नंदुरबार

नंदुरबारमधले मायबोलीकर

Submit to kanokani.com

कसमा मझारला कोनी शे का आठे मनासंगे टर टर कराले

काय म्हणता मंडळी ? तुम्ही सगळे नंदुरबारचे का? माझं आजोळ नंदुरबारच त्यामुळे कधीकधी (म्हणजे ५/६ वर्षातून एकदा) येणं होतं.. छान वाटलं हा ग्रुप बघून.. स्मित

खानदेश विषेश्-नंदुरबार जिल्हा!
विशेष

नंदुरबार हा गेल्याच दशकात धुळे जिल्ह्याचे विभाजन करून निर्माण करण्यात आलेला जिल्हा आहे. आदिवासींची म्हणजेच अनुसूचित जमातींची जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा हेच या जिल्ह्याचे प्रमुख वैशिष्ट्य होय. नंदूरबार जिल्ह्याच्या एकूण सुमारे १३.५० लाख लोकसंख्येपैकी सुमारे ९ लाख लोकसंख्या ही आदिवासींची आहे. त्यामुळे यास आदिवासी जिल्हा असे संबोधले जाते. दि. १ जुलै, १९९८ रोजी धुळे जिल्ह्याची विभागणी करून नंदूरबार या नव्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.

ऐतिहासिक महत्त्वाचे

नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रीय परिसराला खानदेश असे म्हटले जाते. पूर्वीच्या काळी अभीर (किंवा अहीर) राजे खानदेशावर सत्ता गाजवत होते. अहीर राजांवरूनच येथील लोकांच्या बोलीला अहिराणी भाषा म्हटले जाते. ही मराठीची वैशिष्ट्यपूर्ण बोली नंदुरबार जिल्ह्यात प्रामुख्याने बोलली जाते. जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेले नंदूरबार हे शहर पुरातन काळात नंद या गवळी राजाने वसवले असल्याचे मानतात. १९४२ च्या स्वातंत्र्य आंदोलनात बालक्रांतिकारक शिरीषकुमारने नंदूरबार येथे हौतात्म्य स्वीकारले होते. येथे त्याच्या स्मृती स्मारकाच्या माध्यमातून जतन करण्यात आल्या आहेत.

भूगोल

महाराष्ट्रातील सर्वांत उत्तरेकडील जिल्हा असे या जिल्ह्याचे वर्णन केले जाते. राज्याच्या वायव्य सीमेवर असलेल्या या जिल्ह्याच्या उत्तरेस गुजरात व मध्य प्रदेश या राज्यांचा भाग आहे. जिल्ह्याच्या पूर्वेला मध्य प्रदेश व धुळे जिल्हा, दक्षिणेला धुळे जिल्हा; आणि पश्र्चिमेला गुजरात राज्य आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागात सातपुड्याची पर्वतरांग असून या पर्वतरांगांमुळे नंदुरबार, मध्यप्रदेश व गुजरात राज्यांपासून वेगळा झाला आहे.

जिल्ह्याचे हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. उन्हाळ्यात येथील तापमान काही काळ ४० ते ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते. जिल्ह्याच्या पश्र्चिम व उत्तर भागात पावसाचे प्रमाण जास्त असून, पूर्व ते दक्षिण भागात हेच प्रमाण कमी आहे. पावसाळ्यात जिल्ह्यातील तापमान अधिक दमट असते

लोकसंख्याविषयक तपशील पुढील कोष्टकात दिला आहे.
(संदर्भ - जनगणना २००१ )
क्र तपशील संख्या
१ ) क्षेत्रफळ ५९५५ चौ. कि. मी.
२ ) लोकसंख्या १३,११,७०९
३ i)पुरुष ६,६३,५११
ii)स्त्रिया ६,४८,१९८

४) ग्रामीण ११,०९,०३६
शहरी २,०२,६७३

५) स्त्री-पुरुष गुणोत्तर १००० : ९७७
६) अनुसूचित जमाती ८,५९,५७४ (एकूण लोकसंख्येच्या ६५.५३%)
७) साक्षरता ५५.७८%
पुरुष साक्षरता ६६.१६%
स्त्री साक्षरता ४५.१८%

एकूण लोकसंख्येपैकी आदिवासी (अनुसूचित जमाती) लोकसंख्येचा विचार करता नंदुरबारचा राज्यात प्रथम क्रमांक आहे.

