Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
शेंडेफ़ळ

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » ललित » शेंडेफ़ळ « Previous Next »

Abhishruti
Friday, April 20, 2007 - 8:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रानो, सहज सुचलं म्हणुन लिहितेय, तुमची मते, अनुभवही लिहावेत ही विनंती!

Abhishruti
Friday, April 20, 2007 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


'शेंडेफ़ळ आहे, लाडाचंच असणार' हे वाक्य अनेकदा कानावर यायचं
माझा धाकटा भाऊ आईचा जास्त लाडका आहे असंही मला लहानपणापासून वाटायचं
आईला सगळी मुलं सारखीच हेही सत्यच! पण मग धाकट्यावर एव्हढा जीव का?
मी अडीच वर्षानी मोठी असले तरी मी लहानपणापासून मोठ्ठीच आणि तो आता
चाळीशीला पोचला तरी तो लहानच, असं का? या सर्व पूर्वीपासून मनात
घोळणार्‍या प्रश्नाना आता हळूहळू उत्तरं सापडायला लागली आहेत. अनुभवाने
येणारं शहाणपण नुसतं समजावून किंवा अनुभवकथन करुन तितकसं येतं नाही.

आता जेंव्हा माझी मोठी मुलगी तक्रार करते की तोच तुझा लाडका आहे किंवा
नवरा म्हणतो की तू त्याला मोठा होऊच देत नाहीस, तो तुझं बेबीच रहाणार आहे
तेंव्हा मलाही पटतं की मी त्याचे जास्तच लाड करते, पापे घेते, त्याच्याशी
लाडंलाडं बोलते. शक्यतो त्याला कोणी रागावू नये असं बघते (अगदी बापानेही)
नवर्‍याला सांगतेही की हो तो माझं बाळंच रहाणार कारण त्याच्यानंतर
मला बाळं होणार नाही हे नक्कीच होतं. त्याच्या बालपणाकडे पहात माझं वात्सल्यं
माझं आईपणं कसं ताजंतवानं रहातं . वरवर जरी मी त्याचं सग्गळं मलाचं करावं
लागतं तो आपलंआपलं कधी करणार? मोठा कधी होणार? असा तक्रारीचा सूर लावत
असले तरी मला ते सग्गळं हवं असतं . त्याला न्हाऊ घालताना, खाऊ घालताना, मिठी
मारताना त्याच्या डोळ्यातली माया आणि माझ्या मनातली ममता कशी छान मिसळून जाते .

त्याला प्रत्येक गोष्ट मला सांगायची असते त्याचा नवीन मित्र, नवीन टीचर नवीन
जोक! त्याच्या आवडीचा खेळ, T.V. Show मी पण त्याच्याबरोबर बसुन बघावा असा त्याचा
आग्रह असतो. काही नवीन समजलं की लगेच ते मला माहिती आहे की नाही याची तो
खात्री करुन घेतो. माझ्यातले प्रत्येक बदल त्याचे लुकलुकते डोळे टिपतात. 'आई, हा ड्रेस
तुला मस्त दिसतो, ही भाजी तू छान केलीस, हे कानातलं नवीन का? एक ना दोन! तुमचं
असतं का रे माझ्याकडे इतकं लक्ष?
माझी आई ऐश्वर्या राय पेक्षा छान दिसते किंवा माझ्या आईला सगळं येतं असं
सर्वांसमोर तो मोठ्या अभिमानाने सांगतो. त्याचं जग माझ्याभोवतीच घुटमळतं.
सद्ध्या त्याच्या लेखी मी सर्वात महत्वाची, प्रेमाची, जवळची आणि हक्काची व्यक्ती
आहे . त्याच्या विश्वात मला अढळं स्थान आहे .

