तोंडाचि दुर्गंधी फारच विचित्र प्रकार आहे.
१) हे नुसत दात स्वच्छ न घासण्याशी संबधित आहे का?
२) या व्यतिरिक्त आजुन काही कारणं आहेत का ?
३) याच्यावर काही रामबाण उपाय आहे काय?
३) आणि स्वतःच्या तोंडाची दुर्गंधी येते की नाही हे कसे तपासावे ?
पुण्या मुंबईत कुठे उपचार घेता येतो ते क्रूपया सांगावे!



तोंडाला जर दुर्गंधी येत असेल, तर thyroidमधील दोष, अपचन ही कारणं असू शकतात. वैद्यकिय तपासणी करून घेणं उत्तम.
दंतवैद्याला तुरंत भेटावे.
स्वतःच्या तोंडाची दुर्गंधी येते की नाही हे कसे तपासावे ?>>>>> हे स्वतःच्या बायकोला विचारा. ती बरोबर सांगेल.
हिरड्यांच्या रोगानेसुध्दा तोंडाला दुर्गंधी येते.. पायोरिया की काय म्हणतात बहुधा त्याला.
)
हा प्रश्न वेगळा बीबी काढून का पण? आरोग्याच्या बीबी वर विचारा की. (असेल तर असा बीबी.
खरे वेगळा बी बी का काढला?
पान तंबाखू न खाणे, माउथवॉश वापरणे, तीन वेळा ब्रश करणे जरूरीचे.
पान खाल्ल्याने तोंडाला दुर्गंधी येते?
मुख दुर्गन्धी ही प्रत्येक वेळी तोंडात असलेल्या इम्प्युरिटीज मुळेच येते असे नाही. कान्दा लसूण , इत्यादी अॅरोमॅटिक पदार्थ खाल्यानन्तर त्यातील घटक रक्तातून अभिसरित होऊन फुफ्फुसातून उच्छ्वासातून उत्सर्जित केले जातात . अल्कोहोलचा देखील वास येतो तो रक्तातून सर्क्युलेट होऊन आलेले अल्कोहोल चा अंश श्वासातून बाहेर टाकला जातो त्याचा असतो. तोंडात राहिलेल्या नव्हे. मसाले वगैरे अॅरोमॅटिक पदार्थामुळे श्वासास वास येतात. घामास देखील याच कारणामुळे विविध वास येतात. मसाले कांदा लसूण असे पदार्थ वर्ज्य करोन केवळ फलाहार घेतल्यास वास नष्ट होतात.
गदे, पान न खाणार्या माणसाला ती दुर्गंधी वाटू शकते की !
जास्त चहा कॉफी पिउन पण येते. / क्रॅश डायेट मुळे ही. पान व तंबाखू, सिगरेट यात भयानक केमिकल्स असतात.
त्याना ओरल कॅविटीत काही स्थानच नाही. ते नाजुक पान मस्तानी ने खाणे वेगळे व नाक्यावर्ला पानवाला जे काही विकतो ते वेगळे. वेलची वगैरे दुर्गन्धी मास्क करू शकतात पण मूळ कारण दूर करू शकत नाहीत. तिथे दंतवैद्यच पाहिजे.
हूड यान्स अनुमोदन. बीअर ब्रेथ हे एक वाइट प्रकरण आहे. बटाटावडा ब्रेथ पण I make aromatic profiles of everyone I meet because it is my line of work. That is why perfume blenders dont smoke or eat spicy food.
आणि स्वतःच्या तोंडाची दुर्गंधी येते की नाही हे कसे तपासावे ?
तोंडाजवळ तळहात नेऊन तोंडानी श्वास सोडा म्हणजे समजते स्वतःचे स्वत:ला.
तसेच ईथे जरी माहिती मिळाली तरी कुठल्याही दंतवैद्याला जाऊन भेटा.
जीभ आणि हिरडया प्रत्येक खाण्यानन्तर बोटाने घासून स्वच्छ करणे हा एक उपाय आहे.
जीभ साफ न केल्याने ही तोंडाला प्रचंड दुर्गंधी येते. त्याच्याकडे ही व्यवस्थित लक्ष द्यायला हवे.