मी काय करू??

Submitted by चैताली पाटिल on 3 November, 2009 - 07:17

आज रोजच्या प्रमाणे तो माझ्याशी भांडला कारण एकाच संशय. थकली आहे मी त्याच्या ह्या रोजच्या संश्याला. जिव द्याच ठरवल पण जमल नाही. आई-वडिलांचा विचार करून.
का कुणास ठाउक. मला झोप येत नह्वती आज. हा अस का वागतोय. माझ कुठे चुकते का? ह्याला काय झाल असेल? कधी थांबणार हे सगळ?
का सहन कराव मी?
त्याला जराही पर्वा नाही आहे माझी ?
माझ्या स्वप्नाची ?
किती वेगळी होती मी?
आणि आज फ़क्त सांगाडा उरला आहे माझा?
केवढी स्वप्न सजावली होती मी? आता काय करू? कस समजवू ह्याला? असंख्य प्रश्नानी मला वेड केल. तशी मी भुत काळात हरवत गेले.......................................................

फार काही मोठ्या महत्वाकान्शा नाही केल्या? जरा नाराजितच कॉमर्स ला प्रवेश घेतला होता. ४ वर्गंच कॉलेज काही कॉलेज असता का? नस्ता व्यॉप होता माझ्यासाठी तर. जायच मानूं जायचे आठाव्द्यातुं दोनदाच. उशिरा प्रवेश म्हणुन परीक्षा अगदी जवळ होती मला. माझा हिंदीचा पेपर होता.
मी रिक्षात बसून गाइड वाचत होते. मी मध्ये बसले होते. बाजूला एक मुलगा अणि मुलगी बसलेल. माझ निरी क्षण इतकच. माहित ही नह्वत की पेहली नजर का प्यार भी होता हैं अस. अगदी भक्कड़ होत माझ्या साठी. पण जेव्हा त्याला होकार दिला तेव्हा कळल. की मी त्याच माझ्यावर पेहली नज़र का प्यार होते अस. मला तर तेव्हा कळल की रिक्षात माझ्या बाजूला बसणारा तो मुलगा माझा भावी नवरा होता. माझा प्रेमी. मला वेडा करणारा. मग आमी रोज़ भेटायचो. रोज़ जाऊँन बिच वर बसण. बाहेर लंच घेण. क्लास बंक करण. किती वेगळ जीवन होत आमच. सगळ्या गोष्टीच्या मर्यादा ठरल्या होत्या. मी इंजिनियर होण आणि त्याने नगरपालिकेत कामाला लागुन साइड बिसनेस करण. अगदी सगळ काही सूरलित चालल होत.
आम्ही दिवस ढकलत नव्हतो जगत होतो. एकामेकांच होण्यासाठी. नियतीने एक चुकी केलि. जे सगळ करतात मी ही तेच केल. काही नविन नह्व्त. पण ती अशी चुक ठरली अशी की त्यानंतर सगळ्या चूका शुल्क वाटायला लागल्या. फ़क्त ती एक चुक. नंतर त्याने जणू नेहमी माझ्यावर दबाव धरून ठेवला. मी ही त्या दबावा खाली गडत गेले सम्पूर्ण पणे की मला स्वाशश्वास घेणे पण जमले नाही त्यानंतर. जणू काही तो माझ्यावर स्वताच अधिकारच गाजवत होता. आधी "मी जास्त कोणाशी बोलू नये. मग फ्रेंड्स बनवू नये? जींस घालू नये. जीजू सही बोलू नये. त्याला मेसेज करू नये. मग ऑफिस मध्ये जास्त बोलू नये? कोणाची मस्ती करू नये? सहकारयान सोबत बसू नये. मग सीनियर तुलाच का कॉल करतो? अरे तो तुलाच का मेसेज करतो. तू इतकी का हसतेस? ओड़नी नीट का ठेवत नाहीस. तुझ्या क्लासचा मित्राने तुला का कॉल केला. तुझी कोणी मुलगी मैत्रिण नाही आहे का. जेवताना माझ्याशी का बोलत नाहीस? चाहा पिताना माझा फोन का नाही उचलत. आज झोपताना मला मेसेज का केला नाहीस? इतक बंधन आणि ते पण मला. आज मी इतकी एकटी झाली आहे की मला का आणि किती तरस होतोय ते पण मला कोणाला संगताही येत नाही.
कोणाला सांगाव. कस सांगाव मला हेच कळत नाही. हे सगळ कोणाला सांगुन माझी इज्जत तर जाणार नाही ना कोणी गैर समज तर करून घेणार नाही ना?
मी वेडी झाली आहे म्हणुन आज लिहितेय?
तुमाला काय वाटत काय करव??????????????????????????????????????
मी असच सगळ सहन कराव की यावर ही काही उपाय आहे?
मला समजतच नाही????????????????

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

भाविका प्रथम तुम्ही तुमचे डोके शांत ठेवा अजिबात इरीटेट होऊ नका आणि साधना, दिनेशदा आणि डॉ यांच्या सारख्या समंजस लोकांच्या पोस्टी लक्षात ठेवा एवढेच मी सांगेन

हणमंत शिंदे:एक पत्नी या नात्याने मला त्याची मदत करायची आहे

यासाठी कोणते व्यायाम उपयोगी पडतिल?

<<भाविका प्रथम तुम्ही तुमचे डोके शांत ठेवा अजिबात इरीटेट होऊ नका आणि साधना, दिनेशदा आणि डॉ यांच्या सारख्या समंजस लोकांच्या पोस्टी लक्षात ठेवा एवढेच मी सांगेन>>>
अनूमोदन..

tanvi raut चं काय झालं तिच्या मैत्रिणिचं काय झालं कोणि सांगेल का? का विसरलात तिला? जिने हा धागा दिलेला.. तिच ना ति?

दारु पीनेसे लिव्हर खराब होता है!
हा फक्त डायलॉग नसून शास्त्रीय सत्य आहे, पण इथे दारुप्रेमी मंडळींना ते ही मान्य नसावे.

उदाहर्णार्थ : आता प्रगो दारू पितो पण तरी तो शहाण्या सारखा वागतो (असेल). (निदान लिहतो तरी) एवढी शुध्दि असते म्हण्जे त्याला आपण "ए बेव्ड्या" असं नाही म्हणु शकत. मग त्याने दारू का सोडावी? मूळात त्याने दारु कधी पकडलीच नाही. असो.

>>> चातक , आपण व्यक्तीगत मत नोंदवलेत !त्याला आपण "ए बेव्ड्या" असं नाही म्हणु शकत > आभारी आहे Proud !

जाता जाता एक कन्फेशन देतो , दारु पिवुन कंट्रोल सुटावा असे आजवर एकदाच झाले आहे माझ्या आजवरच्या आयुष्यात ...तेही फक्त २ बीयर घेवुन ...त्या दिवशी जरा जास्तच इमोशनल अन दु:ख्खी Sad होतो ... त्या दिवशी आयुष्यभर पुरेल इतकी दुष्मनी करुन बसलोय ... असो .त्या नंतर कधी च रुळ सोडुन सुटला नाही डब्बा ...

हणमंत शिंदे:एक पत्नी या नात्याने मला त्याची मदत करायची आहे

यासाठी कोणते व्यायाम उपयोगी पडतिल?>>>>
- माझ्या घरी पत्नीने लग्नापुर्विपासूनच माझ्या चघळेगिरीला विरोध केला होता. पण तिने कधी मला अपमान वाटेल असे बोलली नाही किंवा त्रागा केला नाही. आपल्याला आयुष्यात बर्‍याच चांगल्या गोष्टी करायच्या आहेत. याची ती सतत जाणिव करून देत राहिलि.गेल्या तीन वर्षात मला स्वतःशी खूप भांडावे लागले. स्वतःला इतरांना देतो त्यापेक्षा जास्त शिव्या द्याव्या लागल्या. शेवटी मला माझ्या मुलाला माझ्या व्यसनाचा त्रास होईल ही सर्वात महत्वाची काळजी वाटत होती. एका आयुर्वेदीक डॉक्टराने सुर्यनमस्कार सांगितले तर मी स्वतः मेडीटेशन्चा अभ्यास करून ते सुरू केले. मनाची तयारी होणं हा सर्वात महत्वाचा भाग आहे. हा सारा मनाचा खेळ आहे. मन सुदृढ असेल तर कसल्याही औषधाशिवाय माणूस क्षणात व्यसन सोडू शकतो. आणि सुदृढ शरीरातच सुदृढ मन वास करते हा सुविचार नाही तर ते त्रिकालाबाधित सत्य आहे. जीम लावायला सांगा. सुर्यनमस्कार तुम्ही स्वतः सुरू करा. मेडीटेशन तुम्ही स्वतः सुरू करा. त्यांच्या व्यसनांचा अवास्तव उल्लेख टाळा. इतरांवरून बोला... "तो अमका तमका कसला गुटखा खाऊन पायर्‍यांवरच थुंकतो" "परवा एका मैत्रीणीचा नवरा लिव्हर फुटून मेला" अशा गोष्टी त्याच्याशी संबंध न जोडता बोला. हसत खेळत रहा. तुम्ही त्याला एवढं आनंदी ठेवा की त्याला विश्रांती साठी शोधलेल्या या व्यसनांचा आधार सोडावा वाटेल. आपल्या कुटूंबाची सामाजिक प्रतिष्टा हा कोणत्याही नवर्‍यासाठी खूप कळीचा मुद्दा असतो हेही लक्षात ठेवा.

भाविका, एक प्रश्न विचारू? तु शिकलेली आहेस, तुझ्यापुढे एक गहन प्रॉब्लेम आहे ज्यावर तुला अजून उत्तर मिळालं नाहीये. असं असताना, मुल होऊ देण्याचा निर्णय का घेतलास? तुझ्या होणार्‍या बाळाला अशा वातावरणात वाढवणार आहेस का?

वर सगळे सांगत आहेत त्याप्रमाणे ए.ए. तर नक्कीच ट्राय करून बघ. नवर्‍याला सुधारायचा जरूर प्रयत्न कर. सासूसासरे तुझ्या बाजूने असणे अतिशय महत्वाचे आहे. कौंसेलिंगला त्यांनाही घेऊन जा. त्यांची या प्रकरणात नक्की काय भुमिका आणि द्रुष्टीकोन आहे हा अतिशय कळीचा मुद्दा ठरू शकतो.

पण त्याचबरोबर स्वतःशी नक्की ठरव की, पुढच्या २-३ वर्षांनी तुला आयुष्यात काय हवे आहे? लग्न आणि कसाही असला तरी एक नवरा की, मनःशांती आणि एक चांगले आयुष्य? मला असं वाटतं की, तु स्वतः अतिशय खंबीरपणे, कोणत्याही भावनेच्या आहारी न जाता आणि इतर कोणाच्याही दबावाखाली न येता, तर्ककठोर निर्णय घ्यावास.

तेही फक्त २ बीयर घेवुन ...त्या दिवशी जरा जास्तच इमोशनल अन दु:ख्खी होतो >>
प्रगो होतोच रे बहुतेक बियर ला कळते की आपन इमोशनल आहेत ते.....
(अनुभव आहे)
Lol

अरे हे काय चाललंय काय? तन्वी राऊत कोणे, भाविका कोणे?? कोई समझाओ मुझे... कुछ समझ मे नही आ रहा... मै कहा हू??
सांगा लोकहो, मी काय करू??

मंजिरी, तन्वी राऊत का किस्सा पुराना हो गया. एक साल पुराना.

मला वाटतं, भाविकाने वेगळा बाफ काढण्याऐवजी यातच लिहिले.

लग्न आणि कसाही असला तरी एक नवरा की, मनःशांती आणि एक चांगले आयुष्य? मला असं वाटतं की, तु स्वतः अतिशय खंबीरपणे, कोणत्याही भावनेच्या आहारी न जाता आणि इतर कोणाच्याही दबावाखाली न येता, तर्ककठोर निर्णय घ्यावास.>>> मामी तुम्ही आडाणीपणाची भुमिका घेता आहात. व्यसन ही जशी लागणारी गोष्ट आहे तशीच तू सुटणारीही आहे. चप्पल पायाला बोचते म्हणून फेकून दुसरी घेण्याईतपत सोपी गोष्ट आहे का नवरा? त्यांचा नवरा व्यसने सोडेल आणि तिच्या साठी नाही तर तो स्वतःसाठी का होईना नक्की सोडेल. बाळ होणारच आहे तर तीही चांगलीच गोष्ट आहे. व्यसन करून बाळाला हातात घ्यायचं धाडस होणार नाही त्याचं. आणि त्याच्या व्यसनांवर आघात करायला तिलाही एक नामी शस्त्र मिळेल.

तर्ककठोर निर्णय घेणं फारच सोपं झालय आजकाल.... अशा मार्गदर्शनांचा त्यात मोलाचा वाटा आहे.

प्रगो , दारू आणि सिगारेट समर्थनीय होऊ शकत नाहीत. पण तुम्हाला त्यांचे समर्थन करायचेच असेल तर अजून १० वर्षांनी करा. तोवर तुमचं चालू दे.

ह बा , मित्रा , तु व्यसन सोडण्याचे सांगितलेले उपाय खरेच मस्त आहेत ...अनुभवावरुन सांगतोस त्या अर्थी नक्कीच प्रभावीही असतील ...अरे पन माझा मुळ प्रश्न दारु कशी सोडावी हा नसुन दारु का सोडावी हा आहे ?

अमेरिकेत दारु पितात ..युरोपात पितात ...अफ्रिकेत ही घेतात ... अरेबिक कंट्रीत निशिध्द आहे असे ऐकले होते पण नुकताच एक मित्र तिकडे गेला अन त्याने कळवले की अगदीच निशिध्द नाही !

आणि आपल्या सारख्या प्राचीन संस्कृती असलेल्या देषातही पितात मग त्यात वाईट काय ?
ऋग्वेदात मधु सुक्त आहे ( मधु म्हणजे महुवा ...फुलापासुन तयार करतात ही दारु !) ( माझ्याकडे ऑदियो फाईल आहे त्याची ) ....सोमसुक्त आहे !
.
.
.
दारुला टोकाचा विरोध का ? गुजरातेत दारु बंदी आहे पण काय फायदा झाला ? लोकांनी चोरुन दारु भट्ट्या लावल्या अन रीतसर न तयार करता आल्याने ...विषबाधा होवुन मेले !

दारु पिणे ज्याचात्याचा निर्णय आहे ... जो तो आपापल्या विवेकाने ठरवेल ...दुसर्‍या कोणी तरी जबरदस्तीने आपला निर्णय त्यावर का लादावा ?

अरे प्रसादराव, आपण ऐन भरात आलात इथे......
आपली मते वाचून काही वाचक एकदा तरी चाखून पहावी असा विचार करू लागतील असे दिसते....!!!!
काय बार असोसिअशनची सूपारी घेतली का रे.... Proud

मामी तुम्ही आडाणीपणाची भुमिका घेता आहात. व्यसन ही जशी लागणारी गोष्ट आहे तशीच तू सुटणारीही आहे. चप्पल पायाला बोचते म्हणून फेकून दुसरी घेण्याईतपत सोपी गोष्ट आहे का नवरा? त्यांचा नवरा व्यसने सोडेल आणि तिच्या साठी नाही तर तो स्वतःसाठी का होईना नक्की सोडेल. बाळ होणारच आहे तर तीही चांगलीच गोष्ट आहे. व्यसन करून बाळाला हातात घ्यायचं धाडस होणार नाही त्याचं. आणि त्याच्या व्यसनांवर आघात करायला तिलाही एक नामी शस्त्र मिळेल.

तर्ककठोर निर्णय घेणं फारच सोपं झालय आजकाल.... अशा मार्गदर्शनांचा त्यात मोलाचा वाटा आहे.

>>>>> हबा, प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते. नवरा सुधारावा म्हणून स्त्रीने किती संयम पाळायचा? हे ही त्याला या गोष्टीची गरजही वाटत नसताना. भाविकाच्या घरात तर तिचे सासूसासरेही आहेत. आपल्या आईवडिलांसमोर हा माणूस रोज दारू पितो. लग्नाआधीपासून पीत असेल आणि ते भाविकाला सांगितले गेले नसेल तर ती तिची फसवणूक ठरते. तिला माहीत असताना तिने हे लग्न केले असेल तर प्रश्नच मिटला. पण हा प्रॉब्लेम केव्हापासून चालू आहे आणि आतापर्यंत काय काय उपाय केलेत तेही पाहिले पाहिजे.

लग्न ही अतिशय पवित्र संस्था आहे. पण त्याचबरोबर एक जोडीदार सतत घुसमटत असेल आणि दुसर्‍याला त्याची पर्वाही नाही तर याला काहीच अर्थ रहात नाही. शेवटी तिलाही आयुष्य आहेच ना.....

हबा, उगाच काहीतरी तर्क काढून वाद निर्माण होऊ नयेत असे वाटते. सल्ला देणारा नेहमी स्वतःला जो योग्य वाटतो तोच देत असतो. मी स्वतः या परिस्थिती असते तर असाच विचार केला असता आणि मी तो भाविकाबरोबर शेअर केला आहे. यात तुमच्या आणि माझ्या भिन्नभिन्न background च्या मुळे विचारांतील फरक असेल. पण तिने लगोलग घटस्फोट घ्यावा असा माझा बिलकूल सल्ला नाही.

निष्कारण मूळ मुद्दा बाजूला पडून वाद नकोत.

दारु पिणे ज्याचात्याचा निर्णय आहे ... जो तो आपापल्या विवेकाने ठरवेल ...दुसर्‍या कोणी तरी जबरदस्तीने आपला निर्णय त्यावर का लादावा ? >>>

बायको नवर्‍यावर लादणारच... आई-बाप मुलावर.... मित्र मित्रावर... डॉक्टर पेशंटवर लादणारच ते त्यांचं कर्तव्य आहे. कुणाच्या लेखी त्या नात्यांना आणि एका चांगल्या विचाराला सिगारेटीच्या एका थोटकाएवढीही किंमत नसेल तर मग कुणीच काही करू शकत नाही. पण माझं ऐक मुक्त आयुष्य नशेच्या त्या काही क्षणांपेक्षा खूप सुंदर असतं. अधिकार नाही तरी सांगतो जमल्यास नक्की सोड.

पण त्याचबरोबर एक जोडीदार सतत घुसमटत असेल आणि दुसर्‍याला त्याची पर्वाही नाही तर याला काहीच अर्थ रहात नाही. शेवटी तिलाही आयुष्य आहेच ना.....>>> मान्य मामी. पण म्हणून एका दिशाभूल झालेल्या माणसाला आपल्या सुटकेसाठी सोडून देण्यापेक्षा त्याची सुटका करून दोघांनी एकत्र राहणं कधीही चांगलं ना? तो आयुष्यभर तिच्या रुणात राहील आणि तिला त्याचा अभिमान वाटेल. घरात जळमट झाली की फ्लॅट विकायला काढतो का आपण? थोडी स्वच्छतेची गरज असते एवढच. कधी ती लवकर होते तर कधी वेळ लागतो.

मामी मी तुमच्याशी भांडण्याचं काहीच कारण नाही. तुम्हाला तसे वाटले असल्यास क्षमा असावी.

लग्न ही अतिशय पवित्र संस्था आहे. पण त्याचबरोबर एक जोडीदार सतत घुसमटत असेल आणि दुसर्‍याला त्याची पर्वाही नाही तर यालाही काहीच अर्थ रहात ना. शेवटी तिलाही आयुष्य आहेच ना.....

>>> येक्झॅक्ट्ली मामी येक्झॅक्टली !!! मलाही हेच म्हणायचेय ...फक्त वेगळ्या अँगल्ने ...बायकोच्या भावनिक दहशतीखाली राहुन नवर्‍याने का घुसमटत रहायचे ...जर ती ह्याच्या अभिव्यक्तीला मान्यता देत नाहीये ...स्वतःची गुलामगिरी करायला भागपाडत आहे तर याला काहीच अर्थ रहात नाही !!!शेवटी त्यालाही आयुष्य आहेच ना !!!

पण माझं ऐक मुक्त आयुष्य नशेच्या त्या काही क्षणांपेक्षा खूप सुंदर असतं.>>> हबा सगळ्याची सगळीच मते जुळायला लागली तर आपण रोबोट होवु ...मला फक्त इतकेच म्हणायचेय की आपण( म्हणजे सर्वच नात्यांनी) एकमेकांच्या मतांचा आदर करायला शिकले पाहिजे ...मग ती कितीही अमान्य असली तरीही !

अधिकार नाही तरी सांगतो जमल्यास नक्की सोड.>>>>धन्यवाद मित्रा ! अरे जिथे कधी गुंतलोच नाही तिथे मुक्त होण्याची शक्यताच येत नाही !

आणि दैवदुर्विलासाने कधी अडकलोच तर " कर्मणो गहना गति: " असे बोलुन मी सोडुन देईन ..तुही सोडुन दे !!

>>मला वाटतं, भाविकाने वेगळा बाफ काढण्याऐवजी यातच लिहिले.>>

>>त्यांचे समर्थन करायचेच असेल तर अजून १० वर्षांनी करा. तोवर तुमचं चालू दे.<<

मामी तुम्ही बरोबर आहात....पण ज्यांना खुप जगायची इछा नाही..पण मना सारखं खाउन पिउन जग सोडयचं असेल तर कोण काय करू शकतं. आणि दुसर्‍याला त्रास न देता मना सारखं जगुन मरण आलेलं बरं ना. मग काय हरकत आहे दारू प्यायला न सिगरेटी फुंकायला. नाही तर मरमरता मरमरता ईछा अपूर्ण राहिल्या चा पच्छात्ताप होईल...आणि जर या गोष्टी अति व्हायला लगल्या तर त्या व्यसन म्हणुन समजाव्या.

हे डॉ. ,दिनेशद आणि हा. शिंदे तेच तेच सांगत आहे जे मि आधी पोस्ट्ले आहे....ते म्हण्जे मन्...मन्...र्‍हदय्...र्‍हदयपरीवर्तनंच माणसाला बदलू शकते......पून्हा वाचा.....>>>>

पोस्ट१
>>जर त्याने स्वःताहुन निर्णय घेतला तरंच व्यसन सुटेल नाही तर्.....त्रास तुम्हालाच होणार आहे ना त्याला नाही. म्हणुन आपल्या "नशिबाचे भोग" असं म्हट्लं....तुम्हाला वाईट वाटलं असेल तर माफ करा. आणि हे खर का खोटं तुम्हीच ठरवा.<<

पोस्ट२
>>
भाविका, काउन्सिलिंग करून फक्त काही दिवसांसाठी व्यसन सुटेल कायमचं नाही. दारु क प्यायची,
सिगरेट का ओढायची, गुट्खा का खायाचा, हे त्याला त्याचेच माहीत नसते. ही सगळि व्यासनं तो सुरुवातिला करायचा....पण आता ही व्यसनंच त्याला खात आहेत. हा एकातुन सुटला कि दुसर्‍यात रमेल (मल्टीव्यसनि आहेना..). तो स्वःताहुन सुधरूशकतो, जर त्यानेच ठरवलं तर ... आणखी काही मार्ग नाही. तुम्ही कितिहि प्रयत्न करा...निष्फळ.<<

दारु पिऊन घरी घिंगाणा घालणार्‍याला, मुलांच भविष्य पणाला लावणार्‍याला, आणि काहीही चुक नसताना फक्त आणि फक्त स्वतःच्या व्यसनापायी बायकोला खच्ची पाडणार्‍याला हाकलुन का देऊ नये?? कारण अशी माणस सुधारण्यापलिकडे गेलेली असतात. शेवटी व्यसन ते व्यसनच. चांदीच्या ग्लासात घेतली काय नि कशात दारु फक्त आयुष्य उध्वस्त करते.

अरेरे तो भाविकाचा नवरा अगदी एकटा पड्ला आहे. भाविका तुम्ही त्यांना एक आठवडा काहीही नॅगिंग करू नका. त्यांना ऑफिसात, वैयक्तिक काही त्रास असेल, त्यांचे जवळचे कोणी गेले असेल किंवा दुरावले असेल तर
ते अगदी एकटे झाले असतील. असे तुम्हीही द्वारे बंद करून घेतलीत तर त्यांना प्रेम कोण देणार? त्यांच्या कामाच्या तिथल्या व्यक्तिस व जवळच्या नातेवाइकास विचारून घ्यावे काय त्रास आहे. दारू पिणे हा सिम्ट्म आहे त्यामागील कारण समजून घ्यावे. त्यांचा प्रेमाने, कलाकलाने घेऊन मेडिकल चेकप करवावा. काय नक्की त्रास आहे ते संयम ठेवून जाणून घ्यावे व उपाय योजना करावी. यावेळी तुम्ही त्यांची आई होउन त्यांना मदत करावी. काहीतरी जेन्युईन प्रॉब्लेम असेल तर अगदी ऐकून घ्यावे. बाहेरचा समुपदेशका पेक्षा बायकोच ते काम नीट करू शकते. तो त्याच्या शेल मध्ये गेला ना तर त्याला बाहेर काढणे अवघड जाईल. ही भडकण्याची, दुस्वास करणयाची वेळ नाही. अगदी प्रेमाने गोडव्याने तुमच्या दोघांतील संवाद परत
प्रस्थापित करा. मग कोणतेही प्रशन सुटू शकतात. धीर सोडू नका आजिबात.

>>बायको नवर्‍यावर लादणारच... आई-बाप मुलावर.... मित्र मित्रावर... डॉक्टर पेशंटवर लादणारच ते त्यांचं कर्तव्य आहे.<<
ह.बा, तुमच्या भावना सहाजिक आहेत.....पण जबर्दस्तीने लादलेल्या सवयी..जास्त काळ टीकत नाहीत... आठवा आपण शाळेत असतानां बळ्जबरी ने सोडवलेले गणित किंवा वाचलेला धडा तुम्हाला पूस्तक हातातुन सुट्ताच त्यातले शब्द ध्यानात होते काय्?.....लाद्ण्याने काहीच होणार नाही उलटपक्षि आण्खिन बिघडेल नात्यात दुरावे होतील.

नवरा बायकोत खरं प्रेम असेल किंवा सामजंस्य असेल आणि आई बापाचे मुलावर चांगले संस्कार असतील तर नक्कीच कसलेही व्यसन जुडणार नाही.

तुमचंही मत कळ्वा...

Pages