Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 11, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » योग » Archive through April 11, 2007 « Previous Next »

Vaibhav_joshi
Monday, April 09, 2007 - 7:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो ,

योग स्वतः संगीतकार ( आपल्या कार्यशाळेतली एक गज़ल यांच्याचतर्फे संगीतबध्द होणार आहे ) असल्याने मीटर , यती चा प्रश्नच येत नाही . पण फक्त ते नाही तर काही काहे कल्पना फार सुरेख उतरल्या आहेत . उदा :-

नव्या चौकटीला आणि सजे रातराणी .... मला अत्यंत आवडलेले शेर .

योग

ऋतू येत होते , ऋतू जात होते
कधी साथ होती अता बात होते

धुके शिंपते कोवळ्या भेटगाठी
किती बांध ओले वळीवात होते

नव्या चौकटीला नवे पोत देतो
जुनी ओल येते , पुन्हा मात होते

सजे रातराणी पुन्हा मोल घ्याया
रिते सूर्य तांबूस कैफ़ात होते

मला जाळती भास हे सावल्यांचे
निखारे तिच्या दूर जाण्यात होते

नको दाखले ते शशी कौमुदीचे
उरी काजवे तेज लाखात होते

असा योग हा सागरी झुंज देतो
उभे गारदी ते किनार्‍यात होते



Vaibhav_joshi
Monday, April 09, 2007 - 7:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग ..

सजे रातराणी पुन्हा मोल घ्याया
रिते सूर्य तांबूस कैफ़ात होते

ह्या शेर बद्दल मनःपूर्वक अभिनंदन . नाजूक विषय फार सुंदर हाताळला म्हणूनच नाही तर माझी एक पूर्ण विस्मरणात गेलेली गज़ल ह्या शेरमुळे आठवली म्हणून. तुझ्यासाठी मतला आणि ह्याच्या आसपासचा तो शेर पेश करतोय .

अर्ज़ किया है


कोण जाणे काय झाले
एकतर्फी न्याय झाले

रात बाजारात आली
हासणे व्यवसाय झाले


Yog
Monday, April 09, 2007 - 7:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव,
क्या बात है, हासणे व्यवसाय झाले.. आहा!

गझल कार्यशाळेत काही काही अप्रतिम गझला वाचायला मिळाल्या, तुझे खास अभिनन्दन. त्यातही माझ्या प्रयत्नाला इथे स्थान दिलेस त्याबद्दल आभार. पण मेघधाराच्या आपुलकीच्या आग्रहाला टाळू शकलो नाही किम्बहुना तिच्या प्रोत्साहनामुळे ही गझल पूर्ण करू शकलो तेव्हा तिचे विशेष आभार.


Daad
Monday, April 09, 2007 - 11:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग, अतिशय आवडली, तुमची गज़ल!
नव्या चौकटीला, सजे रातराणी, मला जाळती हे मला आवडलेले शेर.
सजे रातराणी एखाद्या अप्रतिम शिल्पासारखा हा शेर आहे. "दगड" कातून "मुर्ती" उरल्यासारखा निखळ अर्थ! वाचणार्‍याला मौन करणारा!


Princess
Tuesday, April 10, 2007 - 4:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळेच शेर एकाहुन एक... रातराणी आणि शशी कौमुदी खुप आवडले.

Jo_s
Tuesday, April 10, 2007 - 4:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग, छान आहे गझल.

नव्या चौकटीला नवे पोत देतो
जुनी ओल येते , पुन्हा मात होते

सजे रातराणी पुन्हा मोल घ्याया
रिते सूर्य तांबूस कैफ़ात होते

हे जास्त आवडले, आणि मक्ताही छान झालाय


Itsme
Tuesday, April 10, 2007 - 5:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला जाळती भास हे सावल्यांचे
निखारे तिच्या दूर जाण्यात होते

खुपच छान ....





Mankya
Tuesday, April 10, 2007 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग .. शब्दरचना, शब्दांचा वापर अन आशय खूप खूप आवडलं !
धुके शिंपते .. आह ! किती हळुवार !
जुनी ओल .. वाह !
रिते सुर्य ... काय बोलायचं ! बरं झाल वैभवा तू लिहिलस ते मला शब्दच सापडेनात रे ! हासणे व्यवसाय .. जबरीच रे वैभवा ! शक्य झालं तर पाठव ही गज़ल !
जाळती भास .. सही है !
शशी कौमुदिचे .. सुंदर उतरलाय हा शेर !
मक्ता .. नाव मस्त गुंतलयस !

माणिक !


Jo_s
Tuesday, April 10, 2007 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव
एकतर्फी न्याय झाले
आणि
हासणे व्यवसाय झाले
मस्त


Psg
Tuesday, April 10, 2007 - 8:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग, अप्रतिम गजल! मतला, मक्ता जबरी! सगळे शेर well thought of . खूप आवडली

Meghdhara
Tuesday, April 10, 2007 - 8:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग सुंदर!
मतला.. वाह!
सजे रातराणी.. बाप रे!
नव्या चौकटीला.. मस्तच. नवे पोत की नवी पोत?

मक्त्यात..
किनार्‍यात की किनार्‍यास?

मेघा



Jayavi
Tuesday, April 10, 2007 - 12:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग........ वा.....मस्तच झालीये रे गझल.
मतला एकदम आवडेश :-)

नव्या चौकटीला नवे पोत देतो
जुनी ओल येते , पुन्हा मात होते
खूप छान.....पण मेघा म्हणतेय त्याप्रमाणे नवी पोत बरोबर वाटतंय.
सजे रातराणी पुन्हा मोल घ्याया
रिते सूर्य तांबूस कैफ़ात होते
आह.......क्या बात है!
मक्ता भी लाजवाब :-)



Chinnu
Tuesday, April 10, 2007 - 2:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नको दाखले ते शशी कौमुदीचे
उरी काजवे तेज लाखात होते

योग, मस्त! मक्ता पण आवडला.

Asami
Tuesday, April 10, 2007 - 4:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धुके शिंपते कोवळ्या भेटगाठी
किती बांध ओले वळीवात होते
>> खलास जमलाय रे. ह्यापुढे काही वाचले नाही.

Yog
Tuesday, April 10, 2007 - 5:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thx people..
नवी पोत.. hhmm may be thats correct. मि "पोत" शब्द पुल्लिन्गी समजत / वापरत आलो. वरील शेरात पुन्हा तो अनेकवचनी आहे (नवे).
मेघा, "आत" हे यमक,अलामत आहे म्हणून किनार्‍यात. असो.


Savyasachi
Tuesday, April 10, 2007 - 8:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग, मस्त रे. झकास लिहीली आहेस.

Savyasachi
Tuesday, April 10, 2007 - 8:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पोत बहुतेक पुल्लींगीच आहे. जाणकार?

Maitreyee
Tuesday, April 10, 2007 - 8:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तरी पोत पुल्लिन्गी शब्द वाटतो. (मी जाणकार वगैरे नाही :-) )
"केला जरी पोत बळेचि खाले
ज्वाला तरी ते वरती उफ़ाळे"
..


Pulasti
Tuesday, April 10, 2007 - 8:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग - गझल छानच आहे!
पोत, रातराणी आणि मक्ता भावला..
पोत - पु. च आहे.
-- पुलस्ति.

Desh_ks
Wednesday, April 11, 2007 - 4:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पोत संबंधी

पोत याचा अर्थ 'टेक्स्चर' असाही आहे. एखाद्या वस्त्राचा पोत मुलायम आहे असं म्हणतात तसं. शिवाय 'लिंपून काढणे' अशा अर्थी पोतणे असं क्रियापद वापरलं जातं.

नवे पोत जुन्या ओलीनं पुन्हा पुन्हा बिघडून जातात म्हणजे नव्या रचनात्मक प्रयत्नांना जुन्या रीती, सवयी, विचार यांचं ग्रहण नेहमीच ग्रासून असतं असा अर्थ मला दिसला.

कवीच्या मनात काय अर्थ आहे ते सांगणं मात्र कवीचाच अधिकार आहे असं मला वाटतं. तो योग कवीनं आणावा ही विनंती.

-सतीश





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators