
श्री महागणपती- रांजणगाव, जि. पुणे.
मार्ग- नगर रस्त्यावर पुण्यापासुन सुमारे ५० कि.मी., उरळी स्थानकापासून सुमारे १६ कि. मी.
यात्रा- भाद्रपद शु. चतुर्थी.
मूर्ती- मंदिरात दिसते ती भोगमूर्ती. ही प्रसन्न व मनोहर आहे. ऋद्धी-सिद्धी समवेत मूळ मूर्ती विधर्मीयांच्या आक्रमणाच्या भीती मुळे तळघरात दडवलेली आहे. महागणपती हा ८, १० किंवा १२ भुजांचा असतो. तशीच काहीतरी तळघरातली मूर्ती असावी. तिला १० सोंडी व २० हात असल्याचे सांगतात.
मंदीर- पूर्वाभिमुख. दिशासाधन आहे. मोठा सभामंडप.
इतिहास- सभामंडप इंदूरचे सरदार किबे यांनी बांधला. पवार व शिंदे या सरदारांनी ओवर्या बांधल्या. गाभारा श्रीमंत माधवराव पेशवे यांनी बांधला. होळकर व चंद्रचूड यांनी इनामे दिली. भोरकरांचीही एक खास नेमणूक होती.



वा.. चित्रं खूपच सुंदर आहे.. !
सुरेख हेही !!
गणपती बाप्पा मोरया
हा ही अप्रतिम, खुपच मस्त
सुंदर काढले आहे चित्र, पल्ली. सगळीच चित्रं सुरेख काढली आहेत.
पल्ली सुंदर आहेत सगळे गणपती