मायबोलीवरील कोडे.

मायबोलीवरील कोडे (ज्याला मराठीत quiz म्हंटले आहे,) तिथे विषयांतर होऊ नये म्हणून इथे लिहितो.

मी मायबोलीवर अनेक कारणांमुळे येतो. मुख्यतः गंमत जंमत. पण त्यातूनहि मला बरेच काही शिकण्याजोगे मिळाले. माझा स्वभाव रागीट आहे, मी अद्वातद्वा लिहीतो. लोकांना लागेल असे लिहीतो. वाईट्ट सवयी. इथल्या लोकांनी मला प्रेमळपणे वारंवार समजावले. मी माफी मागतो, बरेच लोक विसरतात नि इतरत्र लक्ष देतात.
अडचण अशी की गंमत म्हणून लिहावे नि कुणाला तरी अगदी लागावे, असे पण होते.
मी स्वतः असुखकारक आठवणी काढून आनंदाला मुकतो. हीहि वाईट सवय. ती जावी म्हणून स्वतःचे खरे नाव न घेता झक्की असे नाव घेतले. आता कुणी टीका केली ती 'झक्की' वर केली असे समजून विसरायला मदत होते. नि त्याची गंमत वाटते.

आता शब्दांबद्दल: माझ्या माहितीप्रमाणे Threepeat हा एकच शब्द patented आहे. त्या शब्दाचा 'मालक' एक व्यक्ति आहे. मायबोलीवरहि काही शब्द असे patented असतील असे वाटत नाही. असे असता काही शब्द वापरले की वैयक्तिक टीका समजून त्याला आक्षेप घ्यावा असे मला वाटत नाही. त्यातून कुणावर वैयक्तिक चिखलफेक करण्याचा प्रयत्न आहे असे समजू नये असे मला वाटते. विशेषतः जे चिडतात त्यांना चिडवण्यात जास्त गंमत असते. ही साधी गोष्ट आहे. जे आवडत नाही ते स्वतः विसरले तर इतर लोक गंमत म्हणून त्याकडे पाहू शकतात.

आता मी नाही वापरले ते शब्द तरी इतर कुणि वापरणार नाहीत का? त्याचेहि खापर माझ्याच डोक्यावर का? आता 'माझ्या' म्हणजे 'झक्की' च्या. तेंव्हा फोडा, फोडा. मला काही होणार नाही.

हटकेश्वर हटकेश्वर!! चपेट्दान मारुती, आता तूच रे!!


चपेट्दान म्हणजे काय झक्कीजी?