मी काय करू??

Submitted by चैताली पाटिल on 3 November, 2009 - 07:17

आज रोजच्या प्रमाणे तो माझ्याशी भांडला कारण एकाच संशय. थकली आहे मी त्याच्या ह्या रोजच्या संश्याला. जिव द्याच ठरवल पण जमल नाही. आई-वडिलांचा विचार करून.
का कुणास ठाउक. मला झोप येत नह्वती आज. हा अस का वागतोय. माझ कुठे चुकते का? ह्याला काय झाल असेल? कधी थांबणार हे सगळ?
का सहन कराव मी?
त्याला जराही पर्वा नाही आहे माझी ?
माझ्या स्वप्नाची ?
किती वेगळी होती मी?
आणि आज फ़क्त सांगाडा उरला आहे माझा?
केवढी स्वप्न सजावली होती मी? आता काय करू? कस समजवू ह्याला? असंख्य प्रश्नानी मला वेड केल. तशी मी भुत काळात हरवत गेले.......................................................

फार काही मोठ्या महत्वाकान्शा नाही केल्या? जरा नाराजितच कॉमर्स ला प्रवेश घेतला होता. ४ वर्गंच कॉलेज काही कॉलेज असता का? नस्ता व्यॉप होता माझ्यासाठी तर. जायच मानूं जायचे आठाव्द्यातुं दोनदाच. उशिरा प्रवेश म्हणुन परीक्षा अगदी जवळ होती मला. माझा हिंदीचा पेपर होता.
मी रिक्षात बसून गाइड वाचत होते. मी मध्ये बसले होते. बाजूला एक मुलगा अणि मुलगी बसलेल. माझ निरी क्षण इतकच. माहित ही नह्वत की पेहली नजर का प्यार भी होता हैं अस. अगदी भक्कड़ होत माझ्या साठी. पण जेव्हा त्याला होकार दिला तेव्हा कळल. की मी त्याच माझ्यावर पेहली नज़र का प्यार होते अस. मला तर तेव्हा कळल की रिक्षात माझ्या बाजूला बसणारा तो मुलगा माझा भावी नवरा होता. माझा प्रेमी. मला वेडा करणारा. मग आमी रोज़ भेटायचो. रोज़ जाऊँन बिच वर बसण. बाहेर लंच घेण. क्लास बंक करण. किती वेगळ जीवन होत आमच. सगळ्या गोष्टीच्या मर्यादा ठरल्या होत्या. मी इंजिनियर होण आणि त्याने नगरपालिकेत कामाला लागुन साइड बिसनेस करण. अगदी सगळ काही सूरलित चालल होत.
आम्ही दिवस ढकलत नव्हतो जगत होतो. एकामेकांच होण्यासाठी. नियतीने एक चुकी केलि. जे सगळ करतात मी ही तेच केल. काही नविन नह्व्त. पण ती अशी चुक ठरली अशी की त्यानंतर सगळ्या चूका शुल्क वाटायला लागल्या. फ़क्त ती एक चुक. नंतर त्याने जणू नेहमी माझ्यावर दबाव धरून ठेवला. मी ही त्या दबावा खाली गडत गेले सम्पूर्ण पणे की मला स्वाशश्वास घेणे पण जमले नाही त्यानंतर. जणू काही तो माझ्यावर स्वताच अधिकारच गाजवत होता. आधी "मी जास्त कोणाशी बोलू नये. मग फ्रेंड्स बनवू नये? जींस घालू नये. जीजू सही बोलू नये. त्याला मेसेज करू नये. मग ऑफिस मध्ये जास्त बोलू नये? कोणाची मस्ती करू नये? सहकारयान सोबत बसू नये. मग सीनियर तुलाच का कॉल करतो? अरे तो तुलाच का मेसेज करतो. तू इतकी का हसतेस? ओड़नी नीट का ठेवत नाहीस. तुझ्या क्लासचा मित्राने तुला का कॉल केला. तुझी कोणी मुलगी मैत्रिण नाही आहे का. जेवताना माझ्याशी का बोलत नाहीस? चाहा पिताना माझा फोन का नाही उचलत. आज झोपताना मला मेसेज का केला नाहीस? इतक बंधन आणि ते पण मला. आज मी इतकी एकटी झाली आहे की मला का आणि किती तरस होतोय ते पण मला कोणाला संगताही येत नाही.
कोणाला सांगाव. कस सांगाव मला हेच कळत नाही. हे सगळ कोणाला सांगुन माझी इज्जत तर जाणार नाही ना कोणी गैर समज तर करून घेणार नाही ना?
मी वेडी झाली आहे म्हणुन आज लिहितेय?
तुमाला काय वाटत काय करव??????????????????????????????????????
मी असच सगळ सहन कराव की यावर ही काही उपाय आहे?
मला समजतच नाही????????????????

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

भाविका, डॉ,नी सांगितल्याप्रमाणे ताबडतोब त्यांना ए.ए. च्या सभांना घेऊन जा.
या विषयावर मिळतील ते पोष्टर्स व लेख घरात ठेवा. टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधे जरब बसतील अशी पोस्टर्स बघितली होती.
२ वर्षांपुर्वी एका दिवाळी अंकात, डॉ अनिल अवचटांचा लेख वाचला होता. त्यात त्यांनी असे लिहिले होते, की मेंदूभोवतीचे संरक्षक आवरण केवळ दोनच गोष्टी भेदू शकतात. एक निकोटीन आणि दुसरी अल्कोहोल.

तुमचे गायनिक तज्ञ पण याबाबतीत काही पोष्टर्स देऊ शकतील.

हातात पैसे आले की झाल येरे माझ्या मगल्या<<
भाविका याचाच अर्थ व्यसन आहे. मुळात तुम्ही जोवर हे व्यसन नाहीये म्हणत रहाल तोवर तुम्ही त्यालाही मदत करू शकणार नाही.
वरती अनेकांनी सुचवल्याप्रमाणे काउन्सेलरची भेट घ्या.

भा:त्यांना मायबोलीवर टाकलेल्या प्रतिक्रिया दाखवा........किमान लाज तरी वाटेल.

आणि
प्रगो व्यसनि आहे पण लिमिट मध्ये असतो असं त्याला सांगायचं आहे. उदा. त्याला महीत आहे आपण ४ पैग मध्ये झुलेलाल होतो म्हणुन तो २चं पैग मारतो. आणि वेळेवर घरी जातो. ( जाउ द्या बिचार्‍याला..... सगळे मिळुन असे चोपु नका त्याला... नाहीतर ४चं ढ्कलून जायचा आज )

हो ना रे...मद्यशास्त्रि???

दारु सोडा असे इथे सांगणार्‍यातल्या कित्तीनी सुंदर असा एकतरी मद्यपानाचा अनुभव घेतला आहे ??
उगाचच " दारु सोडा, दारु सोडा " अशी एकांगी ओरड का करता ...
मद्यपानाचे काही नितांत सुंदर अनुभव मांडले पाहिजेत ....( ह्यासाठी स्वतंत्र धागा काढला पाहिजे )..ते अनुभवलए पाहिजेत ...आणि त्यानंतर ठरवा की आपण का विरोध करतोय ते !
उगाचच स्वमतांध होवुन एकांगी जाहिरात्बाजीने मद्यपानापेक्षा जास्त नुकसान होते. ( मद्यपानाने कदाचित एखाद्याचे नुकसान होत असेल पण ह्या असल्या एकांगी जाहिरातबाजीने समाजाची दिशाभुल होते )

शिवायएखाद्याला जबरदस्तीने काहीतरी करायला लावणे हा त्याच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर हला नाही काय ? Uhoh

प्रगो,

मद्यपान हे चांगले क्षण साजरे करण्यासाठी केले आणी ते ही limit मधे तर ठिक आहे

पण भावने च्या आहारी जाउन उगाचच दुसर्याला वाईट वाटे पर्यंत करणे चुकीचे आहे

enjoy करा पण त्याचा त्रास होउ देउ नकाना

अमि

मी लागलिये कामाला

नवरा sorry म्हन्तोय

पण मला त्याच्या वर विश्वास ठेवणे आवघड वाटतय

रात्रभर कुठे होता विचारले तर तो विषय नको काढु आसे म्हन्तोय

माझी आई प्रश्न विचारुन मला हैराण करते
Sad

भाविका तुला एक सांगु का...
बहुतेक मुळात जो दारु पितो त्याला मनातुन सोडण्याची इच्छा पाहीजे तरच सोडता येते....
नाहीतर फायदा होत नाहि..

बहुतेक मुळात जो दारु पितो त्याला मनातुन सोडण्याची इच्छा पाहीजे तरच सोडता येते

>>>> अगदी अगदी सहमत किश्या !

पण " दारु का सोडावी ?" या प्रश्णाचं अजुन एकजणही समाधान कारक उत्तर देवु शकत नाहीये

भाविका, इथे काहि लिंक्स देत आहे. त्या वाचून त्यातील मुद्द्यांचा आवश्यकतेप्रमाणे, उपयोग करा.

http://www.shesinrecovery.com/addiction/harmfuleffects.html
http://alcoholism.about.com/od/health/Effects_of_Alcohol_Health_Effects_...
http://en.wikipedia.org/wiki/Short-term_effects_of_alcohol

दारू पिणे चांगले, असेही संशोधन अधून मधून प्रसिद्ध होत असते, पण त्यामागे मोठ्या दारु उत्पादकांचा हात असतो.
भारतातली दारू प्यायची पद्धतच चूकीची आहे. (बहुतांशी) उपाशी पोटी ती पिणे, सोबत तेलकट तिखट खाणे, प्यायल्यावर पोटभर न जेवणे, आणि त्याचा परिणाम घालवण्यासाठी काळी कॉफी न पिणे, या सवयी मारक / घातक ठरतात.
वाईन बाबत, त्यातल्या द्राक्षांच्या बियांतील काही घटकांनी, ह्रुदयरोग व्हायची शक्यता कमी होते, असे मत आहे (त्याला फ्रेंच पॅराडॉक्स म्हणतात., त्याबाबात http://en.wikipedia.org/wiki/French_Paradox
इथे वाचता येईल) पण त्यासाठी वाईनच प्यायला पाहिजे, हे खरे नाही.
तूम्हाला स्वतःला फार कठोर होणे गरजेचे आहे. तूमच्या होणार्‍या बाळाच्या प्रकृतीशी याचा थेट संबंध आहे.

धन्यवाद दिनेशदा

कठोर बनल्याचे दुषपरीणाम मी आनुभवले आहे

म्हणुन कठोरता न घेता त्याला नुस्ते रोज समजाउन सांगत आहे...

time पण waste होतो ,
शनिवार पुर्न न रविवार आर्धा

डॉ. >भारतातली दारू प्यायची पद्धतच चूकीची आहे>>> १०१% अनुमोदन.
खरतर दारू ला बदनाम करून टाकलंय असल्या लोकांनी.

भाविक: माझी शेवटुन ३री प्रतिक्रिया एकदा पुन्हा वाचा.

चातक असल्या लोकांनी >> म्हणजे कसल्या लोकांनी?

आणि माझ्या नशीबाचे भोग मी माझ्या भवीष्यावर होउ नयेत यासाठिच प्रयत्न करत आहे.

दारु का प्यावी? याचं उत्तर तुम्हाला मिळालंय?

>>> डॉ. दारु सोडा असा हट्टाग्रह करणे अन दारु प्या असा आग्रह करणे दोन्ही निरथक अन कारणहीन आहे हेच मी सांगतोय .

दारु घ्यावी की नघ्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्ण !

इथे माझा विरोध " दारु सोडा" या एकांगी जाहिरातबाजीला अन त्याच्या जो कोणीतरी बळी पडणार आहे त्याचे व्यक्तीस्वातंत्र हिरावण्याला आहे !

दारु का प्यावी? याचं उत्तर तुम्हाला मिळालंय?>>> आणि ह्या प्रश्णाचं ..पर्सनल उत्तर हो असेच आहे .
दारु का प्यावी.. कशी प्यावी... किती प्यावी ...कोणती प्यावी ..कॉकटेल कोणते करावे ...चकणा काय घ्यावा ...यावर एक धागा काढणाचा विचार आहे ( तो वादग्रस्त ठरेल असे वाटले म्हणुन आधी अ‍ॅडमीनची परवानगी मागितली आहे .)

भारतातली दारू प्यायची पद्धतच चूकीची आहे>>>> १००% अनुमोदन !
पण दारू प्यायची पद्धतच चूकीची आहे असे कोणी म्हणत असेल तर >>> १००% निषेध

भाविका,
माझ्या परिचयातील एका स्त्रीने केलेला सत्याग्रह. ती नेहमी संध्याकाळी, तिचा नवरा जिथे दारु प्यायला जातो, त्याच्या बाहेर उभी रहात असे. आणि हात धरुन त्याला घरी नेत असे. पुढे अत्यंत शरम वाटल्याने त्याने पुर्णपणे दारु सोडली. आज त्याच्या व्यवसायात तो यशस्वी आहे. (ते दोघे आजही माझे मित्र आहेत.)

मराठी नाट्यक्षेत्रातील, एका विनोदवीराची पत्नी पण दादरला हा सत्याग्रह करत असे. ती स्वतः एक यशस्वी कलाकार होती. (नाव देणे मला अप्रस्तूत वाटते.)

जूना दाग सिनेमा, (दिलीप कुमार, निम्मी, ललिता पवार आणि उषाकिरण) पण दारुच्या दुष्परिणामांवर आधारित होता. त्यात दारु प्यायल्यावर आपण किती वाईट वागतो, हे नवर्‍याला कळावे, म्हणून निम्मी स्वतः अंगावर दारू शिंपडून, स्वतः दारु प्यायल्याची बतावणी करते. अर्थात हा सिनेमातला प्रसंग आहे, पण पडद्यावर तो खुपच प्रभावी वाटतो.

तूम्ही पण प्रयत्नात सातत्य ठेवणे गरजेचे आहे. कुठल्या क्षणी अपेक्षित परिणाम होईल, ते सांगता येणार नाही. अर्थात आम्हा सर्वांच्या शुभेच्छा आपल्या पाठिशी आहेतच.
कदाचित एका मित्राच्या नात्याने, तो नेमकी का दारू पितो, हेही शोधायचा प्रयत्न करा. कदाचित काही ताण असतील. जमल्यास त्याचे निराकरण करा. त्यावर पर्यायी उपचार सूचवा.

मी स्वतः दारुचे अजिबात समर्थन करत नाही. मी आयूष्यात दारूच काय, इतर कुठलेही वाईट व्यसन केलेले नाही. कधी करणारही नाही.

धन्यवाद दिनेशदा

मी तो नेमकी का दारू पितो, हेही शोधायचा प्रयत्न करत आहे .

मला जे वाटते ते मी त्याला सांगते पण तो : काय बोलु ......... असे करतो

त्याच्या मनात काय चाललय तेच समजणे कठिन जाते

alcohol is not something nice but if u want 2 take take it in little unit bacause when it is too much it damages plenty things in the inner part of the body e.g like your liver it destroys it little by little and everytin becomes damaged so the cells wont be able to rotate the it supposed to be

" दारु का सोडावी ?" >>
प्रसाद पंत माझ्याकडे भरपुर रिजन्स आहेत..
१) पैसा पुरत नाही..
२) hangover झाल्यावर दिवस फुकट जातो...
३) जास्त झाल्यावर उल्टी होऊन अशक्तपणा येतो...
४) आपल्याबद्दल सामाजात आदर राहत नाही..

मि हे सगळ अनुभवल आहे त्यामुळे सांगतो दारु सोडा....
मी ही घेत होतो अगदी भरपुर पण अभिमानाने सांगतो की मि ६ महिने झाले दारु सोडली आहे and i feel better.....

मी स्वतः दारुचे अजिबात समर्थन करत नाही. मी आयूष्यात दारूच काय, इतर कुठलेही वाईट व्यसन केलेले नाही

>>> एक नम्र प्रश्न : " आपण पुणेकर होता काय ? "
अमेरीकेची आर्थिक आघाडी ...ठोका ...:फिदी:

दिनेश दा , आपण ज्येष्ठ आहात ....अहो ज्या गोष्टीचा आपल्याला अनुभव नाही ..त्या गोष्टीवर ...केवळ इतरांची ऑब्सेरवेशन्स पाहुन आपण कशी काय कॉमेन्ट करु शकता ???
( आता आपण म्हणाल - "विष पिवुन माणुस मरतो हे सांगायला स्वतः अनुभव घेतलाच पाहिजे असे नाही" ....पण मग तो वितंडवाद होईल ... दारु म्हणजे विष नव्हे ...प्रत्यक्ष अनुभव घेतल्या नंतर " दारु वाईट " असे कोणी म्हणत असेल तर ते समजण्या सारखे आहे )

भाविका , वर आपण ईंग्रजीत मत नोंदवले आहेत ते तर पाण्याविषयी ही खरे आहे ...खोटे वाट्ट असेल तर पाणी एक्सेस मधे पिउन बघा ... Anything in excess is Poison .

Anything in excess is Poison >>>>

बरोबर

मग excess का होउ द्यायचे ?

पण अजुन एक मि आधी लिहल्याप्रमाणे की "मुळात जो दारु पितो त्याला मनातुन सोडण्याची इच्छा पाहीजे तरच सोडता येते"...
आणि अजुन एक हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्यामुळे मि फक्त सोडा असं सांगु शकतो....

निकोटेक्स च्युईंग गमसारखे स्वस्त पर्याय किंवा औषधे उपलब्ध आहेत. व्यायाम, मेडीटेशन नितांत गरजेचे आहे. व्यसनातून सुटल्यानंतर बुध्दी आणि देहाला जाणवणारा बदल त्या माणसाला व्यसनापासून दूर राहण्याची आवड निर्माण करतो. व्यसनी माणसासाठी व्यसनमुक्त होणं हा एक नवा जन्म असतो. त्यात त्याला जवळच्या माणसांची खूप गरज असते. स्वानुभव!

" दारु का सोडावी ?" >>
प्रसाद पंत माझ्याकडे भरपुर रिजन्स आहेत..>>>> ही घे उत्तरं

१) पैसा पुरत नाही..>>>> तुला किती प्यायची हे कळत नाही
२) hangover झाल्यावर दिवस फुकट जातो...>>>> दारु कधी प्यायची हे तुला कळत नाही सुट्टीच्या आधल्या दिवशी पी . मग हॅन्गऑव्हर मधे जो दुसरा दिवस जाईल त्याला तु " फुकट" गेला असे म्हणणार नाहीस .
३) जास्त झाल्यावर उल्टी होऊन अशक्तपणा येतो...>>>> हे म्हणजे कैच्याकै कारण आहे Proud उलटी वुन अशक्तपणा येतो हे कारण द्यायचे झाले तर मानवी वंश खुंटायला फारसा वेळ लागणार नाही .:हहगलो:
४) आपल्याबद्दल सामाजात आदर राहत नाही..>>>> तु चुकीचा समाज निवडत आहेस .

भाविका माफ करा तुम्हाला गैरसमज होत आहे...
असल्या लोकांनी >> म्हणजे कसल्या लोकांनी? >>>
म्हणजे तुमच्या नवर्‍या सारख्या लोकांनी.

उदाहर्णार्थ : आता प्रगो दारू पितो पण तरी तो शहाण्या सारखा वागतो (असेल). (निदान लिहतो तरी) एवढी शुध्दि असते म्हण्जे त्याला आपण "ए बेव्ड्या" असं नाही म्हणु शकत. मग त्याने दारू का सोडावी? मूळात त्याने दारु कधी पकडलीच नाही. असो.

पण इथे तुम्च्या नवर्‍याने दारू पकडुन एक चक्र पुर्ण झालं, आणि आता त्याला दारूने पकड्ले आहे. ते सुट्णे जरा मुश्किल आहे. पण जिथे तो सॉरी म्हणतो तेथे त्याला त्याचि जाणिव होते असे वाट्ते...त्यांना जरा विश्वासत घेउन विचारा काही टेंशन आहे का? मनात कही सल असेल?काही त्रास असेल जे कोणाशी अजुन शेअर केले नसतील. काही अड्चण असेल?...विचारा...
जर त्याने स्वःताहुन निर्णय घेतला तरंच व्यसन सुटेल नाही तर्.....त्रास तुम्हालाच होणार आहे ना त्याला नाही. म्हणुन आपल्या "नशिबाचे भोग" असं म्हट्लं....तुम्हाला वाईट वाटलं असेल तर माफ करा. आणि हे खर का खोटं तुम्हीच ठरवा.

तुमचं जिवन पहील्या पावसाने न्हालेल्या चातकाच्या मना सारखं व्हावं हिच इश्वर चरणी प्रार्थना.

अरे मूळ विषय काये? अन हा दारूचा तर्र विषय कुठून घुसला?
दारू सोडण्या न सोडण्यावर बोलायचे/लिहायचे तर एक बीबीच काय, आख्खा विभाग पुरणार नाही! Happy
वेगळा बीबी काढा अन तिथे हलवा.

प्रसादपंत,
मी अनुभवी आहे याविषयी आपले दुमत नसावे. जी व्यसने आपल्या बुध्दीला चालना देतात किंवा विश्रांती देतात असे आपणास वाटते आहे तीच काही वर्षांनी आपल्या त्याच बुध्दीची ताकद संपवत आहेत असे आपल्या लक्षात येईल. आपला उत्साह वाढविण्याऐवजी कमी करत आहेत हेही लक्षात येईल. १३ वर्षे स्वतःला ऑब्जर्व केले आहे त्यानंतर हे लिहीतो आहे. आहे ती व्यसने सोडायची असतील तर माझ्या सोबत नक्की बोला. मी काही नियमीत (१३ वर्षे) गोष्टी बंद करून तीन महिने झाले आहेत व ओकेजनली गोष्टीतुन मोकळा झालोच आहे असे समजा. कैलासजींची मदतही झाली आहेच. तुम्हाला या कळांमधून मोकळं व्हायचं आहे का? मी सुईन व्हायला तयार आहे.

भाविका, दारु पिण्यामागचे खरे कारण कळेपर्यंत सातत्याने पण प्रेमाने बोलून ते शोधायचा प्रयत्न करा.
तूम्हाला होणारा त्रास हा गौण मानून, त्याला तूमच्या मदतीची जास्त गरज आहे, हा दृष्टीकोन ठेवा.
तूम्हाला इथे चर्चा करणे गैरसोयीचे वाटत असेल, तर आमच्यापैकी कुणाशीही खाजगी संपर्क साधू शकता.
-----------

श्री. प्रसाद गोडबोले. मी कधीही पूणेकर नव्हतो. आणि मी फारसा जेष्ठही नाही. मी कधीही अमेरिकेला गेलो नाही.
मला वाटते इथे आपल्या पोष्ट्स गैरस्थानी पडताहेत. दारु पिणे, हि आपली समस्याच नसल्याने, आपण एक वेगळा धागा उधडावा, हि एक नम्र विनंती.
माझ्या आधीच्या पोष्ट्स मधली वाक्ये आपल्याला उद्देशून नव्हती, पण ती आपण तशी मानल्यामूळे इथे लिहित आहे. यापूढे माझ्या इथल्या वाक्यांची आपण दखल घेऊ नये, कारण ती आपल्याला उद्देशून असणार नाहीत.
कुणी आपली समस्या इथे मांडावी, आणि ती गांभीर्याने न घेता, चर्चेला वेगळेच वळण लागावे, हे इथे नेहमीच घडते. भाविकाची समस्या मला खरी वाटली, म्हणूनच इथे प्रतिसाद देतोय.

Pages