नद्या - तापी ही जिल्ह्यांतील प्रमुख नदी आहे. तापी-पूर्णा नद्यांचा संयुक्त प्रवाह जिल्ह्यातून वाहतो. तापी जिल्ह्यात पूर्वेकडून पश्र्चिमेकडे वाहते. तापीला अनेक उपनद्या येऊन मिळतात. जिल्ह्याचा बराचसा भाग तापीचे खोरे म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याच्या उत्तर-वायव्य सीमेवरून नर्मदा नदी वाहते. नर्मदा महाराष्ट्राची सीमा अधोरेखीत करते. नर्मदेचा सुमारे ५४ कि.मी.चा प्रवाह जिल्ह्याच्या सीमेला जोडलेला आहे.
* जिल्ह्यात प्रामुख्याने विहीरी व तलावांच्या माध्यमातून जलसिंचनाची सोय केली जाते. शनिमांडख व यशवंत तलाव (तोरणमाळ) हे तलाव जिल्ह्यात आहेत. * जिल्ह्यातील गोमती नदीवर सुसरी धरण बांधण्यात आले आहे. सरदार सरोवर प्रकल्पामुळे जिल्ह्यातील अक्कलकुवा व अक्राणी तालुक्यातील ३३ गावे पाण्याखाली गेली आहेत. शासनाच्या वतीने या गावांचे तळोदे व अक्कलकुवा तालुक्यांत नवीन ५ गावे वसवण्यात येऊन पुनर्वसन करण्यात आले आहे. या जिल्ह्यातील काही भागाला नर्मदा प्रकल्पाचा लाभ होतो आहे.

जंगले - वनसंपत्तीच्या दृष्टीने नंदूरबार अधिक समृद्ध आहे. जिल्ह्यातील ४०% हून जास्त क्षेत्र वनांनी व्यापले आहे. अक्राणी तालुका ह्या डोंगराळ भागात दाट वने जास्त प्रमाणात आहेत. अक्कलकुवा, तळोदे, शहादे या भागांतही वनसंपदा समृद्ध आहे. साग, अंजन, बांबू, खैर, हळद, शिसव हे प्रमुख वृक्ष येथील जंगलात आहेत. तसेच मध, डिंक, तेंदूची पाने, हिरडा, बेहडा, लाख, चारोळे व रोशा गवत ही वन्य उत्पादने येथे सापडतात. सागाचे लाकूड हे या जंगलांतील प्रमुख उत्पादन आहे. या जिल्ह्यात काही भागांत चुनखडी आढळते. अनेर धरण हे वन्यजीवांसाठीचे अभयारण्य जिल्ह्यात असून त्याचे जिल्ह्यातील क्षेत्रफळ सुमारे ८३ चौ. कि. मी. आहे.

प्रशासन:

तालुकानिहाय लोकसंख्या व क्षेत्रफळ (संदर्भ : जनगणना २००१)
क्र तालुका क्षेत्रफळ (चौ. कि. मी.) लोकसंख्या
१ नंदूरबार १,१११.४ २,९४,०८४
२ नवापूर ९५६.५ २,३९,५०७
३ शहादे ९७३.५ ३,३५,३४६
४ तळोदे २०५.२ १,२८,५३१
५ अक्कलकुवा ८७८.० १,७७,७३७
६ अक्राणी ७७४.० १,३६,५०४

नागरी प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांची माहिती पुढे दिली आहे.

