Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 28, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » प्रसाद मोकाशी » Archive through March 28, 2007 « Previous Next »

Vaibhav_joshi
Tuesday, March 27, 2007 - 5:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो ,

प्रसाद मोकाशी बद्दल मी काय लिहीणार

प्रसाद मोकाशी

ऋतू येत होते , ऋतू जात होते
पुराणेच गाणे जणू गात होते

असा दग्ध होतो तुझ्या आठवाने
जशी तेवताना जुनी वात होते

मुक्या अंगणातून येतात हाका
तुझ्या पावलांचे ठसे ज्यात होते

असा एक दाता मला भेटला की
तयाचेच आसू कटोर्‍यात होते

उगा वाटले जन्म आहे युगाचा
इथे संपले ते क्षणार्धात होते

तसे भेटती लोक कित्येक येथे
स्वतःशी कधी का मुलाकात होते ?

मला शोधले मीच विश्वात सार्‍या
परी विश्व सारेच माझ्यात होते


Sanghamitra
Tuesday, March 27, 2007 - 5:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद काय बोलू?
तुझी कुठलीही कविता वाचताना पहिली प्रतिक्रिया हीच असते
स्स्स्स्स. कसे सुचत असेल इतके खोलवर परिणाम करणारे?
सगळं स्वच्छ सरळ मांडलेलं. रसग्रहणाची, विश्लेषणांची गरजच नाही. फक्त वाचा आणि तो आनंद अनुभवत रहा.

>> असा दग्ध होतो तुझ्या आठवाने
जशी तेवताना जुनी वात होते
केवळ वा!

Daad
Tuesday, March 27, 2007 - 5:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरय, प्रसाद बद्दल काय लिहिणार (आम्ही तर अगदीच पामर)? तरीही
सगळेच शेर अप्रतिम. मल खास आवडलेले
असा एक दाता...
तसे भेटती...
मला शोधले...

असा दग्ध... यात जुनी वात म्हणजे नक्की काय म्हणायचय, प्रसाद? विझत आलेल्या दिव्याची वात विझताना ज्योत अधिक तेजाने जळते अशा अर्थाने?

एक नितांत सुंदर गज़ल!


Desh_ks
Tuesday, March 27, 2007 - 5:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'प्रासादिक'!

फारच सुंदर!

असा दग्ध होतो तुझ्या आठवाने
जशी तेवताना जुनी वात होते

मुक्या अंगणातून येतात हाका
तुझ्या पावलांचे ठसे ज्यात होते

असा एक दाता मला भेटला की
तयाचेच आसू कटोर्‍यात होते

हे तिन्ही शेर मनापासून आवडले. "जुनी वात" या रूपकातून व्यक्त होणारी घुसमट ह्रद्य आहे. स्नेह (आठवणींचा) मिळत असतानाही, किंबहुना त्या मुळेच, ना धड जळून राख होणं ना धड न जळता राहाण (कोरडं) अशी अवस्था अस मला दिसलेल त्या वातीच चित्र आहे. सुंदर!

अभिनंदन प्रसाद!


Psg
Tuesday, March 27, 2007 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुक्या अंगणातून येतात हाका
तुझ्या पावलांचे ठसे ज्यात होते

तसे भेटती लोक कित्येक येथे
स्वतःशी कधी का मुलाकात होते ?

हे दोन शेर विशेष आवडले. पूर्ण गजल सुरेख!


Bairagee
Tuesday, March 27, 2007 - 5:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



प्रिय प्रसाद,

एकंदर गझल छान आहे. द्विपदींतल्या कल्पना चांगल्या आहेत. पण त्या घासूनपुसून अजून स्वच्छ करायला हव्यात, असे वाटते.
असा दग्ध होतो तुझ्या आठवाने
जशी तेवताना जुनी वात होते

वा! वा!! खालच्या ओळीत बदल सुचवण्याचे धाडस करतो.
असा दग्ध होतो तुझ्या आठवाने
विझू लागली की जशी वात होते


मक्ताही आवडला.


Mankya
Tuesday, March 27, 2007 - 6:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद ... किती खोल .. विविध भावनांना स्पर्श करणारी गजल ..!
सागरासारखी शांतही पण अथांग, तेवढाच विशाल आशय देणारी आणि सुंदर आकाशाचं प्रतिबिंब दाखवणारी, विचारमंथन करता अनेक सुरेख अर्थांना जन्म देईल अशी वाटली हि अजोड कलाकृती !

मुक्या अंगणातून ... आह !
जन्म युगाचा, आसू कटोर्‍यात ... खूप अर्थाचे पदर आहेत या ओळीत !
स्वतःशी मुलाकात .. खरंय !
मक्ता ... दमदार आहे आणि तेवढाच सुंदरही !

माणिक !


Jo_s
Tuesday, March 27, 2007 - 6:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद
अ प्र ती म

असा दग्ध होतो तुझ्या आठवाने
जशी तेवताना जुनी वात होते

मुक्या अंगणातून येतात हाका
तुझ्या पावलांचे ठसे ज्यात होते

आणि

उगा वाटले जन्म आहे युगाचा
इथे संपले ते क्षणार्धात होते

तसे भेटती लोक कित्येक येथे
स्वतःशी कधी का मुलाकात होते ?

हे फारच आवडले.


Jayavi
Tuesday, March 27, 2007 - 7:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद....केवळ सुरेख!! कुठून शोधायची नवीन विशेषणं?
मक्ता Terrific!!

असा दग्ध होतो तुझ्या आठवाने
जशी तेवताना जुनी वात होते ..... वा....वा!

उगा वाटले जन्म आहे युगाचा
इथे संपले ते क्षणार्धात होते........ अगदी खरंय!

तसे भेटती लोक कित्येक येथे
स्वतःशी कधी का मुलाकात होते ? .....आई गं!

मला शोधले मीच विश्वात सार्‍या
परी विश्व सारेच माझ्यात होते ......कळस!!

तुझ्या कविता एक वेगळीच अनुभूती देतात.


Mayurlankeshwar
Tuesday, March 27, 2007 - 9:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद... 'गझल' म्हणजे नेमके काय ते जाणवलं प्रत्येक शेरातुन...

असा एक दाता मला भेटला की
तयाचेच आसू कटोर्‍यात होते
विलक्षण सुंदर!


Gs1
Tuesday, March 27, 2007 - 10:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद, फार सुरेख
२, ३, ४ विशेष आवडले


Ganesh_kulkarni
Tuesday, March 27, 2007 - 10:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद,

खुप छान गज़ल!
=======================
१)मुक्या अंगणातून येतात हाका
तुझ्या पावलांचे ठसे ज्यात होते
=======================
२)असा एक दाता मला भेटला की
तयाचेच आसू कटोर्‍यात होते
=======================
३)तसे भेटती लोक कित्येक येथे
स्वतःशी कधी का मुलाकात होते ?
=======================
४)मला शोधले मीच विश्वात सार्‍या
परी विश्व सारेच माझ्यात होते
=======================
फार छान शेर आणी फार छान गज़ल!


Mi_anandyatri
Tuesday, March 27, 2007 - 11:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुक्या अंगणातून येतात हाका
तुझ्या पावलांचे ठसे ज्यात होते
मला हा शेर खूऽऽऽऽऽऽऽप आवडला...

तसे बरेच शेर दाद घेऊन जाणारे आहेत यात.
पण हा म्हणजे खस्स्स्स्स्स्स्स्स्स्स........... :-)


Lalu
Tuesday, March 27, 2007 - 1:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद, सुन्दर आहे गज़ल. साधी,सोपी. 'दाता' आवडला. सगळे इतक्या वेगवेगळ्या सुंदर कल्पना मांडतायत....

Yog
Tuesday, March 27, 2007 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पावलान्चे ठसे.. एकदम छान!

Milya
Tuesday, March 27, 2007 - 6:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा प्रसाद... तुझ्या लौकिकाला जगणारी गज़ल..

साध्य सोप्या शब्दात अर्थपूर्ण कल्पना मांडायची तुझी हातोटी जबरदस्त आहे...

सर्वच शेर आवडले

'प्रसाद' ह्या साध्या सोप्या नावातच काहीतरी साठवलेले आहे असे वाटते


Meghdhara
Tuesday, March 27, 2007 - 6:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह!
सन्मित्रा म्हणते त्याप्रमाणे फक्त वाचा. आपोआप आत झिरपत रहातं.

मेघा


Paragkan
Tuesday, March 27, 2007 - 6:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kya baat hai! good one prasad!

Meenu
Wednesday, March 28, 2007 - 4:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह प्रसाद मस्त गज़ल ...!!

Imtushar
Wednesday, March 28, 2007 - 11:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद,
खूपच छान गझल आहे


असा एक दाता ...
हा शेर खूपच आवडला

-तुषार





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators