Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
काहीच्या काही कविता ...

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » काहीच्या काही कविता « Previous Next »

R_joshi
Friday, April 20, 2007 - 4:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक तु... एक मी

एक मी...
निराशेच्या काळोखात ग्रासलेली
एक तु....
आशेचा किरण आणणारा

एक मी...
स्वप्नाच्या जगात वावरणारी
एक तु...
वास्तवाच भान जपणारा

एक मी...
तुझ मन मोडणारी
एक तु...
मला सतत जपणारा

एक मी...
तुझ्यासाठी जगणारी
एक तु...
अर्ध्यावर साथ सोडणारा.

प्रिति:-)


Jagu
Friday, April 20, 2007 - 5:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिती, एक तू, एक मी भावना छान उतरल्या आहेत.

Mansmi18
Friday, April 20, 2007 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिती,

खुप छान. शेवटचे कडवे मात्र चटका देउन गेले.


Mankya
Friday, April 20, 2007 - 5:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिति .. आवडली !

माणिक !


Mansmi18
Friday, April 20, 2007 - 6:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही च्या काही कविता या सदराला सार्थ ठरणारी कविता देत आहे.
माझ्या कॉलेजात एकदा क्रिअटीव रायटीन्ग स्पर्धा ठेवली होती त्यात काहीही लिहावे (कथा, कविता इ इ) पण पहिली ओळ
"काल रात्री बारा वाजता"
आणि शेवटची ओळ
"नुकतीच पहाट झाली होती"
अशी असली पाहिजे अशी अट होती.
तेव्हा लिहिलेली ही (पहिली आणि शेवटची )कविता.(साधारण १५ वर्शापुर्वी)

काल रात्री बारा वाजता
काय गम्मत झाली होती
जेव्हा माझ्या स्वप्नामधे
ती नुकतीच आलि होती

रात्रीचा तो दुसरा प्रहर
तिच्या स्मिताने केल कहर
तिच्या अस्तित्वाने तेव्हा
रात्र धुन्द झाली होती

ती आणि मीच होतो
कोणी काहीच बोलत नव्हते
कुणीही जागे नव्हते तेव्हा
रात्र सुद्धा झोपली होती

आपले साले असेच होते
बरच काही बोलायचे असते
जेव्हा बोलायची वेळ येते
तेव्हा लाम्ब पळुन जातो

शेवटी म्हटले जाउ दे यार
घेतला पहिजे आपणच पुढाकार
माझ्या मनातील गोष्ट तेव्हा
ओठावरती आली होती

पण माझ्या दुर्दैवाने सुद्धा
तीच वेळ साधली होती
जागा झालो स्वप्नातुन जेव्हा
नुकतीच पहाट झाली होती


R_joshi
Saturday, April 21, 2007 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मन्समि (नाव चुकल बहुतेक) कविता खरच छान आहे. पण त्यातिल एक कडव ऊमगल नाहि ते म्हणजे "आपले सारे असेच असते".

Manogat
Tuesday, April 24, 2007 - 7:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय सांगु तुम्हाले
इपरित घडल
शहराच्या पोरि संग
म्हाय बि सुत जुलल

मित्राले भेटवाय
पोरिले नेल
तोंडावरचा तिचा रुमाल पाहुन
त्याने वेगलच भाकित केल

कोपर्यात बोलवुन
म्हने अबे मुसल्मान हाय काय
परद्या मधे लपवुन
पोरगि दाखवाले आला काय

त्याले म्हन्ल बुवा
पोरगि हिन्दुच हाय
तो तोंडावरचा रुमाल
शहरातली फ़ॅशनच हाय

तुटक्या फ़ुटक्या इंग्रजित
त्यायच introduction केल
त्यायन बि मुक्या वानि
तिले अभीवादन केल

शहरातलि पोरगि म्हन्जे
म्हाया साठि प्रश्नच हाय
थे बोलल्या वर कलत न्हाहि
कारन इंग्रजि तीची म्हने मत्रुभाशाच हाय

भांडनात तिन एकदा
मले "u phool" म्हनल
मराठितल फूल समजुन
मि तीले थांकु म्हनल

शेवटि मले त्रासुन
ती सोडुन गेली
म्हाया नाजुक दिलाले
ती तोडुन गेली
म्हाया नाजुक दिलाले
ती तोडुन गेली






R_joshi
Tuesday, April 24, 2007 - 7:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनोगत खुपच छान. :-)
कवितेच्या बिबिवर टाक.


R_joshi
Tuesday, April 24, 2007 - 7:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ स्वप्न पडाव यासाठी
आराधना मी करते
स्वप्नात माझ्या येशील
म्हणुन फोटो तुझा पाहते

विचार तुझाच रात्रंदिनी
मनी माझ्या असतो
तुझ्याशिवाय मनी माझ्या
ध्यास दुसरा नसतो

जवळ येतोस माझ्या जेव्हा
शब्द सुचत नाही
लांब तुझ्यापासुन आता
मला राहवत नाही

प्रेम हे असच असत
असे सारे म्हणतात
ओठांची भाषा हे
डोळ्यांनी कशी बोलतात

स्वप्नात आज येशिल तेव्हा
नक्कि तुला विचारेन
'प्रेम माझ तुझ्यावर आहे'
आज तुला सांगेन

प्रिति:-)





Manogat
Tuesday, April 24, 2007 - 8:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद रुपल,
कवीतेच्या BB वर पोस्ट केली,पहिले तिथेच करणार होते पण वाट्ल सगळे म्हणतिल की ही कवित या section ला पोस्ट करायला हवि होति.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators