Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 20, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » Archive through April 20, 2007 « Previous Next »

Mayurlankeshwar
Thursday, April 19, 2007 - 3:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्नू... किती छान लिहिलं आहेस!! भावस्पर्शी!!
आढावा एकदम सही!!


Meenu
Thursday, April 19, 2007 - 3:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण ही गज़ल कार्यशाळा म्हणजे गुरुजींनी "हाती घ्याल ते तडीस न्या" प्रत्यक्ष कृतीतून शिकवलय ..

चिन्नु मस्त वाटलं तु घेतलेला आढावा वाचुन ..

मला वाटतं पुढची कार्यशाळा वृत्तबद्ध कवितेची असेल तर अजुन काही लोक सहभागी होऊ शकतील ..

आणि नचिकेत कुठय काहीच का बोलत नाहीये हा ..?


Nachikets
Thursday, April 19, 2007 - 4:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वांचे मनःपुर्वक आभार!!!!

काय बोलू? ह्या अनपेक्षीत धक्क्यातून अजूनही सावरलेलो नाहीये! :-)

स्वतः मा. वैराळकरांनी माझी गज़ल वाचली व त्यांना ती आवडली हा आनंद व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत.

'आशास्थान' हा शब्द फारच मोठा झाला. शिवाय कार्यशाळेत सहभागी झालेले आपण सर्वच विद्यार्थी आपल्या मराठी गज़लेचे आशास्थान आहोत. वैभव, प्रसाद, स्वाती, सारंग आणि नियामक मंडळातल्या इतर जाणकारांचे मार्गदर्शन असेच लाभत राहीले तर उत्तमोत्तम गज़ल लिहील्या व वाचल्या जातीलच. तुम्हा सर्वांना अनेक धन्यवाद!!

चिन्नुने कार्यशाळेचा आढावा छान घेतला आहेच. ह्या कार्यशाळेतला एकूण प्रवास आणि प्रवसाच्या शेवटी इथल्या प्रत्येक गज़लने दिलेला वेगळाच अनूभव व आनंद ह्याबाबत मी इतकेच म्हणीन:

इथे कोणती लाट घेऊन आली?
मला हे किनारे कुठे ज्ञात होते?


पुन्हा एकदा धन्यवाद!!!


Nachikets
Thursday, April 19, 2007 - 4:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु, काल रात्रीपासून प्रयत्न करतो आहे लिहायचा!! पण नेटाची साथ मिळत नव्हती. :-)

वैभव, drive करताना मोबाईलवर बोलणे आणि वर गज़ल discuss करणे dangerous रे बाबा!!

मयुर, आनंदयात्री... :-)


Aparnas
Thursday, April 19, 2007 - 4:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नचिकेत, हार्दिक अभिनंदन!!!
गुरुजी, तुमच्या मेलची वाट बघते आहे...


Kmayuresh2002
Thursday, April 19, 2007 - 4:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नचिकेत,तुझे हार्दिक अभिनंदन रे.. तुझी गझल सुरेख आहे रे.. तुझ्यकडुन अश्याच उत्तमोत्तम गझल्स आम्हाला भविष्यातही वाचायला मिळु देत:-)


वैभव, drive करताना मोबाईलवर बोलणे आणि वर गज़ल discuss करणे dangerous रे बाबा!!.. खरय रे नचिकेत तुझे.. पण वैभवची हिच खासियत आहे.. तो जे काम हाती घेतो ते काम भान हरपुन करतो... आणि गझल हा तर त्याचा अतिशय आवडता प्रांत.. मग तर विचारायलाच नको..आपण अनुभव घेतलच आहे या कार्यशाळेच्या वेळी याचा..
वैभवा,हॅट्स ऑफ़ टु यु रे.. तुझ्या कामाच्या रगाड्यातुन वेळात वेळ काढुन तू ह्या कार्यशाळेची जबाबदारी स्विकारलीस आणि यशस्वीरित्या तडीस नेलीस... लोकांच्या मनात गझलेची नुसती आवडच निर्माण केली नाहीस तर ते चांगली गझल लिहुही शकतात हा आत्मविश्वासही फ़ुलवलास
त्यांच्या मनात.. आणि त्यामुळेच एकाहुन एक अश्या सरस गझल्सची मेजवानी मिळाली आम्हाला...:-)
वैभवला याकामी सर्वतोपरी सहकार्य करणार्‍या नियामक मंडळालाही अनेकानेक धन्यवाद...


Psg
Thursday, April 19, 2007 - 5:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नचिकेत, हार्दिक अभिनंदन :-)

तुझी मीटरची जाण पक्की आहेच. ही तर सुरुवात आहे.. आता सुंदर सुंदर गजलही वाचायला मिळूदे.

