Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
नंदिनी देसाई

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » नंदिनी देसाई « Previous Next »

Vaibhav_joshi
Monday, April 09, 2007 - 6:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो, गज़लच काय, पण पद्य लिहायचा हा नंदिनीचा पहिलाच प्रयत्न आहे हे तुम्हाला सांगितलं तर खरं वाटेल का?

ऋरु येत होते, ऋतु जात होते
कळ्या लुप्त! काटेच बहरात होते

कसा काळ सरला उमगलेच नाही
कुण्या एक धुंदीत मी न्हात होते

जरी झोंबल्या लाख जखमा मनाला
हसू एक छापील गालात होते

जरी तापले देह वणव्याप्रमाणे
तरी चांदणे बाहुपाशात होते

निखळली कशी पैंजणे आज माझी
जरी बळ पुरेसे न पायात होते

सजा भोगूनीही त्रिशंकू अवस्था?
न स्वर्गात होते न नरकात होते

ऋतू येत होते ऋतू जात होते
जिणे मात्र एकाच श्वासात होते.


Daad
Monday, April 09, 2007 - 11:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, पहिला प्रयत्न न वाटण्याइतकी छान उतरलीये गज़ल.
कळ्या लुप्त, नंतरचा "विराम" मस्तच, अगदी सहज बोलल्यासारखं.
मतला, सजा, मक्ता खूप आवडले. लिहित रहा हो, छान लिहिता. (तुम्ही चांगल्या कविताही लिहीत असणार.)


Bee
Tuesday, April 10, 2007 - 2:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदीनी.. छान आहे गझल..

Jo_s
Tuesday, April 10, 2007 - 4:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, उत्तमच आहे ही गझल
खास करून
ऋरु येत होते, ऋतु जात होते
कळ्या लुप्त! काटेच बहरात होते

जरी झोंबल्या लाख जखमा मनाला
हसू एक छापील गालात होते

आणि

सजा भोगूनीही त्रिशंकू अवस्था?
न स्वर्गात होते न नरकात होते

हे शेर, क्या बात है....
कमीत कमी ५ शेर लागतात म्हणून नाहीतर् हेच सगळ बोलून जाताहेत.

सुधीर


Princess
Tuesday, April 10, 2007 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे नंदिनी, सुरेख लिहिलय... कळ्या लुप्त, छापील हसु आणि पैंजणे विशेष आवडले. तू नक्कीच छान लिहु शकशील, याची खात्री वाटते.

Mi_anandyatri
Tuesday, April 10, 2007 - 4:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा..
सारेच शेर आवडले.. :-)


Mankya
Tuesday, April 10, 2007 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी ... हि गज़ल फारच वेगळी बरं ! जीवनक्रमानुसार लिहिलिये तू तर .. म्हणजे बघ जीवनाच कश्या उत्पत्ती, स्थिती अन लय अशा अवस्था असतात तशीच वाटली ! एकंदरीत मतल्यापासून मक्त्यापर्यंतचा प्रवास आवडला !
मतला ... लुप्त शब्दाचा वापर आवडला !
धुंदीत ... ईथे ही गज़ल तारुण्यात प्रवेश करतेय !
हसू छापील ... वाह !
चांदणे .. विरोधाभास उत्कृष्ठ साधलायेस !
त्रिशंकू .. मस्तच .. ईथे तारूण्य संपून लयाकडे वाटचाल !
एकाच श्वासात .. मक्ता अप्रतिम ... आवर्तन पुर्ण ... जीवनाचं अंतिम सत्य !

प्रयत्न ...???? अन तो ही पहिला ..??? वाटत नाही !

माणिक !


Bhramar_vihar
Tuesday, April 10, 2007 - 7:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, तुझ्या कथे सारखीच गजलही छान उतरलीये. तुझ्याकडुन अपेक्षा वाढल्यात!

Chinnu
Tuesday, April 10, 2007 - 2:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कळ्या लुप्त! काटेच बहरात होते

जरी झोंबल्या लाख जखमा मनाला
हसू एक छापील गालात होते

जरी तापले देह वणव्याप्रमाणे
तरी चांदणे बाहुपाशात होते

सजा भोगूनीही त्रिशंकू अवस्था?
न स्वर्गात होते न नरकात होते

ऋतू येत होते ऋतू जात होते
जिणे मात्र एकाच श्वासात होते.

नंदिनी! वरील सर्व शेर आवडले. लिहीत रहा. पु.ले.शु.

Jayavi
Tuesday, April 10, 2007 - 3:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी........किती मस्त surprise दिलंस..... गझल फ़ार फ़ार आवडली. आता तुझ्या छान छान गोष्टींसारख्या तुझ्या कविता, गझल पण वाचायला मिळ्णार :-)

मतला एकदम आवडेश!!

जरी झोंबल्या लाख जखमा मनाला
हसू एक छापील गालात होते
वा........क्या बात है!

लिहित रहा गं....!


Meghdhara
Tuesday, April 10, 2007 - 4:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी
एक एक शेर सुंदर.
आणि पहिलं पद्य?
ग्रेट!!!

मेघा


Dineshvs
Tuesday, April 10, 2007 - 5:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदीनी, मला खुप आवडली हि गझल.
मला पैजणाच्या शेर मधे दुसर्‍या ओळीत, न नसावा, असे वाटतेय.


Pulasti
Tuesday, April 10, 2007 - 6:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, गझल खूप आवडली! पहिलाच काय १००वा प्रयत्न असता तरी आवडावी अशी गझल आहे..
छापील हसू, पैंजणे, त्रिशंकू - मस्त शेर. पण मतला केवळ अप्रतिम!! तयार मिसर्‍यावर शेर लिहिणे खूपच कठीण असते.. निदान मला तरी फार अवघड जाते. पण तुझा "कळ्या-काटे" शेर .. वा! वा!!
लिहित राहा. शुभेच्छा!!
-- पुलस्ति.

Sanghamitra
Thursday, April 12, 2007 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी मस्त झालीय. मतला तर सगळ्यात सहज आहे.

Zakasrao
Friday, April 13, 2007 - 4:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नन्दिनी मला गजल मधल बिल्कुल कळत नाही पण कार्यशाळेमुळे आता इकडे येवुन वाचायला सुरवात केली आहे. मागचे ३- ४ दिवस डोक शांत नव्हत म्हणुन आज परत गजल वाचली. गजल आवडली. १, ३ , ६ नं. चे शेर खुप आवडले.
तुला ल गा गा शेवटी झेपल म्हणायच.

Pendhya
Friday, April 13, 2007 - 11:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बोहोत खूब! क्या बात है!
माहित नव्हतं की तू गजल पण करत असशील.
कुठला एक शेर निवडू? संपुर्ण गजलच अप्रतीम आहे.
लिहीत रहा.


Shyamli
Wednesday, May 09, 2007 - 6:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिनंदन ग, मतला जीवघेणा आहे अगदी
आणि छापील हसू पण सहीच, वडलं




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators