रूम हीटर

मला भारतात /अमेरिकेत मिळणार्‍या रुम हीटरविषयी माहिती हवी आहे. इतरान्नाही उपयोगी पडेल असेल वाटते म्हणुन हा लेखनाचा धागा.

भारतात (पुण्यात) रुम हिटर मिळतात त्याचा कुणाला अनुभव आहे का?
असल्यास कोणत्या कम्पनीचा, कोणते मॉडेल चान्गले?
अमेरिकेतुन भारतात नेता येईल का? म्हणजे तिथे २२० वोल्ट ला चालतात का हे हिटर?
नेल्यास कस्टममध्ये काही अडचण येण्याची शक्यता?
अजुन काही पर्याय्/माहिती असल्यास कृपया शेअर करा.
धन्यवाद!!

Submit to kanokani.com

कुणालाच माहीत नाही का अरेरे

रुम हीटरची खरचं गरज आहे का पण? इतके थंड नसते आपल्याकडे.

न्याती,

अमेरिकेतुन भारतात नेता येईल का? म्हणजे तिथे २२० वोल्ट ला चालतात का हे हिटर?
नेल्यास कस्टममध्ये काही अडचण येण्याची शक्यता?
=====>इथे काही देसी दुकानात ११०-६०/२२०-५० अशा दोन्हीवर चालणारे मिळु शकतात. इथुन ११० वर चालणारे नेलेत तर तिथे परत जाउन त्यात चेंज करुन घ्यावे लागतील.
वापरलेला आहे म्हणुन तिथे नेलात तर कस्टम ड्युटी पडणार नाही बहुतेक.

मला तरी वाटते तिथेच(भारतात) घ्या. सर्विस इ साठी सोपे पडेल. इथुन नेउन तिथे बिघडला तर दुरुस्तीला आणखी खर्च येइल.
तिकडे कुठले वापरतात वगैरे माहिती नाही. मिळाल्यास लिहीन.

बी, माझ्या ४ महिन्याच्या बाळाला घेउन जात आहे, गरज पडली तर असावा ना.
थॅन्क्स मनस्मी!

न्याती, मी वापरला होता रूम हीटर कारण माझी मुलगी डिसेंबरचीच आहे. पुण्यात ३०० पासुन १००० रु. पर्यंत रूम हीटर मिळतो.

थॅन्क्स आस!