वैभव, हा उपक्रम तडीस नेण्याबद्दल तुझे आणि तुझ्या टीमचे आभार. असा अभिनव उपक्रम केवळ तुमच्या कष्टांमुळे पूर्णत्वास गेला.

सगळ्यांनी लिहत रहा, आम्ही वाचतोय :-)


Zakasrao
Thursday, April 19, 2007 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा निकाल लागला.
पहिला नं. मिळवणार्‍या नचिकेता तुझ खुप खुप खुप अभिनंदन. ह्या शाळेत सर्वच विद्यार्थी हुशार होते त्यातुन तु नं. मिळवलास.
ह्या शाळेचे सर्व मास्तर, हेडमास्तर यांनी हि शाळा यशस्वीपणे चालवली ह्याबद्दल त्यांचे परत एकदा आभार.
ह्या शाळेला मायबोलीवर स्थान देणारे आणि मदत करणारे संचालक मंडळ म्हणजेच ADMIN आणि सर्व MODS यांचेही विशेष आभार.
ह्या शाळेतील सर्व सहभागी आणि वाचक ह्यानी ह्या शाळेचे नंदनवन फ़ुलवले.
तर ह्या शाळेच्या निमित्ताने मायबोलीची ताकद दिसुन येत आहे.
तर म्हणा
थ्री चीअर्स फ़ॉर मायबोली
हिप हिप हुर्रे हिप हिप हुर्रे हिप हिप हुर्रे


Giriraj
Thursday, April 19, 2007 - 6:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वप्रथम नचिकेताचे हार्दीक अभिनंदन! :-)

मुळात जेव्हा 'कार्यशाळा' हा शब्द वाचला तेव्हा सगळ्यांनी कुठे जमायचे असेच माझ्या डोक्यात आले. त्यामुळे जेव्हा ही कार्यशाळा online आहे हे कळले तेव्हा मुळातच अशी कल्पना करणे आणि ती यशस्वीरित्या तडीस नेणे हे किती अवघड काम आहे हे माझ्या बुद्धीला तरी निश्cइतच पटले! :-)

फ़क्त एकाच ओळिवर किति कल्पनाविस्तार होत गेले हे पाहिले तर या कार्यशाळेची महति लक्षात येते. गोड गोड प्रेमापासून कढत दुःखापर्यन्त! इतक्या जणांचे मिळून डज़नावारी शेर एकाच लयीत असूनही किती भिन्न होते. खूप काही वाचायला मिळालं यातून!

वैयक्तिक फ़ायदा म्हणायचे तर मला गज़ल आवडूनही त्यामध्ये लिहिणे म्हणजे बांग्लादेशने भारताला हरविण्याइतके कठीण वाटायचे! :-) दोन चार गज़ला वाचल्यानंतर गज़लेची लय अंगात भिनली आणि अगदी सहजपणे लिहिता आले. ज्या त्रुटी होत्या त्यांवर वैभवशी विचारविनिमय केला तेव्हा माझे विचार या माणसाला माझ्यापेक्षा सुटसुटीतपणे कसे मांडता येऊ शकतात याचे आश्चर्य अजुनही आहे.

या सगळ्याबद्दल जाहीर साष्टांग दंडवत रे वैभवा!

ज्या मायबोलिने वैभवसारखे मित्र दिले तिचे आभार मानावे तितके थोडेच आहेत!



Mankya
Thursday, April 19, 2007 - 7:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रथमतः वैभवचे मनःपुर्वक आभार .. ह्या ईतक्या सुंदर कार्यशाळेच्या अनुभवाबद्दल .. वैभवा तसं आभार वगैरे मानून तुझ्या आणि Team च्या ऋणातून मुक्त होणे शक्य नाही तरीही धन्यवाद मित्रा !

नचिकेता .. अखेर पहिला क्रमांक मिळवला तर .. खूप खूप अभिनंदन, पुढच्या लेखनास अनेक शुभेच्छा ! गजल बीबी वर वाट पहातो तुझ्या ग़जलांची !

मीनू, श्यामली, नचिकेत जोशी, अभिजित दाते .. तुमचेही मनःपुर्वक अभिनंदन .. तुमच्याकडूनही उत्तमोत्तम ग़जलांची अपेक्षा आहे !

ईतर सहभागी मित्रांचेही अभिनंदन .. मात्रा, मीटर, आशय संभाळूण लिहिणे हे ही नसे थोडके ! अभिनंदन मित्रांनो अभिनंदन !

चिन्नू .. अगदि मनातलं लिहून गेलीस .. मस्त !

माणिक !



Visunaik
Thursday, April 19, 2007 - 8:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नचिकेत आठवले यांचे मनापासून अभिनंदन. गज़ल दुसर्‍या विश्वातली आहे.

कार्यशाळेची कल्पना आणि विस्तार दोन्ही सम्पूर्ण यशस्वी झाले यासाठी सर्व समधर्मींचे अभिनंदन! (फारच कोरड्या शब्दांत! :-))


Prasadmokashi
Thursday, April 19, 2007 - 10:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रा नचिकेत, अभिनंदन.

ही कार्यशाळा इथे सुरू झाली आहे याची माहिती नचिकेतनेच मला दिली.
आणि पाठोपाठ त्याची ही नितांतसुंदर गज़ल ऐकवली.
एक एक शेर जीव वेडावत गेला हे सांगायला नकोच.

नचिकेतचे वैशिष्ठ्य हे आहे की त्याच्या भावनांशी तो प्रामाणिक आहे.
त्यामुळे काफ़ियांची चळत बरोबर घेऊन लिहायला बसलेल्या रचनाकारासारखा तो वाटत नाही.
त्याच्या लिखाणामागे खोलवर केलेला विचार जाणवतो.
म्हणूनच प्रत्येक शेर चकचकीत काचेसारखा नुसताच आकर्षक वाटत नाही तर अनुभवाचे प्रतिबिंब पडलेल्या दर्पणासारखा स्वच्छ देखील वाटतो.

नचिकेत, दोस्ता काय बोलू ? मनापासून अभिनंदन.
खूप खूप लिहीत रहा.

~ प्रसाद


Devdattag
Thursday, April 19, 2007 - 10:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिनंदन नचिकेत..:-)
>>बांग्लादेशने भारताला हरविण्याइतके कठीण वाटायचे!
गिरी.. म्हणजे अगदिच सोपे वाटायचे की तुला हे
माझी पहिली निर्दोष गज़ल या कार्यशाळेच्या निमित्ताने लिहून झाली.. वैभव, सारंग, स्वाती, बैरागी,प्रसाद सार्‍यांनाच धन्यवाद


Nandini2911
Thursday, April 19, 2007 - 11:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी तर जेव्हा माझी गझल पहिल्यान्दा पाहिली तेव्हा ती इतकी विचित्र आणि आकरहीन होती, पण वैभव मानले बाबा तुम्हाला....
छोट्यात छोटे बदल करून ती गझल खरंच गझल वाटयला लागली. इथे सर्वानाच धन्यवाद.. कारण ही अशी ऑनलाइन कार्यशाळा असून शकते आणी तीही तितकी सुंदर हे पहिल्यान्दाच समजले. गुरूजी आणि वर्गातल्या सर्व विद्यार्थ्याना धन्यवाद,.
नचिकेतचे पुन्हा एकदा अभिनंदन..
आणि बाकी सर्वाचेही अभिनंदन....
ऋतू येत राहतील ऋतू जात राहतील
ही शाळा मात्र कायम लक्षात राहील.....


Supermom
Thursday, April 19, 2007 - 12:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नचिकेत, तुमचे मनापासून अभिनन्दन. प्रगतीचा आलेख असाच चढता राहू दे.
वैभव, खरेतर कार्यशाळेची घोषणा झाल्यानंतरही गजल लिहायची हिम्मत केली नाही. इतकी मी या काव्यप्रकाराला घाबरते. पण आता सगळ्यांच्या गजल वाचून खूपच छान वाटते आहे.
पुढच्या वेळी अनाउन्स कराल तेव्हा जरूर भाग घेईन. भलेही डर डर के....


Chinnu
Thursday, April 19, 2007 - 1:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ मीपण डर डर के च भाग घेतलेला यावेळी! पण 'आत' आल्यवर सर्वांनी सामावुन घेतलं छान पैकी.
कधी कधी खुप सारी पुष्पगुछ्छं भेट म्हणुन येतात. जीव हरखून जातो. मग कालांतराने ती फुल वाळून जातात. पण वाळलेल्या फुलांना पाहिले तरीही टवटवीत फुलांइतकाच आनंद होतो. ही सुंदर कल्पना पूर्णपणे माझी नाही. :-) सुधीर यांच्या गजलेत आहे!
तसेच सावळे रूप ध्यानात ठेवुन साधना करणार्‍या नचिकेत जोशींना तपस्येचे फळ मिळालेले आहेच.
पसार्‍याला पाहुन माझ्या नवर्‍यालाच काय सर्वांनाच माझी आठवण येते, असे मला वाटते! :-) सतीश देशपांडेंना मात्र तिची साद सतत सर्वत्र भासत राहते!
गुरुजींच्या गझलेतला मुकुटमणी शोधायचा म्हणजे पूर्ण माळच हाती यायची! तरीही नकाशाचा शेर महत्प्रयासाने बाजुला ठेवून त्यानंतरचा, मला सर्वात आवडलेला शेर म्हणजे मक्ता. कुणी आपलेसे 'आत' होते! क्या बात है!!
हेम्स, पुलस्ति, बी, मयुर, मीनु, नचिकेत, माणिक, हा आढावा नाही, आवेग आहे!
सर्व श्रेय गुरुजनांचे आहे. आणि वेळोवेळी मार्गदर्शक आणि प्रोत्साहक ठरलेल्या प्रतिक्रिया देणार्‍यांचे सर्व सहभागींच्या वतीने आभार! एवढा सुंदर अनुभव मिळवून दिल्याबद्दल मायबोलीचे खुप खुप आभार.


Music
Friday, April 20, 2007 - 4:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार ... !

नुकतीच मायबोली join केली.
बरेच दिवस झाले गजलांचा आस्वाद घेतेय. खूपदा अभिप्राय द्यावासा वाटला, पण अभिप्राय सुद्धा इतके सुन्दर सुन्दर येतात की आता काय लिहावं असा प्रश्न पडतो.. असो ...!

मुळात गजल technically मला समजत नाही. भावार्थ बरेचदा कळतो एवढंच काय ते ज्ञान ..
त्यातून मराठी गजला फ़ारच कमी वाचल्या आहेत.
एक share करायला आवडेल -
भीमराव पांचाळांनी गायलेली i guess ...

जखमा किती सुगंधी, झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने तो मोगरा असावा

कार्यशाळेतल्या जवळ जवळ सगळ्याच गजला वाचताना असाच काहीसा अनुभव आला असं म्हट्लं तर वावगं ठरू नये.
नचिकेत, वैभव, स्वाती सर्वांचच मनापासून अभिनंदन .. :-)

असेच उपक्रम राबवत रहा

कार्यशाळेत आलेल्या सगळ्या गज़ला वाचून संपल्या तेव्हा इतकं चुकल्या चुकल्या सारखं वाटलं ... :-((

वक़्ते रुख्सत अल्विदा का लफ़्ज़ केहते हुए
वो तेरे सूखे लबोंका थरथराना याद है


Jo_s
Friday, April 20, 2007 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नचिकेत, ग्रेट
जरा उशीरच झालाय मला इथे यायला....
पण

मनापासून आभिनंदन
असच पुढेही तुझं लिखाण येत राहूदे आणि आम्हाला वाचायला मिळूदे.

सुधीर


Meghdhara
Friday, April 20, 2007 - 7:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी शब्द नाहीत.

आता राहिलय रेंगाळणं..

पुन्हा पुन्हा गज़ल वाचणं..

बोट पकडून कोणी असं ..'ही बघ तुझी.. एकटीची बाग.. फुलव आता' करेल असं वाटलच नव्हतं..

खरं तर 'आमचा उद्देश गज़लचं व्याकरण समजावणं हा आहे.. समजवल्यावर जमेल ते शिकतील ..' इतका सहज ऍप्रोच असू शकला असता.

पण वैभवची गज़लेवरची माया.. आणि जे आहे ते पूर्ण देण्याचा, ओतण्याचा ध्यास आमचे पेले भरून गेला.

'नाही समजलं ना.. पुन्हा सम्जवुन घेऊ!' इतकी समजुतदार, लहानपणी गणित शिकवताना आईही सुद्धा नव्हती कधी कधी.

बरं शिकणारे सगळेच, जशी मी, प्रतिभा संपन्न आणि जाणीव संपन्न नव्हते तरी.. त्याला महत्व न देता.. न दुखावता.. सांभाळून आणखीन आणखीन सौंदर्य आतुन कसं येईल याचा पोटतिडकीने पाठपुरावा झाला..

चार थेंबांनी का होईना नखशिंखांत भिजलो आहोत.

वैभव हे ऋण नाहीच.. जे आहे, त्यासाठी यापुढेही शब्द निर्माण होऊ नये.. असच राहुदे!

असाच जगत रहा.

मेघा


Gs1
Friday, April 20, 2007 - 7:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक उत्तम संकल्प करून तो चिकाटीने तडीस नेल्याबद्दल वैभवचे आणी त्याला साथ देणार्‍या सर्वांचे अभिनंदन.

आपला इथे येण्यात खर्च होणारा वेळ अधिकाधिक सत्कारणी कसा लावता येईल हेही या सुरेख उपक्रमातून दिसले आहे.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators