एकदंत भालचंद्र - श्री. रघुनंदन पणशीकर

Submitted by संयोजक on 1 September, 2009 - 01:50

गीत/संगीत: उपासक (मनोज ताम्हनकर)
स्वर: श्री. रघुनंदन पणशीकर


सौजन्यः मनोज ताम्हनकर (उपासक)
अधिक माहिती साठी जय हेरंब पहा.
ही ध्वनीफीत मायबोली खरेदी विभागात उपलब्ध आहे.

विशेष सूचना:
"जय हेरंब" या मालिकेत एकूण नऊ गाणी असून तुम्हाला मायबोली गणेशोत्सवात रोज एक अशी सर्व गाणी ऐकायला मिळतील. प्रत्येक गाणं वेगळ्या रागात आणि तालात बांधलेलं आहे. तुम्हाला सर्व गाण्यांचा ताल आणि राग ओळखून संयोजकांना ईमेल करून कळवायचा आहे. सर्व अचूक उत्तरे देणा-यातील एका भाग्यवान स्पर्धकास उपासक एक ध्वनीफीत बक्षीस देणार आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद! मनापासून धन्यवाद! आनंद वाटला.
मी आमच्या सर्व टीम ला कळवले आहे. (अजय, रघुनंदन, राहुल, माधुरी,
विदुला (वेब साईट डिझाईन : vidula@thebhandarkars.com), सुवर्णा (सी डी कव्हर tsuvarna@gmail.com)
त्यानाही तुमच्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला असेल. माझी पत्नी सौ. अर्चना हिनीच मला हे कार्य करण्याची कल्पना, पाठिंबा (महत्त्वाचा आहे Happy आणि प्रोत्साहन दिलं. तिलाही खूप आनंद झाला वाचून!
आशा आहे की उद्याचं गीत देखील सर्वांना तसंच आवडेल!

आता थोडं विषयांतर...
या आपल्या गणेशोत्सवाच्या संयोजकांचे निश्चितंच खूप कौतुक केले पाहिजे. स्वतःचे व्याप / कामे सांभाळून त्यानी ज्या पद्धतीने हा उत्सवाचे व्यवस्थापन सांभाळले, त्याला तोड नाही. साईट चे डिझाईन अतिशय सुंदर! लॅन्डिग पेज, आणि प्रत्येक विषयाची पाने सर्व एकदम मस्तं!
सपना ,रुपाली, पराग, अल्पना , भाग्यश्री , भारत , तृप्ती , राहुल .. सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि आभार. समीर तुझे व्यक्तीशः आभार.. अजय, धन्यवाद!
आणि सर्वच मा बो कराना हार्दिक शुभेच्छा!
पुढचे काही दिवस नक्कीच चैन पडणार नाही!
पुढच्या वर्षी लवकर या!!