तुम्ही सगळे मोठे आहात, तुम्हाला तुमचं असं स्वतंत्र विश्व आहे friend circle आहे
life आहे . त्यात मला स्थान नाही किंवा माझी गरज नाही असं नाही. आणि पंख फ़ुटले
की पाखरं तरी कुठे एका जागी थांबतात. स्वाभाविकच आहे . बाहेरचं जग नवनवीन
आकर्षक गोष्टीनी, मित्रानी, projects, tours, dinner-meetings, picnics यानी खचाखच
भरलेलं आहे , मोहमयी आहे . तुम्ही बहुतांशी वेळ घराबाहेर असता, घरी आल्यावर
मला आवर्जुन सांगावं (कामं सोडून) असं काहीच तुमच्याजवळं नसतं किंवा उत्साह नसतो. माझा
सगळा वेळ तुमच्या वेळा सांभाळण्यात आणि वाट बघण्यात जातो. त्यावेळी मला खर्‍या अर्थाने
सोबत कोणं करतं साथ कोण देतं? माझं शेंडेफ़ळ!
म्हणुनच बहुधा मी त्याच्यात जास्त रमते . तो गोष्टी सांगतो, गाणी म्हणतो, नकला करतो
कधी कधी प्रश्नावर प्रश्न विचारुन हैराण करतो. पण हे सगळं मला कौतुकाने पहात रहावसं
वाटतं. त्याच्या प्रगतीत सहभागी व्हावं, त्याच्या चुकानी दुःखी व्हावं, त्या दुरुस्त करायला
त्याला मदत करावी. त्याची अगदी क्षुल्लक गोष्टही अभिमानाने सांगावी असं मला वाटतं .

तो मोठा झाला की त्यालाही माझ्या जवळं इतका वेळ राहता येणार नाही, त्याचही नवीन
विश्व निर्माण होईल. तोपर्यंत तरी मला त्याची अनमोल साथ enjoy करायची आहे . या धकाधकीच्या
धावपळीच्या, रस्सीखेच, राजकारण, भेदभाव, सासर - माहेर असल्या टेन्शनच्या दुनियेत तोच
माझा एकमेव विरंगुळा आहे . त्याच्याएव्हढा निरागस, निष्पाप साथीदार आता मला मिळणार नाही.

हा आत्तापर्यंतचा माझा अनुभव!

पण नंतरच्या काळात सुद्धा शेंडेफ़ळ आईवडिलांजवळं जास्त रहातं त्यामुळे ते जवळच होतं .
आजारपणं, बदलत्या सवयी, गरजा, आवडीनिवडी धाकट्याच्या जास्त लक्षात रहातात.
कदाचित मोठ्या एव्हढी जबाबदारी घेण्याची धमक त्याच्यात नसेल पण attachment त्याला जास्त
असते . अर्थात याला मुख्य कारण सहवास! मोठा किंवा मोठी लग्न होऊन वेगळे झाले , दूर गेले की
धाकटाच आईवडिलांबरोबर असतो. वयानुसार त्यांच्यात होणारे बदल त्याला जवळुन पहायला
मिळतात, जाणवतात. मोठ्याने नकळत आईला दुखावलं असेल तर त्याची पुनरावृत्ती आपल्याकडून
होणार नाही याची तो काळजी घेतो. 'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' म्हणा हवं तर! सहवास जास्त असल्याने आईवडिलांची विचारसरणी त्याला बरोबर माहित असते त्यामुळे त्यांना आवडेल
अशा प्रकारे वागून आपल्या मनासारखे करायची कला त्याला अवगत असते. मोठा जी गोष्ट
हक्क गाजवून मिळवतो तीच गोष्ट धाकटा गोडीगुलाबीने सहज पदरात पाडून घेतो.

धाकटं असण्याचा अजुन एक फ़ायदा म्हणजे लाडं करणारं, कौतुक करणारं माणुस नेहमीच
मोठ्यापेक्षा एका संख्येने जास्त असतं - दस्तुर खुद्द मोठ्ठा! मोठ्याकडुन मार्गदर्शन, सल्ला तर
न मागता मिळतोच. शिवाय मोठा खर्‍या अर्थाने मोठा झाल्यावर त्याच्याकडुन गिफ़्ट्स,
पैसेही मिळतात ते वेगळं . कधीमधी नावडती गोष्ट आईवडिलाना सांगताना मध्यस्थी, तर
कधी पाठीशी घालणं हे कर्तव्यही तो जातीने पार पाडतो. वेळप्रसंगी शिक्षणालाही मदत करतो,
जीवाभावाचा सोबती नाही का तो?

आईवडिल धाकट्याच्या बाबती थोडे शिथील असतात. पहिल्याचा अनुभव असतो.
नवीन पालकत्वाच्या वेळी केलेल्या चुका लक्षात आलेल्या असतात. maturity आणि patience
दोन्हीची level बदललेली असते . त्यामुळे जरुरतीपेक्षा जास्तीची शिस्त, नियम धाकट्याच्या वाटेला
येत नाहीत. मोठ्याचं मोठ्ठपणं जसं जपलं जातं तसच धाकट्याचं बालपणं जपलं जातं
अगदी ठरवून नाही हे सगळं आपसूकच होतं !

धाकटं होण्याचा सर्वात मोठ्ठा गैरफ़ायदा म्हणजे day one पासून सर्व वाटून घ्याव लागतं, share
करावं लागतं अगदी आईवडिलांपासून ते रूमपर्यंत! मोठ्याची दादागिरी सहन करावी लागते .
अंतर जास्त असेल तर आईवडिलांबरोबर त्याच्याही धाकात रहावं लागतं . मोठ्याला सगळं हक्काने
मिळतं , धाकट्याला सगळं हट्टाने मिळवावं लागतं . मोठ्याला त्याचं श्रेष्ठत्व सिद्ध करावं
लागतं नाही, तो कायमचं श्रेष्ठ असतो. धाकट्याचं तसं नाही. मोठा कायम समंजस, शांत,
साधा समजला जातो. तसा असला तरी धाकट्याला तसं राहून चालतं नाही. कारण त्याला घरात
त्याचं एक स्थान निर्माण करावं लागतं .


Sangeetak
Friday, April 20, 2007 - 12:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार लोकहो,
आज प्रथमच मायबोली वर लिहिते आहे... अभिश्रुति, तुमचा लेख खूपच सुन्दर आहे..मी शेंडेफ़ळ आहे, त्यामुळे अगदी पटला :-) आमचाकडे अगदी असच झालं होतं, ताईचं लग्न झाल्यावर मी एकटीच होते आई बाबांजवळ. त्यामुळे माझं लग्न होऊन मी गेले तेव्हा आई बाबा घरी जाऊन काय काय करत असतील हे मला नेमकं कळत होतं.


Hems
Friday, April 20, 2007 - 4:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिश्रुती, छान ! आवडलंही आणि पटलंही !

Ashwini
Friday, April 20, 2007 - 5:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिश्रुती, मस्त लिहीलं आहेस.

Apurv
Friday, April 20, 2007 - 6:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फारच छान आकलन! पटलं ?... समजलं!

Bhramar_vihar
Saturday, April 21, 2007 - 5:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रुती, छानच लिहिलस गो! मी थोरलो आसय, पण माकाय ह्या पटला! :-)

Rupali_rahul
Saturday, April 21, 2007 - 6:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ष्रुती गो पटला ह्या माका, माझ्या घरी मी मोठी त्यामुळे भावाचे लाड खुप बघितले आहे. सगळ्याच गोष्टींचा अनुभव आहे फ़क्त दादागिरिचा नाही कारण लहान असुनही तोच माझ्यावर दादागिरी करायचा आणि लग्नानंतरही करतो, पण तेवढीच त्याची काळजी पण वाटते.

Manuswini
Saturday, April 21, 2007 - 9:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तच गं माझ्या बहिणीने वाचला असता असेच म्हणाली असती हीचे एवढे लाड का?

ती फक्त २० मिनिटाने, हो २० मिनीटाने मोठी आहे. पण माझे इतके लाड होतात ना. आणि खरे तर तीच माझे लाड करते सुद्धा पण पप्पांने समजा एखादा लाडाचा शब्द सांगीतला की हीला वाटते तुझे का ग इतके कौतुक... :-)


R_joshi
Saturday, April 21, 2007 - 11:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिश्रुति लेख खरच छान लिहिला आहेस. मी घरातल शेंडेफळ त्यामुळे तुझ्या लेखातल्या प्रत्येक बाबी मला पटल्या आहेत.:-)

Abhishruti
Saturday, April 21, 2007 - 5:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद! खरचं अगदी सहज जे वाटलं ते लिहिलं . प्रतिक्रिया मनापासून लिहिल्याबद्दल मनापासून आभार! अजुन कोणी आईच्या भुमिकेतून प्रतिक्रिया दिली असती तर ... I mean मी वाट पहातेय.

Sayuri
Saturday, April 21, 2007 - 6:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hmm well, शेंडेफळाचे लाड होतात पण 'जास्त' असं वाटत नाही. खरं तर मोठ्या भावंडाचे तेव्हढेच झालेले असतात कारण ते त्या घरातील 'पहिलं' बाळ असतं आणि त्या नव्या पाहुण्याच्या नवलाईत चिक्कार लाड होतात. :-)

Disha013
Saturday, April 21, 2007 - 8:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहिलेय अभिश्रुती!
मी मोठी त्यामुळे तो अनुभव नाही. पण २ मुले आहेत मला. मोठा मुलगा आणि धाकटी मुलगी. आणि धाकट्या शेंडेफ़ळिणीचे मोठ्यापेक्षा जास्त लाड आपोआपच होताहेत याचा अनुभव सध्या घेतच आहोत. आता मोठा तिच्यावर दादागिरी करतोय की नाही याचा अनुभव नंतर येईल. सध्या तरी ' my baby sister ' म्हणुन भरपुर लाड चालु आहेत!!


Gurudasb
Sunday, April 22, 2007 - 10:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रुती , किती गो चांगला लिहिलस ? कोणाकय पटात असा . एक जिवंत कौटुंबिक उदाहरण .

Bsk
Sunday, April 22, 2007 - 2:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय मस्त लिहीलय... मी शेंडेफळ असल्यामुळे सगळं पटलं! भरपूर लाड होतात.. मोठयांना जरा समजुतदार असावंच लागते.. :-)
btw, सगळे कोकणी का लिहीत आहेत??

Ldhule
Sunday, April 22, 2007 - 8:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रुती, छान लिहिलयस. शेंडेफळाचे खुप लाड पण बरे नाय हा. :-)

Bhramar_vihar
Monday, April 23, 2007 - 7:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

btw, सगळे कोकणी का लिहीत आहेत??
bsk , अभिश्रुती, गुरुकाका, रुपाली, लक्ष्मीकांत आणि मी.. आम्ही सगळे मालवणी मुलुखातले आहोत. general time pass मधे गजाली section ला कधि भेट दिलीस तर कळेल. तिथे आम्हि मालवणितूनच 'गजाली' (गप्पा) मारतो. त्यामुळे तिला प्रतिक्रिया त्याच भाषेत लिहिली. क्षमस्व!


Bsk
Monday, April 23, 2007 - 8:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

oh..ic..मी कधी नाही गेले त्या सेक्शनला.. म्हणून माहीत नव्हत..

Dineshvs
Monday, April 23, 2007 - 4:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिश्रुती, मी पण शेंडेफळच.
त्यामूळे या सगळ्यातून गेलोय मी.

खर्‍या आयुष्यात कधीच दादा नाही झालो, तर मायबोलीने तेही भाग्य मिळवुन दिले.


Fulpari
Monday, April 30, 2007 - 5:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभिश्रुती, छान लिहिलं आहेस

Nkashi
Monday, April 30, 2007 - 9:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी शेंडेफळच, पण दोन मोठ्ठे दादा असल्यामुळे बहुदा त्यांची assistant गिरी करायला लागायची..
म्हणजे ते पतंग उडवणार आणि मी मागे फिरकी पकडाला उभी (वरुन ओरडा पण खायचा तुला साधी फिरकी पकडता येत नाही... :-)), हे लोक गोट्या खेळणार, मी मात्र त्यानी किती जिंकल्या त्याचा count ठेवायचा...

असो, पण कधि कधि मज्जा यायची मी कच्चा लिम्बु म्हणुन माझ्यावाटच राज्य ते घ्यायचे, त्या दोघांच्या मारामारी मध्ये मला judge व्हायला लागायच... :-)


Saee
Saturday, May 05, 2007 - 11:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झालं, माझी धाकटी भन वाचू देत आता हे की आणखी बरेच मुद्दे लागणार तिच्या हाताला! अन्याय! अन्याय!!

:-)पण खरं लिहिलं आहेस, तिची काळजीही तितकीच वाटते. डोक्यावर मिरे वाटणे आणि काळजी करायला लावणे हे एकाच वेळी चाललेलं असतं. प्रत्यक्षात ती आम्हालाच आमच्यापेक्षाही उत्तमपणे सांभाळण्याइतकी समर्थ आहे तरीही:-)





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators