Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 18, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » Archive through April 18, 2007 « Previous Next »

Abhiyadav
Monday, April 16, 2007 - 7:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दंगा..

ऋतू येत होते ऋतू जात होते
कुणाला खबर या(चि) दंग्यात होते



Vaibhav_joshi
Wednesday, April 18, 2007 - 9:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मराठी गज़लचे नवे आशास्थान


... आणि अखेर तो दिवस उजाडलाच ... १० सर्वोत्तम गज़ल मा.सुरेश वैराळकरांकडे दिल्यापासून तीन चार दिवस उत्कंठा शिगेला पोचली होती . आपल्याला जी वाटते ती गज़ल पहिली येईल का ? इतरांकडून फोनवर , चॅटवर जे अंदाज आले आहेत त्यातली एखादी असेल का ? अश्या कित्येक प्रश्नांना घेऊन मा . वैराळकरांच्या ऑफिसमध्ये पाय ठेवताना आपलाच रिझल्ट बघायला जावं असं झालं होतं . त्यात वैराळकरांनी सर्वोत्तम गज़ल निवडून ठेवलीच नव्हती . माझ्यासमोर बसून एक एक गज़ल वाचू लागले . कवीवर्य सुरेश भटांचा एक अन एक शेर मुखोद्गत असणार्‍या वैराळकरांना आपल्या कार्यशाळेतील उत्तमोत्तम शेर न दिसते तरच नवल .

मीनूचा

" कुणी मारवा गात जातो दिवाणा
तुझे याद येते , सुनी रात होते "


श्यामलीचा मतला
" ऋतू येत होते , ऋतू जात होते
मनाचे परी गाव ग्रीष्मात होते "


नचिकेत जोशी ( मी आनंदयात्रीचा )

" सले वेदना काळजाशी तरीही
हसू लोचनी , गीत ओठात होते "


अभिजीत दाते चा

" प्रकाशून स्वप्ने अशी लुप्त झाली
जशी वीज उध्वस्त दर्यात होते "


हे सगळे शेर वानगीदाखल दिले आहेत . अश्या कित्येक शेरांवर ते थांबत होते , परत परत पूर्ण गज़ल वाचत होते .

आणि मग ....

क्रमशः ........



Giriraj
Wednesday, April 18, 2007 - 9:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आवाज आवाज! लवकर येऊ द्या...


Mayurlankeshwar
Wednesday, April 18, 2007 - 9:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवा.. ते 'क्रमशः ' लवकर संपवू नकोस...
काळजाचे ठोके दुपटीने वाढलेत :-)
आवाज कुणाचा???????????????????????


Meenu
Wednesday, April 18, 2007 - 10:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बास की गुर्जी किती ताणून धरलय .. लवकर बोला ..

Mi_anandyatri
Wednesday, April 18, 2007 - 10:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिजेपर्यंत दम निघतो, निवेपर्यंत नाही!
पण एक शंका आहे...
"ऋतू येत होते, ऋतू जात होते" चा नक्की अर्थ काय आहे?


Meghdhara
Wednesday, April 18, 2007 - 10:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव
एकता कपूर स्टाईल नको..

अरे कोणी गुरूदक्षिणा द्यायचं राहिलं का रे?

:-)

मेघा


Mayurlankeshwar
Wednesday, April 18, 2007 - 10:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकता कपूर नको तर मग
'कौन बनेगा गझलपति(पत्नी :-O)' चालेल का?


Psg
Wednesday, April 18, 2007 - 10:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुरुजी.. विद्यार्थ्यांना असा त्रास देणं शो ना हो :-) सांगा लवकर कोण आहे ते 'आशास्थान'..

मयुर, क्रमश: लवकर संपवू नकोस????? का रे बाबा? तुला नाही का उत्कंठा? :-)




Vaibhav_joshi
Wednesday, April 18, 2007 - 11:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि मग ....

वैराळकरांनी एक कागद हातात घेतला ..... कितीतरी वेळ तो कागद हातात घेऊन ते हरवूनच गेले .

हं .. वाह ... क्या बात है ... असं ऐकून ऐकून जीव जायची वेळ आली होती . माझ्याबाजूने ती कुणाची गज़ल आहे वगैरे काहीच दिसत नव्हतं .

शेवटी त्यांनी माझ्याकडे हसून पाहिलं , म्हणाले " तुला घाई नाही ना ? आपण ऑफिसमध्ये बसलो असल्याने हे असे कागदपत्र , अर्ज येतच राहतात . संपवतो हे काम आणि लगेच पुढच्या गज़ल कडे वळू . " असं म्हणून त्यांनी शेरा मारून तो कागद आपल्या शिपायाकडे दिला .

आणि आम्ही गज़लकडे वळलो ...

क्रमशः


Mi_anandyatri
Wednesday, April 18, 2007 - 11:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुर्जी...
झी टीव्ही वरच्या एखाद्या मालिकेची पटकथा का लिहीत नाही तुम्ही??


Meghdhara
Wednesday, April 18, 2007 - 11:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्लोज अप घे रे..
हां.. दुखल्या काय? अजून उंचवा माना..

आजच्या भागात एवढेच.

पॅक अप.


Mankya
Wednesday, April 18, 2007 - 11:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए वैभवा .. अरे हे रे काय ?
हो एखाद्या पटकथेसारखं चाललं आहे हे !

माणिक !


Vaibhav_joshi
Wednesday, April 18, 2007 - 12:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओके . ५ मिनिटात रिझल्ट देतो.

Vaibhav_joshi
Wednesday, April 18, 2007 - 12:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो ...
एका साध्या कल्पनेतून इथपर्यंत कसे आलो काय माहीत . आपल्या कार्यशाळेची १२०० वी पोस्ट निकाल म्हणून टाकताना मला अत्यंत आनंद होत आहे .

सुरेश वैराळकरजी म्हणतात ( हे सगळं त्यांनी स्वतःच्या स्वाक्षरीने गज़ल च्या प्रिंट आऊट वर लिहून दिले आहे .. इतकी त्यांना ही गज़ल आवडली )

" वैयक्तिक तरल प्रेमभावनेचा आविष्कार आणि " तिथे देव नुसते पुराणात होते " सारखा सामूहिक वंचनेच्या सामुदायिक व्यथेला प्रकट करणारा अप्रतिम मिसरा , हे फक्त गज़लेतच एकत्र नांदू शकतात . " गज़ल ही कवितांची कविता असते " या सुरेश भटांच्या विधानाची साक्ष देणारी ही रचना . "



" तरसलो जरी मी , बरसलेच नाही
खुजे मेघ त्या आसमंतात होते "


हा शेर जसा वैयक्तिक अनुभूतीचा भाग असू शकतो तसाच दुष्काळग्रस्त शेतकर्‍याची आर्त व्यथाही असू शकते .

" मला सांग होता कसा दोष माझा ?
जरी ओठ माझे , तुझे दात होते "


ह्या शेराने वैराळकरांना भटांच्या

" हे स्पर्श रेशमी अन हे श्वास रेशमांचे
ये ! आज रेशमाने रेशीम कातरू या "

ह्या ओळींची आठवण करून दिली .
( आणि भटांच्या त्या ओळींचा त्यांनी उल्लेख केल्याने मी खलास झालो . आह ! )

हे असे अप्रतिम शेर असलेली गज़ल खाली पुन्हा देत आहे .

ऋतू येत होते , ऋतू जात होते
तरी ताटवे मग्न झुरण्यात होते

म्हणाया तुझे आटणेही अकाली
तुझे दाटणेही अकस्मात होते

समजण्या मला लागला वेळ थोडा
तुझे प्रेम लपले नकारात होते

मला सांग होता कसा दोष माझा ?
जरी ओठ माझे , तुझे दात होते

तरसलो जरी मी , बरसलेच नाही
खुजे मेघ त्या आसमंतात होते

तिथे पाहिली दानवांचीच सत्ता
तिथे देव नुसते पुराणात होते

इथे कोणती लाट घेऊन आली ?
मला हे किनारे कुठे ज्ञात होते


आणि गज़लकाराचं नाव आहे

नचिकेत आठवले .


मनःपूर्वक अभिनंदन . आपले पुरस्कार पोचवण्यासाठी लवकरच संपर्क साधला जाईल .

पुढील गज़ल लेखन प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा

मा. ऍडमिन , ह्या गज़लेला आपल्या मायबोलीच्या मुखपृष्ठावर मानाचे स्थान द्यावे ही विनंती


Nandini2911
Wednesday, April 18, 2007 - 12:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Congratulations
नचिकेत... हार्दिक अभिनंदन.. :-)


Meenu
Wednesday, April 18, 2007 - 12:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह .. वा ..!! नचिकेत, अभिनंदन ....

Mi_anandyatri
Wednesday, April 18, 2007 - 12:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिनंदन नचिकेत...
हे माझ्यातर्फे... "नचिकेत" नावाची शान वाढवल्याबद्दल!


Meghdhara
Wednesday, April 18, 2007 - 12:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हार्दिक अभिनंदन नचिकेत..
पुढल्या लेखनास शुभेच्छा!!!

मेघा


Princess
Wednesday, April 18, 2007 - 12:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिनंदन नचिकेत...
गझल अगदी सुरेख आहे तुझी.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators