Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 15, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » Archive through April 15, 2007 « Previous Next »

Desh_ks
Tuesday, April 10, 2007 - 10:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री वैभव आणि तुम्ही सारे, ज्यांच्यामुळे हा कार्यशाळेचा संकल्प संपन्न होतो आहे,

तुम्हा सार्‍यांचे मन:पूर्वक आभार आणि हार्दिक अभिनंदन! या निमित्तानं गज़लची जवळून ओळख झाली, तंत्र शिकण्याची संधी लाभली, बरेच समानशील स्नेही भेटले आणि खूप चांगलं लिखाणही वाचायची संधी लाभली. या सार्‍याबद्दल पुनश्च सार्‍यांना धन्यवाद.

"जरा खंत; आनंदही खूप याचा
कसा सुफल संपूर्ण संकल्प त्यांचा

रुजे बीज मातीत जीवे मिळोनी
फुलोनी उद्या वृक्ष होईल त्याचा

निरोपात या हीच आशा उद्याची
निराळ्या जगी वायदा भेटण्याचा

पहा हे कसे मित्र सारे मिळूनी
पुढे नेत हा वारसा वैभवाचा"

(पाचवा शेर नाही लिहिला कारण हे संपावं ही खरं तर इच्छा नाही) :-).

असे विविध प्रकल्प पुन्हा पुन्हा कराल या अपेक्षेत

-सतीश


Jo_s
Tuesday, April 10, 2007 - 11:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, पर्व आवडलं. पण संपलं नाहीये.

कुठे संपले रे, नवे पर्व आले
लगागा वरी स्वार सारे निघाले
असे वैभवी तो गुरूंचा इशारा
मराठी गझलचा उगवला सितारा

सुधीर


Jayavi
Tuesday, April 10, 2007 - 12:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, हे पर्व संपलं असं म्हणताच येणार नाही. आता तर सुरवात झालीये. खरंच......ह्या कार्यशाळेतून खूप काही शिकायला मिळालं. तुझ्याकडून शिकण्यासारखं तर इतकं काही आहे ना.
स्वाती, शलाकाला माझं सुद्धा अनुमोदन :-) स्वाती, आता तू सुद्धा हेच सगळं करते आहेस की....! मायबोलीमुळे खरंच इतके गुणी मित्र मिळालेत ना....!!
आता माझा मोठ्ठा प्रश्न.......नज्म कशी ओळखायची?

Chinnu
Tuesday, April 10, 2007 - 2:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कसे ना समजले मला एवढेही
ललाटापुढे हारती वादळेही
असे वाटले आत्मविश्वास होता
अता जाणवे की अहंकार होता

गुरुजी, :-)
तुमचे स्वाती आणि सहभागी सर्वांनाच धन्यवाद. सर्वांकडून बरेच शिकता आले.
सुधीर, सतीश :-)


Yog
Tuesday, April 10, 2007 - 6:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव,
एक पर्व सम्पलं तरी दुसर चालू करायला हरकत नाही of course if Admin/mods would permit the use of the space . उदा : वेगळ्या वृत्ताची वा थाटाची गझल. कार्यशाळेतून आकलन झाल्यावर मला वाटते या दुसर्‍या पर्वात अधिक उत्कृष्ट व सौन्दर्यपूर्ण गझल लोक लिहीतील यात शन्का नाही.

तूर्तास, मा. वैराळकराना या कार्यशाळेतील कुठले (गझल) शेर आवडले, सौन्दर्यस्थळे, थाट, इत्यादी बाबतीत त्यान्चे निवडक विचार वाचायला आवडतील. त्यानी सुचवलेले काही बदल, फ़ेरफ़ार इत्यादी "सन्कलन" इथे लिहीलेस तर या पहिल्या पर्वाची कहाणी साठा उत्तरी सुफ़ळ सम्पूर्ण का काय म्हणतात तसे होईल असे वाटते.

शिवाय इतक्या एकापेक्षा एक सरस गझलेतून album साठी एकच निवडायला तुझी मदत लागेल... तेव्हा वाट पहातो.

जाता जाता एक प्रामाणिक मत : स्वाती आम्बोळेनी लिहीलेले गझलेचे रसग्रहण, इतरानी केलेले थोडे निरुपण इत्यादी छान आहे. पण गझल हा काव्यप्रकार कवितेपेक्षा फ़ार वेगळा आहे. प्रत्त्येक शेर, गझल स्वताः परीपूर्ण असल्याने खरे तर गझल ही एक अनुभूती आहे. गझलेला रसग्रहण लागू नये. दोन ओळीत(शेर) वाचकाला वा श्रोत्याला आपल्या भावना पोचवायची खुबी त्यात आहे. शब्द भिडतात, भावना पोचतात, आणि मग ती हळू हळू गळी उतरते... असे काहीसे. म्हणूनच गझल लिहीणे आणि ती पेश करणे हे येर्‍या गबाळ्याचे काम नव्हेच कारण ती आशय, विषय, भाषा, अर्थ अन भाव सम्पन्न असावीच लागते. सहज्-गझल आणि meter , यमक, रदीफ़, इत्यादीत बसवलेली कविता यात हा अस्पष्ट फ़रक आहे असे मला वाटते. थोडक्यात शेर वा गझल कळली नाही असे होत नाही (तशी अपेक्षा नसावी?) त्यामूळे रसग्रहणाची गरज रहात नाही. असो.
चू. भू. दे. घे.


Swaatee_ambole
Wednesday, April 11, 2007 - 6:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जया आणि इतर इच्छुकांसाठी..
उर्दू काव्याच्या प्रकारांची थोडक्यात माहिती
इथे आहे.

Vaibhav_joshi
Thursday, April 12, 2007 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिय मित्रांनो ...

नज़्म ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार

मा . सुरेश वैराळकरजी भिमरावदादांसोबत विदर्भाच्या दौर्‍यावर असल्याने निकाल आपल्या हाती १४/ १५ तारखेला पडणार आहे .
तोपर्यंत आता आपण वर्गात दंगा घालू शकतो
:-)




Mayurlankeshwar
Thursday, April 12, 2007 - 7:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणत्या प्रकारचा दंगा? साहित्यीक दंगा तर रोजच चालू असतो.. :-O

Milindaa
Thursday, April 12, 2007 - 9:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय माई, तुमचं पोस्ट बदललं वाटतं? :-)

Anilbhai
Thursday, April 12, 2007 - 3:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कसल पोष्ट?. मी कुठे बदलल?. अरे तो चष्मा कुठे गेला?. :-)

Swaatee_ambole
Thursday, April 12, 2007 - 3:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही पाहिलं होतंत वाटतं दाजी!

Anilbhai
Thursday, April 12, 2007 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे इथे ते मुसलसल आणि गैरमुसलसल बद्दल कोणितरी लिहिल होत, ते कुठे गेल. तो चष्मा पण सापडत नाहिये. :-)

Swaatee_ambole
Thursday, April 12, 2007 - 6:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते वैभवच्या गज़लच्या आधी आहे भाई.

आज काय गैर चष्मा का? :-)
* आता मॉड्सनाच पोस्ट्स सापडेनाश्या झाल्या? :-)


Meenu
Friday, April 13, 2007 - 9:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुरुजींनी इमानदारीत दंगा करा, असं सांगूनही, कुणी दंगा करत नाहीये म्हणजे कमाल आहे. अरे इतका ताण वाटुन घेऊ नका रीजल्टचा ..
नायतर मग आपल्याला एखादी दंगा कार्यशाळा घ्यायला लागेल ..


Pulasti
Friday, April 13, 2007 - 4:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दंगा कार्यशाळा :-)
अगदी दंगा कार्यशाळा नाही तरी "हझल" कार्यशाळा घेता येइल. हसतखेळत (पण तरीही उथळपणे नाही) लिहिणं.. जगणं देखील आता फारसं सोपं राहिलेलं नाही. सगळ्यांबरोबर हझल लिहिताना नक्कीच मजा येइल..
-- पुलस्ति.

Yog
Friday, April 13, 2007 - 7:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

milindaa,
तू भा चा मा केल्याने भाई आणि माई गोन्धळले.. पण (आम्हा) सर्व चाणाक्ष वाचकान्च्या नजरेतून त्या पोष्ट सुटल्या नाहीत हे नमूद करतो. :-)

Jo_s
Saturday, April 14, 2007 - 10:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला, माझा एक दंगा

प्रयत्न

ऋतू येत होते ऋतू जात होते
भितीचे गुपित त्या निकालात होते

गुरूंचा असे खास सल्ला तरीही
कुणी पोर ना दंग दंग्यात होते

असा घोळ होताच, म्हणाल आता
करा कार्यदंगा हसू ज्यात होते

ऋतू येत होते ऋतू जात होते
उगा वाट पाहून ते जात होते

अजूनी मना आस आहेच वेडी
तरीही कुणी येत ना जात होते

सुधीर



Desh_ks
Sunday, April 15, 2007 - 4:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला, दंगा सुरू झाला म्हणायचा :-)

सुधीर,

गमतीशीर आहे तुमची रचना.

गुरूंचा असे खास सल्ला तरीही
कुणी पोर ना दंग दंग्यात होते

अजूनी मना आस आहेच वेडी
तरीही कुणी येत ना जात होते
हे तर छानच आहे.

"असा घोळ होताच, म्हणाल आता"

इथे मात्र "लगागा, लगागा, ललगा, लगागा" असं झालंय.

दंगा करतानाही नियम पाळायचे असा अलिखित नियम असायला हरकत नाही ना?

-सतीश


Jo_s
Sunday, April 15, 2007 - 6:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद सतीशजी

म्ह हे जोडाक्षर आहे म्हणून "गा" समजलो होतो. हा ल असेल तर तिथे बोलाल चालेल ना?


Pulasti
Sunday, April 15, 2007 - 11:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुधीरजी, म्ह हा ल च आहे. बोलाल चालेल..
दंगा आवडला :-)
-- पुलस्ति.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators