२००९ चे दिवाळी अंक

नमस्कार!

ज्यांनी २००९ चे दिवाळी विकत घेतलेत आणि वाचलेत त्यांना विंनती की त्यांनी त्या त्या दिवाळी अंकातील चांगले साहित्य आणि साहित्यकार याबद्दल लिहावे. म्हणजे एखाद्या दिवाळी अंकातील चांगला लेख सुटणार नाही.

आभारी आहे.


Submit to kanokani.com

मी नुकताच मौजचा दिवाळी अंक वाचून संपवला. विशेष काहीही नाहिये. कथा अगदीच साधारण दर्जाच्या आहेत.

विकास गायतोंडे याचा लेख आणि अंबरिश मिश्र यानी लिहिलेला दांडी यात्रेवरचा लेख चांगले आहेत. सुलभा ब्रह्म्नाळ्कर यानी पॅरिसच्या म्युझियम भेटीवरचा लेख मस्त आहे.

अशोक दा रानडे यानी लतावर लिहिलेला लेख प्रचंड कंटाळवाणा आहे.

कालनिर्णयच्या दिवाळी अंकातले बहुतांश लेख मला आवडले.

यंदाचा नवलचा अंक मला आवडला. कथा चांगल्या निवडल्या आहेत. आणि आटोपशीर आहे अंक.

आवाजच्या बाबतीत :
मी अंक चाळायला घेतला, पण कुणीच ओळखीचे लेखक नाही. छपाई, कागदाचा दर्जा वगैरे पण अतिशय खालावलेला वाटला. नेहमीची टंच बायका बाप्यांची रेखाटने सोडून कसल्या गोल्ड टंच आणि रिफायनरीच्या जाहिराती!! ईतर जाहीराती पण साधारण अशा :

हॉटेल ड्रिमलॅन्ड : परमीट रूंम आणि बीअरबारची स्वतन्त्र सोय.
राजश्री फार्म : बापुराव पडळकर, माजी सरपंच, मिटकी ग्राम पंचायत.
मायाक्का शेती फार्म आणि जिवनकुमार अ‍ॅन्ड सुरेश गोल्ड प्युरिफाय - वडिएरायबाग.
अशा अनेक शुभेच्छा दर्शक जाहिराती त्या त्या प्रोप्रांच्या मिशाळ फोटोंसकट अरेरे
यांना मोठ्या कंपन्यांच्या जाहीराती पण मिळेनात आता म्हणत मी खिडक्या पाहायला सुरूवात केली. त्या नेहमीप्रमाणेच पांचट होत्या!
एक कथा वाचायला सुरूवात केली तर शुद्धलेखन पाहून थक्क व्हायला झाले. -- "पानपोईच्या रांजनातील गार पाणी श्यामल गटागटा प्याली. गॉगलच्या कान्चा पुसून तिने गॉगल दोळ्यावर चढवला.."
वैतागून पाने पलटून दुसरी कथा वाचायला घेतली -- " सदैव हसतमुख असनारे मुणीवर्य आज खुपच काळजीत वाटत होते."
कपाळाला हात मारून मी अविश्वासाने मुखपृष्ठ बघितले. तर आवाजचाच दिवाळी अंक. पण संपादक कुणी रविकुमार एन. मगदुम. पाटकर कुठे गेले म्हणून आत संपादकिय विभाग बघितला तर डीट्टो आवाजच्याच लोगो सारखा पण विटा गाव, जि. सांगली ईथून प्रकाशीत होणारा हा "दिवाळी आवाज" होता. हाहा

पाटकर कुठे गेले म्हणून आत संपादकिय विभाग बघितला तर डीट्टो आवाजच्याच लोगो सारखा पण विटा गाव, जि. सांगली ईथून प्रकाशीत होणारा हा "दिवाळी आवाज" होता>>> मी एस टी स्टअँड वर अंक विचारला तेव्हा त्या दुकान दाराने मला "पाटकराचा आवाज हवाय का दुसरा आवाज?" असे विचारले होते. तेव्हा काय म्हणालेते समजले नाही.. आता समजले स्मित

हह, हाहा

दिवाळी आवाज..बरं झालं कळलं, मी घेणार होते. स्मित दुसरा आवाज वाचला की नाही मग?
नंदिनी, मौज ठीक नाही का? अरेरे

मी तर फार्फार वर्षापूर्वीच मराठी पत्रकारसंघाने त्यांचा 'आवाज' काढला होता तेव्हा विकत घेऊन फसलो होतो. तेव्हापासून आवाज घेताना चांगला सगळीकडून तपासून घेतो. यन्दाचा आवाजही 'आणखी एक पाटी' या सदरातलाच आहे. राखी सावन्तचे खिडकीचित्र आहे. विशेष म्हणजे वि.आ. वुवा यांचा विनोदी लेख आहे. हे बुवा नव्वदीत असावेत. मी लहानपणापासून बुवांचे लेखन वाचतोय. आवाज मध्ये त्यांची हजेरी अगदी मस्ट असते.
मौज खास नाही. काही दिवाळी अंक आपण इतिकर्तव्य म्हणून घ्यायचे असतात आणि त्यानी आपल्याला निराश करायचे असते. अपवाद हितगुज दिवाळी अंक. त्यात लेखक 'लगेच 'फाडकाम' सुरू होऊ नये म्हणून घाबरून दर्जेदार लिहित असावेत. स्मित
मी दिवाळी अंक घेतला की पहिले त्यातले अनिल अवचटांचे लेखन वाचतो. मग बाकी. भारत सासणे यांचे लेखन अंक फेकून देण्याच्या वेळी वाच्तो . फार कुंथाकुंथ हो...

अरेच्चा. हे वि आ बुवा रत्नागिरी टाईम्समधे देखील नियमाने लिहायचे.
भारत ससाणे बद्दल अनुमोदन.
लालू, मी पहिलाच दिवाळी अंक वाचला आणि तो अगदीच साधारण निघाला. अरेरे

लोकप्रभाचा दिवाळी अंक पण ठिक आहे.

साप्ताहीक सकाळ आणि अक्षर बद्दल लिहा ना....

लोकप्रभाचा दि.अंक ऑनलाईन उपलब्ध आहे. काहीही खास नाही. एकही लेख लक्षात रहात नाही.
हिंप्पी़जीवनावरचा लेख वाचून मात्र थोडीशी हबकले. पण तोही पॉईटलेस वाटला.
पूर्वी लेखांना सुरवात मध्य आणि शेवट असायचे. आता ना शेंडा न बुडखा. दृष्टीकोण नाही, अभ्यास तर त्याहुन नाही. तुम्हाला म्हणायचेय काय ? कशासाठी लिहीताय? अशी चिडचिड होते.- मामुट्टीवरचा लेख वगैरे इतके सामान्य आहेत, की कलाकाराचे नाव बदलले तरी फरक पडणार नाही.
अकबरावरचाच लेख तेवढा आवडला.
आणि भोसल्यांवरच्या लेखातले मराठी तर एकदम हुच्च आहे.
""पॅचअप केले, रॉयल फॅमिलीजना पराभव नविन नाही, पॅलेसमध्ये"" वगैरे- अ‍ॅडम प्लीज नोट
अगदी मन्सुरांवरील लेखातही गोडबोलेंनी पाट्या टाकल्यात.

रैना,प्लीज लिंक देनार का लोकसत्ता दिवाळी अंकाची? मला सापडत नाहि.

अरे म्हणजे तो दिवाळी अंक होता तर!!
>>भोसल्यांवरच्या लेखातले मराठी तर एकदम हुच्च आहे.
रैना ला अनुमोदन.आणि एवढ्या लेखांमधून लेखकाचा लेख लिहिण्यामागचा उद्देश्य च कळत नाही.मुलाखत घेताना मुलाखतीचा ढाचा तयार करणे,व्यक्तीच्या पार्श्वभूमीचा अभ्यास करणे , त्या व्यक्तीबद्दल किमान माहिती असणे हे गृहित असते. पण इथे म्हणजे जे मनात येते ते विचारून आनि नंतर छापून पण रिकामे झाले आहेत लोकप्रभा वाले.

दिवाळी अंकांबद्दलचा एकत्रित असलेली माहिती आवडली

अमोल-

आवाज ३-४ प्रकाशित होतात... पाटकरांचा आणि मगदुमांचा हे दोन मुख्य... स्मित

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=129...

हा लेख वाचनिय. दिवाळीच्या चतुरंगमध्ये होता म्हणुन इथे टाकते आहे.
योग्य जागा ही नाही असे कोणाला वाटल्यास हलवेन.

धन्यवाद रैना,

छानाय लेख. रैना धन्यवाद.

रैना या लेखाचा दुवा कानोकानीत इथे http://kanokani.maayboli.com/node/346 दिलाय. ज्यांना आवडलाय त्यांनी तिथे आवडलाय असे मत द्या. स्मित

मटाच्या दिवाळी अंकातला पं हृदयनाथ मंगेशकरांचा "मृगजळ" हा लेख वाचा.... सारेगमप वगैरे बघणं सोडुन द्याल!

मटाचा दिवाळी अन्क ओन लाईन आहे असे ऐकले. कोणाला माहिती असल्यास लिन्क द्यावी. धन्यवाद!

अमी

दै. पुढारीचा दिवाळी अंक कोणाला वाचायला हवा असेल तर.

लोकप्रभाही खास नाही का? अरेरे
मी मागवलेल्यातले ३ काल आले, लोकप्रभा, मोहिनी आणि चंद्रकांत. लोकप्रभा पाहिल्यावर नेहमीचाच अंक वाटतोय. बाकी दोन जरा जाडजूड तरी आहेत. फिदीफिदी
अजून काही वाचलेलं नाही.
रुनि, धन्यवाद लिन्कबद्दल.

.

सकाळचा दिवाळी अंक.

http://www.esakal.in/deepotsov/

रैना, चतुरंगमधला 'आय अ‍ॅम सॉरी' हा लेख वाचला. खूप अस्वस्थ व्हायला झालं.

ललित, अक्षर आणि सा. सकाळ बद्दल पण लिहा ना..

दै. पुढारी चा अंक ऑनलाइन उपलब्ध आहे.. स्मित

http://epaper.pudhari.com/WebDiwali.aspx

मुलाला घरात बंद ठेवून तासनतास बाहेर भटकणे ? ... घरात मुलाचं काही झालं असतं तर. पाणी पाणी झालं वाचताना. रागाच्या भरात कुलूप लावून बाहेर पडणे इतपत एक वेळ समजू शकते पण बाहेर फिरायला नाही जाऊ शकणार. डिप्रेशनच्या पलीकडेही मातॄत्वाची एक सर्वसमावेशक भावना असते की नाही ? ती मागे खेचेल अशा वेळी.
>>> १००% अनुमोदन. आज ती लेखिका 'त्याने मला माफ केलं' म्हणत आहे.. ती परतल्यानंतर तो रंग खेळत नसता, तहान-भूकेने व्याकूळ, घाबरलेला, शी-शू मध्ये पडलेला असा असता तर? तिने माफ केलं असतं स्वतःला? भीतीदायक आहे हे..

बर, चर्चेच्या अनुषंगाने 'जत्रा'चा अंक बराय, म्हणजे जसा असायला पाहिजे तसा आहे. खिडक्या, चावट विनोद, विनोदी कथा वगैरेंनी युक्त. 'जत्रा' आणि 'आवाज्'चे नियमित वाचक असतात, त्यांची निराशा नाही होणार स्मित

'जत्रा' आणि 'आवाज्'चे नियमित वाचक असतात, त्यांची निराशा नाही होणार >> म्हणजे तुझी निराशा नाही झाली तर हाहा

आवाजबाबत मी पण फसलो अरेरे
लोकप्रभाचा दिवाळी अंक फसलाय. एक किमान पातळीपण नाहिये लेखांना. अरेरे