Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 17, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » श्रावण » कथा कादंबरी » विक्रम आणि वेताळ » Archive through August 17, 2007 « Previous Next »

Ajai
Wednesday, August 15, 2007 - 10:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विक्रमाने वेताळाला खांद्यावर मारले आणि तो चालु लागला.
"राजा विक्रमा तुझ्या चिकाटीची मी दाद देतो.तु हे काम कुणाच्या सान्गण्यावरुन करतोयस हे मला माहीत नाही पण तु जसा न थकता मला घेवुन निघतोस तसाच मीही तुला न थकता येक कथा सांगतो. ऐक..."
वेताळाने कथा सुरु केली आणि विक्रम लक्षपुर्वक ऐकु लागला.

मुम्बापुरि नावाची महानगरी. ही नगरी मोठि म्हणुन तीथे संधी ही भरपुर आणि सन्धीसाधुही भरपुर. महानगरी मोठी म्हणुन तिचे प्रश्नही मोठे.
या महा प्रश्नांवर उपाय सन्शोधन करण्यासाठि विलासराव,उद्ववसाहेब,आबा आणि राज अशा मंडळीनी महाचर्चा करायची ठरवली. सगळ्याना सोयीस्कर म्हणुन शिवाजी पार्कात शिवाजी पार्क जिमखान्याच्या क्रिकेट पिच वर भेटायचे नक्कि केले.
घराजवळ म्हणुन राज साहेब आधिच हजर होते.त्यांच्या हातात कसलासा निळा कागद होता. नंतर कळले कि ति महाराष्ट्र आणि मुंबापुरि विकासाची blueprint होती.
त्यांच्या पाठोपाठ उद्ववसाहेबांचे आगमन झाले.
राजसाहेबानी त्याना ती blue print दाखवायचा प्रयत्न केला पण उध्ववसाहेबानी आपण गणपती मंडळांची मतं विचारात घेत नाही म्हणुन त्याना झटकुन लावले. दोघेही येकमेकांना पाठ करुन आबा आणि विलासरावांची वाट पाहु लागले.

तासगाव आणि लातुर विकासाच्या मिटिंग लांबल्यामुळे आबा आणि विलासरावाना उशीर झाला. आपापल्या मिटींग संपवुन दोघेही आघाडीची स्कुटर घेवुन निघाले. स्कुटर विलासराव चालवत होते तर साइडकारमधे आबा होते. ही आघाडीची स्कुटर कितिही दामटली तरि पोचायला उशीर व्हायचा तो झालाच.
"मुम्बापुरिच्या विकासाचा प्रश्न आहे म्हणुन थांबलो नाही तर केव्हाच निघुन गेलो असतो. मुम्बापुरीचा विकास हाच साहेबांचा ध्यास.." उद्वव गरजले.
"हो ना साहेबांचे मुम्बापुरिवर खास लक्ष.." आबानी दुजोरा दिला. ते दोघेही वेगवेगळ्या साहेबांबद्दल बोलत होते हा भाग वेगळा.
"युतीच्या कारकिर्दीत किती विकासाची काम झाली.. हे सगळे उड्डाणपुल त्याची साक्ष आहेत" - उध्वव
"यात किती कोटीची उड्डाणे झाली ती मला माहीत आहेत.त्यापेक्षा ही blueprint पहा" राजसाहेबांनी आपले घोडे दामटले.
त्याकडे दुर्लक्ष करीत आबानी आपण डान्सबार बंद करुन मुंबापुरीचे संस्कृती रक्षण केल्याचे गोडवे गायले.
आता विलासराव कसे मागे राहतील " पीएम तर मुम्बापुरीचे शांघाय करणारच. आणि तो storm water project madam मुळेच मंजुर झाला ना" इथे madam कोण हे माहीत असल्याने दोन साहेबांसारखे कन्फ्युजन नव्हते.
जशी रात्र चढत गेली तशी चारिजणांची चर्चा रंगत गेली. शेवटी मुम्बापुरिच्या विकासासाठि झटण्याची शपथ घेवुन मिटींग संपली.





"आता मला सांग मुंबापुरीच्या विकासासठि येव्हडे लोक कटिबद्ध असताना प्रश्नही कायम आहेत. अस का?. या प्रश्नाचे उत्तर दे. आणि लक्षात ठेव जर माहीत असुनही तु याचे उत्तर दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होवुन तुझ्याच पायवर पडतील" वेताळाने कथा संपवत राजाला विचारले