नागरी व ग्रामीण प्रशासन क्र तपशील संख्या नावे
१ नगरपालिका ०४ नंदुरबार, शहादा, तळोदे, नवापूर

२ पंचायत समित्या ०६ शहादा, नंदूरबार, नवापूर, तळोदे, अक्कलकुवा, अक्राणी
३ ग्रामपंचायती ५०१ ----


लोकवस्ती असलेली गावे
९३५ ----
राजकीय संरचना

लोकसभा मतदारसंघ (१) - जिल्ह्यात नंदूरबार हा १ लोकसभा मतदारसंघ असून तो अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे. या मतदारसंघात नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा, नंदूरबार व नवापूर आणि धुळे जिल्ह्यातील साक्री, शिरपूर हे विधानसभा मतदारसंघ आहेत.

विधानसभा मतदारसंघ (४) - जिल्ह्यात अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार व नवापूर हे ४ विधानसभा मतदारसंघ असून हे सर्व अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेले मतदारसंघ आहेत.

नंदूरबार जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ५३ मतदारसंघ असून, पंचायत समितीचे १०६ मतदारसंघ आहेत.

शेती :

लागवडीखालील क्षेत्राचा तपशील पुढीलप्रमाणे क्र तपशील क्षेत्र (हेक्टर)
१ निव्वळ लागवडीखालील क्षेत्र २,९६,३००
२ जिरायत क्षेत्र २,५०,३००
३ बागायत क्षेत्र ४६,०००

हंगामनिहाय पिकांचा तपशील क्र हंगाम प्रमुख पिके
१ खरीप तांदूळ, बाजरी, ज्वारी, भुईमूग, कापूस, मूग, तूर, तीळ, मका, कुळीथ
२ रब्बी गहू, हरभरा
३ खरीप व रब्बी ज्वारी व ऊस

उद्योग

जिल्ह्यातील उद्योगांचा विकास प्रामुख्याने तळोदे, शहादे या भागात झाल्याचे दिसते. जिल्ह्यातील एकमेव औद्योगिक वसाहत तळोदे येथे आहे. जिनिंग व प्रेसिंगचे कारखाने नंदूरबार व शहादे येथे आहेत. तळोदे येथील सागाच्या लाकडाची बाजारपेठ जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूत गिरणी नंदुरबार व जवाहर सहकारी सूत गिरणी (मोराने, नंदुरबार) या सूत गिरण्यांसह जिल्ह्यात शहादे तालुक्यात लोणखेडे येथे सूत गिरणी आहे.

तसेच जिल्ह्यात पुढील साखर कारखाने आहेत.
१. सातपुडा-तापी पारसेर सहकारी साखर कारखाना -- पुरुषोत्तमनगर, शहादा
२. पुष्पदंतेश्वरा सहकारी साखर कारखाना -- समशीरपूर, शहादा

जिल्ह्यात प्रामुख्याने कृषि-आधारित छोटे उद्योग चालतात. रोशा गवतापासून औषधे व सुगंधी तेल बनवण्याचा उद्योग जिल्ह्यात चालतो. हा जिल्हा रेल्वे मार्गाद्वारे गुजरातला जोडला गेला आहे. भुसावळकडून सूरतकडे जाणारा लोहमार्ग या जिल्ह्यातून जातो.

दळणवळण

महाराष्ट्र व गुजरात या राज्यांना जोडणारा लोहमार्ग या जिल्ह्यातून जातो. नंदुरबार, नवापूर, चिंचपाडा रनाळे ही जिल्ह्यातील महत्त्वाची रेल्वे स्थानके आहेत.

गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांकडे जाणारे रस्ते नंसूरबार जिल्ह्यातून जातात. चांदसेली घाट व तोरणमाळ घाट हे महत्त्वाचे घाट जिल्ह्यात आहेत.

नंदुरबारचे महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरापासूनचे अंदाजे अंतर

...पासून अंतर(कि.मी.)
मुंबई ४३०

...पासून अंतर(कि.मी.)
मुंबई ४३०
नागपूर ६१५
औरंगाबाद २३8
रत्नागिरी ७३४
पुणे ४३४

संद़र्भ- महाराष्ट्र मार्गदर्शक नकाशा
समर्थ उद्योग, औरंगाबाद.
पर्यटन

नंदूरबार जिल्ह्यात प्रकाशे हे ठिकाण खानदेशाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. तापी व गोमाई या नद्यांचा संगम या तीर्थक्षेत्रावर झालेला असून केदारेश्र्वर, संगमेश्र्वर ही महादेव मंदिरे प्रसिद्ध आहेत. शहादा तालुक्यातील सारंगखेड येथील दत्त मंदिर प्रसिद्ध असून येथील दत्त जयंती यात्रेला महाराष्ट्रासह राजस्थान, मध्य प्रदेश व गुजरात येथून भाविक दर्शनासाठी येतात. जिल्ह्यातील तळोदा येथील कालिका देवीचे मंदिर व तेथील यात्राही प्रसिद्ध आहे.

शहादा तालुक्यात उपणदेव येथे गरम पाण्याचे झरे आहेत. कडक थंडीच्या काळातही हे झरे आटत नाहीत. श्रीरामचंद्रांनी मारलेल्या बाणामुळे हे झरे निर्माण झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. येथील फत्तेपूर किल्ला व अक्का राणीचा किल्ला हे किल्लाही प्रसिद्ध आहेत.

महाबळेश्र्वरनंतरचे राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ या जिल्ह्यात आहे. सात खेड्यांनी बनलेला हा परिसर नंदूरबारपासून सुमारे ९० कि.मी. अंतरावर आहे. अक्राणी तालुक्यातील डोंगराळ भागात हे ठिकाण असून समूद्रसपाटीपासून ११४३ मी. उंचीवर वसलेले आहे. प्राचीन काळी मांडू घराण्याच्या राजधानीचे हे ठिकाण होते, तसेच हे नाथ संप्रदायाचे पवित्र स्थळ असून येथे गोरक्षनाथांचे मंदिर व मच्छिंद्रनाथांची गुंफा आहे. याच परिसरात यशवंत तलाव व कृष्णकमळ तलाव आहेत. कृष्णकमळ हा नैसर्गिक तलाव असून यात असंख्य कमळे आहेत. तोरणमाळ परिसरातील आदिवासी जीवनही अनुभवण्यासारखे असून येथे नागार्जून मंदिर (गुहेतील अर्जूनाची मूर्ती) व सीताखाई ही ठिकाणे आहेत. श्रीराम व सीता रथातून या भागातून जात असताना, रथामुळे गुहा निर्माण झाली असे मानले जाते. या गुहेस सीताखाई म्हटले जाते. तोरण नावाची फुले येथे मोठ्या प्रमाणावर आढळतात व पठारी, सपाट भागाला माळ म्हटले जाते. यावरून या भागास तोरणमाळ म्हटले जाते. या भागातील आदिवासी लोक नाहा ही वैशिष्टपूर्ण भाषा बोलतात. येथील निसर्गरम्य डोंगर, दाट जंगले, पाण्याचे प्रवाह व धबधबे यांमुळे हे अलीकडच्या काळात पर्यटकांचे आकर्षण बनत आहेत.

साभार- www.manase.org

( संगाळनार - यदु भाउ नी ओरकुट वर पोष्टेल व्हत ते मी आठे पेष्टी टाका )

छावा भाउ तुमना नंदुरबार ना सा़क्षरता न प्रमाण कमी शे जरासा वाढावा ना प्रयत्न कर रे भौ

नीलु भाउ तुले पेस्टान काम चांगल जमस बर का
आशीच चांगली माहीती पेस्टाडत जाय त्यापाइन आमले बी चांगली माहीती भेटी

निलु भलतच भारी माहीती लिखेल दखास. मी अजुन पुरी वाचेल नई, आज जरा घाई शे. पण शाब्बास रे पठ्या!

--------------------------------------------------------------------
एका हो मंडळी!
सकाळ पाईन मी ६-७ रोज बाहेर गावले जाई र्‍हायनु. तठे नेट व्हई ते जमी तव्हढ येवाना प्रयत्न करसु.
पण शक्य नई व्हयन ते, मना नावतीन बोटे मोडाना नईत बरका. आत्तेच माफी मांगीलेस.
तरी सुध्दा कोणी तशे कर तर Same to you! बरका!!

Thank U

आन्ना स्मित

काय म्हणता मंडळी ? तुम्ही सगळे नंदुरबारचे का? माझं आजोळ नंदुरबारच त्यामुळे कधीकधी (म्हणजे ५/६ वर्षातून एकदा) येणं होतं.. छान वाटलं हा ग्रुप बघून..
>>>>>>>>>>>>>>
अरे पळा पळा पळा साक्षात अ‍ॅडमीन नंदुरबारच्या पानावर. पायघड्या घाला, हार-तुरे आणा. डोळा मारा हाहा
आम्हाला बी लै भारी वाटलं तुम्हाला इथ बघुन. असेच चक्कर टाकत चला अधुन्-मधुन.

drukghoshana.jpg

नमस्कार !!

आपल्या हितगुज दिवाळी अंकातील दृक्-श्राव्य विभाग हा एक लोकप्रिय विभाग!! या विभागात मायबोलीकर आपल्या विविध कलाकौशल्याचं सादरीकरण करतात.

यंदाही दिवाळी अंकात हा विभाग असणार आहे. या विभागात तुमच्या कलेचे सादरीकरण करता आले तर या अंकाची शोभा वाढेल. याशिवाय, गाणी, कविता सादर करणे, यांसारखे श्राव्य कार्यक्रमही आपण सादर करू शकता.

त्यासाठी पाठवायच्या चित्रफिती / ध्वनिफिती कशा असाव्यात, कुठे पाठवाव्यात असे प्रश्न पडलेत का? तर मग नक्कीच इथे जाऊन बघा.

या फिती संपादक मंडळाकडे ५ सप्टेंबर, २००९पर्यंत पोहोचायला हव्यात.

यासंदर्भात काही मदत लागली तर नि:संकोचपणे sampadak@maayboli.com ह्या पत्त्यावर ई-मेल पाठवून किंवा विचारपुशीत जाऊन निरोप ठेवा. आम्ही शक्य तितक्या लवकर मदत करू.

आपले,
संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक, २००९

निलेश१२४८२, छान माहीती दिलीस. पण हे वाहुन जाणार पान आहे. कायमस्वरुपी राहील अशा ठिकानी टाकता आली तर बघ ना. स्मित

..

..

announcement%20animation.gif

ऐका होऽऽऽऽ ऐकाऽऽऽऽ !!!

३ सप्टेंबर, २००९ला गणपती बाप्पांची बोळवण होते आहे. मायबोलीच्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवायला ५ सप्टेंबर ही अंतिम तारीख ठरवली होती. म्हणजे काय, बाप्पांच्या विसर्जनानंतर निवांत बसून लिहायला, लिहिलेलं साहित्य पाठवायला जेमतेम दोन दिवस उरणार हातात!

तेव्हा संपादक मंडळानं विचार केला, 'मायबोलीकर गणरायाच्या स्वागतात, बडदास्त ठेवण्यात आणि पाठवणीत दहा दिवसांपेक्षा जरा जास्त काळ गडबडीत असणार. त्यांना थोडा वेळ मिळावा, त्यांच्याकडून उत्तमोत्तम साहित्य लिहिलं जावं! तर मग दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याची मुदत वाढवायला हवी..'

तेव्हा आता नवी मुदत आहे १२ सप्टेंबर, २००९!!!!

आता आपलं लिखाण, ध्वनिमुद्रण, दृक्-श्राव्य फितींचं चित्रीकरण लवकर पूर्ण करा. Camera_man.gif

कृपया १२ सप्टेंबरापर्यंत आपल्या कथा, कविता, बालसाहित्य, ललितलेख, दृक्-श्राव्य फिती संपादक मंडळाकडे पोचत्या करा.

साहित्य इथे पाठवायचंय. COM07.gif

काही शंका किंवा अडचणी असल्यास आम्हाला sampadak@maayboli.com ह्या पत्त्यावर इमेल पाठवून विचारू शकता. आम्ही शक्य तितक्या लवकर मदत करू.

fireworks10.gif

१२ सप्टेंबरपर्यंत आपल्या साहित्याच्या प्रतिक्षेत...

आपले,
संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक, २००९

animation2.gif

adm म्हण्जे अ‍ॅडमिन नव्हे. हा वेगळा आय डी आहे त्यामुळे धावपळ करण्याची गरज नाही. साधे स्वागत करा स्मित

adm म्हण्जे अ‍ॅडमिन नव्हे>>>>>>>>>
रॉबीनदा, मुद्दाम टिंगल्या चालल्या होत्या. पुढे डोळा मारलाय.
adm यांना मी पाहिलय न्यु जर्सी च्या ए वे ए ठि च्या कार्यक्रमात. स्मित
म्हनजे फोटोत बर का. हाहा

<<<<<<<<ससेभाउ
तुमले जवळ पहिजे तवळ २४ तास सेवा शे मेलामेली जीमेल वर हाउच आय डी शे मना जोडी घ्या माले मेल करी देस तुम्ले <<<

निलेश, तुमनं एन्टर न बटन दबी जाएल शे वाट्टं! २-२ येळेस सांगी राह्यनात म्हनुन म्हन्लं ....स्मित

फिदीफिदी

नंदुरबारच्या गाड्या बर्‍याचला लेट दिसतात?
म्हंजे लवकर कोणी येत नाही म्हणुन म्हटल. उगाच कुणी चुकीचा अर्थ काढु नका हं!
नंदुरबार ला अ‍ॅडम दिसला इव कुठेय? डोळा मारा

डु. अ‍ॅडम शे भाउ तो स्मित

ड्यु अ‍ॅडम शे भाउ तो >>>>>>
म्हण्जे काय रे भो?

म्हण्जे काय रे भो? >>>>>

म्हणजे डुप्लीकेट अ‍ॅडम शे

ड्यु. adm>>>>
हसून हसून गडबडा लोळण

नाही रे बाबांनो मी ओरीजनलच आहे.. डोळा मारा

इथलं खरच कोणी असतं का नंदुरबारात?

हो हो मी असतो नंदुरबारात. स्मित

Matdan_Jahirat.jpg

मतदानाची अंतिम तारीख १६ सप्टेंबर २००९ ही आहे.

हो हो मी असतो नंदुरबारात. >>>>>>

ससे म्हणजे शिस्त प्रिय प्राणी

मग आता अ‍ॅडम भाऊ पुढे काय? आणि इव कुठय? डोळा मारा

नमस्कार मंडळी
माझं आजोळ नंदुरबारच. लहानपणी बरेचदा जाणं व्हायचं. खुप मजा यायची. नंदुरबार आणि तिथली माणसं म्हणजे वेगळच रसायन आहे! एकुणच नंदुरबारविषयी गप्पा मारायला आवडेल.

शांतता का?
म्हन्जे शांतेच कार्ट चालु आहे म्हणुन का? दिवा घ्या

riksha1.jpg

या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा-
मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम
धन्यवाद,
संयोजक_संयुक्ता

mbs_nibandh.jpg

प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख जवळ येतेय! आपल्या प्रवेशिका २० फेब्रुवारी, २०११ च्या आधी आमच्या पर्यंत पोचल्या पाहिजेत.

स्पर्धेसाठी गट पुढीलप्रमाणे आहेत - इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी.
आणि आता मोठेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. वरच्या गटामध्ये न बसणारे सगळेजणही आपल्या प्रवेशिका पाठवु शकतील. मात्र मोठ्या गटासाठी ही स्पर्धा नसणार आहे.

या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
कार्यक्रमाच्या संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा-
मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम

तुमच्या प्रवेशिकांची वाट पहात आहोत.

धन्यवाद
संयोजक_संयुक्ता