सासू सासर्‍यांच्या म्हातार्‍या वयात कशाला हि जबाबदारी?
नवरा मदत करत नसेल तर सांगून पहा. नाहिच एकला तर एकटीचा डबा करा, मुलीचे करा व चालू पडा स्पष्ट सांगून नवऱोबाला कि, हे तुम्ही एकटीने करणार नाही. डबा हवा असेल तर मुलीचे आवर , तोवर मी डबा करेन दोघांचा.
हे असले प्रश्ण राहिलेच नाहित तर राग येणार नाही. नवर्‍याला घ्या मदतीला अगदी निक्षून सांगाकाय धावपळ होते ते, मनात कशाला चरफडता? दोघेही संसारासाठीच करता ना नोकरी का मौज म्हणून?
मुलीच्या आजी-आजोबांशी बोलून पहा की तुम्हाला कशा प्रकारची शिस्त हवी आहे व मुलीचे हट्ट पाहिजे तसे पुरवू नका सांगा सा.बा व सा.बु ना.
नाहितर सगळ्यात बेस्ट उपाय, आजी आजोबा घरात नाहिच आहेत समजून पाळणाघरात ठेवा शक्य असेल तर.. आजी-आजोबांच्या लाडाने बिघडली असेही नाही वाटणार व नवर्‍याला सांगा, मला तुझ्या आई बाबांच्या जीवावर नाहि आवडत ठेवायला म्हणून तूच आटपून पाळणाघरात सोड. Wink
एका दगडाने माराल दोन पक्षी... कसे ते कळले ना..;)

Pages