"हे बघ वेताळा या कथेचा पुढचा भाग मी तुला सांगतो म्हणजे तुझ्या प्रश्नांची उत्तरे तुला आपोआप मिळतील"
मीटींग संपल्यावर हे सगळे निघुन गेले पण त्या चर्चेच्या गुर्‍हाळातुन बरीच चिपाडं बाहेर पडली.त्या कचर्‍याचा हा मोठा ढिग त्या पिचवर जमा झाला.
दुसर्‍यादिवशी क्रिकेटची नेट लावयाला चार माणसं आली. त्यानी ती घाण गोळा केली. ती घाण फ़ेकायला ते कचराकुंडी शोधायला लागले. आख्खा शिवाजी पार्क विभाग पालथा घातला पण त्याना कचराकुंडी काही सापडली नाहि. आजही दादर माहिम भागात ते लोक हिंडताना दिसतील..
"स्वच्छ मुंबापुरीची घोषणा होवुन बराच काळ लोटला तरी अजुन ही अवस्था त्यामुळे बाकिच्या घोषणांचे काय होणार याचे उत्तर तुझे तुलाच मिळेल"- राजाने कथा संपवली.
"ह्म्म्म .... माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले पण तु बोललास आणि हा मी चाललो"..
वेताळ येव्हढे बोलुन पुन्हा झाडावर लटकु लागला.




Rani_2007
Wednesday, August 15, 2007 - 1:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय, चांगला कल्पनाविलास...गोष्ट आवडली.

Asami
Wednesday, August 15, 2007 - 2:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आख्खा शिवाजी पार्क विभाग पालथा घातला पण त्याना कचराकुंडी काही सापडली नाहि. >> awesome रे. एकदम दोन फ़ूल एक हाफ़ style वर जमलाय.

Kmayuresh2002
Wednesday, August 15, 2007 - 5:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय,चांगली मांडली आहेस रे कथा. आवडली...

Aktta
Wednesday, August 15, 2007 - 6:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> आपण गणपती मंडळांची मतं विचारात घेत नाही
ही लाईन र्सवात मस्त आहे....:-)
एकटा...


Mepunekar
Wednesday, August 15, 2007 - 10:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय, आवडली ही कथा :-)

Daad
Thursday, August 16, 2007 - 1:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय, प्रच्चंड झक्कास! कल्पना आणि तिचा विलास! बहोत खूब!

Sanghamitra
Thursday, August 16, 2007 - 5:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय मस्त रे. चांदोबातली गोष्ट आणि दोन फुल एक हाफ चे सही कॉंबीनेशन.

Chetnaa
Thursday, August 16, 2007 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय,मस्तच...
गणपती मंडळ आणि कचराकुंडी!!! झक्कास!


Ladaki
Thursday, August 16, 2007 - 6:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय चांदोबातल्या कथा जश्या बोधपर असतात... तशी तुझी कथा अर्थपूर्ण आहे... all the best... keep writting...:-)

Ajai
Thursday, August 16, 2007 - 7:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वांना प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. asami,sanghamitra दोन फुल येक हाफ़ चा प्रभाव नक्किच आहे. असाच येक column पुर्वी म.टा. मधे यायचा अशोक जैन लिहायचे.२फुल १हाफ़ कोण लिहते ते मात्र अजुन कळले नाही.

Nandini2911
Thursday, August 16, 2007 - 10:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय, मस्तच लिहिले आहेस.
दोन फ़ुल एक हाफ़ तंबी दुराई लिहितात


Ajai
Thursday, August 16, 2007 - 10:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

nandini2911 - हो पण तंबी दुराई कोण हा प्रश्न अनुत्तरितच आहे

Nandini2911
Thursday, August 16, 2007 - 11:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लेखक आहेत म्हणे. मलाही इतकंच ठाऊक आहे. :-)

Sanghamitra
Thursday, August 16, 2007 - 11:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ते अशोक जैन लिहायचे त्या सदराचं नाव आठवतंय का कुणाला?
मला तर आधी तंबी दुराई हे त्यांचंच टोपण नाव वाटे. पण नंतर कळलं की ते हे नव्हेत. तंबी दुराईंना मधे कसला तरी पुरस्कार मिळाला तेंव्हाचा फोटोही आला होता ना पेपरात. त्यामुळे तेच त्यांचं खरं नाव असावं असं वाटतंय.


Asami
Thursday, August 16, 2007 - 12:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश नायगावकर का ? काहिही असो, जे काय असते ते अप्रतिम असते. ajai चा लेख पण तसाच आहे.

Ajai
Thursday, August 16, 2007 - 12:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अशोक जैन यांचे सदर "कानोकानी"- "कलन्दर" या नावाने लिहायचे बहुतेक CBDG

Chinnu
Thursday, August 16, 2007 - 2:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजै, लिहिण्याची शैली आवडली. पु. ले. शु.

Chaffa
Friday, August 17, 2007 - 3:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय खरच छान सहसा राजकारणी कथा मी वाचत नाही पण वाचावीशी वाटली आणि आवडली सुध्दा. मस्तच रे!!!!!!!!!!!!

Slarti
Friday, August 17, 2007 - 4:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

२ फुल १ हाफ हे सदर कोणत्या वर्तमानपत्रात प्रकाशित होते ?




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators